समाजिक आणि भावनिक
शिक्षण
निर्भय हा इयत्ता ७ वी शिकत आहे. सतत इतरांची छेड काढणे, रागावर अजिबात
ताबा नसणे, तोंडात नेहमी शिव्या असणे .. असेच एकंदर त्याचे व्यक्तिमत्व आहे. शिक्षकांनी
अनेकवेळा ताकीद दिली, शाळेतून काढून टाकू अशी धमकी ही दिली. पण निर्भयमधील या सर्व
गोष्टी कमी व्हायच्या सोडून वाढत होत्या.
निशा , इयत्ता ६ वी मध्ये शिकते, मोजकच बोलणारी, कधीही व्यक्त न होणारी.. थोडीशी
घबराट.. त्यामुळे वर्गात कधीच स्वतःहून उत्तर देत नाही आणि समोरून शिक्षकांनी विचारल
तर उत्तर देता येत नाही.
अभय हा ५ वी शिकत आहे, अभ्यासात हुशार पण कधीच कोणताच काम वेळेवर पूर्ण करत
नाही,.. अनेक प्रकारचे क्लाससेस करतो पण कुठेच रमत नाही. यावरून आईवडील सतत अभयला बोलत
असतात.
सूचिता, सध्या इंजिनियर आहे, तिचे वय ४५ वर्ष आहे. तिला तिच्या कामात अजिबात
रस नाही. तिला आता हळूहळू कळू लागल आहे की तिची आवड ही इंजिनियरिंग नव्हतीच मुळी. सूचिताला
सतत वाटत की शाळेत असतानाच जर आवडी निवडी कळल्या तर पुढील आयुष्य किती सोप आणि समाधानकारक
असेल.
निर्भयचा राग आणि विध्वंसवृत्ती , निशाच अबोलपण आणि व्यक्त न होण्याच्या क्षमतेचा
अभाव , अभयच कोणताही काम वेळेत पूर्ण न करण आणि सूचिताला ४५ व्या वर्षी होणारा पश्चाताप.
या सर्वावर काम करण्यासाठी आपल्या शिक्षणप्रणालीत काही वाव आहे का? अशा प्रकारची अनेक मुले प्रत्येक शाळेत असतात. प्रत्येक वर्गात अशी सतत मस्ती करणारी, कोचाही आदर
न करणारी, खोट बोलणारी, शिव्यादेणारी, इतरांना सतावणारी, कॉपी करणारी .. अशी अनेक विद्यार्थी
प्रत्येक वर्गात प्रत्येक शाळेत असतात. या नकारात्मक सवयींचा त्यांच्या पुढील आयुष्यावर
ही वाईट परिणाम होऊ शकतो. बऱ्याच वेळा पालक आणि शिक्षक या गोष्टीचा संबंध “कठोर शिस्तीचा
अभाव” याच्याशी लावतात आणि मुलांना बंधनात अडकवून नकळत या नकारात्मक सवयींना सुपीक
अस वातावरण तयार करतात.
मुलांच्या या साऱ्या समस्येची कारणे काही असोत पण त्यामध्ये होणारी वाढ ही
सामाजिक आणि भावनिक शिक्षण या विषयाची
जागरूकता नसणे आणि तो वर्गात कसा अमलात आणायच्या याबद्दल शिक्षकांना प्रशिक्षण नसणे
हा आहे. सामाजिक आणि भावनिक शिक्षण हा
विषय तसा अल्पशा प्रमाणात मूल्यशिक्षण या नावाने शाळांमध्ये राबावला जात होता. ते पुरेस
नव्हत. शिक्षक आणि पालक या दोघांना या विषयाबद्दल माहिती असणे गरजेचे आहे. या लेखाच्या
माध्यमातून हा विषय मी समजून सांगायचं छोटासा प्रयत्न करणार आहे.
Collaborative for Academic, Social, and Emotional Learning – CASEL यांनी
समाजिक आणि भावनिक शिक्षण ही संकल्पना १९९४ साली जागतिक स्तरावर मांडली. तेव्हापासून
CASEL समाजिक आणि भावनिक शिक्षण - (SEL Social and Emotional Learning) चा प्रसार
करत आहेत. भारतात ही द टीचर फाऊंडेशन ने SEL च्या धरतीवर भारतीय विद्यार्थ्याचा विचार
करून ISELF (Indian Social and Emotional Learning Framework) ही संकल्पना राबविली
जाते.
समाजिक आणि भावनिक
शिक्षण म्हणजे काय ?
सामाजिक आणि भावनिक शिक्षण (SEL ) ही एक प्रक्रिया आहे ज्या द्वारे मुले स्वतःच्या
भावना समजून घेतात आणि त्यांचे व्यवस्थापन करतात; अर्थपूर्ण
वैयक्तिक आणि सांघिक उद्दीष्टे प्राप्त करतात, इतरांबद्दल अनुभूती दर्शवितात, सकारात्मक संबंध स्थापित करतात आणि जबाबदारीने निर्णय घेतात. (संदर्भ: https://casel.org/fundamentals-of-sel/what-is-the-casel-framework/#social-emotional-learning)
CASEL च्या मांडणीनुसार समाजिक आणि
भावनिक शिक्षण हे पांच सामाजिक आणि भावनिक क्षमतेवर आधारित आहे. या क्षमता लहानपणापासूनच
प्रभावित होत असतात. त्यावर काम होण अत्यंत गरजेच आहे. खालील ५ क्षमतांचा समाजिक आणि भावनिक शिक्षणाचा गाभा आहे.
- स्वजागरुकता Self Awareness
स्वतःच्या भावना, विचार आणि मूल्ये आणि त्यांचा स्वतःच्या एकंदर आचारणावर होणार
परिणाम समजून घेण्याची क्षमता म्हणजे स्वजागरुकतात. यामध्ये स्वतची बलस्थाने आणि मर्यादा
ओळखण्याच्या क्षमतेचा ही समावेश होतो. या क्षमता सुधारण्यासाठी पद्धतशीर प्रमाणे काही
activities मुलांसोबत करता येतील.
- स्वव्यवस्थापन Self Management
स्वतच्या भावनांचे, विचारांचे आणि स्वभावाचे वेगवेगळ्या परिस्थितीत प्रभावी
व्यवस्थापन करण्याची क्षमता, म्हणजे स्वव्यवस्थापन. यामध्ये स्वतच्या आवडी-निवडी ओळखणे,
स्वयंशिस्त पाळणे , सांघिक आणि वैयक्तिक ध्येय ठरविणे आणि नियोजन कौशल्य यांचा समावेश
होतो.
- सामाजिक जागरूकता Social Awareness
वरील दोन क्षमता या वैयक्तिक पातळीवर काम करतात, पण सामाजिक जागरूकता ही इतरंबद्दल
विचार करण्यास सांगते. इतरांचा दृष्टिकोण समजून घेणे, इतरंबद्दल अनुभूती असणे, तसेच
इतरांच्या संस्कृतीचा, धार्मिक पार्श्वभूमीचा आणि विचारधारेचा आदर करणे म्हणजे सामाजिक
जागरूकता. या मध्ये इतरंबद्दल दयाभावना आणि अनुभूती दाखविणे, इतरांची बलस्थाने ओळखणे,
व्यापक ऐतिहासिक आणि सामाजिक मानके (SOCIAL NORMAS) समजून घेऊन समाजात (कुटुंब, शाळा,
मित्र इत्यादि) वावरणे या क्षमतांचा सामाजिक जगरुकते मध्ये समावेश होतो.
- जबाबदारीने निर्णय घेण्याची क्षमता Responsible Decision Making
वैविध्यपूर्ण परिस्थितींमध्ये वैयक्तिक वर्तन आणि सामाजिक परस्परसंवादांबद्दल
रचनात्मक निवडी करण्याची क्षमता, जिज्ञासू आणि चिकित्सक वृत्ती, स्वतच्या निर्णयांचा
स्वतःवर व इतरांवर होणारे परिणाम समजून घेणे, यांसारख्या क्षमतां म्हणजे जबाबदारीने निर्णय घेण्याची क्षमता.
- सकारात्मक संबंध प्रस्थापित करण्याचे कौशल्ये
Relationship skills
वेगवेगळया परिस्थितीत आणि लोकांसोबत त्यांच्याशी अनुभूती दाखवून सकारात्मक
संबंध प्रस्थापित करण्याची क्षमता. या मध्ये संवाद कौशल्य, परस्पर सहकार्यात, समस्या
निवारण्याची क्षमता, सांघिक कार्यात सहभाग घेण्याची क्षमता, तसेच नेतृत्व कौशल्य आदींचा
समावेश सकारात्मक संबंध प्रस्थापित करण्याचे
कौशल्ये मध्ये येतात.
समाजिक आणि भावनिक
शिक्षण फायदे
एका संशोधनानुसार ज्या मुलांसोबत सामाजिक आणि भावनिक शिक्षणाचे उपक्रम राबविले
गेले त्यातील ५७% विद्यार्थ्यांची कौशल्ये पातळी वाढली आणि २७% पेक्षा जास्त मुलांच्या
शैक्षणिक कामगिरीत सुधारणा दिसून आली. वरील संशोधनुसार, सामाजिक आणि भावनिक शिक्षणामुळे
२४% पेक्षा जास्त मुलांमध्ये सामाजिक वर्तनात सुधारणा दिसून आली. तसेच मुलांमध्ये समाजात
वावरताना आत्मविश्वास दिसतो. चांगल-वाईट समजण्याची जाण निर्माण होते. एकंदर मुलांमध्ये
स्वजाण आणि समाजभाण या दोन्ही गोष्टी रुजतात.
(संदर्भ: https://casel.s3.us-east-2.amazonaws.com/Practical-Benefits-of-SEL-Program.pdf)
समाजिक आणि भावनिक शिक्षण नक्की कसे राबावयेचे, कोणत्या संधानांचा वापर करता येईल, त्याचा काही अभ्यासक्रम आहे का या बद्दलची माहिती पुढील लेखात देईन.
#SocialEmotionalLearning
#nep2020
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा