राजकीय-सामाजिक-आर्थिक लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
राजकीय-सामाजिक-आर्थिक लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, ८ सप्टेंबर, २०२३

इंडिया काय नि भारत काय || What is India, and what is Bharat?


apaliwritergiri_blogpsot_india_bharat_politics_News
PC:google

इंडिया काय नि भारत काय

मले काय मिळून राहिले त्याचे

इंडियाचा भारत करा नाही तर भारताचा इंडिया करा

मले काय मिळून राहिले त्याचे


मले सांग,

याने देशातला जाती-धर्म भेद थांबेल काय ?

दरवेळी दंगलीत मरणारा सामान्य माणूस "भारत माता कि जय " बोलला तर मरायचा वाचेल काय ?

नाही ना .. मग इंडिया काय नि भारत काय

मले काय मिळून राहिले त्याचे



मले सांग,

शेतकरी आत्महत्या थांबेल काय ?

जमिनी, नदी आणि जंगलांचा विनाश होणे थांबेल काय ?

नाही ना .. मग इंडिया काय नि भारत काय

मले काय मिळून राहिले त्याचे



मले सांग,

स्त्रीभ्रूण हत्या थांबेल काय ?

भारतात निर्भया निर्भयपणे राहू शकेल काय ? रात्रीची एकटी फिरू शकेल काय ?

नाही ना .. मग इंडिया काय नि भारत काय

मले काय मिळून राहिले त्याचे



मले सांग,

मणिपूर जळायचे थांबेल काय ?

काश्मीर मध्ये सुरक्षित वातावरण मिळाले काय ?

गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत होणारी जाती पातीची भांडण थांबतील काय ?

नाही ना .. मग इंडिया काय नि भारत काय

मले काय मिळून राहिले त्याचे



मले सांग,

"भारत" म्हटले कि, मले नोकरी मिळेल काय ?

चांगले सरकारी शिक्षण मिळेल काय ?

सरकारी हॉस्पिटल मध्ये चांगल्या सुविधा मिळतील काय ?

बिना खड्याचे चांगले रेशन मिळेल काय ?



नाही ना .. मग इंडिया काय नि भारत काय

मले काय मिळून राहिले त्याचे



म्हणजे तुझा विरोध आहे ना "भारत" नावाला ..

बापाओ पुन्हा तेच

विरोध करून मले काय मिळणार

समर्थन करून मले काय मिळणार

राजा बदलतो तसे राज्यांचे नाव बदलते

आतापर्यन्त १००हुन अधिक जिल्हे किंवा राज्याची नावे बदलली आहेत

पण

मले काय मिळून राहिले त्याचे

राजा नाव बदलत राहतो पण प्रजेचे समस्या आणि प्रश्न मात्र बदलत नाही


अंजली प्रविण  

amkar.anju@gmail.com


मंगळवार, १५ ऑगस्ट, २०२३

आजादी का अमृत महोत्सव vs निःशब्द भारतीय || Amrit Mahotsav of Independence vs Quiet Indian

आजादी का अमृत महोत्सव vs निःशब्द भारतीय  

apali-writergiri-azadi-15th-august-india-swatantryadin


गेल्या काही वर्षात स्वातंत्र्यदिन हा फक्त झेंडा फडकविण्यासाठी, त्या झेंड्यासमोर फोटो किंवा सेल्फी काढण्यापुरता मर्यादित राहिला आहे. त्याचे फोटो सरकारी वेबसाईटला टाकले तर त्याचे पार्टीसिपेशन सर्टिफिकेट घेण्याचे पण नवीन फॅड सुरु आहे.  हा शोऑफ केला कि, " तुमचे भारतीयत्व खरे असे ठरविले जाते." अन्यथा तुम्ही बाटलेले किंवा देशद्रोही ठरता. 


आज इंग्रंजांच्या गुलामगिरीतून  स्वातंत्र्य होऊन ७५ वर्षे पूर्ण झाली. पण  तेव्हापासून भारत राजकारणींच्या गुलामगिरीत अडकत गेला. भारतात "लोकशाही" राज्यव्यवस्था स्थापन तर झाली पण "लोकशाही" अमलांत मात्र अजूनही आलेली नाही.    देशाला स्वातंत्र्य  मिळाल्यानंतर अनेक सकारात्मक स्वप्न भारतीयांच्या मनात रुजली होती. " लोकशाही देश किंवा स्वतंत्र भारत म्हणजे आपण आपला नेता निवडणार. जो लोकांचे प्रतिनिधित्व करणार. जनकल्याणाचे काम निःपक्षपणे करणार. देशातील चांगले शिक्षण, रोजगार, आरोग्य, अन्नपुरवठा यांसारख्या मूलभूत गरजांसाठी पहिले प्राधान्य देणार. भारत धर्मनिरपेक्ष असणारा पहिला देश ठरणार. भारतात स्वातंत्र्य, समता आणि बंधुता असणार. आपल्याला आपल्या देशात सुरक्षित वातावरण मिळणार. पण वास्तविकता मात्र पूर्णपणे उलट आहे. भारतातील लोकशाही फक्त  "धर्म आणि पैसा" या दोनच गोष्टींवर अवलंबून आहे.

आजादी का अमृत महोत्सव निमित्ताने  प्रत्येक भारतीयासाठी काही प्रश्न या लेखाच्या माध्यमातून मांडत आहे. खालील प्रश्नांचा आणि मुद्द्यांचा नक्की विचार पुढच्या मतदाना आधी केलाच पाहिजे. 


१.  क्लार्क असो किंवा  IPS ऑफिसर लाखों तरुण स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतात. त्यातील जेमतेम ५ ते १० टक्के उत्तीर्णांना सरकारी क्षेत्रात काम करण्याची संधी मिळते. पण लोकांचा नेता - राजकारणी बनण्यासाठी "मोठा गुन्हा करणे" हि पात्रता असते का ?  ज्या व्यक्तींवर कालपर्यंत करोडोंचा भ्रष्टाचार, स्त्रीचे लैंगिक शोषण आणि खूनासारखे गंभीर आरोप असतात.  या लोकशाही देशातील जनता त्याच व्यक्तीला कशी निवडून देते ? एकीकडे सामान्य माणसाने जर साधी चोरी केली तर त्याला समाजात कुठेच नोकरी मिळत नाही. पण सध्या मंत्रिमंडळ ते आपल्या गावातील सरपंचपर्यंत  सर्व नेते खुलेआम गुंडगिरी करतात किंवा त्यांचे कार्यकर्ते खुलेआम दादागिरी करतात. याना कोणत्याही कायद्याचे भय का नसते ? उलट या लोकनेत्याला किंवा कार्यकर्त्यांना सामान्य जनता का घाबरून असते ? मग तरीही आपण याना का निवडून देतो ? या विरुद्ध सर्व जनता एकञ का येऊ शकत नाही ?  


२.  गल्ली गल्लीत  किंवा गावो गाव "मंदिरे / मस्जिद /चर्च  " दिसतील. या धर्मस्थळांसाठी करोडो खर्च होतात. करोडोंची देणगी देखील आपली भारतीय जनता देते. " मंदिर याही बनेगा" घोषणा करत करोडो लोक रस्त्यावर उतरतात. दंगली करतात.  मात्र हि जनता आपल्या गावात "रस्ते नाही, पाणी नाही,  शाळा नाही, दवाखाना नाही किंवा रोजगार नाही यासाठी का एकत्र येत नाही?"  आपण ज्या नेत्याला मत देतो तो मात्र रस्ते, शाळा, दवाखाना वैगरे अनेक आश्वासने देतो. त्यासोबत धर्माच्या नावाने  कीड डोक्यात सोडून जातो. त्यानंतर दवाखाने-शाळा तर कधी बनत नाही पण धर्माची कीड वाढत राहावी म्हणून गावात "धर्मस्थळ" १०० % बांधले जाते. यासाठी आपण त्या नेत्याला निवडून देतो. पण यामुळे तुमची मुलं शिक्षित होणार का ? रोजगार प्रश्न सुटला का ? तुमच्या गावात हॉस्पिटल सेवा बनली का किंवा सुधारली का ?पाण्याचा समस्या मिटल्या का ? हे प्रश्न कधी तुम्ही निवडून दिलेल्या नेत्याला / पक्षाला विचारले का ? कधी प्रश्न विचारण्याची साधी संधी तरी मिळाली का ?

 

३.  भारत हा  धर्मनिरपेक्ष देश आहे म्हणून त्याची ओळख होती. पण आज आपले लोकनेते उघडपणे धर्माच्या आणि जातीच्या नावाने भडकाऊ भाषण करतात. जातीभेदाचे विष पेरतात.  त्यामुळे दंगली ते मोबलिंचिंग सारखे अनेक गंभीर घटना वाढल्या आहेत. हजारो लोक आज याचे बळी ठरले आणि स्त्रियांवर अमानुषपणे लैंगिक अत्याचार झाले. ज्यात कायम सामान्य जनतेचाच बळी गेला आहे.  धर्म आणि  जात नावाच्या अफूने सामान्य जनतेला इतके व्यसनाधिन आणि निकामी बनवून ठेवले आहे कि तो याविरुद्ध प्रश्न विचारत नाही. उलट हि धर्म आणि जातीच्या नावाने जेव्हा नेता बोलेल "मारा कि कसलाही न विचार करता एक भारतीय आपल्याच दुसऱ्या  भारतीय बंधूला मारत सुटला आहे." मग आपण धर्मनिरपेक्ष भारत म्हणून का स्वातंत्र्यदिन साजरा करावा ?


आज ना आपल्याकडे समान न्यायव्यवस्था आहे. ना रोजगाराच्या संधी आहेत. ना चांगल्या प्रतीचे सरकारी शिक्षण गावोगावी आहे. ना पाणी समस्या मिटली. अनेक लैंगिक अत्याचार आणि दंगली करणारे आरोपी मोकाट सुटले. दंगलीत लाखोंची कत्तल होतेय .  तीन दिवस अमृत महोत्सवाला करोडो खर्च होतात. पण दुसरीकडे दोन वेळचे जेवण नाही म्हणून सामान्य माणूस तडफडून किंवा आत्महत्या करून मरतो आहे.  गरीब हा अधिक गरीब होत गेला. श्रीमंत अधिक श्रीमंत होत आहे. पुन्हा याच गुंड प्रवृतीचे - धर्माचे विष पेरणारे आणि पैशासाठी क्षणाक्षणाला पक्ष बदलणाऱ्याला मत देणार असाल तर हा धर्मनिरपेक्ष - लोकशाही भारत नाही.   

मग नेमक्या कोणत्या लोकशाही भारताचा स्वातंत्र्यदिन आज साजरा होत आहे ?






सोमवार, ७ ऑगस्ट, २०२३

"समाजस्वास्थ्य" - रघुनाथ धोंडो कर्वे यांच्या जीवन कार्यावर आधारित एक उत्कृष्ट नाटक || Samajswasthya - R. D. Karve

 "समाजस्वास्थ्य" - रघुनाथ धोंडो कर्वे यांच्या जीवन कार्यावर आधारित एक उत्कृष्ट नाटक. 


समागम, हस्तमैथुन आणि लैंगिक इच्छा असे शब्द जरी आपल्या मोबाईलवर  दिसले. तर लाजेमुळे आज हि तो मोबाईल कोपऱ्यात नेऊन मग त्या पोस्टची लिंक आपण उघडून बघतो किंवा न बघताच अश्लिलतेचे लेबल लावून लगेच ती पोस्ट डिलीट करून टाकतो. 

तुमच्यासोबत पण असा अनुभव नक्कीच आला असेल. 

samajswastya-raghunath-karve-sex-education-apali-writergiri
PC: Facebook


आजही वयात येताना होणाऱ्या शारीरिक बदलांची आणि त्यांनतर वाढत जाणाऱ्या लैंगिक आकर्षणाची भीती आणि  अज्ञानामुळे मनात प्रचंड प्रश्न निर्माण होतात.   मनात येणाऱ्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी आजूबाजूला कोणीच नसते. कोणाला जर आपण आपल्या मनातल्या भावना बद्दल सांगितले तर, " किती ते वाईट विचार , पापी विचार, चुकीच्या वळणावर मुलं चालली,  शेण खाल्लं वैगरे लेबल त्यांना दिले जातात.  अनेकजण आपण हे पाप केलं याच ओझं आयुष्यभर डोक्यावर घेऊन बसलेले असतात. अलीकडेच 'लैंगिक शिक्षण' हा विषय शाळेत नामपात्र शिकवायला सुरुवात झाली. पण तरीही 'लैंगिक शिक्षण' या विषयाबाबतीत शिक्षकांना आणि पालकांनाच जनजागृती नसेल तर ते विद्यार्थांना काय शिकवणार ? कसे शिकवणार ? 


सोशल मीडियाच्या जगात एका क्लिक वर सर्व गोष्टींची माहिती मिळते.  तरीही २०२३ मध्ये देखील "लैंगिक शिक्षण" हा एक टॅबू म्हणूनच पाहिला जातो.  पण र. धों. कर्वे यांनी  १९३० च्या दशकात लैंगिक शिक्षण आणि संततीनियमन याच ज्ञान लोकांपर्यंत पोहोचावं याकरिता 'समाजस्वास्थ्य' नावाचं मासिक सुरु केलं होत. त्यांची पत्नी मालती देखील त्यांच्या सोबत खंबीर उभ्या होत्या.  लैंगिक शिक्षण, लैंगिक स्वातंत्र्य, स्त्री मुक्ती, स्त्री शिक्षण, अभिव्यक्ती स्वातंत्र्य यासाठी र. धों. कर्वे यांनी आपले संपूर्ण जीवन समर्पित केले. त्यांनी या लेखांमधून लैंगिक साक्षरता नसल्यामुळे स्त्री-आणि पुरुष दोघांच्या हि शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यावर दुष्परिणाम होत असल्याचे मांडले होते. त्यांच्या बेधडक आणि स्पष्टरित्या विचार मांडल्यामुळे त्यांच्यावर १९३१ मध्ये व्यभिचाराचे अनेक गुन्हे दाखल झाले आणि दंड झाले. तरीही त्यांनी त्यांचे कार्य थांबविले नाही. त्यांनी समलैंगिक संबंधाबद्दल हि उघड भाष्य केले होते. त्यानंतर  १९३४ त्यांच्यावर "अश्लीलतेचे लेबल लावून" पुन्हा नवीन खटला दाखल झाला. यावेळी व्यक्ती स्वातंत्र्याचा विचार करून डॉ.  बाबासाहेब आंबेडकर खुद्द स्वतः त्यांचे वकील म्हणून उभे राहिले. बाबासाहेबांनी कर्वेंची बाजू खूप शिताफीने न्यायालयात मांडली.  तेव्हा नायमूर्तींनी देखील " लैंगिक शिक्षण कशाला पाहिजे ? का तो प्रश्न उत्तरांचा भाग ठेवला ? कशाला ती विकृती ? बोलत अनेक प्रश्न उभे केले. तेव्हा बाबा साहेबानी " जर ते प्रश्न विकृती असेल तर ती विकृती ज्ञानाने दूर होईल." अश्यापद्धतीने त्यांची बाजू मंडळी होती. कर्वेंचं लिखाण हे अश्लील नसून काळाला सुसंगत आणि समाज परिवर्तनासाठी किती गरजेचं आहे हे न्यायालयात पटवून देण्याचा त्यांनी  प्रयत्न केला पण धर्माच्या बेडीत अडकलेल्या आणि धर्मसंकल्पनेत शारीरिक संबंधांना घाणेरडं मानलं गेलेल्या काळात त्यांचं म्हणणं ऐकणार ते कोण ? खरतर १९३० ते आजचे २०२३  काळ बदलला म्हटले तरीहि आजच्या काळातही कोणी ते समजून घेईल असं वाटत नाही. शेवटी ती केस आंबेडकर आणि कर्वे हरले. कर्वेंना २०० रुपये इतका दंड झाला. पण तरीही कर्वेंनी मासिक छापणं सुरूच ठेवलं. 

२४ जून १९४० पुन्हा खटला दाखल झाला. त्यावेळी प्रथम खटल्याचा निकाल र. धो कर्वे च्या बाजूला लागला होता. 

लैंगिक शिक्षणाबाबत येणारे प्रश्न लोकांचे होते.  त्या प्रश्नाची विज्ञानदृष्टया योग्य उत्तरे देणे म्हणजे धर्माने बांधलेली समाजाची घडी विस्कटेल अशी भीती समाजाला वाटते. मग अस्वस्थ अवस्थेतच समाज पुढे चालत राहतो. एकीकडे आपण किती मॉडर्न झाल्याचे सोशलमिडियातुन दाखवतो. पण दुसरीकडे आज हि " लैंगिकता" म्हंटले कि तितकेच "अज्ञान" आहे जितके १९३० साली होते. 

या लेखामागील उद्देश इतकाच कि, जसे लैंगिक शिक्षण विषयाबाबतीत आपण सिग्मन्ट फ्राईड आणि अलबर्ट एलिस यांचे संदर्भ  वाचन करतो. त्या प्रमाणे भारतातील र धो कर्वेंच्या लेखनाचा हि अभ्यास करावा. तसेच आपल्याला लैंगिक शिक्षण आणि लैंगिक स्वातंत्र्य विषयाबाबतीत असेलेले गैरसमज दूर करावा.  

सदर नाटक युट्युबवर पाहायला मिळेल. किंवा खालील लिंकवर क्लिक केले तरीही नाटक पाहायला मिळेल. 

"Samajswastya YouTube Link"

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

लेखिका : अंजली प्रविण, ८+ वर्षांपासून समुपदेशक आणि डेटा विश्लेषक  म्हणून सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. 

amkar.anju@gmail.com










रविवार, ६ ऑगस्ट, २०२३

मैत्री कोणाशी होते ? कि मैत्री कोणाशीही होते ? || Happy Friendship Day

 मैत्री कोणाशी होते ? कि मैत्री कोणाशीही होते ?

friendship-day-friends-apali-writergiri-blogspot


मैत्री कशी करायची, मैत्री कोणाशी करायची, मैत्री कोणत्या वयोगटाशी करावी, कोणत्या जाती - धर्मातील व्यक्तीशी करावी, मैत्री किती वेळासाठी करावी... कशालाच काही बंधन नसते. "मैत्री"  कळत- नकळत केव्हाही आणि कोणाशीही होऊ शकते. 


आपण एकटेच जन्माला येतो... तेव्हा आपली पहिली असते कि, आपल्याला बोलायचं असत आणि खूप बोलायचं असत. तेव्हा नुकतेच हुंकार द्यायला शिकलेले बाळ मध्यरात्रीचे आपल्या आई बाबांसोबत गप्पा मारत होते. आईपेक्षा हि बाबांच्या प्रत्येक वाक्याला "हू... हू... हा... " सुरु होते. तेव्हा ती आई बोलते कि, "तुमची गट्टी भारी जुळली." मैत्रीत बोलणे आणि शेअरिंग किती महत्वाचे असते. हे  इथूनच आपण शिकतो. 


त्यानंतर मैत्री होते आपल्या भावंडांशी. कधी एकत्र खेळायचे, चिडायची, भांडायचे पण पुन्हा एकत्र येऊन मस्ती करायची. मॆत्रीत रुसवे- फुगवे होणारच पण ते क्षणभराने विसरून पुन्हा एकत्र येणे. हे आपण इथूनच शिकलो. 


शाळेत जाऊ लागल्यावर पहिली मैत्री होते ती, माझ्या बाजूला बसलेल्या विद्यार्थीसोबत, पहिल्यांदा एकमेकांच्या बाजूला बसणे , मधल्या सुट्टीत लवकर डब्बा शेअर करून खेळायला वेळ काढणे, एकमेकांना अभ्यासात मदत करणे, समविचारी छोटे छोटे ग्रुप बनवून शर्यती लावणे. शर्यत संपली कि, पुन्हा खांद्यावर हात ठेवून एकत्र येणे. हे टीम वर्क आपण इथूनच शिकतो. 


कॉलेजला गेल्यावर मैत्री साठी पण एक दिवस साजरा केला जातो. ज्यात पेन किंवा मार्करने नाव लिहिणे,  फ्रेंडशिप बँड बांधणे, कॅन्टीन मध्ये समोसा - वडापाव ची पार्टी देणे, एका मित्राला काही बोलले तर त्याच्यापाठी ढाल बनून उभे राहणे. आनंद शेअर करण्यापासून ते संकटातही एकमेकांना साथ देणे. आपण कॉलेजच्या मैत्रीतुन शिकतो. 


ऑफिस किंवा कंपनीत आठ ते दहा तासाची ड्युटी, वर्कलोड, टार्गेट, आपल्या गरजा आणि पैशाच्या मागे धावताना अनेकदा वाटते कि आपण जगणे विसरलो आणि कुटुंबापासून लांब जात आहे. ना शाळा - कॉलेज सारखी मस्ती राहिली. ना स्वतः साठी मोकळा वेळ... तेव्हा एकत्र काम करणाऱ्या सहकारी सोबत कँटीग चहासोबत समदुःखी गोष्टी शेअर करताना पण खूप मोठा आधार वाटतो.  गर्दीतले एकटेपण दूर करणे हे आपण या मैत्रीतून शिकतो. 


रोज रोज बसने प्रवास करताना त्याच बस स्टॉपवर महिनाभरापासून  दिसणारी ती अनोळखी व्यक्ती आज मला ओळखीची वाटू लागली... आज आम्ही एकमेकींना बघून रोज एक स्माईल देतो. अजूनही मला तिचे नाव नाही माहिती... पण आम्ही आता रोज बस स्टॉपवर एकत्र भेटू लागलो बोलू लागलो. जर एखाद्या दिवशी ती किंवा मी नाही आली तर, कंडक्टर हि आपुलकीने विचारतात कि, "आज तुमची मैत्रीण नाही आली." कोणतीह ओळख नसताना नकळत मैत्रीचे नाते बनविणे आपण इथूनच शिकतो. 


मॉर्निंग वॉकला जाताना एक छोटेसे कुत्र्याचे पिल्लू एकेदिवशी अचानक पायाशी येऊन शेपटी हलवत खेळायला सुरुवात करतो. त्यानंतर दररोज नित्यनियमाने त्याच्याशी भेट होऊ लागली. मॉर्निंग वॉकला येणारे एक आजोबा बोलले कि,  " मस्त मैत्री आहे तुमची." मैत्री फक्त माणसाशी संबंधित नसून निसर्ग आणि प्राण्यांसोबत पण नकळत मैत्री होऊ शकते. हे आपण इथूनच शिकतो. 


सोशलमिडीयाच्या जगात हजारो फॉलोवर्स आणि फ्रेंड्स असतात... पण आजूबाजूला हि नकळत बनणारी मैत्री करणे कुठे तरी विसरलो आहोत. "मैत्री" चे एकमेव नाते निरपेक्ष असते.  पण अलीकडे मैत्रीतून जर फायदा होत नसेल तर ती लगेच तोडली जाते. किंवा कारणाशिवाय मैत्री केली जात नाही. 

अखेरीस पु. ल. देशपांडे यांच्या काही ओळी ज्या आज हि तितक्याच अर्थपूर्ण आहेत. 


"रोज आठवण यावी अस काही नाही, रोज भेट व्हावी अस काही नाही, एवढंच कशाला रोज बोलणं व्हावं अस ही काहीच नाही. पण मी तुला विसरणार नाही ही झाली खात्री, आणि तुला याची जाणिव असणं ही झाली मैत्री."


शेवटी काय हो भेटी झाल्या... नाही झाल्या तरी मैत्रीचे नाते घट्ट राहणे महत्वाचं आहे.   ज्यांनी हे जाणलं त्यांनी माणसातलं माणूसपण जपलं.


Anjali Pravin

amkar.anju@gmail.com

शुक्रवार, २८ जुलै, २०२३

तुला दहावी / बारावीला किती टक्के होते ? हे इतकं महत्वाचं आहे का ? || Beyond the Grades: Understanding the Relevance of SSC and HSC Exams

 तुला दहावी / बारावीला किती टक्के होते ? हे इतकं महत्वाचं आहे का ?

tension-mental-health-children-counseling-suicide


काल एका ४५ वर्षीय संदीप नावाच्या पालकासोबत माझे समुपदेशन विषयावर चर्चा सुरु होती. तेव्हा बोलता बोलता त्यांनी त्यांच्या दहावीत असणाऱ्या मुलीबद्दल सांगायला सुरुवात केली. मुलीची परीक्षा जवळ आली म्हणून मी महिनाभर सुट्टी घेतली. मी स्वतः तिचा रोज अभ्यास घेतो. बाहेरचे खाणे- जाणे सर्व बंद केले. फक्त अभ्यास एके अभ्यास... यंदा ९० % मार्क्स मिळायलाच पाहिजे. अन्यथा मनासारखं करिअर कुठे मिळत. त्यानंतर त्यांनी लहानपणीचा एक अनुभव सांगितला कि, "मला सहावी नंतर कधीच बाहेर खेळायला जाऊ दिले नाही. संध्याकाळी थोड्यावेळासाठी तरी मित्रांशी बोललो तरी आई ओरडायची. मी फक्त आणि फक्त अभ्यास करायचो. कारण पाच वर्षांनी मी दहावीला जाणार होतो. घरातील केबल काढून टाकली आणि टीव्ही बंद केले.  घरात काहीच मनोरंजनाचे साधन नव्हते म्हणून मला सकाळी वर्तमानपत्र वाचायची सवय लागली.  मला दहावी आणि  बारावीला ७० टक्के च्या पुढेच मार्क्स पडले." थोड्यावेळाने त्यांनी सिगारेट पिण्यासाठी ब्रेक घेतला हा. 

तेव्हा मी त्याला एक प्रश्न विचारला कि, " तूम्ही तुझ्या आयुष्यातील पहिली सिगारेट केव्हा पिली ?"

उत्तर मिळाले कि, " आठवीत असताना."

त्यानंतर मी त्यांना अजून तीन प्रश्न विचारले  कि, " आज तुम्ही जिथे नोकरी करत आहे तिथे कोणी तुझे दहावी / बारावीचे टक्के विचारले का ? 

त्या ७०% टक्क्यांनी तुमच्या करिअरमध्ये ठरवलेल्या गोष्टी अगदी प्लॅन नुसार परफेक्ट झाल्या का ?    

तुम्ही आज तुमच्या शिक्षण आणि नोकरी बाबत आनंदी आणि समाधानी आहात का ? 


तिन्ही प्रश्नाचे उत्तर एकच मिळाले, " नाही."


मुलं दहावी / बारावीला पोहचली कि त्या मुलांचे टेन्शन कमी करण्यासाठी काहीच पर्याय शिल्लक नसतात. आई, वडील, नातेवाईक आणि समाज हे एकत्रितपणे रेड अलर्टसारखे ऍक्टिव्हेट होतात. आणि नकळतपणे त्यामुलांवर सर्वजण मिळून प्रेशर देतात... दबाव देतात.... त्यानंतर पालक हीच गोष्ट अभिमानाने सर्वीकडे सांगतात देखील कि, " आम्ही ना आता टीव्ही बंद केला. आम्ही खेळायला बाहेर पाठवायचे बंद केले. आम्ही बाहेर फिरायला जाणे बंद केले. अमुक केले आणि तमुक केले.... " हि झाली पालकांची बाजू... एकीकडे त्या मुलांचे करमणुकीचे किंवा मनोरंजनाचे एकही पर्याय शिल्लक ठेवले नाही. पण टेन्शनचे वजन मात्र वाढवत गेलो. 

कधी विचार केला का कि ते "मुलं ते प्रेशर कसे सहन करेल ?"


त्याचे प्रेशर कमी करण्यासाठी मी एक पालक म्हणून काय करत आहे ?


सतत चालू असलेल्या मशीनवरचा प्रेशर आपल्याला लगेच कळतो. एकतर ती तापते , चटके लागतात किंवा बंद पडते.  तेव्हा मॅकेनिक येऊन " मशीनला आराम देण्याचा सल्ला देऊन जातो." पण मुलांच्या  मेंदूवर परीक्षेच्या नावाने होणारे प्रेशर मोजण्याचे यंत्र आपल्याकडे नाही. या अति प्रेशरमुळे अनेक मुलं नैराश्य, चिंता, टेन्शन आणि उदासीनतेचा विळख्यात सापडतात. अनेक मुलं दबावामुळे व्यसनांच्या आहारी जातात. अति रागिष्ट आणि चिडचिडी होतात. जर मुलांना पालकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात अपयश येत असेल  तर त्या 'Guilt' मुले  आत्महत्येचा प्रयत्न करतात.  मुलांचे बालपणच या स्टेजवर हरवण्याची खूप मोठी संभावना असते. 

मुलांना परीक्षेत मिळालेले मार्क्स आणि करिअर या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. मुळात करिअर म्हणजे एक परीक्षा दिली कि झालं चांगलं करिअर असे अजिबात नाही. करिअर हि एक प्रक्रिया म्हणजे लांब चालणाऱ्या प्रवासासारखी आहे. ज्यात अनेक वळणे येतात. अनेक बदल होत असतात. पण या ' करिअरसाठी' शिकत राहणे मात्र गरजेचे असते. पण त्या शिकण्याचे मार्क्स किंवा टक्केवारीत रूपांतरण करणे मात्र चुकीचे आहे. 


हि गोष्ट समजण्यासाठी काही खऱ्या जगातील नामवंतांची उदाहरणे पाहू. 


थॉमस एडिसन यांना " हा मुलगा नॉर्मल शाळेत शिकू शकणार नाही. तो 'ढ' आहे सारखा नापास होतो म्हणून शाळेतून काढण्यात आले. पण त्याच्या आईने मात्र  त्याला शिकत राहण्यासाठी पाठिंबा दिला. आणि शिकण्यासाठी शाळेची गरज नाही हे देखील सांगितले. तोच एडिसन ब्लबचा शोध लावणारा शास्त्रज्ञ म्हणून आज प्रसिद्ध आहे."


कोलोनेल सॅन्डर्स नामक व्यक्ती वयाच्या ६५ वर्षे पर्यंत कुटुंबासाठी नोकरी केली आणि संघर्ष केले. अनेकदा अपयश आले पण त्यातून शिकण्याची जिद्द मात्र कधी हरली नाही. यांनीच वयाच्या ६५ वर्षानंतर KFC ची सुरुवात केली. जी आज पूर्ण जगभर प्रसिद्ध आहे. 


असे अनेक क्रिकेटर, सिंगर, व्यावसायिकांची उदाहरणे आहेत. ज्यांना कोणीही दहावी / बारावीच्या टक्के विचारले नाही. त्यांनी त्यांच्या शिकत राहण्याच्या जिद्दीमुळे आज प्रसिद्धी मिळाली आहे.  

 

पालक म्हंणून एक गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे कि,  

"आईबाप मुलांना गादी देऊ शकतात पण झोप नाही देऊ शकत. किंवा जेवण देऊ शकतात पण भूक नाही देऊ शकत." 


३ इडियट्स मध्ये देखील रॅन्चोने सतत हे सांगण्याचे प्रयत्न केले. 

"कामयाब होने के लिए नही काबिल बनने के लिए सीखो।"


-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

लेखिका : अंजली प्रविण, ८+ वर्षांपासून समुपदेशक आणि डेटा विश्लेषक  म्हणून सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. 

amkar.anju@gmail.com







बुधवार, १९ जुलै, २०२३

समुपदेशन काळाची गरज का बनत आहे ? || Why counseling matters ?

समुपदेशन काळाची गरज || Why counseling matters ?

apaliwritergiri-counseling-mental-health-family-counseling-marathi-blog


आपण अलीकडे खूप वेगवेगळ्या प्रकारचे समुपदेशन ऐकले असेल. महिला समुपदेशन, बालक समुपदेशन, कुटुंब समुपदेशन, करिअर समुपदेशन, कायद्याचे समुपदेशन, व्यावसायिक समुपदेशन, मानसिक समुपदेशन, व्यसनमुक्ती समुपदेशन इत्यादी. माणसांचे जितके प्रॉब्लेम्स तितके वेगवेगळी समुपदेशन केंद्र आणि वेगवेगळे कौशल्य असणारे समुपदेशक. 

कोणी दारू सोडत नाही म्हणून व्यसनमुक्ती समुपदेशनाकडे जात असतील. कोणाला करिअर मध्ये काय करावे सुचत नाही म्हणून करिअर समुपदेशनासाठी जातात.  अलीकडे तर अनेक शाळा आणि कॉलेजसमध्ये देखील करिअर समुपदेशन करताना दिसतील. कोणत्या स्त्रीला जर कौटुंबिक हिंसा सहन करावी लागत असेल तर ती महिला  कुटुंब समुपदेशन किंवा महिला समुपदेशन केंद्रात जाते. असे माणसांचे जितके प्रॉब्लेम्स तितके वेगवेगळी समुपदेशन केंद्र आणि वेगवेगळे कौशल्य असणारे समुपदेशक. 

तुम्ही देखील बऱ्याचदा वरील "समुपदेशन / कौन्सिलिंग " हा शब्द नक्कीच ऐकले असेल. 

"बऱ्याचदा समुपदेशन म्हणजे काय तर नुसते आपले ऐकून घेतात बस.... इतकंच... कधी कधी त्याचे आपणच पैसे पण द्यायचे. नुसतं नवीन फॅड आहे बास्स्सस... पूर्वी लोकांना काय प्रॉब्लेम नव्हते का ? मग तेव्हा समुपदेशन का नव्हते ? " अनेकजण असे बोलताना पण तुम्ही ऐकले असेल. 

 तर समुपदेशनाची गरज का भासू लागली ते समजून घेऊया. 

पूर्वी आपल्याकडे संयुक्त कुटुंब पद्धती होती. ज्यात आजी- आजोबा , काका , चुलते, मामा, बहिणी, भावंडे असे तीन चार पिढ्या एकत्र राहायचे. त्यामुळे त्या मोठ्या  कुटुंबातील व्यक्तीला आपल्याच घरामध्येच कोणीना कोणी वेगवेगळ्या प्रॉब्लेम्सवर बोलणारे किंवा मार्गर्दर्शन करणारे किंवा संवाद करणारे मिळायचे. जर कुटुंबातील एका सदस्याने समजून घेतले नाही तर कोणी तरी दुसरे सदस्य त्या व्यक्तीला समजून घ्यायचे. पण आधुनिक काळात शिक्षण आणि नोकरी निमित्ताने संयुक्त मोठे  कुटुंब कमी होऊन ते  विभक्त छोटे कुटुंब होताना दिसतात. आधुनिकीकरण आणि काळाची गरज म्हणून हे परिवर्तन होताना आपण पाहिले असेल. 

या परिवर्तनांचा त्या कुटुंब सदस्यांवरती हि तितकाच परिणाम झाला आहे. सध्याच्या या धावपळीच्या जगात एकत्र कुटुंब फक्त सणावाराला एकत्र भेटतात. अन्यथा, प्रत्येकजण स्वतः चे शिक्षण, नोकरी, व्यवसाय इत्यादी मागे दिवसरात्र धावत असतात. या धावपळीमुळे लक्षातच येत नाही कि, आपण संवाद करणे विसरलो आहे. एकमेकांचे ऐकून घेणे, एकमेकांशी बोलणे,  एकेमेकांना समजून घेणे आणि  एकमेकांच्या मतांचा आदर करणेही कमी - कमी होत गेले आहे. यामुळे अगदी छोट्याश्या शुल्ल्लक  गोष्टीवरूनही  मतभेद किंवा क्लेश होताना दिसतात. कुटुंबातील व्यक्ती किंवा मित्रपरिवारही आपल्याला समजून घेत नाही हि भावना निर्माण होते. 

यामुळे घरातील / ऑफिस मधील / समाजातील  नकारात्मक वातावरणाचा परिणाम व्यक्तीच्या शारीरिक, मानसिक, मनावर, नाते संबंधावर,  नात्यात दुरावा निर्माण होणे, पूर्वग्रह विचारांमुळे चुकीचे सल्ले किंवा निर्णय देणे,शिक्षणावर, करिअरवर व्हायला  सुरु होते.  अशावेळी मानसिक पातळीवर समुपदेशन उपयुक्त ठरते.   

समुपदेशन म्हणजे देखील एक प्रकारचा संवादच असतो. 

समुपदेशक हा सर्वप्रथम श्रोता मग संवादकाची भूमिका बजावतो.  समुपदेशकाने यासाठी विशिष्ठ प्रकारचे शिक्षण आणि कौशल्ये शिकलेली असतात. समुपदेशक कधीच स्वतःची मते नैतिक मूल्ये दुसऱ्यावर लादत नाही.  समुपदेशक कधीच पूर्वग्रह दूषित विचार डोक्यात ठेवत नाही. समुपदेशकासाठी प्रत्येक व्यक्ती हि भिन्न असते. येथे पूर्णपणे गोपनीयता पाळली जाते. 

 

समुपदेशन हि आधुनिक काळाची  गरज आहे. कधी मनावरचा ताण मोकळा करण्यासाठी तर कधी मनातील गोंधळ दूर करण्यासाठी,  शिक्षण किंवा व्यवसायासाठी, कायदे विषयक मदत मिळविण्यासाठी , व्यसन मुक्तीसाठी  अश्या बऱ्याच कारणांसाठी समुपदेशनाची गरज पडू शकते. 

तर अश्यावेळी  नक्की जवळील समुपदेशकाकडे जा. 

कारण,

समुपदेशन म्हणजे फक्त गप्पा मारणे नाही,  फक्त सल्ला - मार्गदर्शन देणे नाही,   स्वतः ची नैतिक मूल्ये दुसऱ्यावर लादणे नाही, स्वतःची विचार धारा दुसऱ्यावर लादणे नाही. तर स्वतः साठी उचललेले एक पहिले पाऊल आहे. 


लेखिका : अंजली प्रविण, ८+ वर्षांपासून समुपदेशक आणि डेटा विश्लेषक  म्हणून सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. 

amkar.anju@gmail.com







शनिवार, १५ जुलै, २०२३

मुलांच्या आत्महत्येचे वाढते प्रमाण.... याला जबाबदार कोण ? || Rising Suicide Rates Among Children: Who is Accountable?

 मुलांच्या आत्महत्येचे वाढते प्रमाण.... याला जबाबदार कोण ? 

apali-writergiri-blog-suicide-prevention-mental-health-awareness-


अलिकडच्या वर्षांत मुलांमधील आत्महत्येचे प्रमाण चिंताजनक वाढणे हा गंभीर चिंतेचा विषय बनला आहे. समाज या हृदयद्रावक समस्येला सामोरे जात असताना, या प्रश्नाकडे लक्ष देणे अत्यावश्यक बनते: जबाबदारी कोणाची? हा लेख मुलांच्या आत्महत्येच्या वाढीस कारणीभूत असलेल्या विविध घटकांचा अभ्यास करतो, विविध भागधारकांच्या भूमिकेचे परीक्षण करतो आणि आपल्या तरुण पिढीच्या कल्याणासाठी सामूहिक कृती करण्याचे आवाहन करतो.  इंटरनेशनल असोशिएशन फॉर सुसाईड प्रिव्हेन्शन (IASP) या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या २०१९ च्या संशोधनानुसार जगभरात ७लक्ष व्यक्ती एका वर्षात आत्महत्या करतात. National Crime  Recor Bureo (NCRB)  यांच्या रिपोर्ट नुसार २०२१ मध्ये भारतात  १६४०३३ जणांनी आत्महत्या केली.  २०२० च्या तुलनेने ७.२ टक्के आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. यात १८ वर्षा आतील मुलांचे आत्महत्येच्या आकड्याचे प्रमाण १० हजाराहून अधिक आहे. एकूण ८ % आत्महत्या करणाऱ्या मुलं हि विद्यार्थी असतात. तसेच एकूण आत्महत्येच्या आकडेवारीच्या तुलनेने ३२% आत्महत्या हि कौटुंबिक क्लेश किंवा समजून न घेणे  या कारणास्तव असतात. 

आपण आपल्या आजूबाजूला. सोशलमिडीया  किंवा बातम्यांमध्ये अनेकदा बातमी वाचतो कि,  प्रेमात नकार मिळाला म्हणून आत्महत्या केली. दहावी, बारावी किंवा कोणत्याही परीक्षेत नापास झाला म्हणून आत्महत्या केली. नवीन मोबाईल दिला नाही म्हणून आत्महत्या केली. पिकनिकला गेलो नाही म्हणून आत्महत्या केली. मामाच्या गावी जाऊया म्हंटले म्हणून आत्महत्या केली. कमी मार्क पडले किंवा जास्त मार्क पडले म्हणून आत्महत्या केली किंवा काहीच कारण नसताना हि आत्महत्या केली ........ 

अगदी शुल्लक वाटणारी घटना किंवा गोष्ट आत्महत्येचे कारण आहे. हे वाचल्यावर मन सुन्न होऊन जाते. 

पण खरंच तेवढे एकच कारण असते का ?

मुळात आत्महत्या करण्यासाठी कधीही एकच कारण किंवा एक घटना जबाबदार नसते. आत्महत्या पूर्वीची ती शेवटची घटना एक निमित्त असू शकते पण ते मुख्य कारण असू शकत नाही हे आपल्याला समजून घेतले पाहिजे.  आत्महत्ये मागे वैद्यकीय कारणे, तसेच  नैराश्य, असहाय्यता आणि जीवन व्यर्थ झाल्याची भावना देखील असते. 


आत्महत्या करण्याचा विचार नेमका का येतो ? याचे काही उदाहरणे बघू : 

१.  सीमा, वय १६ वर्षे नुकतीच दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाली. तिने चांगला अभ्यास केला होता म्हणून  तिला ९० % मार्क्स मिळाले. मोठ्या नामी कॉलेजमध्ये ऍडमिशन झाले पण महिन्या भरातच "कोणतेही कारण नसताना" तिने आत्महत्या केली. काही महिने झाल्यानंतर लक्षात आले कि,  महिना भर तिला कॉलेजमध्ये शिक्षकाकडून लैंगिक शोषण केले जात होते. या बाबत तिला बाहेर बोलायची हि भीती वाटत होती. घरी आईकडे कॉलेज बदलण्याबद्दल तिने विचार मांडले होते पण कॉलेजच्या नावाची प्रसिद्धी मोठी आहे सांगून आईने तिलाच कॉलेज बदलायचे नाही निर्णय देऊन टाकला होता.  तसेच बाबांसमोर तर बोलायची भीती म्हणून काहीच सांगितले नाही.  तिच्याकडे याबाबत काहीच उपाय सुचला नाही. पोलीस स्टेशन वैगरे जाणे म्हणजे बदनामी अशी भीती वाटत होती. अखेरीस तिने आत्महत्या या मार्गाची निवड केली. 

२. समीर, वय १३ वर्षे, " सुट्टीत मामाच्या गावी जाऊया." असे बोलल्यावर आत्महत्या केली.  काही महिन्यानंतर लक्षात आले कि, समीरला मामाच्या गावी काही मुलं रोज प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीवरून चिडवायची किंवा चेष्टा करायचे. हे त्याला अजिबात आवडत नव्हते. अनेकदा याबाबत घरी सांगूनही घरच्यांनी लक्ष दिले नाही. तरीही दर सुट्टीला त्याला त्याच गावी त्याच मुलांसमोर जाणे असह्य झाले व अखेरीस आत्महत्या या मार्गाची निवड केली.

३. प्रीती, वय १८ वर्षे, बारावीची परीक्षा सुरु होण्याआधीच आत्महत्या केली. 

प्रीतीला दहावीला ८५% मार्क्स होते. तिच्या आई - वडिलांना ती डॉकटर बनावी असे  स्वप्न होते. ते स्वप्न  पूर्ण करण्यासाठी ती जोमाने अभ्यास करत होती. पण परीक्षा सुरु होण्याआधीच आत्महत्या केली. 


अश्या प्रत्येक आत्महत्येच्या घटनेचा सखोल अभ्यास केला तर लक्षात येईल कि, त्याने किंवा तिने फक्त एका शुल्लक गोष्टीमुळे आत्महत्या नसते केलेली. त्याचे मागील काही दिवस / महिने किंवा वर्षे ती व्यक्ती  एखाद्या मानसिक त्रासातून जात असते. नकळतपणे ते आपल्याला या बाबत सूचना देखील देतात. पण शुल्लक कारण समजून त्या गोष्टीकडे आपण लक्ष देत नाही.  यामुळे त्या मुलांमध्ये "आपलं कोणीच ऐकून घेणारे नाही  किंवा अपयश आले तर घरचे रागावतील. कोणीच आपल्याला समजून घेणारे नाही. " हे नकारत्मक विचार त्या मुलांसाठी एकटेपणा, नैराश्य, आणि असहाय्य्य असल्यासारखे वाटते. कोणताही मानसिक आणि भावनिक आधार न मिळाल्याने हळू हळू  सुसायडल आयडेशन सुरु होते. जेव्हा एखाद्या व्यक्तीला स्वतःचे  जीवन संपवून टाकण्याचे विचार येणे किंवा तशी कल्पना करणे याला मानसोपचारतज्ञ "सुसायडल आयडेशन" असे म्हणतात.  

 

यावर सर्वांना जमेल असा सोपा उपाय म्हणजे " आपल्या पाल्याचे किंवा मुलांचे बोलणे ऐकून घेणे आणि समजून घेणे." आपल्याला शुल्लक वाटणारी गोष्ट कदाचित समोरच्या व्यक्ती साठी काहीतरी भयावह असू शकते याची गंभीरता समजून घेता आली पाहिजे. 


पालकांच्या इच्छा आणि अपेक्षा या मुलांसाठी  अपेक्षेचे ओझं बनत नाही ना याचा विचार केला पाहिजे. 

शिक्षकांना आपल्या विद्यार्थ्यांच्या वागणुकीत असे काही गोष्टी निदर्शनास येत असतील तर त्वरित त्या विद्यार्थीशी किंवा पालकांशी गरजेनुसार चर्चा करणे महत्वाचे आहे. 

निष्कर्ष:

मुलांच्या आत्महत्येच्या वाढीला विविध भागधारकांकडून सामूहिक प्रतिसादाची गरज आहे. एकूणच समाजाने मानसिक आरोग्य आणि सुधारणेला प्राधान्य दिले पाहिजे, अशा वातावरणास प्रोत्साहन दिले पाहिजे जे मुक्त संवादाला प्रोत्साहन देते आणि मुलांसाठी पुरेशी समर्थन प्रणाली प्रदान करते. या गंभीर समस्येचे निराकरण करण्यासाठी शैक्षणिक संस्था, पालक, सरकार आणि मानसिक आरोग्य व्यावसायिकांनी एकत्रितपणे काम केले पाहिजे. आपल्या मुलांच्या मानसिक आरोग्याला महत्त्व देणारा समाज विकसित करून, आम्ही एक सुरक्षित आणि अधिक पोषण देणारे वातावरण तयार करू शकतो जिथे तरुण जीवन संरक्षित केले जाईल आणि मुलांच्या आत्महत्येचा विनाशकारी प्रभाव कमी होईल.


लेखिका : अंजली प्रविण, ८+ वर्षांपासून समुपदेशक आणि डेटा विश्लेषक  म्हणून सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. 

amkar.anju@gmail.com





 

शुक्रवार, १४ जुलै, २०२३

समस्या बालकांच्या कि पालकांच्या ??? || Child & Parent - Conflict & Win-Win

 समस्या बालकांच्या कि पालकांच्या ???


तुमच्या घरी किंवा आजूबाजूलादेखील खालील प्रसंगापैकी काही अनुभव येतात का ? 

माझा मुलगा/ मुलगी  - खूप शॉर्ट टेम्पर आहे. 

माझा मुलगा/ मुलगी - कोणाचंच ऐकत नाही. 

माझा मुलगा/ मुलगी - अभ्यास करत नाही. 

माझा मुलगा/ मुलगी - लोकांशी बोलत नाही . स्टेज डेअरिंगच नाही. 

माझा मुलगा/ मुलगी - खूप भित्रा / भित्री आहे. 

माझा मुलगा/ मुलगी - नीट जेवताच नाही. सारखं बाहेरचे खायला पाहिजे. 

माझा मुलगा/ मुलगी - सारखा मोबाइल / टीव्ही समोर असतो / असते. 

हि तक्रारीची लिस्ट न संपणारी आहे. 

apali-writergiri-school-children-education-counseling


यावर तुम्ही काय उपाय करता ?

(दोन मिनिट शांतपणे डोळे बंद करून विचार करा. )

तुम्ही प्रेमाने बोलून बघता ऐकत नाही म्हणून रागवता / मारता / चिडता / एखादी गोष्ट देतच नाही / हॉस्टेलला पाठविण्याचा धाक देता / हॉस्टेलमध्ये पाठवता देखील / बोलणं सोडून देता / देवाची शांती किंवा उपवास सुरु करता. 

 

वरील पैकी एखादा मार्ग आपण देखील केलाच असेल ना ? तरीही योग्य ते फळ मात्र मिळत नाही. 

तुम्ही कधी विचार केला का ? कि आपली  मुलं असे का वागायला लागले ?


बाळ जन्माला आल्यानंतर जेवायला बसल्यावर सर्वात पहिला टिव्ही लावून जेवण कोणी केले ? त्या बाळाने  की पालकाने ?

सर्वात आधी मोबाईलवर जास्त वेळ कोणी घालविला?त्या बाळाने की पालकाने ?

चॉकलेट्स किंवा बाहेरच्या खाण्याची ओळख कोणी करून दिली...त्या बाळाने स्वतः हुन ओळख केली की पालकाने ओळख करून दिली ?

असे प्रत्येक बाबतीत जर पालकांनी स्वतः ला "का?" असा प्रश्न केला तर लक्षात येईल की, बालकांच्या वरील  अनेक समस्या निर्माण करायला आपण पालक  स्वतः ही तितकेच कारणीभूत आहोत.


आज स्पर्धेचे आणि सहज इन्फ्लुएन्स होणारे युग आहे.  ज्यात आपल्याला पालक म्हणून सर्व गोष्टी परफेक्ट लागतात. अगदी दोन महिन्याच्या बाळापासून आपण "परफेक्शनची"  तुलना करायला सुरुवात करतो.  

"तुमचे बाळ अजून ओळखायला लागले नाही का ? माझे बाळ सर्वाना ओळखते. तुमचे बाळ अजून रांगायला सुरुवात केले नाही का ? माझे बाळ करते." 

इथून ज्या अनपेक्षितपण "रेस" ची सुरुवात होते. ती रेस शाळा - कॉलेज - नोकरी करत आयुष्यभर सोबत राहते.  जर आपण या "परफेक्शनची"  तुलना  करणे सोडले तर बालक - पालक संबंधातील अर्धे प्रॉब्लेम सुटतील. परफेक्शनसाठी  पालक सतत जर मुलांना निर्देश देत असतील. तर त्या मुलाला स्वतःची स्पेसच कधी मिळणार नाही.

एकूणच, टाळी कधी एका हाताने वाजत नाही. जेव्हा एक मुलं घडत असते त्याच वेळी एक पालक सुद्धा घडत होतो.

पालक या शब्दाचा एक सुंदर अर्थ आहे.  : 

पा आहे पाठिंब्याचा : 

मुलांचं काही चुकले तर लगेच पाठीत थाप दिली जाते. पर्फेक्शनच्या रेस मध्ये आपला मुलांना काही जमतच नाही किंवा हळूहळू समजते. सारखा चुकीचंच करत आहे. या उणीव सारख्या सारख्या दाखवून देत राहिलो तर त्या मुलांमध्ये नकारात्मक विचारांची पेरणी होत जाते.  असे न करता आपल्या मुलांना शाब्बासकीचा ,सुरक्षेच्या, आणि मायेच्या पाठिंब्याची गरज असते. हे ओळखता आले पाहिजे व वेळोवेळी हा पाठींबा दिला पाहिजे. 


ल आहे लवचिकतेचा : 

प्रत्येक मुलांची स्वतःची गुणवैशिष्ट्ये असतात. पण जर आपण ती पालक म्हणून आपल्याला पाहिजे तसे बंधन टाकत गेलो तर त्या मुलांमध्ये त्याचा चुकीचा प्रभाव पडण्याची शक्यता असते. म्हणून आपल्या विचारांत आणि निर्णयात लवचिकता असणे गरजेचे असते. 


क म्हणजे कणखरपणा : 

बालक हा पूर्णपणे पालकांवर अवलंबून असतो. त्याला स्वतःची सुरक्षा किंवा निर्णय बरोबर कि चूक हे कळत नसते. अश्यावेळेस पालक म्हणून बालकाच्या विकासाच्या दृष्टीने कणखर निर्णय घेणे गरजेचे असते. 


गरज आहे तिथे पाठिंबा देणे, गरज आहे तिथे दोन पाऊले पाठी घेणे, गरज आहे तिथे समजूत घालणे, गरज आहे तिथे योग्य -अयोग्य यातील फरक समोर मांडता आला पाहिजे. पण प्रत्येकवेळी माझंच ऐकले पाहिजे हा समज ठेवणे मात्र पूर्णपणे चुकीचे आहे. 



लेखिका : अंजली प्रविण, ८+ वर्षांपासून समुपदेशक आणि डेटा विश्लेषक  म्हणून सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. 

amkar.anju@gmail.com







गुरुवार, १३ जुलै, २०२३

कुटुंब जोडणारे आणि महिलेला योग्य मार्गदर्शन करणारे समुपदेशन केंद्र || Women & Child / Family Counselling Centre

 तुम्ही कुटुंब किंवा महिला  समुपदेशन केंद्र हे नाव कधी ऐकले आहे का ? 

इथे केस रजिस्टर झाल्यावर नेहमी पोलीस स्टेशन आणि  कोर्टात सारखे जावे लागते असे तुम्हाला वाटते का ?

हि केंद्रे नेमकी कुठे असतात ?

येथील समुपदेशक नेमके काय करतात ?

आज वरील सर्व प्रश्नाबद्दल सविस्तर जाणून घेऊ या. 

रुपाली आज हि ऑफिसला आली नाही. मागील एक आठवड्यापासून ती ऑफिसला येत नव्हती. काळजी वाटली म्हणून मी आज तिच्या घरी गेली. पाहते तर काय, तिच्या डोक्याला आणि मानेवर मारण्याची जखम होती. ती डॉक्टरकडे देखील उपचारासाठी गेली नव्हती. मला पाहून तिच्या डोळ्यात अश्रू आले. पण घरी सासू सासरे असल्यामुळे ती काहीच बोलू शकली नाही. मी तिला माझ्यासोबत थोड्यावेळासाठी बाहेर घेऊन आले तेव्हा तिने मागील ७ वर्षांपासून होत असेलेल्या कौटुंबिक हिंसाचाराबद्दल सांगितले. मुलगा जन्माला न येत मुलगी जन्माला आली. यावरून रोज पती मारहाण करतो. सासू- सासरे हि नवऱ्याची बाजू घेतात किंवा अजून आगीत तेल ओततात. मी मुलींना घेऊन घरा बाहेर पडू शकत नाही. माहेरी जाऊ शकत नाही. मुलींसाठी म्हणून मी त्या घरात रोज कसेबसे दिवस  काढते. 

हा प्रसंग ओळखीचा किंवा खूप कॉमन वाटतो ना..... 


तुमच्या हि आजूबाजूला कोणी ना कोणी रुपाली असेल जी लहान मोठ्या स्वरूपाच्या कौटुंबिक हिंसाचाराशी पीडित असते. कधी मुलं होत नाही म्हणून , कधी हुंडा मिळाला नाही म्हणून , कधी सारखं माहेरी फोन वर बोलते म्हणून , तर कधी घरातली कामे करत नाही म्हणून , तर कधी नोकरी किंवा अभ्यास करायचा बोलते म्हणून ..वैगरे वैगरे कारणांशी पीडित रुपाली तुम्हाला दिसतील. अशी महिला स्वतःहून मदत मागत नाही कारण तिला भीती असते कि,  समाज काय म्हणेल ?   तिच्या घरातल्या किंवा चार भिंती आतील गोष्टी म्हणून आपण काही मदत हि करू शकत नाही. म्हणून आपण फक्त सांत्वन करून किंवा धीर देऊन येतो.  


पण खरंच यामुळे प्रश्न सुटतो का ? 

समाज काय म्हणेल किंवा मुलांसाठी म्हणून किती वर्ष सहन करणार ?

अश्या कौटुंबिक हिंसक वातावरणात किती वर्ष काढणार ... २ वर्षे ... ५ वर्षे ... १५ वर्षे कि ५० वर्षे ??


याला संसार बोलणार का ? 

याला क्वालिटी ऑफ लाईफ बोलणार का ?


 अनेक वर्ष चालत असेलेली कुटुंब व्यवस्था टिकून राहावी. पण नात्यातील आलेला दुरावा मात्र दूर व्हावा. नात्यातील हिंसा आणि अत्याचार दूर व्हावा. कुटुंबातील व्यक्तीमधले सवांद आणि नाते दृढ  व्हावे साठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार मार्फत  "कुटुंब किंवा महिला  समुपदेशन केंद्र "ची निर्मिती करण्यात आली. इथे दोन्ही पक्षांना आपली बाजू सविस्तरपणे मांडण्याचा आणि एकमेकाना समजून घेण्याचा प्रयत्न केला जातो. वेळप्रसंगी कायद्याची मदत हि घेतली जाते. सदर समुपदेशन केंद्रे हि मोफत सेवा देतात. 


कुटुंब किंवा महिला  समुपदेशन केंद्र दिली जाणारी सेवा : 


१. येथील समुपदेशक त्या पीडित महिलेची समस्या पूर्ण ऐकून घेतली जाते. 

२. त्या महिलेला नेमक्या कोणत्या स्वरूपाचे सहकार्य पाहिजे आहे हे विचारले जाते. ३. समुपदेशनावेळी तिच्या गरजेनुसार तिला समुपदेशन, पोलीस स्टेशन, कौटुंबिक हिंसाचार कायद्या अंतर्गत केस , निवासी आश्रम  पर्याय उपलब्ध करून दिले जातात. याबद्दल सविस्तर माहिती दिली जाते आणि मार्गदर्शन केले जाते.  

४. जर कुटुंबातील इतर व्यक्तींना बोलवून करायचे असल्यास किंवा केस दाखल करायची असल्यास प्रत्येकवेळी तिची समंती घेतली जाते. 

५. गरजेनुसार कायदेविषयक सविस्तर मार्गदर्शन केले जाते. तसेच जिल्हा विधी प्राधिकरणा अंतर्गत मोफत कायदेशीर सेवा आणि वकील दिला जातो. 

हे समुपदेशन कुठे असते ? 


आपल्या घराजवळील पोलीस स्टेशन किंवा काही स्वयंसेवी संस्थाच्या कार्यालयात असते किंवा येथे चौकशी केल्यावर तुम्हाला तुमच्या जवळील समुपदेशन केंद्राचा नंबर व पत्ता  मिळेल. 

तसेच जिल्हा महिला व बाल विकास आणि सेंट्रल सोशल वेल्फेअर बोर्ड यांच्या वेबसाईटवर आपणास समुपदेशन केंद्राचा संपर्क क्रमांक आणि पत्ता मिळेल. 


 समुपदेशकांच्या संपर्कासाठी येथे क्लीक करावे.


Central Social Welfare BoardState-wise Family Counselling Centres 


Support Organisations in Maharashtra



लेखिका : अंजली प्रविण, ८+ वर्षांपासून समुपदेशक आणि डेटा विश्लेषक  म्हणून सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. 

amkar.anju@gmail.com



बुधवार, १२ जुलै, २०२३

Degree मिळाल्यानंतर पुढे काय ? फेलोशिप म्हणजे काय माहिती आहे का ? सामाजिक क्षेत्रांशी संबंधित Fellowships

डिग्री मिळाल्या नंतर पुढे काय ? फेलोशिप म्हणजे काय माहिती आहे का ?  

apali-writergiri-blogspot-school-career-guide-graduation-fellowship


फेलोशिप हे एक प्रोग्राम / कार्यक्रम आहे ज्यामध्ये प्रतिष्ठित संस्था किंवा संघटनेने विविध क्षेत्रातील युवकांसाठी विशिष्ट विषयात स्पेशलाझेशन / विशेषता विकसित करण्याचा अवसर मिळतो. फेलोशिप आपल्याला संबंधित क्षेत्रातील अभ्यास, अनुभव, आणि प्रशिक्षणांच्या मार्गदर्शनाने समृद्ध करते. इथे आपण अधिक अनुभव वापरून नवीन कौशल्ये विकसित करू शकता, विचारांच्या विन्यासात मदत करू शकता, सामाजिक आणि संशोधन क्षेत्रातील नेतृत्व आणि सामाजिक बदल करण्याच्या कार्यालयाच्या कार्यात भागीदारी करू शकता. फेलोशिपमध्ये सहभागी होण्याचे विविध लाभ आहेत, जसे की अनुभवाची वाढ, व्यापक ज्ञान विकास, नेटवर्किंग संधी वाढवणे, आणि सामाजिक विश्वास विकसित करणे. फेलोशिप प्रोग्राम अनुकरणीय शिक्षण, मार्गदर्शन, आणि संरक्षण प्रदान करण्यात आलेले असल्यामुळे या कार्यक्रमांमध्ये युवांना माहिती वाढविण्याचा एक वापरून्या अवसर मिळतो. यथे आपल्याला मार्गदर्शनासोबत त्याचे मानधन हि मिळते. तसेच काही  फेलोशिप पूर्ण झाल्यावर  ती फेलोशिप राबविणारी संस्था फेलोसच्या   पुढील वाटचालीसाठीचे नोकरी किंवा संस्था विकसित करण्याचे  पर्याय हि उपलब्ध करून देतात. 

1. गांधी फेलोशिप कार्यक्रम (Gandhi Fellowship ): दोन वर्षांचा निवासी फेलोशिप आहे. संपूर्ण भारतातील ग्रामीण भागात यांचे काम सुरु आहे.  जिथे ग्रामीण क्षेत्रात ग्रासरूट पातळीवर काम करतात. येथे आरोग्य,  शिक्षण आणि पाणी या प्रमुख घटकांवर काम केले जाते. 


2. टीच फॉर इंडिया फेलोशिप (Teach for India Fellowship): दोन वर्षांची, पूर्ण-वेळ फेलोशिप जिथे सहभागी शैक्षणिक असमानता दूर करण्यासाठी आणि सर्व मुलांसाठी शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी काम करण्यासाठी वंचित शाळांमध्ये शिकवतात.


3. अझीम प्रेमजी फाउंडेशन फेलोशिप (Azim Premji Foundation Fellowship) : दोन वर्षांचा कार्यक्रम ज्याचा उद्देश शैक्षणिक व्यावसायिकांचे एक कॅडर तयार करणे आहे जे भारतातील सरकारी शाळा प्रणाली सुधारण्यात योगदान देऊ शकतात.


4. पंतप्रधान ग्रामीण विकास (PMRD) फेलोशिप (Pradhan Mantri Gramin Vikas (PMRD) Fellowship): दोन वर्षांची फेलोशिप ज्यामध्ये ग्रामीण विकास कार्यक्रम आणि योजनांची अंमलबजावणी आणि देखरेख करण्यासाठी जिल्हा प्रशासनासोबत काम करणे समाविष्ट आहे.


5. एसबीआय युथ फॉर इंडिया फेलोशिप (SBI Youth for India Fellowship): एक वर्षाची ग्रामीण फेलोशिप जी तरुण व्यावसायिकांना ग्रामीण विकासाला चालना देण्यासाठी आणि ग्रामीण भारत समजून घेण्यासाठी तळागाळातील प्रकल्पांवर काम करण्यास सक्षम करते.


6. यंग इंडिया फेलोशिप (Young India Fellowship): एक वर्षाची बहुविद्याशाखीय पदव्युत्तर फेलोशिप जी उदारमतवादी कला शिक्षण आणि नेतृत्व विकास देते, विविध करिअर मार्गांसाठी फेलो तयार करते.


7. इंडियन स्कूल ऑफ डेमोक्रसी फेलोशिप (Indian School of Democracy Fellowship) : एक नऊ महिन्यांचा फेलोशिप कार्यक्रम जो तरुण नेत्यांना लोकशाही प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी आणि सुशासनात योगदान देण्यासाठी ज्ञान आणि कौशल्यांनी सुसज्ज करतो.


8. AIF क्लिंटन फेलोशिप (AIF Clinton Fellowship): एक 10 महिन्यांची फेलोशिप जी तरुण व्यावसायिकांना भारतातील एनजीओ आणि सामाजिक उपक्रमांशी जोडते, समजून, सहयोग आणि शाश्वत विकासाला चालना देते.


9. LAMP फेलोशिप (संसद सदस्यांसाठी विधान सहाय्यक) (Legislative Assistant for Members of Parliament)): एक वर्षाची फेलोशिप जी तरुण व्यावसायिकांना संसद सदस्यांसोबत जवळून काम करण्याची संधी देते, विधान प्रक्रियेत अंतर्दृष्टी प्राप्त करते.


10. अक्युमेन इंडिया फेलोशिप (Acumen India Fellowship): एक वर्षाचा कार्यक्रम जो गरिबी आणि अन्याय दूर करण्यासाठी नाविन्यपूर्ण सामाजिक प्रभाव उपक्रमांवर काम करणाऱ्या व्यक्तींना नेतृत्व विकास आणि समर्थन प्रदान करतो.

11. फेअर ट्रायल फेलोशिप (Fair Trial Fellowship) : कालावधी २ वर्ष, यात कायदेविषयक अभ्यास असणे गरजेचे आहे. LLB, LLM, MSW आणि BSW कायदे आणि सामाजिक क्षेत्रातील पदवीधर हि फेलोशिप करू शकतात. येथे न्यायधीन बंद्याच्या न्याय आणि हक्क साठी काम केले जाते. 

12. भूमी फेलोशिप (Bhumi Fellowship) : दोन वर्षांची, पूर्ण-वेळ फेलोशिप जिथे सहभागी शैक्षणिक असमानता दूर करण्यासाठी, सामाजिक भावनिक शिक्षण  आणि सर्व मुलांसाठी शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी काम करण्यासाठी वंचित शाळांमध्ये शिकवतात.

13. वुमेनलीड इंडिया फेलोशिप (WomenLead India Fellowship):  येथे कोणतीही वयोमर्यादा नाही, फक्त महिला हि फेलोपशीप करू शकते. ज्यांना  महिलांशी संबंधित ग्रामीण पातळीवर, शिक्षण, ,खेळ , कला व  विकासा संबंधित सामाजिक काम करण्याचा कमीत कमी अनुभव गरजेचं आहे. 

या फेलोशिप्स व्यक्तींना सामाजिक विकासात योगदान देण्यासाठी आणि भारतातील विविध क्षेत्रांमध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी अद्वितीय संधी प्रदान करतात. 


प्रत्येक फेलोशिपचा प्रवेशाचा वेगवेगळा कालावधी असतो.  वेगवेगळी वयोमर्यादा असते.  अनुभवी आणि फ्रेशर्स या पात्रता असतात.  त्याची प्रवेश परीक्षा आणि मुलाखत असते, ज्यात तुम्हाला नेमकी हि फेलोशिप का  करायची आहे याची पडताळणी केली जाते. तुमची आवड , तुमचे ध्येय हे फेलोशिपच्या ध्येयाशी निगडित असेल तरच तुमचे त्या फेलोशिपला  निवड होते. 

नोट : फेलोशिपच्या इंग्रजी नावावर क्लिक केल्यास त्या फेलोशिपच्या मुख्य वेबसाईट पोर्टलवर सदर फेलोशिपची सविस्तर माहिती मिळेल. 


लेखिका : अंजली प्रविण, ८+ वर्षांपासून समुपदेशक आणि डेटा विश्लेषक  म्हणून सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. 
amkar.anju@gmail.com 

ग्रॅड्युएशन आणि पोस्ट ग्रॅड्युएशन नंतर पुढे काय ? स्वतः ला ओळखणे.

 ग्रॅड्युएशन आणि पोस्ट ग्रॅड्युएशन नंतर पुढे काय ?


माझं ग्रॅड्युएशन पूर्ण झाले आता मी काय करू ?
माझं पोस्ट ग्रॅड्युएशन पूर्ण झाले आता मी काय करू ?
हे दोन प्रश्न हमखास नुकतेच पदवीधर झालेल्या समोर उभे असतात. 
चांगले पाठांतर केले कि चांगले मार्क्स मिळतात मग चांगले कॉलेज मिळते... मग फर्स्ट क्लासची किंवा उत्तीर्ण झाल्याची डिग्री मिळते मग खरा प्रश्न पुढे येतो कि, "आता मी पुढे काय करू ? " 
मग काही जण वेगवेगळे कॉम्युटर आणि टायपिंगचे कोर्स करतात. काही जण MPSC आणि UPSC परीक्षेच्या अभ्यासाला सुरुवात करतात. अलीकडे कोडिंग शिकण्यावर भर दिला जातो.  तरीही "पुढे काय करायचे ?" या प्रश्नाचे उत्तर मात्र सापडत नाही.

 बरोबर ना...

 

आपल्याकडे "शिक्षण = नोकरी" या पलीकडे शिक्षणाचा काही उपयोग होतो वाटत नाही.  अगदी करिअर या शब्दाचा अर्थ हि 'चांगली नोकरी' इतकाच समजला जातो. त्यामुळे पाच ते सात वर्षे शिकून डिग्री घेतल्यावर देखील हा प्रश्न पडतो कि "आता पुढे काय ?"

मग इथूनच  "नकारात्मक विचार आणि कारणे" ऐकणे आणि देणे या साखळीला सुरुवात होते.... नोकऱ्याच नाही राहिल्या आता , बेरोजगारी वाढलीय, खूपच जीवघेणी स्पर्धा आहे.. इंग्रजी येत नाही म्हणून नोकरी नाही, कॉम्प्युटर येत नाही म्हणून नोकरी नाही. ..मला अजून मोठे मोठे कम्प्युटर कोर्स करावे लागतील, गावात नोकरीच नसते, शहरात स्पर्धाच खूप, सरकारी नोकरीच्या जाहिराती निघत नाही, कमी  पैशाच्या नोकऱ्या असतात आता.... फक्त मुलांनाच किंवा मुलींनाच  नोकऱ्या मिळतात, बिझनेस करायला भांडवल खूप लागते.. इतके पैसे कोण देणार, धंदा फक्त श्रीमंतानीच करावा, माझ्या वडिलांनी शहरात घरच घेतले नाही तर नोकरीसाठी कसे जाऊ, CBSC बोर्ड मधून शिकायला पाहिजे होते स्टेट बोर्ड ला कोणी विचारतहि नाही.. इंटरनेशनल शाळा / कॉलेज मधून शिकलो नाही म्हणून नोकरी नाही, स्पोर्ट्स मध्ये नाही म्हणून नोकरी नाही, गावात पैसा नाही किंवा  शेतीत पैसा नाही, माझे कोणी नातेवाईक सरकारी नोकरी किंवा मोठ्या कंपनीत नाही म्हणून मला नोकरी नाही किंवा *** नोकरीसाठी लाखो रुपयाची बोली लागली आहे ते पैसे देऊ शकत नाही म्हणून नोकरी नाही, फ्रेशर्सला कोणी जॉबसाठी निवडत नाही  ?..  वैगरे वैगरे वैगरे वैगरे"  जसे वेगवेगळ्या प्रांतातले लोक तशी वेगवेगळी कारणे आपणही कधीना कधी ऐकली असतील किंवा दिली असतील.

यात नेमका दोष कोणाचा शिक्षण व्यवस्थेचा , पालकांचा, सरकारचा कि आपला ? या उणिवा शोधण्यामध्येच आपला बराच वेळ व्यस्त होत असतो? 

दोन मिनिट थांबा आणि थोडं विचार करा... केले का असे कधी ?

मुळात शाळा आणि कॉलेज यातील शिक्षण हे फक्त डिग्री घेण्यापुरते आणि नोकरी मिळवण्याच्या उद्देशाने नसते. हि गोष्ट समजून घेता आली पाहिजे. शाळा आणि कॉलेजचा एक मोठा प्लॅटफॉर्म असा असतो कि, येथे आपल्याला आपली "इकिगाई" शोधता येते. (इकिगाई म्हणजे काय ? Ikigai Book Summaryया लेखाची लिंक सोबत जोडत आहे. ) येथील ज्ञानाचा प्रत्येक विषय म्हणजे फक्त डिग्री नसून वेगवेगळे स्किल्स आणि करिअरच्या फिल्ड्स असतात. या बाबत आपण कधीच जागरूक नसतो.
changle  तसेच या बद्दल सखोल माहिती घेण्यात हि फारसा उत्साह घेत नाही. यामुळे आपण डिग्री मिळाल्यानंतर हि संभ्रमात राहतो कि आता पुढे काय करायचे.

तर मग या दलदलीतून बाहेर पडण्याचा उपाय काय ?

स्वतःला घडविण्यासाठी पहिले तीन महत्वाचे पाऊल :  

१. सर्व प्रथम तर "SWOT Analysis" करून  स्वतःला निपक्षपणे ओळखता आले पाहिजे. त्याचा स्वीकार करता आला पाहिजे. स्वतः मधील Strenght (बलस्थाने), Weakness (कमकुवतपणा ), Opportunity (संधी ) आणि Threats (धोके ) ओळखून त्यावर काम करता आले पाहिजे.


२. आपली इकिगाई काय ? हे आपल्याला शोधता आले पाहिजे.  आपण कशात चांगले आहोत? आपल्याला काय करायला आवडते? माझ्या आयुष्याचा नेमका उद्देश काय ? त्यात आपण समाधानी आहोत का ? अश्या प्रश्नाची उत्तरे  शोधण्म्हयाचे तंत्र म्हणजे  "इकीगाई" सविस्तर लेखाची लिंक सोबत जोडत आहे. (Ikigai Book Summary Blog )


३. वाचन हा उत्तम मार्गदर्शक असतो. वाचन फक्त मार्क्स मिळविण्यापुरते मर्यादित नसते. यात आपल्या आवडी नुसार अनेक व्यक्तीचे अनुभव वाचता येतात, वेगवेगळ्या गावांची, शहरांची आणि प्रांताची माहिती आपल्याला समजते. खूप नवीन वेगवेगळे स्किल्स आणि करिअरचे पर्याय येथून मिळतात. अनेकदा आपल्या करिअरचा रस्ता योग्य कि अयोग्य हे वाचनातून पडताळणी करता येते. आपण जरी रस्ता चुकलो तरी पुन्हा आपला करिअरचा किंवा आयुष्याचा रस्ता सापडण्यास मदत करते.
 नोट : व्हाट्सअप वरील चार पोस्ट वाचणे याला वाचन म्हणून संबोधित करू नये. 

वरील तिन्ही टप्पे जर यशस्वी पण पार पाडता आले. तर स्वतः मधील आवड, स्वतः मधील गुण, स्वतः च्या कोणत्या दोषांवर काम करणे गरजेचे आहे, आपल्याला नेमके काय बनायचे आहे, आपली प्रायोरिटी नेमकी काय ? आपलयाला कश्यात करिअर घडवायचे आहे ? अश्या अनेक प्रश्नांची उत्तर सापडतात. 

"स्वतःला ओळखता आले तरच स्वतःला घडविता येते."

लेखिका : अंजली प्रविण, ८+ वर्षांपासून समुपदेशक आणि डेटा विश्लेषक  म्हणून सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. 

amkar.anju@gmail.com 

पुढील लेखासाठी खालील लिंकवर क्लिक करा.









रविवार, २ जुलै, २०२३

The Therapeutic Connection Between Gardening and Mental Health




In our fast-paced and technology-driven world, it's becoming increasingly important to find ways to reconnect with nature and prioritize our mental well-being. One powerful method that combines both of these objectives is gardening. Engaging in gardening activities not only allows us to cultivate beautiful plants and flowers, but it also nurtures our mental health and provides a multitude of therapeutic benefits. Let's explore some of the ways in which gardening positively impacts our well-being.


Connecting with the Earth and Nature

Gardening is an invitation to immerse ourselves in the natural world. As we dig our hands into the soil, we establish a deep connection with the Earth. The act of working with the soil has been proven to release serotonin, a chemical in the brain that helps elevate mood and reduce stress levels. Breathing in the fresh air, feeling the warmth of the sun on our skin, and listening to the sounds of nature can all contribute to a sense of calm and tranquility.


Composting and Life Creation

Composting is an integral part of gardening that involves the decomposition of organic matter to create nutrient-rich soil. This process mirrors the cycle of life and teaches us valuable lessons about transformation and growth. Witnessing the transformation of kitchen scraps and garden waste into nourishing compost can be a metaphorical reminder of the potential for growth and renewal in our own lives. Moreover, being responsible for creating new life through gardening can instill a sense of purpose and accomplishment, boosting our self-esteem and overall well-being.


Seeds, Flowers, and Plants

Watching seeds germinate and grow into vibrant flowers or lush plants is an incredibly rewarding experience. Gardening allows us to witness the miracle of life unfolding before our eyes, offering a sense of joy and fulfillment. The process of caring for plants encourages mindfulness, as we must be present in the moment and attuned to the needs of our green companions. This focused attention on the present helps reduce anxiety and fosters a sense of inner calm.


Roots: The Connection with Mental Health

Just as plants rely on their roots for stability and nourishment, humans too have a need for a strong foundation to support their mental health. Engaging in gardening activities can help us establish a rootedness and connection to the world around us. Spending time in nature has been shown to reduce symptoms of depression and anxiety, improve concentration, and enhance overall psychological well-being. Gardening offers a sanctuary away from the stresses of everyday life, allowing us to find solace in the simplicity and beauty of nature.


Psycho-Socio Health

Gardening has proven to be beneficial not only for individual mental health but also for community well-being. Engaging in gardening activities as a group or participating in community gardens fosters a sense of belonging and social connection. It provides an opportunity to interact with others who share similar interests, creating a support network and reducing feelings of isolation. Additionally, community gardens often contribute to the beautification of neighborhoods, improving the overall environment and promoting a sense of pride and unity.


In conclusion, gardening is much more than a hobby or a means of cultivating plants. It is a profound practice that allows us to reconnect with the Earth, find solace in nature, and nurture our mental well-being. Whether it's through composting, witnessing the growth of plants, or establishing roots, gardening offers a myriad of therapeutic benefits. So, grab a shovel, plant some seeds, and let your garden become a sanctuary for your mind and soul.


Writer info:


anjali-pravin-apali-writergiri
Anjali Pravin, a dedicated writer and passionate activist, hails from Maharashtra, India. With 8 years of invaluable experience in mental health and the criminal justice system, she fearlessly wields her pen to shed light on pressing societal issues, advocating for change and inspiring compassion through her profound narratives.

email id : amkar.anju@gmail.com




समाजिक आणि भावनिक शिक्षण - 1

 

समाजिक आणि भावनिक शिक्षण

निर्भय हा इयत्ता ७ वी शिकत आहे. सतत इतरांची छेड काढणे, रागावर अजिबात ताबा नसणे, तोंडात नेहमी शिव्या असणे .. असेच एकंदर त्याचे व्यक्तिमत्व आहे. शिक्षकांनी अनेकवेळा ताकीद दिली, शाळेतून काढून टाकू अशी धमकी ही दिली. पण निर्भयमधील या सर्व गोष्टी कमी व्हायच्या सोडून वाढत होत्या.

निशा , इयत्ता ६ वी मध्ये शिकते, मोजकच बोलणारी, कधीही व्यक्त न होणारी.. थोडीशी घबराट.. त्यामुळे वर्गात कधीच स्वतःहून उत्तर देत नाही आणि समोरून शिक्षकांनी विचारल तर उत्तर देता येत नाही. 

अभय हा ५ वी शिकत आहे, अभ्यासात हुशार पण कधीच कोणताच काम वेळेवर पूर्ण करत नाही,.. अनेक प्रकारचे क्लाससेस करतो पण कुठेच रमत नाही. यावरून आईवडील सतत अभयला बोलत असतात.

सूचिता, सध्या इंजिनियर आहे, तिचे वय ४५ वर्ष आहे. तिला तिच्या कामात अजिबात रस नाही. तिला आता हळूहळू कळू लागल आहे की तिची आवड ही इंजिनियरिंग नव्हतीच मुळी. सूचिताला सतत वाटत की शाळेत असतानाच जर आवडी निवडी कळल्या तर पुढील आयुष्य किती सोप आणि समाधानकारक असेल.

निर्भयचा राग आणि विध्वंसवृत्ती , निशाच अबोलपण आणि व्यक्त न होण्याच्या क्षमतेचा अभाव , अभयच कोणताही काम वेळेत पूर्ण न करण आणि सूचिताला ४५ व्या वर्षी होणारा पश्चाताप. या सर्वावर काम करण्यासाठी आपल्या शिक्षणप्रणालीत काही वाव आहे का?  अशा प्रकारची अनेक मुले प्रत्येक शाळेत असतात.  प्रत्येक वर्गात अशी सतत मस्ती करणारी, कोचाही आदर न करणारी, खोट बोलणारी, शिव्यादेणारी, इतरांना सतावणारी, कॉपी करणारी .. अशी अनेक विद्यार्थी प्रत्येक वर्गात प्रत्येक शाळेत असतात. या नकारात्मक सवयींचा त्यांच्या पुढील आयुष्यावर ही वाईट परिणाम होऊ शकतो. बऱ्याच वेळा पालक आणि शिक्षक या गोष्टीचा संबंध “कठोर शिस्तीचा अभाव” याच्याशी लावतात आणि मुलांना बंधनात अडकवून नकळत या नकारात्मक सवयींना सुपीक अस वातावरण तयार करतात.

मुलांच्या या साऱ्या समस्येची कारणे काही असोत पण त्यामध्ये होणारी वाढ ही सामाजिक आणि भावनिक शिक्षण या विषयाची जागरूकता नसणे आणि तो वर्गात कसा अमलात आणायच्या याबद्दल शिक्षकांना प्रशिक्षण नसणे हा आहे. सामाजिक आणि भावनिक शिक्षण हा विषय तसा अल्पशा प्रमाणात मूल्यशिक्षण या नावाने शाळांमध्ये राबावला जात होता. ते पुरेस नव्हत. शिक्षक आणि पालक या दोघांना या विषयाबद्दल माहिती असणे गरजेचे आहे. या लेखाच्या माध्यमातून हा विषय मी समजून सांगायचं छोटासा प्रयत्न करणार आहे.

Collaborative for Academic, Social, and Emotional Learning – CASEL यांनी समाजिक आणि भावनिक शिक्षण ही संकल्पना १९९४ साली जागतिक स्तरावर मांडली. तेव्हापासून CASEL  समाजिक आणि भावनिक शिक्षण - (SEL Social and Emotional Learning) चा प्रसार करत आहेत. भारतात ही द टीचर फाऊंडेशन ने SEL च्या धरतीवर भारतीय विद्यार्थ्याचा विचार करून ISELF (Indian Social and Emotional Learning Framework) ही संकल्पना राबविली जाते.

समाजिक आणि भावनिक शिक्षण म्हणजे काय ?



सामाजिक आणि भावनिक शिक्षण (SEL ) ही एक प्रक्रिया आहे ज्या द्वारे मुले स्वतःच्या भावना समजून घेतात आणि त्यांचे व्यवस्थापन करतात;  अर्थपूर्ण वैयक्तिक आणि सांघिक उद्दीष्टे प्राप्त करतात, इतरांबद्दल अनुभूती दर्शवितात, सकारात्मक संबंध स्थापित करतात आणि जबाबदारीने निर्णय घेतात. (संदर्भ: https://casel.org/fundamentals-of-sel/what-is-the-casel-framework/#social-emotional-learning)

CASEL च्या मांडणीनुसार समाजिक आणि भावनिक शिक्षण हे पांच सामाजिक आणि भावनिक क्षमतेवर आधारित आहे. या क्षमता लहानपणापासूनच प्रभावित होत असतात. त्यावर काम होण अत्यंत गरजेच आहे. खालील ५ क्षमतांचा समाजिक आणि भावनिक शिक्षणाचा गाभा आहे. 

  1. स्वजागरुकता Self Awareness

स्वतःच्या भावना, विचार आणि मूल्ये आणि त्यांचा स्वतःच्या एकंदर आचारणावर होणार परिणाम समजून घेण्याची क्षमता म्हणजे स्वजागरुकतात. यामध्ये स्वतची बलस्थाने आणि मर्यादा ओळखण्याच्या क्षमतेचा ही समावेश होतो. या क्षमता सुधारण्यासाठी पद्धतशीर प्रमाणे काही activities मुलांसोबत करता येतील.

  1. स्वव्यवस्थापन Self Management

स्वतच्या भावनांचे, विचारांचे आणि स्वभावाचे वेगवेगळ्या परिस्थितीत प्रभावी व्यवस्थापन करण्याची क्षमता, म्हणजे स्वव्यवस्थापन. यामध्ये स्वतच्या आवडी-निवडी ओळखणे, स्वयंशिस्त पाळणे , सांघिक आणि वैयक्तिक ध्येय ठरविणे आणि नियोजन कौशल्य यांचा समावेश होतो.

  1. सामाजिक जागरूकता Social Awareness

वरील दोन क्षमता या वैयक्तिक पातळीवर काम करतात, पण सामाजिक जागरूकता ही इतरंबद्दल विचार करण्यास सांगते. इतरांचा दृष्टिकोण समजून घेणे, इतरंबद्दल अनुभूती असणे, तसेच इतरांच्या संस्कृतीचा, धार्मिक पार्श्वभूमीचा आणि विचारधारेचा आदर करणे म्हणजे सामाजिक जागरूकता. या मध्ये इतरंबद्दल दयाभावना आणि अनुभूती दाखविणे, इतरांची बलस्थाने ओळखणे, व्यापक ऐतिहासिक आणि सामाजिक मानके (SOCIAL NORMAS) समजून घेऊन समाजात (कुटुंब, शाळा, मित्र इत्यादि) वावरणे या क्षमतांचा सामाजिक जगरुकते मध्ये समावेश होतो.

  1. जबाबदारीने निर्णय घेण्याची क्षमता  Responsible Decision Making

वैविध्यपूर्ण परिस्थितींमध्ये वैयक्तिक वर्तन आणि सामाजिक परस्परसंवादांबद्दल रचनात्मक निवडी करण्याची क्षमता, जिज्ञासू आणि चिकित्सक वृत्ती, स्वतच्या निर्णयांचा स्वतःवर व इतरांवर होणारे परिणाम समजून घेणे, यांसारख्या क्षमतां म्हणजे जबाबदारीने निर्णय घेण्याची क्षमता.

  1. सकारात्मक संबंध प्रस्थापित करण्याचे कौशल्ये Relationship skills

वेगवेगळया परिस्थितीत आणि लोकांसोबत त्यांच्याशी अनुभूती दाखवून सकारात्मक संबंध प्रस्थापित करण्याची क्षमता. या मध्ये संवाद कौशल्य, परस्पर सहकार्यात, समस्या निवारण्याची क्षमता, सांघिक कार्यात सहभाग घेण्याची क्षमता, तसेच नेतृत्व कौशल्य आदींचा समावेश सकारात्मक संबंध प्रस्थापित करण्याचे कौशल्ये मध्ये येतात.

 

समाजिक आणि भावनिक शिक्षण फायदे

एका संशोधनानुसार ज्या मुलांसोबत सामाजिक आणि भावनिक शिक्षणाचे उपक्रम राबविले गेले त्यातील ५७% विद्यार्थ्यांची कौशल्ये पातळी वाढली आणि २७% पेक्षा जास्त मुलांच्या शैक्षणिक कामगिरीत सुधारणा दिसून आली. वरील संशोधनुसार, सामाजिक आणि भावनिक शिक्षणामुळे २४% पेक्षा जास्त मुलांमध्ये सामाजिक वर्तनात सुधारणा दिसून आली. तसेच मुलांमध्ये समाजात वावरताना आत्मविश्वास दिसतो. चांगल-वाईट समजण्याची जाण निर्माण होते. एकंदर मुलांमध्ये स्वजाण आणि समाजभाण या दोन्ही गोष्टी रुजतात.

(संदर्भ: https://casel.s3.us-east-2.amazonaws.com/Practical-Benefits-of-SEL-Program.pdf)

समाजिक आणि भावनिक शिक्षण नक्की कसे राबावयेचे, कोणत्या संधानांचा वापर करता येईल, त्याचा काही अभ्यासक्रम आहे का या बद्दलची माहिती पुढील लेखात देईन.


#SocialEmotionalLearning

#nep2020

शुक्रवार, ३० जून, २०२३

संवेदना हरवलेलं माणूसपण


 

प्रसंग १ : 

अंदाजे पन्नाशी वयाचे एक गृहस्थ एका सिग्नल्स रस्त्याच्यामध्ये उभे राहून एका कारमधील ड्रायव्हरला गाडी हळू चालविण्याबद्दल बोलत होता. त्याच वेळी पहिल्यांदा मी त्यांचे काही शब्द ओझरते कानावर ऐकले. ते गृहस्थ सांगत होते की, "जसे तुम्ही या वेळी ऑफिसला जाता. तसे लहान मुलांची ही शाळेत जाण्याची वेळ आहे. त्यामुळे गाडी सावकाश चालवा." हे अगदी तळमळीने सांगत होता. थोड्यावेळाने ते जवळील बसस्टॉपकडे कामाला जाण्यासाठी बस पकडायला आले. ते गृहस्थ बस येण्याची वाट पाहत असताना बस स्टॉपमधील लोकांनाही कोणत्या तरी कार अपघाताबद्दल बोलत होते. ज्यात एक लहान मुलाचा जागीच मृत्यू झाला आणि त्याची आई खूप रडत होती.  ते गृहस्थ प्रत्येक गाडीतील ड्रायव्हरला त्याच गोष्टी पुन्हा पुन्हा  थांबवून सांगत होते.  

अजून थोड्यावेळाने ते गृहस्थ बस स्टॉप मधील रिकाम्या खुर्चीकडे बघून एकटेच हातवारे करून बोलू लागले.  "ओ हवालदार, किती मोठा अपघात झाला हो.  तो शाळेतला १० वर्षाचा मुलगा जागीच खल्लास झाला. मी स्वतःच्या डोळ्याने पाहिले. मी हॉस्पिटलला घेऊन गेलो होतो.  

बसस्टॉपमधील सर्व व्यक्ती ते बघून हसत होते. "डोकं फिरलय म्हाताऱ्याच, वेडाच दिसतोय" अशी चर्चा आपापसात होऊ लागली.


प्रसंग २ : 

बस मधून प्रवास करताना एक महिला एकटीच बोलत होती कि, "मेरे को वो बहुत मारते है, मुझे बांध के रखते है, आज भी उसने मारा मुझे, ये देखो सुजन, इसीलिए निकाल घर छोड दिया मैने..., तुम मेरे साथ रहो हम कही दूर चले जाते है,  मेरा भाई है वहा" 

यावेळी देखील बस मध्ये सर्व जण तिची चेष्टा करत होते. अगदी कॉलेज किंवा नोकरीला असणाऱ्या सुशिक्षित व्यक्ती पासून ते शिक्षित नसलेल्या व्यक्ती पर्यंत प्रत्येकजण तिला बघून हसत होते.

या दोन्ही प्रसंगात अगदी स्पष्टपणे कळून येत होते कि, या दोघांच्या आयुष्यात  कोणतेतरी भयावह अपघात किंवा ट्रॉमा  झाले आहेत. त्याचाच  मानसिक आघात त्यांना बसला आहे. यामुळे कदाचित त्यांना कोणीतरी किंवा काहीतरी  दिसण्याचे, ऐकण्याचे आणि बोलण्याचे भास  होत असावेत. 

इतका भयावह मानसिक त्रास बघून साहजिकच कोणत्याही संवेदनशील  व्यक्तीचे  मन विचलित होईल.  या दोन्ही प्रसंगाच्या वेळी  सर्वप्रथम तर मी सुन्न झाले आणि त्यांच्या बोलण्यातील तो त्रास किंवा अपघाताबद्दल जसे कळत होते तसे डोळ्यात पाणी आले. कारण आपण यांच्यासाठी काही करू शकत नाही. याची हि खंत वाटत होती. 

पण याच वेळी दोन्ही प्रसंगातील आजूबाजूच्या व्यक्ती एकमेकांकडे बघून चेष्ठा करताना किंवा हसताना माझ्याकडे देखील याच आशेने पाहत होते कि, मी या प्रसंगावर  देखील हसावे. किती विलक्षण गोष्ट आहे ना, एरव्ही सार्वजनिक ठिकाणी आपल्या बाजूला कोण बसले किंवा उभे असेल तर आपण लक्ष हि देत नाही. पण या स्वतःला शहाण्या समजणाऱ्या समाजात त्यांच्या दृष्टीने "वेडे" व्यक्ती आले कि लगेच डोळ्यांनी आणि हसून चर्चेला सुरुवात होते.  मग या असंवेदनशील  शहाण्या समाजातील लोकांचे शाहनपण म्हणजे नेमकं काय ?  

शरीराचे अपंगत्व दिसून येते म्हणून आपल्याला एखाद्याच्या संवेदना सहज समजतात. लगेच त्या व्यक्तीला रस्ता ओलांडायला मदत करणे , बसमध्ये बसायला सीट देणे वैगरे वैगरे वेगवेगळ्या पद्धतीने मदत करतो. पण मानसिक अपंगत्व असेल तर ते दिसून येत नाही.  त्यांना कोणी बसायला जागा देणार नाही.  त्यांना कोणी रस्ता ओलांडायला मदत करणार नाही.  जरी कोणाचा मानसिक त्रास दिसून आला तर त्याची समाजाकडून नेहमी अशीच चेष्टा केली जाते. 

आज हा लेख लिहिण्यामागील उद्देश हाच कि, एखाद्याचा होणारा मानसिक त्रास समजून घेता येत नसेल. तर निदान त्यावर हसू तरी नका.



लेखिका : अंजली प्रविण, ८+ वर्षांपासून समुपदेशक आणि डेटा विश्लेषक  म्हणून सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. 

amkar.anju@gmail.com 

पुढील लेखासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

शनिवार, १ मे, २०२१

मी आणि माझ्या कॅमेरातील महाराष्ट्र

मी आणि माझ्या कॅमेऱ्यातील महाराष्ट्र 

सर्वप्रथम सर्वाना महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!! 

माझ्या कामानिमित्त आता पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रभर प्रवास दौरा करता आला.   विदर्भ, मराठवाडा, कोकण, खान्देश आणि प. महाराष्ट्र विभाग येथील विविधता आणि परंपरा खूप जवळून अनुभवायला मिळाली.  प्रत्येक ठिकाणची खाद्य संस्कृती, बोली भाषा आणि  जैव विविधता अनुभवताना गोविंदाग्रज यांची एक कविता कायम माझ्या बॅकग्राऊंडला वाजायची.  
मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा 
प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा 
राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा 
नाजूक देशा, कोमल देश, फुलांच्याही देशा 
याच विविधतेतील माझ्या कॅमेऱ्याने   टिपलेले काही निवडक क्षण 


apali-writergiri-mahrashtra-din
apali-writergiri-mahrashtra-din

apali-writergiri-mahrashtra-dinq

apali-writergiri-mahrashtra-din

apali-writergiri-mahrashtra-din

apali-writergiri-mahrashtra-din


apali-writergiri-mahrashtra-din

apali-writergiri-mahrashtra-din

apali-writergiri-mahrashtra-din

apali-writergiri-mahrashtra-din

apali-writergiri-mahrashtra-din

apali-writergiri-mahrashtra-din
apali-writergiri-mahrashtra-din




#apaliwritergiri
pranju8990@gmail.com 
7738882692



कांदे पोहे कि सौदेबाजी....की विवाह संस्थेच फाऊंडेशन

 कांदे पोहे कि सौदेबाजी....की विवाह संस्थेच फाऊंडेशन   काही चांगल्या / कमावत्या मुलांची लग्न ठरत नाही मग ती मुलं किंवा त्याच्या घरचे मुलींना...