ग्रॅड्युएशन आणि पोस्ट ग्रॅड्युएशन नंतर पुढे काय ?
माझं ग्रॅड्युएशन पूर्ण झाले आता मी काय करू ?
माझं पोस्ट ग्रॅड्युएशन पूर्ण झाले आता मी काय करू ?
हे दोन प्रश्न हमखास नुकतेच पदवीधर झालेल्या समोर उभे असतात.
चांगले पाठांतर केले कि चांगले मार्क्स मिळतात मग चांगले कॉलेज मिळते... मग फर्स्ट क्लासची किंवा उत्तीर्ण झाल्याची डिग्री मिळते मग खरा प्रश्न पुढे येतो कि, "आता मी पुढे काय करू ? "
मग काही जण वेगवेगळे कॉम्युटर आणि टायपिंगचे कोर्स करतात. काही जण MPSC आणि UPSC परीक्षेच्या अभ्यासाला सुरुवात करतात. अलीकडे कोडिंग शिकण्यावर भर दिला जातो. तरीही "पुढे काय करायचे ?" या प्रश्नाचे उत्तर मात्र सापडत नाही.
बरोबर ना...
आपल्याकडे "शिक्षण = नोकरी" या पलीकडे शिक्षणाचा काही उपयोग होतो वाटत नाही. अगदी करिअर या शब्दाचा अर्थ हि 'चांगली नोकरी' इतकाच समजला जातो. त्यामुळे पाच ते सात वर्षे शिकून डिग्री घेतल्यावर देखील हा प्रश्न पडतो कि "आता पुढे काय ?"
मग इथूनच "नकारात्मक विचार आणि कारणे" ऐकणे आणि देणे या साखळीला सुरुवात होते.... नोकऱ्याच नाही राहिल्या आता , बेरोजगारी वाढलीय, खूपच जीवघेणी स्पर्धा आहे.. इंग्रजी येत नाही म्हणून नोकरी नाही, कॉम्प्युटर येत नाही म्हणून नोकरी नाही. ..मला अजून मोठे मोठे कम्प्युटर कोर्स करावे लागतील, गावात नोकरीच नसते, शहरात स्पर्धाच खूप, सरकारी नोकरीच्या जाहिराती निघत नाही, कमी पैशाच्या नोकऱ्या असतात आता.... फक्त मुलांनाच किंवा मुलींनाच नोकऱ्या मिळतात, बिझनेस करायला भांडवल खूप लागते.. इतके पैसे कोण देणार, धंदा फक्त श्रीमंतानीच करावा, माझ्या वडिलांनी शहरात घरच घेतले नाही तर नोकरीसाठी कसे जाऊ, CBSC बोर्ड मधून शिकायला पाहिजे होते स्टेट बोर्ड ला कोणी विचारतहि नाही.. इंटरनेशनल शाळा / कॉलेज मधून शिकलो नाही म्हणून नोकरी नाही, स्पोर्ट्स मध्ये नाही म्हणून नोकरी नाही, गावात पैसा नाही किंवा शेतीत पैसा नाही, माझे कोणी नातेवाईक सरकारी नोकरी किंवा मोठ्या कंपनीत नाही म्हणून मला नोकरी नाही किंवा *** नोकरीसाठी लाखो रुपयाची बोली लागली आहे ते पैसे देऊ शकत नाही म्हणून नोकरी नाही, फ्रेशर्सला कोणी जॉबसाठी निवडत नाही ?.. वैगरे वैगरे वैगरे वैगरे" जसे वेगवेगळ्या प्रांतातले लोक तशी वेगवेगळी कारणे आपणही कधीना कधी ऐकली असतील किंवा दिली असतील.
३. वाचन हा उत्तम मार्गदर्शक असतो. वाचन फक्त मार्क्स मिळविण्यापुरते मर्यादित नसते. यात आपल्या आवडी नुसार अनेक व्यक्तीचे अनुभव वाचता येतात, वेगवेगळ्या गावांची, शहरांची आणि प्रांताची माहिती आपल्याला समजते. खूप नवीन वेगवेगळे स्किल्स आणि करिअरचे पर्याय येथून मिळतात. अनेकदा आपल्या करिअरचा रस्ता योग्य कि अयोग्य हे वाचनातून पडताळणी करता येते. आपण जरी रस्ता चुकलो तरी पुन्हा आपला करिअरचा किंवा आयुष्याचा रस्ता सापडण्यास मदत करते.
नोट : व्हाट्सअप वरील चार पोस्ट वाचणे याला वाचन म्हणून संबोधित करू नये.

यात नेमका दोष कोणाचा शिक्षण व्यवस्थेचा , पालकांचा, सरकारचा कि आपला ? या उणिवा शोधण्यामध्येच आपला बराच वेळ व्यस्त होत असतो?
दोन मिनिट थांबा आणि थोडं विचार करा... केले का असे कधी ?
मुळात शाळा आणि कॉलेज यातील शिक्षण हे फक्त डिग्री घेण्यापुरते आणि नोकरी मिळवण्याच्या उद्देशाने नसते. हि गोष्ट समजून घेता आली पाहिजे. शाळा आणि कॉलेजचा एक मोठा प्लॅटफॉर्म असा असतो कि, येथे आपल्याला आपली "इकिगाई" शोधता येते. (इकिगाई म्हणजे काय ? Ikigai Book Summaryया लेखाची लिंक सोबत जोडत आहे. ) येथील ज्ञानाचा प्रत्येक विषय म्हणजे फक्त डिग्री नसून वेगवेगळे स्किल्स आणि करिअरच्या फिल्ड्स असतात. या बाबत आपण कधीच जागरूक नसतो.

changle तसेच या बद्दल सखोल माहिती घेण्यात हि फारसा उत्साह घेत नाही. यामुळे आपण डिग्री मिळाल्यानंतर हि संभ्रमात राहतो कि आता पुढे काय करायचे.
तर मग या दलदलीतून बाहेर पडण्याचा उपाय काय ?
स्वतःला घडविण्यासाठी पहिले तीन महत्वाचे पाऊल :
१. सर्व प्रथम तर "SWOT Analysis" करून स्वतःला निपक्षपणे ओळखता आले पाहिजे. त्याचा स्वीकार करता आला पाहिजे. स्वतः मधील Strenght (बलस्थाने), Weakness (कमकुवतपणा ), Opportunity (संधी ) आणि Threats (धोके ) ओळखून त्यावर काम करता आले पाहिजे.
२. आपली इकिगाई काय ? हे आपल्याला शोधता आले पाहिजे. आपण कशात चांगले आहोत? आपल्याला काय करायला आवडते? माझ्या आयुष्याचा नेमका उद्देश काय ? त्यात आपण समाधानी आहोत का ? अश्या प्रश्नाची उत्तरे शोधण्म्हयाचे तंत्र म्हणजे "इकीगाई" सविस्तर लेखाची लिंक सोबत जोडत आहे. (Ikigai Book Summary Blog )
३. वाचन हा उत्तम मार्गदर्शक असतो. वाचन फक्त मार्क्स मिळविण्यापुरते मर्यादित नसते. यात आपल्या आवडी नुसार अनेक व्यक्तीचे अनुभव वाचता येतात, वेगवेगळ्या गावांची, शहरांची आणि प्रांताची माहिती आपल्याला समजते. खूप नवीन वेगवेगळे स्किल्स आणि करिअरचे पर्याय येथून मिळतात. अनेकदा आपल्या करिअरचा रस्ता योग्य कि अयोग्य हे वाचनातून पडताळणी करता येते. आपण जरी रस्ता चुकलो तरी पुन्हा आपला करिअरचा किंवा आयुष्याचा रस्ता सापडण्यास मदत करते.
नोट : व्हाट्सअप वरील चार पोस्ट वाचणे याला वाचन म्हणून संबोधित करू नये.
वरील तिन्ही टप्पे जर यशस्वी पण पार पाडता आले. तर स्वतः मधील आवड, स्वतः मधील गुण, स्वतः च्या कोणत्या दोषांवर काम करणे गरजेचे आहे, आपल्याला नेमके काय बनायचे आहे, आपली प्रायोरिटी नेमकी काय ? आपलयाला कश्यात करिअर घडवायचे आहे ? अश्या अनेक प्रश्नांची उत्तर सापडतात.
"स्वतःला ओळखता आले तरच स्वतःला घडविता येते."
लेखिका : अंजली प्रविण, ८+ वर्षांपासून समुपदेशक आणि डेटा विश्लेषक म्हणून सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत.
amkar.anju@gmail.com
पुढील लेखासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा