बुधवार, ३० जून, २०२१

इकीगाई म्हणजे ......अगदी साध्या सोप्या शब्दांत

"इकीगाई" हे नाव पहिल्यांदा कॉलेजमध्ये शिकत असताना ऐकले होते. तेव्हा वाटले कि "इकीगाई" नावाचे फ़क़्त ए पुस्तक आहे. ते पुस्तक माझ्या वाचनात यायला देखील खूप वेळ गेला. पुस्तक वाचल्यावर कळले कि, "इकीगाई"  एक विचारधारा  आणि एक शोध निबंध आहे. जे प्रत्येकाने वाचली पाहिजे आणि आपल्या आयुष्यात जगली पाहिजे. 
apali-writergiri-ikigai

"इकीगाई" हि एक जादुई समजली जाणारी एक जपानी संकल्पना आहे. जी दीर्घायुष्याशी सबंधित आहे.  जपान मधील ओकिनावा शहरातील लोकांच आयुर्मान हे जागतिक वयोमानाच्या तुलनेत जास्त आहे.  हे वयोमान दीर्घायुषी असण्यामागील गुपित "इकीगाई" विचारधारा उत्क्रांतीचे तज्ञ आणि क्लिनिकल मानसशास्त्रज्ञ  'अकीरोवो हासेगावा' यांनी २००१ साली त्यांच्या शोधनिबंध प्रसिध्द केला. त्यानंतर 'Ikigai- The Japanese secret to a long and happy life" हे पुस्तक हेक्टर गार्सिया, फ्रान्सिस मिरेलस यांनी "इकीगाई- दीर्घायुषी, निरोगी आणि आनंदी जीवनाचे जापानी रहस्य " या विषयावर पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकात खूप सुंदरपणे "इकीगाई" संकल्पनेचा शोध आणि शास्त्रीयदृष्ट्या असणारे संबध याबद्दल सखोल चिंतन केले आहे. लोगोथेरपी, मोरिता थेरपी, केस स्टडीज, खाद्यसंस्कृती, व्यायामाचे महत्व, मुलाखती आणि बरंच काही माहिती या पुस्तकाच्या माध्यमातून मिळेल. आपण कशात चांगले आहोत? आपल्याला काय करायला आवडते? माझ्या आयुष्याचा नेमका उद्देश काय ? त्यात आपण समाधानी आहोत का ? अश्या प्रश्नाची उत्तरे  शोधण्म्हयाचे तंत्र म्हणजे  "इकीगाई"

 
apali-writergiri-ikigai

जपानी लोकांच्या मते प्रत्येकाचा वेगवेगळा जीवनाचा एक इकीगाई असतोच. आपली आवड काय आहे ?- जगाला काय हवे ?-  आपण कशात पारंगत आहोत ? - आपल्यातील अशी कोणती कला आहे ज्यासाठी लोक  पैसे देऊ शकतात.? यावरच आपले ध्येय - उद्दिष्ट - उपजीविकेचा मार्ग आणि आपला व्यवसाय  या सर्व गोष्टी एकमेकावर आधारित आणि संलग्नित असतात. हे प्रश्न दिसायला आणि वाचायला जितके सोपे तितकीच त्याची उत्तरे शोधणे अवघड आहे.  पण एकदा का उत्तर सापडले कि, आपल्याला आपली "इकीगाई" सापडलीच असे समजा. 

"इकीगाई" जगणारी अनेक नामवंत उदाहरणे प्रत्येक क्षेत्रात पाहायला मिळतील. 

उदा. १. क्रीडा क्षेत्रातील सचिन तेंडूलकर ते सायना नेहवाल  कोणत्याही खेळाडूचे उदाहरण घेऊ शकतो. ज्यांनी आपली आवड जपली. जगाला काय पाहिजे ते शोधले. त्या खेळात ते पारंगत बनले. ज्यातून त्यांचे उपजीविकेचे मार्ग देखील मिळाले. 

२. अभिनय क्षेत्रातील शाहरुख खान, नागराज मंजुळे, माधुरी दीक्षित, सिद्धार्थ जाधव कोणाचेही उदाहरण आपण घेऊ शकतो. ज्यांनी आपल्या कलेमुळे स्वतःची वेगळी ओळख तयार केली आहे. जे जगभरात प्रसिद्ध आहेत. 

 

दररोज सकाळी उठल्यावर "आज काय करायचं ? किंवा तेच रटाळ / कंटाळवाणे काम करावे लागेल. कधी संपणार आजचा दिवस ? असे कोणतेही  जर नकारात्मक आणि चिंताजनक विचार येत असतील तर नक्कीच आपलं कुठे तरी चुकलय किंवा बिनसलं आहे हे कळायला पाहिजे. जर नाही चूक सुधारली तर त्याच चुकीच्या निर्णयात आयुष्य गुरफटून निराशाजनक जीवन व्यतीत करावे लागते.  हे आधुनिक जीवन आपल्याला आपल्या खऱ्या स्वभावापासून दूर घेऊन जात असतो. सत्ता, पैसा आणि यशाच्या मागे आपला मूळ स्वभाव हा भरकटत जात असतो.  तर या गोष्टी आपल्याला आपल्या खऱ्या आनंदा पासून आणि निरोगी जीवना पासूनही दूर नेतात.  म्हणूनच  आपली आवड - उत्सुकता ज्यात आहे त्या गोष्टी आपल्या आयुष्या पासून दूर करू नका. 

प्रत्येकाची इकीगाई हि वेगवेगळी असते. कोणाला लिहिणे, वाचन , फोटोग्राफी, संगीत, नृत्य यांसारख्या कला आवडत असतील तर कोणाला आपल्या आणि शेजारील मुलांचा अभ्यास घेणे हि आवड असू शकेल. तर कोणाची जेवण बनवणे हि आवड असू शकेल तर कोणाची अमुक वस्तू विकणे हि आवड असू शकेल. प्रत्येक व्यक्ती वेगवेगळा आहे तशी त्याची आवड हि वेगवेगळीच असणार. आणि हि आवड नेहमी कोणती तरी मोठी - ठराविक - अमुकअमुकच हवी असे अजिबात नाही. 

"ओगिमी लोकांची - इकीगाई" जगताना पुढील दहा नियम हे अधिक महत्वाचे आहे. ज्यामुळे आपल्याला आपली इकीगाई सापडू शकते - आयुष्यभर इकीगाई सोबत राहू शकतो आणि आपण निरोगी -दीर्घायुषी जगू शकतो. 

१. कायम आपल्या आवडीच्या गोष्टीत  कार्यरत राहा.  त्यातून कधी निवृत्त होऊ नका.

२. जीवनातील दगदग - धावपळ हि दीर्घायुष्यासाठी घातक आहे. तर संथ गतीने निवांतपणे  जीवनाचा प्रवास करा. 

३.  पोटभरून न जेवता ८०% जेवण करा. 

४.  चांगला मित्रपरिवार बनवा. ज्यांच्याशी मनमोकळेपणे बोलणे, सल्ला देणे -घेणे, मज्जा करणे, स्वप्ने बघणे ... मनाला आनंदी ठेवता येऊ शकेल.

५. दररोज व्यायाम करून शरीराची आणि मनाची काळजी घेणे.

६.  सर्वांशी हसतमुख स्वभावाने बोला आणि नाती जपा.

७. निसर्गाशी देखील नाते जोडा.

८. आभार व्यक्त करा. ज्यांनी आपल्याला शिकवले - जगवले या प्रत्येक गोष्टीसाठी आभार व्यक्त करा.

९. भूतकाळातील दुःख आणि भविष्याची चिंता सोडून आताचा क्षण - वर्तमान आनंदी - अविस्मरणीय बनवा. 

१०. आपल्या "इकीगाई"तून  प्रेरणा घेऊन आपले ध्येय आपल्या आवडी प्रमाणे जगा. 

 

जर अजूनही "इकीगाई" म्हणजे काय कळले नसेल ? किंवा अधिक माहिती जाणून घेण्याची  उत्सुकता  असेल तर  खालील इकीगाईवर आधारित पुस्तके विकत घेऊन वाचू शकता.  इंग्रजी - मराठी आणि हिंदी भाषेत हे पुस्तक उपलब्ध आहे. 


३ टिप्पण्या:

"अंतिमा" || Antima by Manav Kaul

 "अंतिमा" || Antima by Manav Kaul बाहर खुला नीला आकाश था  और भीतर एक पिंजरा लटका हुआ था |  बाहर मुक्ति का डर था  और भीतर सुरक्षित ...