स्त्री विषयी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
स्त्री विषयी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, २८ मे, २०२४

Menstrual Hygiene Day

PC:GOOGLE

माझ्या नातेवाईकांनी मिल कामगारांची मुंबई ते मॉलवाली मुंबई इतके झपाट्याने परिवर्तन पाहिले.  आमच्या गावातील निम्मी लोकसंख्या रोजगारासाठी मुंबईला स्थलांतरित झाली. पण मासिक पाळीतील बंधने मात्र मुंबईच्या छोट्याश्या खोलीत हि काटेकोर पाळले जायचे.  

माझं बालपण देखील  मासिक पाळीतील कपडे लपवून कसे सुकवायचे आणि छोट्याश्या हॉलमध्ये ५ दिवस अस्पृश्य कसे राहायचे यात गेले.  जेवण - पाणी लांबून द्यायचे. या पाच दिवसाचे अंथरून पण वेगळे असायचे. पाच दिवसा नंतर तर ते पुन्हा धुवून ठेवायचे. त्यात कोणी "जाणवे घातलेले किंवा माळकरी म्हणवणारे" घरी आले तर, मासिक पाळी आल्यावर मला बोलण्याची हि पाबंदी होती.  अन्यथा ते "पाण्याचा तांब्या उलटा करून श्राप देतात." हि भीती घालायचे. घरात गोमूत्र शिंपडले जायचे. 


त्यानंतर घरी गणपती, दिवाळी, दसरा, लग्न समारंभ आले कि मासिक पाळीच्या गोळ्या खाण्याचा  एक "नवीन संस्कार" घरी करण्यात आला. घरातील स्त्रिया म्हणजे आई बहिणी मैत्रिणी कायम सणवार आला कि, "किती गोळ्या आणायच्या ? कधी पासून खायच्या ? कुठली गोळी चांगली ? मग त्याने दिवस मागे येतात कि पुढे जातात ?  त्यामुळे कोणाकोणाला किती उलट्या होतात ? कोणाचं किती डोकं दुखत? कोणाची किती  मळमळ होते?  किती चिडचिड होते ?   किती पिंपल्स येतात ? पपई -खजूर -हळद दूध घरगुती कोणते उपाय किती करायचे ? किती गरम पडायचे ?" याची तासनतास पुरुष घरी नसताना चर्चा करायच्या. याचमुळे नेमकं मासिक पाळीत स्त्रीची मानसिक आणि शारीरिक नेमके काय बदल होतात. स्त्रीला किती त्रास होतो या गोष्टी कधी पुरुषांपर्यंत पोहचतच नाही. 


 नेमके सणवाराला त्या घरातील स्त्रीला पाळी आली तर आजही  "अडचण झाली,  प्राब्लेम झाला , विघ्न आले" असे शब्द आज हि सर्रास वापरले जातात. "घरातील आता सर्व सणवारातील काम कोण करणार ?" यामुळे घरातील इतर स्त्री आणि पुरुष यांची चिडचिड आणि टेन्शन वाढत.  आज हि हे चित्र आमच्या गावातील आणि शहरातील  प्रत्येक नातेवाईकाच्या घरी हमखास बघायला मिळते. 


मासिक पाळीतील ५ दिवस वेगळे ठेवणे यासाठी काही सुशिक्षित  मैत्रिणी वकिली करत पुढाकार घेऊन बोलतात कि, "स्त्रीला आराम मिळावा म्हणून ते दिवस वेगळे ठेवतात." तिला आराम मिळावा म्हणून अस्पृश्य ठेवण्याची का गरज भासते? समावेशन करून हि तिला आराम देता येऊ शकतो.  इतकं साधी गोष्ट हि लक्षात येत नाही. 

 

सध्या मी मेट्रो सिटी मध्ये राहते. माझ्या ऑफिसचे कर्मचारी आज हि "अडचण / प्रॉब्लेम आला..किंवा येणार .. आता घरातली सणवारची पूजेची काम कशी होणार ? " याच चर्चा सुरु असतात. 


 It's Time for Action... मासिक पाळी बद्दलचे संस्कृती- परंपरेच्या नावाने नकारात्मक असेलेली विचार सरणी पण बदलूया. प्रत्येकाने पुढाकाराची बदलाची गरज आहे.. 

कारण, 

ती आजही मासिक पाळीला प्रॉब्लेम / अडचण /  बर्थडे / पगार असे कोडवर्ड वापरते. 

कारण, 

तिने मासिक पाळी शब्द वापरला तर ती चारित्र्यहीन म्हणून तिला पाहिले जाते. 

कारण, 

ती आजही तिच्या मासिक पाळीतील कपडे लपवूनच सुकवते. 

कारण, 

ती आज हि सणवारा आणि समारंभात घरात काम करता यावे म्हणून किती हि वेदना झाल्या तरीही  मासिक पाळी पुढे ढकलण्याच्या गोळ्या घेत असते. 

कारण, 

तिला आज हि गावा-गावांत मासिक पाळीच्या दिवसात तिला अस्पृश्यासारखी वागणूकी दिली जाते. 

कारण, 

आज हि तिची मासिक पाळी अपवित्रच आहे. 

कारण, 

तुमच्या घरातील  "ती" तुमची आई, बहीण, पत्नी, काकी,  मामी  किंवा मैत्रीण कोणीही असू शकते. जर लेख वाचणारी स्त्री आहे तर तुम्ही स्वतः देखील असू शकाल ?


 मासिक पाळीदेखील एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. इतकं सोपं आहे समजून घ्यायला. पण उगीच रूढी - परंपरा पाप -पुण्य संस्कृती वैगरे जोखड त्यावर टाकत गेले आहेत. 


नुसते Menstrual Hygiene Day 2024 चा स्टेट्स ठेवण्या पेक्षा तिला तिच्या मासिक पाळीला समजून घेणायचा प्रयत्न करूया. 


अज्ञान, समज - गैरसमज असतील तर मोकळ्या मनाने चर्चा करूया. 

मी चर्चेसाठी तयार आहे माझ्याशी नक्की बोलू शकता. तुम्ही तयार आहात का ?




 

रविवार, २३ मे, २०२१

"मेन्स्ट्रुअल कप" वापरताना माझा अनुभव || Menstrual cup

 "मेन्स्ट्रुअल कप" वापरताना माझा अनुभव

Menstrual-cup-apali-writergiri
PC:Clue

मेन्स्ट्रुअल कप” हा सॅनिटरी नॅपकिन्सला पर्यायी म्हणून नवीन संकल्पना म्हणून चर्चेत आहे. पण खरतर मेन्स्ट्रुअल कप म्हणावी तितकी नवीन संकल्पना नाही. फ़क़्त आपल्याला त्याची फारशी जाणीवजागृती नाही. “मेन्स्ट्रुअल कप वर आधारित अनेक संशोधने लेन्सेट पब्लिक हेल्थ जनरलमध्ये आणि  फिलीप्स – हॉवर्ड सारख्या अनेक विद्यापीठ आणि वर्तमानपत्रात  मेन्स्ट्रुअल कप”च्या वापरावर अनेक संशोधने मांडली गेलेली आहेत.

मेन्स्ट्रुअल कप” म्हणजे काय सोप्या भाषेत :

मेन्स्ट्रुअल कप” म्हणजे सिलिकॉन किंवा मऊ रबराचा एक कप असतो. जो योनीच्या आतमध्ये सरकवल्यावर योनीतील सक्शन सील करतो. यामुळे मासिकपाळी दरम्यान होणारा रक्तस्त्राव त्या कपमध्ये जमा होतो.  योनिमार्गातील सक्शन सील केल्यामुळे रक्तस्त्राव कपच्या बाहेर लिकेज होत नाही.

मेन्स्ट्रुअल कप” वापरताना माझा अनुभव :

नवीन काहीतरी घ्यायचे ठरवले कि, मी ही इतरांप्खूरमाणे खूप गुगल सर्च केले. पण जेव्हा पहिल्यांदा कप वापरण्याआधी  युट्युबवरील काही भयावह एक्स्प्रेशन केलेले व्हिडीओ पाहिले. हे व्हिडीओ पाहून उगाच भीती वाटत होती. योनीमार्गात कप ठेवताना दुखते – त्रास होतो असे उगाच फेक आणि नकारात्मक विडीओमुळे भीती वाटत होती. माझ्याही मनात नको त्या शंका येऊ लागल्या होत्या. कि कप लावून कसे चालायचे? कसे बसायचे ? कसे झोपणार ? लिकेज झाले तर ? आतच गेले तर ? असे अनेक प्रश्न होते. पण यावर अनेक डॉक्टरांच्या मुलाखती आणि संशोधने यांचा अभ्यास केला. याचे फायदे तोटे यांचा खूप अभ्यास केला. पण कोणताही तोटा न दिसता यात खुपसारे फायदेच दिसू लागले. पण तरीही लगेच कप घेण्याची हिम्मत नाही झाली.

दोन वर्षापूर्वी एकेदिवशी अचानक मला माझ्या मैत्रिणीने  याबद्दल सुचविले. तिचा अनुभव ऐकला आणि एक दिलासा वाटला. दर महिन्याला होणारा सॅनिटरी नॅपकिन्सने निर्माण होणारा लवकर विघटन न होणारा कचरा, पर्यावरणहानी टाळणे, दर महिन्याला सॅनिटरी नॅपकिन्सचा खर्च नको, सॅनिटरी नॅपकिन्स होणारे चिकचिक- इरिटेशन  नको  म्हणून मी हि “मेन्स्ट्रुअल कप” लगेच ऑर्डर केला.

खरोखरच  मेन्स्ट्रुअल कप वापरणे खूप सोपे आणि सोयीस्कर आहे. सॅनिटरी नॅपकिन्स मला दिवसातून ५ ते ६ वेळा बदलावे लागायचे. प्रत्येकवेळी ओव्हर ब्लडीगमुळे ऑफिसला असले कि सॅनिटरी नॅपकिन्स बदलणे आणि त्याची विल्हेवाट लावणे हे एक आव्हानच असायचे. त्यात त्या अति ओलाव्यामुळे किंवा चिकचिकमुळे देखील कामात लक्ष नाही लागायचे. पावसाळ्यात ट्रेकिंगला जाताना किंवा समुद्र किनारी फिरायला जायचे ठरले कि, भिजताना टेन्शन यायचे. “मेन्स्ट्रुअल कप” मुळे हे प्रश्न सुटल्यासारखे वाटतात.  सॅनिटरी नॅपकिन्समुळे होणारे इन्फेक्शनची भीती हि आता राहिली नाही.

मेन्स्ट्रुअल कप” घातल्यावर योनी मार्गात खूप कम्फर्टेबल बसते. पहिल्यांदा मनात अनेक शंका / प्रश्न ठेवून वापरल्याने योनीमार्गात काही तरी आहे असे मनात सारखे वाटत राहिले होते. पण मनातील भीती लगेच दूर झाली. मेन्स्ट्रुअल कप लावल्यानंतर चालताना, उठताना,  झोपताना आणि  भिजताना कोणताही त्रास / लिकेज होत नाही.

मेन्स्ट्रुअल कप” कोणता घ्यावा ? किमंत किती ? कसा घ्यावा ?

मेन्स्ट्रुअल कप” चे लहान, मध्यम आणि मोठा असे तीन साईज आहेत जे वयानुसार, शारीरिक संबंध, रक्तस्त्राव  आणि प्रेग्नन्सीनुसार मेन्स्ट्रुअल कपच्या साईजचे वर्गीकरण करण्यात आलेले आहे. ज्या कंपनीचा कप घेऊ त्यावर याबद्दल सविस्तर माहिती लिहिलेली असते.  मेन्स्ट्रुअल कपची किंमत ३००रु.  ते २००० रुपयांपर्यत आहे. (मी सध्या ३०० रुपये किमतीचा ३०० मेन्स्ट्रुअल कप वापरत आहे.)

मेन्स्ट्रुअल कप” चे फायदे :

१.      अवास्तव खर्च नाही आणि  इन्फेक्शन नाही :

सॅनिटरी नॅपकिन्सने होणारा अवास्तव खर्च टाळला जातो. दर महिन्याला कमीतकमी रुपयांचे म्हंटले तरी ५० ते ६० रुपये वर्षाला ७०० ते ८०० रुपये सॅनिटरी नॅपकिन्सनवर  खर्च होतात. खर्चिक आहे  म्हणून  सॅनिटरी नॅपकिन्स जो पर्यंत पूर्ण ओला होत नाही तो पर्यंत वापरले देखील जाते किंवा  आठ तासाहून अधिक वेळ एकच सॅनिटरी नॅपकिन्स वापरला जातो. ज्यामुळे योनीमार्गात इन्फेक्शनदेखील झालेले दिसते.  या सर्व गोष्टी “मेन्स्ट्रुअल कप” च्या वापराने टाळता येतात. एकदा एक “मेन्स्ट्रुअल कप” घेतले कि, एक कप साधारणत कमीत कमी पाच ते सहा आणि जास्तीत जास्त आठ ते दहा वर्षे चालतो.

२.      पर्यावरण हानी नाही :

सॅनिटरी नॅपकिन्सचे लवकर विघटन होत नाही. यामुळे घनकचरा व्यवस्थापन करताना याबद्दल गंभीर समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. एकाच “मेन्स्ट्रुअल कप”चा वापर वर्षानुवर्षे करता येतो. त्यामुळे दर महिन्याचा – वर्षाचा होणारा सॅनिटरी नॅपकिन्सच्या कचरा विघटनाची समस्या कमी करता येऊ शकते.

 

मेन्स्ट्रुअल कप” वापरताना घ्यावयाची काळजी :

दोन पाळीच्या दरम्यान किंवा पहिल्यांदा वापरताना कप निर्जंतुक (स्टरलाईज) करून आणि  कोरडा करून  ठेवा. नेहमी कपला हात लावण्याआधी हात स्वच्छ धुवावे.

  


लेखिका : अंजली प्रविण, ८+ वर्षांपासून समुपदेशक आणि डेटा विश्लेषक  म्हणून सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. 

amkar.anju@gmail.com 

मंगळवार, ३ नोव्हेंबर, २०२०

“नितळ”

 नितळ

apali-writergiri-nital-anjali-pravin-नितळ-आपली

“पानी सा निर्मल हो मेरा मन... मेरा मन

धरती सा अविचल हो मेरा मन

धुंधलाई आँखे जब, भरमाया चित्त है

समझे ना मन को जब सत्य या असत्य है...

चंचलता मोह से दूर रहे

अपने हि द्रोह से दूर रहे

करुणामय निर्भय हो मेरा मन||”

 


नितळ हा शब्द ऐकला कि...टीव्हीवरील जाहिरातींचे शब्द कानावर ऐकू येतात ते म्हणजे .... “नितळ गोऱ्या त्वचेसाठी वापरा आमचे गुणकारी ‘अबक’ प्रोडक्ट... नितळ गोऱ्या त्वचेची १००% खात्री.”

नितळ गोरे दिसणे किती महत्वाचे आहे हे या भांडवलशाही जगाने अगदी शिक्कामोर्तब करून सांगितलेले आहे आणि समाजाने ते सारासार विचार न करता स्वीकारली आहे.  यामुळे  समाजाला लक्षातच नाही कि, ‘नितळ मन आणि  भावना देखील असतात.’ आता हे फ़क़्त पुस्तकी वाक्य बनले आहेत. “सुंदर दिसणं महत्वाचे नसून सुंदर असणं महत्वाचे आहे.” या विषयावर भाष्य करणारा चित्रपट म्हणजे “नितळ”

“नीरजा” हि या चित्रपटातील प्रमुख पात्र आहे. जिला “ल्युकोडोर्मा” किंवा “कोड” म्हणजेच शरीरावर पांढरे डाग आलेले असतात.  ती एक उत्तम नेत्रतज्ञ डॉक्टर असते. त्याच बंगळूरच्या हॉस्पिटलमधील डॉक्टर अनन्य  रानडे  देखील तिच्यावर मनापासून प्रेम करत असतो. दोघे हि एकमेकांवर प्रेम करत असले तरीही तिला तिच्या दिसण्यावरून समाज कोणत्या नजरेने बघतो याची जाणीव असते म्हणून ती त्या प्रेमाच्या स्वीकार करण्यास घाबरत असते. म्हणून तो नीरजा आणि त्याचे कुटुंबीय यांचे एकमेकांबद्दलचे मत विचारात घेण्यासाठी तिला आपल्या घरी घेऊन जायचा विचार करतो. तेव्हा आजीच्या डोळ्याच्या ऑपरेशनचे आणि घरातील एक कार्यक्रमाचे निमित्त सांगून तिला आपल्या पुण्याच्या घरी घेऊन येतो.

 रानडे कुटुंब उच्चविद्याविभूषित असे मोठे कुटुंब दाखविले आहे. ज्यांना समाजात एक  मान किंवा चांगले स्थान मिळालेले आहे. त्याचे कुटुंबहि मोठे असते. ज्यात आजी, आजोबा, आई, वडील, काका, काकी, त्यांची मुले, आत्या वैगरे कुटुंबीय असतात.  अनन्यचा लग्नाचा विषय घरी सुरूच असतो आणि त्याच वेळी नीरजाला मैत्रीण म्हणून घरी घेऊन आलेला असतो. यामुळे घरभर त्या दोघांचीच चर्चा सुरु असते. जेव्हा पहिल्यांदा ते दोघे घरी येतात तेव्हा घरातील सर्व व्यक्ती कोणत्या ना कोणत्या कामा निमित्त घराबाहेर व्यस्त असतात. तेव्हा पहिली भेट आजीशी होते. जिच्या डोळ्यावर पट्टी असते तिला काहीच दिसत नसते. पण आवाज आणि स्पर्शाने ती अनन्यला ओळखते आणि नीरजाशी हि ओळख करून घेते.  त्यानंतर नीरजाची कुटुंबियातील इतर सदस्यांसोबत ओळख होऊ लागते. त्यासोबतच घरच्यांच्या सकारात्मक आणि नकारात्मक प्रतिक्रिया व मते हि दिसू लागतात.

या चित्रपटात सुंदर दिसण्यावरून किती सहजतेने भेदभाव केला जातो हे खूप अचूक आणि उत्तमरीतीने मांडले आहे. त्यात जर कोड असेल तर समाज त्या व्यक्तींना वाळीत टाकल्यासारखेच वागत असतो. या चित्रपटातदेखील एका प्रसंगात नीरजा स्वयंपाकघरात  मदत करायला जाते.  तेव्हा फळे कापत असताना तिला स्वयंपाकघराच्या बाहेर जायला सांगतात आणि तिने कापलेली फळे कचऱ्याच्या डब्यात फेकून दिली जातात. तिला मेकअप करण्याचे सल्ले दिले जातात.  थोडक्यात इथे हि तिला नेहमीप्रमाणे दिसण्यावरून अपमान सहन करावा लागतो. पण तिला लहानपणा पासून समाजाने असे तिच्याशी विक्षिप्त वागण्याची सवय झालेली असते. तिच्या सोबत अश्या वागण्याची सुरुवात घरातूनच झालेली असते.

एकीकडे नीरजाच्या पात्रातून असे अनेक प्रसंग दाखविले आहेत कि ज्यातून आपल्याला सुशिक्षित समाजाचा सुंदरतेकडे बघण्याचा मागासलेला दृष्टीकोन कळतो. तर दुसरीकडे अशिक्षित समजणारे आदिवासी पाड्यातील लोकांमध्ये मात्र सुंदरतेची संकल्पना व विचार पूर्णतः अनोखी आणि पुढारलेली दाखविली आहे.    

वर्ष २००६ ला नितळ चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर यांनी केले आहे. प्रमुख कलाकार देविका दफ्तरदार, शेखर कुलकर्णी, विजय तेंडूलकर, विक्रम गोखले, ज्योती सुभाष, अमृता सुभाष, किशोर कदम, सारंग साठ्ये, दीपा श्रीराम,उत्तरा बावकर आणि  रवींद्र मंकणी या प्रत्येकाने उत्तम अभिनय केला आहे. या चित्रपटातील सवांद आणि गाणी हळुवार मनाला स्पर्श करणारी आहेत. उगीच कोणताही तिखट मसाला न लावता साध्या सरळ आणि सोप्या भाषेत या चित्रपटाची मांडणी केली आहे.

आपण हि जेव्हा एखाद्याला रंग किंवा दिसण्यावरून कळत – नकळत जेव्हा बोलून जातो तेव्हा त्या व्यक्तीने असे प्रसंग किती वेळा सहन केलेले असू शकते. याची जाणीव तर आपल्याला कळेल. त्यासोबतच हा चित्रपट आपल्या विचारांत नक्की सकरात्मक बदल घडवून आणेल.   


लेखिका : अंजली प्रविण, ८+ वर्षांपासून समुपदेशक आणि डेटा विश्लेषक  म्हणून सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. 

amkar.anju@gmail.com 

पुढील लेखासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

रविवार, ४ ऑक्टोबर, २०२०

मैने लोगो से सुना है कि.....

 


मैने लोगो से सुना है कि.....

निर्भया-आपली-apali-writergiri-anjali-pravin
 

जब दिल्ली कि निर्भया थी तब

लोग बोले के ....

क्यू छोटे कपडे पहने थे ?

जब हैदराबाद कि निर्भया थी तब

लोग बोले के ....

क्यू इसे इतने रात को अकेले निकलना था ?

जब कोपर्डी कि निर्भया थी तब

लोग बोले के ....

क्यू वो उस रस्ते से गई थी ?

जब निर्भया कठूआ से आठ साल कि लडकी थी तब

लोग बोले के ....

क्यू माता- पिता अपने बच्चो पे ध्यान नही देते?

जब वो निर्भया मुंबईसे थी तब

लोग बोले के...

मुंबई कि लडकिया होती हि फोरवर्ड है... तो ये हाल तो होना हि है...

जब वो निर्भया बदायु कि दो बहने थी तब

लोग बोले के ....

क्यू बडे जाती के लोगो से झगडा करना था ?

जब वो निर्भया उन्नाव से थी तब

लोग बोले के...

देखा बडे लोगो से पंगा लोगे ... केस दर्ज करोगे तो ... ऐसे हि जला दिया जायेगा

जब वो निर्भया हापूड से थी तब

लोग बोले के...

लडकीया रेप करके चूप ना रहे तो एसिड भी  फेका जायेगा  

जब वो निर्भया हाथरस से थी तब

लोग बोले के...

रेप तो हुआ हि नही था... जुबान तो कटी हि नही थी... फेक न्यूज बना रहे है

जब वो निर्भया बलरामपुर – आजमगढ- बुलंदशहर  से थी तब

लोग बोले के...

ये सब सुशांत और कंगना कि न्यूज ना दिखाये इसीलिये चल रहा है...

ऐसे रेप तो हर रोज होते रहते है इसमे क्या नयी बात है ....


मैने इन लोगो से ये भी सुना है कि,

भारत मेरा देश है... समस्त भारतीय मेरे भाई- बहन है...

मैने इन लोगो से ये भी सुना है कि,

हम स्त्री शक्ती को मां दुर्गा कि तरह पुजते है....

मैने इन लोगो से ये भी सुना है कि,

निर्भया के हत्यारो को फासी दे दो...

 

पर मैने लोगो से ये नही सुना कि...

निर्भया कहा से भी हो वो मेरी बहन है....

पर मैने लोगो से ये नही सुना कि...

निर्भया कौनसे भी जाती से हो वो भारतीय है....

पर मैने लोगो से ये नही सुना कि...

निर्भया का आरोपी कोई भी हो हम उसे सजा देंगे हि....

पर मैने लोगो से ये नही सुना कि...

ऐसी निर्भया ना बने इसलिये स्त्री- पुरुष समानता सोच को अपनाएंगे….

पर मैने लोगो से ये नही सुना कि...

निर्भया कोई भी हो मुझे संवेदना होती है...

मुझे संवेदना होती है...

मुझे संवेदना होती है...

 

Nirbhaya Case मे फासी होगयी  पर निर्भया को न्याय नाही मिला ?....................... 

 

 


शनिवार, ३० मे, २०२०

‘मला मासिक पाळी आलीय’ बोलताना....


मला मासिक पाळी आलीय बोलताना....  


  

आज हि आमच्याकडे मासिक पाळी आली असे सांगायचे असेल तर,  ‘मला कावळा शिवलाय , आज माझी  सुट्टी आहे, आज पगार झाला, आज बाहेरची आहे, विटाळ आहे.’ असेच बोलतात.  काळाबरोबर नवीन वाक्य पण कानावर पडू लागली, ‘आज ते दिवस  आलेत, आज बर्थडे आहे, आज कॉल आला, आज फेस्टिवल आहे’.
आधुनिक महासत्तेच्या आणि मंगळावर पोहचण्याच्या गोष्टी करणाऱ्या भारतात अजून हि साधं ‘आज मला मासिक पाळी आलीय किंवा पिरिएडस  आलेत.’ हे चार-चौघात न लाजता बोलू शकेल असे बोलण्याचे स्वातंत्र्य अजूनही दिसून येत नाही.   जेव्हा एखादी स्त्री ‘मला पिरियड्स आलेत.’ असे चार चौघात बोलते.  तर ती आजूबाजूची माणसं  तिच्याकडे अश्या नजरेने बघतात जसे कि, तिने  शिवी दिलीय किंवा चुकीच काही तरी बोलली. सोबतच हि मुलगी खूप  फोरवर्ड आहे किंवा असंस्कारी आहे असे हे मत आपोआपच तयार होते. शाळेमध्ये आणि  ऑफिसमध्ये सॅनिटरी नेपकीन जर कोणाकडे मागितला तर आज हि तो लपून-छपूनच दिला जातो. सोशल मिडियामुळे मागील एक-दोन वर्षा पासून  निदान एका दिवसासाठी तरी मुली  28th मे ला   “Menstrual Hygiene Day” आणि  5th फेब्रुवारीला  “Happy Periods Day” चे काही  स्टेट्स ठेवू लागलेत. पण ते हि प्रमाण खूपच कमी आणि व्हर्च्युअल  आहे.  स्वतः स्टेटस ठेवूनही त्या मुली चार चौघात ‘आज मला पिरियड्स आलेत’ हे न लाजता आणि न घाबरता बोलू शकत नाही हि उदासीनता आहे.
हल्लीच  माझ्या एका  M.Sc in Chemistry शिकलेल्या  मैत्रिणी सोबत शॉपिंगला गेले असताना.  तिला  सॅनिटरी नेपकीन घ्यायचे होते म्हणून तिने खूप फिरवले. शेवटी ७ किलोमीटर दूर एका  ठिकाणी गेलो. तिकडे एका मेडिकल मध्ये तिने  सॅनिटरी नेपकीन घेतले. मी विचारले, ‘अग ते आपल्या इकडे पण कोणत्याही मेडिकल स्टोअर मध्ये पण मिळाले असते. इतक्या दूर यायची काय गरज होती?’ लगेचच तीच उत्तर आले कि, ‘या मेडिकल स्टोअरला मुलगी असते. पण आपल्या इकडे पुरुष असतात. त्यांच्या समोर सॅनिटरी नेपकीन मागणार कसे?’ याच मुलीचा दोन दिवसानंतर whatsapp ला “Happy Periods Day” म्हणून #NoMoreLimits #ItsTimeForAction असे स्टेटस होते.  मी तिला यावर काहीच न बोलता फ़क़्त मिश्कील अशी स्माईल दिली. 
मी तिला काही समजावत बसले नाही. कारण तिने  स्वतः विज्ञानात पदव्युत्तर शिक्षण घेतले होते. तिला नक्कीच मासिक पाळी विषयी काही गैरसमज नव्हता. पण तरीही तिची स्थिती आज अशी होती.  यात फ़क़्त चूक तिची आहे मी म्हणूच शकत नाही. कारण आज ती जशी आहे तशीच एकेकाळी  मी देखील होते.


मला मासिक पाळी म्हणजे काय? हे वयाच्या सतराव्या वर्षी स्वतः ला पाळी आली तेव्हा कळले. तो पर्यंत माझ्या आजूबाजूच्या सर्व स्त्रिया आई, बहिण आणि मैत्रिणी गपचूप आणि कोड्यात कोणत्या गोष्टी बद्दल बोलायचे हेच कळत नव्हते. टीव्ही वर येणारी  सॅनिटरी नेपकीन जाहिरात लागली कि, लगेच टीव्हीचे  चॅनेल बदलले जायचे. त्यानंतर मी हि तेच करू लागले.  घरी असल्यावर पाळीसाठी वापरले जाणारे कपडे कोणाला दिसू नये अश्या ठिकाणी सुकायला घालायला शिकले. शाळेत एका वर्गात सर्व मुलींना एकत्र करून  खिडकी- दरवाजे बंद करून मगच सॅनिटरी नेपकीनचे वाटप केले जायचे. ते हि मुली लगेच दप्तरात लपवून  ठेवून मगच वर्गाबाहेर पडणार. घर आणि  शाळे पासूनच  ‘सॅनिटरी नेपकीन आणि कपडे  कसे लपवून ठेवायचे’ याच उत्तम प्रशिक्षण न चुकता दिल जात. मला हि आपल्या समाजाकडून आणि कुटुंबातून हीच शिकवण मिळाली.
हल्ली शाळेत लैंगिक शिक्षण विषयात मासिक पाळी बद्दल ज्ञान दिले जाते. या विषयाची शिक्षक हि स्त्री असते व हे ज्ञान फ़क़्त मुलींना वर्गाचे दरवाजे बंद करूनच मिळत. या विषयाबाबत  मुलीसोबत चर्चा केली तेव्हा कळले कि, त्यांना फ़क़्त जुन्या कपड्या ऐवजी सॅनिटरी नेपकीन वापरावे याचीच माहिती दिली जाते. यातीलच एक शिक्षिका मला म्हणाली होती कि, या लहान मुलींना आता पासूनच हे सर्व शिकवल्यामुळे मुली लवकर ‘वाया’ जातात. त्यांची ‘प्रेम-प्रकरण’ आणि ‘शारीरिक संबध’ ठेवण्याची प्रकरण वाढतात.  याच विचारांनी जर बदल घडवायचे म्हटले तर समाजात  बदल होणे अवघड आणि अशक्य असेल.
  मासिक पाळी विषयी कोणाशीही बोलायचं नाही पण मासिक पाळीच्या वेळी सर्वांसमोर अस्पृश्यासारख जगायचं असत. मला माझ्या  मासिक पाळी वेळी इतकीच माहिती माहित होती.  मासिक पाळीच्या वेळी होणारा शारीरिक आणि मानसिक त्रास याच कौतुक करायचं नसतं. सर्वच  बायकांना होतो असा त्रास  असं म्हणून गप्प बसायचं असत. मासिक पाळीशी निगडीत असलेल्या अंधश्रद्धांना देव आणि धर्माच्या श्रद्धेचे नाव देऊन प्रश्न विचारायचे नाही.  प्रश्न विचारले तरीही पाप वाढत. असे सांगून  गप्प केले जायचे.
जसे जसे मासिक पाळी विषयी प्रश्न आणि विचारांचा  गुंता वाढत गेला. तसे   मी स्वतः अभ्यास करून माझ्या प्रश्नांची  उत्तर शोधायला लागले.  मासिक पाळी विषयीचे  अज्ञान दूर होण्यासाठी  घरातूनच स्पष्टपणे चर्चा करायला प्रश्न विचारायला सुरवात केली. मासिक पाळी आणि अंधश्रद्धे विषयीची माझी अनेक स्पष्टीकरणे नातेवाईकाना निरुत्तर करून जायची. पण तरीही बहुतेक प्रश्नाची उत्तरे ‘शास्त्रात असं लिहिलेय’ सांगून सारवासारव केली जायची. पण माझे घरातील  जनजागृतीचे  प्रयत्न सुरूच राहिले. माझ्या नातेवाईक आणि मित्रांशी चर्चा करताना कळले कि, ‘माझ्या बायकोला किंवा बहिणीला दर महिन्याला नेमकं काय होत?’ याबद्दल पूर्णपणे अज्ञानी होते.  त्यांना मासिक पाळी विषयी थोडक्यात माहिती दिली तेव्हा पासून तिच्या त्या पाच दिवसात हे तिला समजून घ्यायला लागले.
एकीकडे मासिक पाळी संबंधी  असलेले गैरसमज, अंधश्रद्धा आणि अज्ञान तर दुसरीकडे न बोलण्याची मानसिकता. या दोन्ही बाजूने स्त्री पुरुष समानते सह बदल घडण्याची गरज आहे.     मासिक पाळी किंवा ऋतू स्त्राव हि श्वसनाइतकीच नैसर्गिक प्रक्रिया आहे म्हणून स्वीकार होईल. तेव्हाच ‘ती’  न लाजता न  घाबरता बोलू शकेल  कि, ‘मला आज पाळी आलीये’.  #ItsTimeForAction



लेखिका : अंजली प्रविण, ८+ वर्षांपासून समुपदेशक आणि डेटा विश्लेषक  म्हणून सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. 

amkar.anju@gmail.com




कांदे पोहे कि सौदेबाजी....की विवाह संस्थेच फाऊंडेशन

 कांदे पोहे कि सौदेबाजी....की विवाह संस्थेच फाऊंडेशन   काही चांगल्या / कमावत्या मुलांची लग्न ठरत नाही मग ती मुलं किंवा त्याच्या घरचे मुलींना...