सोमवार, २५ जुलै, २०२२

जगण्याच्या गर्दीत स्वस्त झालेल्या मरणाचा खरा चेहरा दाखवणारा आरसा म्हणजे बाबुराव बागुल यांचे "मरण स्वस्त होत आहे"...


 

मरण स्वस्त होत आहे - बाबुराव बागुल 


मन सुन्नं करणारं लिखाण...समाजातल्या खऱ्या तळाचा आरसा बनून तो प्रत्येकाला दाखवणारं लिखाण...कुठेही अतिरंजक, अती दिखाऊ म्हणून पुस्तकात कुठेच वाहून जाणे नाही. लेखक हे सगळं, जगून, वागून लिहीत आहे हे प्रत्येक ओळीत समजतं. लिखाण म्हणजे काय, लेखक म्हणजे काय हे बाबुराव बागुल यांच्या "मरण स्वस्त होत आहे" या पुस्तकाने नक्कीच मेंदूला कळते. जे आहे ते सरळ आणि स्पष्ट भाषेत लिहून तितकेच भिडते, त्याला उगाच कसला मुलामा देण्याची गरज नसते हे नक्कीच या पुस्तकातील प्रत्येक कथेतून कळते. यातील प्रत्येक कथा, प्रत्येक पान थिजवून ठेवते. जगण्यातली विदारकता,दुःख, वेदना, घृणा अशा अनेक मिश्र भावनांच योग्य रसायन म्हणजे हे पुस्तक आणि हे पुस्तक वाचणाऱ्या प्रत्येकाला समाजात दिसणारे अपंग, वेश्या, झोपडपट्टी, मवाली, गुन्हेगार अशा अनेक वृत्तीच्या लोकांची मानसिकता, त्यांच्या या जीवनाला कारणीभूत असणारी परिस्थिती याचा नक्कीच मागोवा घ्यायला लावते, विचार करायला लावते. किती विदारक परिस्थिती आहे समाजात. निव्वळ आपल्या भोवतीच्या गुळगुळीत दिसणाऱ्या चार भिंती हे जग नसून, ओरबडे, खाच खळगे पडलेल्या अनेक भिंती आपल्या दृष्टी आड असतात आणि याचे खरे दर्शन घडवून देणारं बाबुराव बागुल यांचे लिखाण खरंच महान आहेएक परिस्थितीने थकलेली आई आपल्या लेकरांना शेवटचं जेवण बनवून देते आणि शेवटच्या घटका मोजून ती तिच्या लहान लेकरांसमोर जीव सोडते या तिच्या मरणा नंतरचे दृश्य सांगताना लेखकाने लिहिलेल्या ओळी मनाला जाळून टाकतात, काय ताकदीचं लिखाण आहे बाबुरावांचं ....

.....आणि बाहेर वारा उधाळून गेला होता. झाडा-झोपड्यांशी झटत होता. त्यांच्या मोडकळीस आलेल्या घराला धडका देत होता. आकाशात काळया ढगांचा समुद्र उचंबळत होता. त्या काळया उसळत्या दर्यात चंद्र बुडून गेला होता. त्याचा प्रकाश वाहून गेला होता. सर्व काही अंधेरून गेलं होतं......

 

त्यांच्या लिखाणात मरणाची व्याख्या शब्दाशब्दांतून पाझरते...जगणाऱ्या प्रत्येकाने वाचावं असं पुस्तक...



दीपेश मोहिते, कल्याण, लेखकाला लिहायला, वाचायला आवडतं. निसर्ग भ्रमण, पक्षी निरीक्षण  करायची आवडं आहे.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

कांदे पोहे कि सौदेबाजी....की विवाह संस्थेच फाऊंडेशन

 कांदे पोहे कि सौदेबाजी....की विवाह संस्थेच फाऊंडेशन   काही चांगल्या / कमावत्या मुलांची लग्न ठरत नाही मग ती मुलं किंवा त्याच्या घरचे मुलींना...