शनिवार, ३० डिसेंबर, २०२३

मुसाफिर आर्टिस्ट || Musaafir Artist Journey

 




"मुसाफिर" हा उर्दू/हिंदी शब्द आहे.  ज्याचा अर्थ "प्रवासी" किंवा "भटकणारा" आहे. "आर्टिस्ट " या शब्दाचा अर्थ म्हणजे "कलाकार". मागील वर्षांपासून आर्ट थेरपीचा माझा प्रवास सुरु झाला. या प्रवासाने मनातील असंख्य गैरसमज दूर केले. जसे  कि, "मला 'कला आणि कलाकार' म्हणजे कोणीतरी वेगळी व्यक्ती वाटायची. जसे आज सुप्रसिदध असणारे संगीतकार, गीतकार, चित्रकार, शिल्पकार वैगरे आहेत. जे पूर्णवेळ आपल्या कलेला समर्पित करतात. कायम खडतर परिश्रम करतात. २४ तास फक्त नि फक्त कालेबद्दलच विचार करतात. " त्यामुळे मी कधीच स्वतःला कलाकार बोलण्याच्या पात्रतेत योग्य समजले नाही. पण हे पूर्णतः चुकीचे होते. यामुळे कला आणि कलाकार याची व्याख्याच एकप्रकारे संकुचित होत होती. माझ्या आर्ट थेरपीच्या प्रवासातील "मुसाफिर आर्टिस्ट" हे  संशोधन अभ्यासताना  "कला आणि कलाकार" यांच्या अर्थाबद्दल क्षितिज समुद्रासारखे विशाल होत गेले. "कला" हि कोणत्याही स्वरूपात असू शकते. तसेच  प्रत्येक व्यक्ती हा कलाकार असू शकतो. फक्त त्याची स्व- जाणीव होणे महत्वाचे असते. 

 

"मुसाफिर आर्टिस्ट" या  संशोधनात लहानपणापासून करत असलेल्या "जर्नी ऑफ हिलिंग" चे देखील ते प्रतिनिधित्व केले आहे. जीवनातील लिंगभेद, घरगुती हिंसाचार, लैंगिक अत्याचार, अपघात  आणि जवळील व्यक्तीचा  मृत्यू यासह अनेक आघातांना तोंड दिले होते. या अनुभवांमुळे मला अविश्वास, चिंता, नैराश्य, एकटेपण, उदासीन , भीतीदायक आणि अस्वस्थ वाटायचे. अनेकदा "सर्व संपले" किंवा " स्वतःला संपवून टाकावे." असेही वाटले. आजूबाजूला जवळची माणसे खूप असतात. तरीही एकटेपणा इतका जाणवायचा कि,  रक्ताची नाती देखील परकी वाटू लागतात. आपल्यासोबत असणारी नातीदेखील अविश्वसनीय वाटू लागतात. त्यामुळे नवीन व्यक्ती आणि नात्यात  विश्वास ठेवणे अवघड होऊन जाते. अश्या अनेक टोकाच्या भावना मनात बालपणीपासूनच्या आघाताने भविष्यातील प्रवासात अडथळे निर्माण करतात. अश्यावेळी वेगवेगळ्या कला म्हणजे मांडला आर्ट, वॉटर कलर, कोलाज, हस्तकला, शिल्पकला, नृत्य, मेडिटेशन, संगीत, नाटक, फोटोग्राफी, स्टोन आर्ट, माईंडमॅप, योगा , व्यायाम, पाककला यांसारख्या असंख्य कलेतून स्वतःला व्यक्त केले. त्याला योग्य दिशा, रचना किंवा आकार मिळाला तर नक्कीच सुंदर प्रतिकृती तयार होते.  

याच संशोधनातील काही अनुभव या "मुसाफिर आर्टिस्ट" मालिकेतून मांडत जाणार आहे. 

ज्यात आर्ट थेरपी (Art Therapy) म्हणजे काय ? त्याचे महत्व ? अनुभव ? संशोधने ? याबाबत माहिती मिळेल. 

_________________________________________________________________________________

लेखिका : अंजली प्रविण, ८+ वर्षांपासून समुपदेशक आणि डेटा विश्लेषक  म्हणून सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. 

amkar.anju@gmail.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

"अंतिमा" || Antima by Manav Kaul

 "अंतिमा" || Antima by Manav Kaul बाहर खुला नीला आकाश था  और भीतर एक पिंजरा लटका हुआ था |  बाहर मुक्ति का डर था  और भीतर सुरक्षित ...