रविवार, ९ मे, २०२१

वस्त्रहरण नाटक

 वस्त्रहरण नाटक

सुस्वागतम रंगदेवता आणि नाट्य रशीकांका नम्र अभिवादन करून सविनय सादर करत आहे वस्त्रहरण नाट्य रशीकांका एक धोक्याची सूचना नाटक बघताना तुम्ही ज्यावेळी  हासश्याल त्यावेळी तुमचा वस्त्रहरण झाला तर त्याची जबाबदारी आमच्यावर नाय हा....

 

apali-writergiri-vastraharan-आपली-वस्त्रहरण-machchindra-kambli-kokan



वस्त्रहरण हे नाटक म्हणजे “मालवणी भाषेचा” झेंडा अटकेपार सातासमुद्रापार फडकवणारे पहिले नाटक आहे. मालवणीतील नटसम्राट अर्थातच “मच्छिन्द्र कांबळी” यांनी त्यांच्या स्थापन केलेल्या भद्रकाली प्रोडक्शन मधून अनेक मालवणी भाषेतील दर्जेदार नाटकांची निर्मिती केली. त्यांचे पांडगो इलो रे इलो, घास रे रामा, येवा कोकण आपलाच असा, केला तुका आणि झाला माका, माझे पती छत्रीपती अशी अनेक नाटके आहेत ज्यात छोट्या कुटुंबाची गोष्ट आणि सामाजिक समस्या यांची जाणीव ठेवून  अफलातून विनोदी आणि संपूर्णतः मालवणी भाषेत मांडली  आहेत.  जगभरात मालवणी विनोदी भाषेची गोडी याच अवलियामुळे पसरली आहे असे म्हटले तर ते खोटं ठरणार नाही.

वस्त्रहरण हे नाटक मी स्वतः लहानपणापासून अगदी आज पर्यंत अनेक वेळा पाहिले आहे. या नाटकाचे ५०००हून अधिक  नाट्यप्रयोग झाले आहे. ५०००व्या नाट्यप्रयोगाच्या वेळी मराठी सिनेसृष्टीतील संतोष नार्वेकर, भरत जाधव, प्रशांत दामले, जितेंद्र जोशी, सिद्धार्थ जाधव, अतुल परचुरे , पंढरीनाथ कांबळी,  यांसारख्या मोठ्या कलाकारांनी देखील काम केले आहे. मच्छिन्द्र कांबळी यांच्या निधनानंतर संतोष मयेकर यांनी त्यांची भूमिका साकारली होती. भद्रकाली प्रोडक्शनची धुरा त्यांची मुले कविता कांबळी आणि प्रसाद कांबळी सांभाळत आहेत.

लेखक : गंगाराम गवाणकर

दिग्दर्शक :  रमेश रणदिवे

कलाकार:  मंगेश कदम, मुकेश जाधव, प्रणव रावराणे, रेशम टिपणीस, देवेंद्र, मयुरेश, दिगंबर नाईक, शशिकांत, किशोर चौगुले आणि इतर कलाकार

नाटकाची कथा:

या नाटकाची सुरुवात कोकणातील एका गावात नाटक बसवताना त्यात होणारा गोंधळ गडबड यावर आधारित आहे. या नाटकातील नाटकाचे नाव हि “वस्त्रहरण” असते. महाभारतातील कथानके या नाटकातील पात्रांनी साकारली आहेत. या व्यतिरिक्त नाटकात प्रमुख भूमिकेत गावातील सरपंच म्हणजे “तात्या” जे या नाटकाची सर्व धुरा आणि सूत्र संचालन सांभाळताना दिसतात. प्रत्येक पात्राचा परिचय करून देणे. नाटक बसवताना होणारे सर्व गोंधळ सावरणारे एकमेव पात्र म्हणजे “तात्या” , त्यानंतर  “गोप्या” हा त्यांचा सहकारी पात्र दाखविला आहे. ज्याची कलाकारी शब्दांपेक्षाही त्याच्या शरीराच्या लवचिक हालचालीमुळे जास्त लोकप्रिय झाली आहे., मास्तर आणि त्यांचा सहकारी हे दोघे नाटकाचे लेखक आणि वाक्य विस्रणाऱ्या पात्रांना दिशादर्शक म्हणून काम केले आहे., मंजुळाबाई या तमाशाच्या  फडातील कालकार आहेत जिने नंतर द्रौपदीची भूमिका साकारली आहे. या गावातील नाटकात एक वेगळीच रंगत  आणली आहे . या नाटकात अर्जुन, इंद्रदेव, युधिष्ठिर, भीम, धर्म, दुर्योधन, शकुनी आणि महाभारतातील इतर कथानके देखील आहेत. या नाटकातील प्रत्येक कथानकाचे जितके वैशिट्यपूर्ण भूमिका आहे त्याच प्रमाणे या नाटकाच्या एका बाजूला वाजंत्री कलाकार आणि गायकांची देखील अप्रतिम कलाकारी यात पाहायला मिळते.  या गावात अप्रत्यक्षरित्या असणारे गाववाले यांची पण खूप महत्वाची भूमिका दाखवली आहे. तर एकूणच संपूर्ण नाटक हे गावातील नाटक उभे राहताना अनेक छोट्यामोठ्या अडचणी उभ्या राहत असतात. या समस्या तितक्याच अफलातून विनोदी पद्धतीने हे कलामंच  सांभाळत असते.

माझे मत : ज्याला मालवणी- कोकणी भाषेची गोडी असेल ती व्यक्ती हे नाटक कितीही वेळा पाहू शकेल . मी प्रत्यक्षरित्या तीन वेळा हे नाटक पाहिले आणि सध्या यु ट्यूबला हि सहज उपलब्ध झाल्याने अनेकवेळा हे नाटक पाहत असते. हे नाटक पाहताना तुम्ही तुमच्या गावातील नमन आणि दशावताराच्या आठवणीशी नक्कीच स्वतःला जुळवून घ्याल. कोकणी भाषेत अगदी सहजतेने शिव्या दिल्या जातात पण त्याचे अर्थ आणि भावना मात्र तितक्या गंभीर नसतात. तर नाटक पाहताना या गोष्टीची खबरदारी नक्की घ्याल.  

वस्त्रहरण नाट्य रशीकांका एक धोक्याची सूचना नाटक बघताना तुम्ही ज्यावेळी  हासश्याल त्यावेळी तुमचा वस्त्रहरण झाला तर त्याची जबाबदारी आमच्यावर नाय हा....


लेखकाची ओळख : अंजली प्रवीण, या कोकणात वास्तव्य करणारी आहे.  तसेच त्या महिला, बाल, कुटुंब , क्रिमिनल जस्टीस सिस्टीम सारख्या सामाजिक क्षेत्रात समुपदेशन आणि डेटा विश्लेषक म्हणून कार्यरत आहेत. 

amkar.anju@gmail.com


 

३ टिप्पण्या:

  1. मी लहानपणी हे नाटक ऑडिओ कसेटद्वारे किमान 100पेक्षा जास्त वेळा ऐकलं असून जवळ जवळ नाटकाचे डायलॉग पाठ होते. झी टीव्ही पाहिलं आहे. आपल्या मताशी सहमत आहे की प्रत्येक मालवणी माणूस मुळातच विनोदी स्वभावाचा असल्याने माणसाला हे नाटक नक्कीच आवडेल.छान परीक्षण करून नाटकाच्या आठवणीला उजाळा दिलात 👌🙏

    उत्तर द्याहटवा
  2. संगीत वस्त्रहरण

    मालवणी भाषेक सोन्याचे दिवस दाखवणार एक अजरामर नाटक..��

    ह्या नाटकातील सगळी पात्र समरस होऊन हे नाटक उचलून धरत असले तरीही बाबूजी म्हणजेच मच्छीन्द्र कांबळी हे त्या नाटकाचा मुख्य पाया होते ही बाब विशेष.मी हे नाटक 3, 4 वेळा पाहिलं असलं तरीही ह्याची ऑडिओ कॅसेट घासून घासून पाठ केली होती. आजही हे नाटक माझ्या स्मरणात आहे, बाबूजींचा सहजसुंदर अभिनय बघताना आपण त्या माणसाच्या प्रेमात पडत जातो, इतकं ते छान काम करायचे. ह्या नाटकात काम करण्याची इच्छा होती, भले पडदा ओढायची भूमिका भेटली असती तरी चालेल असत पण बाबूजींच्या अकस्मात निधनाने आपण खूप काही गमावलं हे मनाला आजही चटका देत राहत..

    उत्तर द्याहटवा
  3. वस्त्रहरण , एक अजरामर मालवणी कलाकृती, परीक्षण अप्रतिम.

    उत्तर द्याहटवा

कांदे पोहे कि सौदेबाजी....की विवाह संस्थेच फाऊंडेशन

 कांदे पोहे कि सौदेबाजी....की विवाह संस्थेच फाऊंडेशन   काही चांगल्या / कमावत्या मुलांची लग्न ठरत नाही मग ती मुलं किंवा त्याच्या घरचे मुलींना...