"जिणं आमुचं" हे पुस्तक म्हणजे बेबीताई कांबळे यांचे आत्मचरित्र आहे. याचा इंग्रजी अनुवाद "The Prisons We Broke" नावे माया पंडित यांनी केला आहे. मराठीतले पहिले दलित स्त्रीचे आत्मचरित्र म्हणून बेबीताईंच्या पुस्तकाला ऐतिहासिक महत्व आहे. ह्या पुस्तकातील त्यावेळच्या महार स्त्री जीवनाचे स्वरूप कसे होते ? याबाबत अतिशय बारकाईने मांडणी केली आहे. बेबीताईं या ललित लेखन करणाऱ्या लेखिका नसून समाजशास्त्राचा सखोल अभ्यास करणाऱ्या लेखिका होत्या. या पुस्तकात महार समाजाचे भीषण वास्तव मांडले तर आहेच त्याच बरोबर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या, "शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा." मूलतत्त्वांचा बेबीताईंच्या जीवनात कसा बदल घडला याबाबत हि आपले विचार मांडले आहेत.
या पुस्तकातील महार समाजाचे माणूसपण फक्त दिसण्यात होते.. त्यांना जनावरांसारखे शेपूट आणि चार पाय नव्हते इतकाच तो बाहेरून दिसणारा माणूस आणि जनवरातील फरक होता. माणसांसारखी माणसं पण सवर्णांकडून मिळणारी मात्र वागणूक जनावरांसारखी होती. जसे जनावरांना गोठ्यात बंदिस्त ठेवले जायचे तसे याना गावाच्या वेशी बाहेर ठेवले जायचे. त्यांना सवर्णासमोर बोलण्याचा हक्क नव्हता. त्यांचा स्पर्श चालत नसे. त्यांना मान वर करण्याचा हि हक्क नव्हता. त्यांना विचार मांडण्याचा हि हक्क नव्हता. त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवले. त्यांना पाणवठा, मंदिर अश्या सार्वजनिक ठिकाणी प्रवेश नव्हता. पण गावातील आणि घरातील घाण साफ करायला मात्र महार पाहिजे होते. गावात व्यक्ती किंवा जनावर मृत्यू झाला तर त्याची सर्व काम महारांनाच होते. गावात कोणाचे लग्न असले, त्यात नवरा नवरीला हळद लावली कि, भुताखेतांपासून वाचण्यासाठी घराबाहेर पडू देत नाही. अश्यावेळी त्याचे शौच साफ करायला हि महाराचं असायचे. या कामाच्या बदल्यात मिळायचे त्या लोकांच्या घरातील आंबलेली भाजी आणि शिळी भाकरी. जर ते हि नाही मिळाले तर उपासमार व्हायची. ८-१० वर्षातचं मुलींची लग्न लावली जायची. त्या मुलींवर घरातील दारिद्र्याचा आणि गुलामगिरीचा सर्व राग निघायचा. सतत काम, शिवीगाळ, मारहाण तर असायचीच त्यासोबत मासिक पाळी आल्यापासून ते जो पर्यंत पाळी जात नाही तो पर्यंत उपासमारीतील गर्भारपण सुरूच असायचे. त्यातील काही मुलं वाचतील ती वाचतील. त्यासोबतच अंधश्रद्धेचा हि विळखा सोबत जोडलेला असायचा. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे बेबीताईंच्या आयुष्यात अनन्य साधारण महत्व आहे. कारण त्यांना त्यांचं आणि वंचित समाजासाठीचे माणूसपण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रयत्नांमुळे मिळाले.
या पुस्तकाचे छोट्या प्रकरणांत विभाजन झाले आहेत. ज्यात त्यांचे महार वस्तीचे वर्णन, आजोळचे घर , बालपण, आषाढ महिन्यातील सण, अस्पृश्यता, गरिबी, अस्वच्छता, रोगराई, नोकरीची अवस्था, मासिक पाळीतील काळ, बालविवाह, गरोदरपणातील हाल, सुनांवर होणारी गुलामगिरी, भीमाचे शिक्षणाचे वारे आल्यानंतरचा बदल, मंदिर प्रवेश, हिंदू कोड बिल, शिक्षणाचे महत्व आणि क्रांतिकारी प्रबोधन अश्या अनेक मुद्द्यांवर बारकाईने सखोल वर्णन केले. या पुस्तकातील हे वर्णन वाचताना महार वस्ती कशी असू शकते ? सवर्णांनी कशी वागणूक दिली. दलित स्त्रीच्या गुलामगिरीची जीवन अवस्था म्हणजे गुलामांची हि गुलाम असते. याचे नक्कीच अनुभूती येईल.
The Prisons We Broke Available on Amazon and Book ganga
-----
amkar.anju@gmail.com
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा