शुक्रवार, २६ जुलै, २०२४

कांदे पोहे कि सौदेबाजी....की विवाह संस्थेच फाऊंडेशन

 कांदे पोहे कि सौदेबाजी....की विवाह संस्थेच फाऊंडेशन

 

काही चांगल्या / कमावत्या मुलांची लग्न ठरत नाही मग ती मुलं किंवा त्याच्या घरचे मुलींना सर्रास नावं ठेवताना दिसतात....

"मुलगी  स्वतः नोकरी करत नाही पण तिला सरकारी नोकरीवाला पाहिजे., स्वतःच घरच पाहिजे वगैरे सारख्या टोकाच्या अपेक्षा मुली ठेवतात." 


माझं या मुलींच्या अपेक्षांना अजिबात समर्थन नाही. 

पण मुलींच्या डोक्यात हे टोकाचे विचार येतातच कसे ??? या उत्तराचा कधी शोध घेतला का ? 

मुलींच्या या विचारांचे  डिकोडिंग करू : 


१. एकतर मुलींचे शिक्षण नामपात्र असते. आमची हि मुलगी ग्रॅड्युएट / पोस्ट ग्रॅड्युएट  झाली म्हटलं कि  तेवढ्या पगारवाला मुलगा बघायचा. आर्थिक स्वावलंबनासाठी तिचे शिक्षण होत नाही. 

२. कधी कधी टाईमपास म्हणून मुली शिकून नोकरी करतात. तरीही लग्नानंतर काय नवराच सांभाळणार हे सतत सतत तिला बिंबवले जाते. त्यामुळे स्वावलंबनासाठी नोकरी करणाऱ्या मुलींची संख्याच कमी आहे. 

३.  मध्यम वर्गात  लग्नानंतर  घरासाठीच  काही मुली नोकरी करत असल्या तरीही घर आणि नोकरी अशी डबल ड्युटी सांभाळावी लागते. ( ते हि मुलगा / सासरचे मोठ्या मनाने परवानगी देऊनच होतं ) हे समाजातल्या  उरलेल्या मुली / मुलीच्या घरातले  बघत असतात.म्हणूनच " चांगल्या पगाराचा मुलगा हवा/ पक्के घर / जमीन जुमला"   याला प्रायोरिटी दिली जाते. 

४. बहुतेक मुलीच्या  घरातले / समाजच तिला शिकवत असतो कि, - "स्वतःच अमुक मोठं घर / अमुक एकर जमीन  हवंच , हौस-मौस पुरवायला मोठ्या पगाराची नोकरीवाला कमवणारा हवाचं. ( याला "मुलीच्या सिक्युरिटीसाठी" व्याख्या समाजात  वापरली जाते.  )


बरं, यात अजून वय आणि बाह्यरूप ( गोरे, काळे, बुटकी, टकले , चकणे )  यावरून होणारी सौदेबाजी वेगळाच महत्वाचा मुद्दा आहे. 


मला अजून एक प्रश्न पडतो कि , या मुलांनी स्वतःच्या बहिणीच्या / त्याच्या घरातल्या मुलींचे लग्न लावताना त्यांनी हा विचार केलेला असतो का ?

 ते आपल्या मुलीचे / बहिणीचे लग्न कमी पगार वाल्या / घर नसलेल्या घरात लावतात का ? 

तुम्ही स्वतःच्या बहिणीला /  मुलीला इतकं आर्थिक स्वावलंबी बनवले आहे का ? 


अंतिमतः मुलीला पत्नीव्रता - पती परमेश्वर  म्हणूनच गुलामगिरीत (ट्रॉफी वाइफ ) जगायचं असतं मग निदान कोणाची गुलाम बनायचं हे ती किंवा तिच्या घरातले ठरवतात.

हि लग्न सौदेबाजी म्हणजे कांदे पोहे कार्यक्रम... आपल्या विवाह संस्थचे फाऊंडेशन.



Anjali Pravin

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

कांदे पोहे कि सौदेबाजी....की विवाह संस्थेच फाऊंडेशन

 कांदे पोहे कि सौदेबाजी....की विवाह संस्थेच फाऊंडेशन   काही चांगल्या / कमावत्या मुलांची लग्न ठरत नाही मग ती मुलं किंवा त्याच्या घरचे मुलींना...