रविवार, २३ मे, २०२१

"मेन्स्ट्रुअल कप" वापरताना माझा अनुभव || Menstrual cup

 "मेन्स्ट्रुअल कप" वापरताना माझा अनुभव

Menstrual-cup-apali-writergiri
PC:Clue

मेन्स्ट्रुअल कप” हा सॅनिटरी नॅपकिन्सला पर्यायी म्हणून नवीन संकल्पना म्हणून चर्चेत आहे. पण खरतर मेन्स्ट्रुअल कप म्हणावी तितकी नवीन संकल्पना नाही. फ़क़्त आपल्याला त्याची फारशी जाणीवजागृती नाही. “मेन्स्ट्रुअल कप वर आधारित अनेक संशोधने लेन्सेट पब्लिक हेल्थ जनरलमध्ये आणि  फिलीप्स – हॉवर्ड सारख्या अनेक विद्यापीठ आणि वर्तमानपत्रात  मेन्स्ट्रुअल कप”च्या वापरावर अनेक संशोधने मांडली गेलेली आहेत.

मेन्स्ट्रुअल कप” म्हणजे काय सोप्या भाषेत :

मेन्स्ट्रुअल कप” म्हणजे सिलिकॉन किंवा मऊ रबराचा एक कप असतो. जो योनीच्या आतमध्ये सरकवल्यावर योनीतील सक्शन सील करतो. यामुळे मासिकपाळी दरम्यान होणारा रक्तस्त्राव त्या कपमध्ये जमा होतो.  योनिमार्गातील सक्शन सील केल्यामुळे रक्तस्त्राव कपच्या बाहेर लिकेज होत नाही.

मेन्स्ट्रुअल कप” वापरताना माझा अनुभव :

नवीन काहीतरी घ्यायचे ठरवले कि, मी ही इतरांप्खूरमाणे खूप गुगल सर्च केले. पण जेव्हा पहिल्यांदा कप वापरण्याआधी  युट्युबवरील काही भयावह एक्स्प्रेशन केलेले व्हिडीओ पाहिले. हे व्हिडीओ पाहून उगाच भीती वाटत होती. योनीमार्गात कप ठेवताना दुखते – त्रास होतो असे उगाच फेक आणि नकारात्मक विडीओमुळे भीती वाटत होती. माझ्याही मनात नको त्या शंका येऊ लागल्या होत्या. कि कप लावून कसे चालायचे? कसे बसायचे ? कसे झोपणार ? लिकेज झाले तर ? आतच गेले तर ? असे अनेक प्रश्न होते. पण यावर अनेक डॉक्टरांच्या मुलाखती आणि संशोधने यांचा अभ्यास केला. याचे फायदे तोटे यांचा खूप अभ्यास केला. पण कोणताही तोटा न दिसता यात खुपसारे फायदेच दिसू लागले. पण तरीही लगेच कप घेण्याची हिम्मत नाही झाली.

दोन वर्षापूर्वी एकेदिवशी अचानक मला माझ्या मैत्रिणीने  याबद्दल सुचविले. तिचा अनुभव ऐकला आणि एक दिलासा वाटला. दर महिन्याला होणारा सॅनिटरी नॅपकिन्सने निर्माण होणारा लवकर विघटन न होणारा कचरा, पर्यावरणहानी टाळणे, दर महिन्याला सॅनिटरी नॅपकिन्सचा खर्च नको, सॅनिटरी नॅपकिन्स होणारे चिकचिक- इरिटेशन  नको  म्हणून मी हि “मेन्स्ट्रुअल कप” लगेच ऑर्डर केला.

खरोखरच  मेन्स्ट्रुअल कप वापरणे खूप सोपे आणि सोयीस्कर आहे. सॅनिटरी नॅपकिन्स मला दिवसातून ५ ते ६ वेळा बदलावे लागायचे. प्रत्येकवेळी ओव्हर ब्लडीगमुळे ऑफिसला असले कि सॅनिटरी नॅपकिन्स बदलणे आणि त्याची विल्हेवाट लावणे हे एक आव्हानच असायचे. त्यात त्या अति ओलाव्यामुळे किंवा चिकचिकमुळे देखील कामात लक्ष नाही लागायचे. पावसाळ्यात ट्रेकिंगला जाताना किंवा समुद्र किनारी फिरायला जायचे ठरले कि, भिजताना टेन्शन यायचे. “मेन्स्ट्रुअल कप” मुळे हे प्रश्न सुटल्यासारखे वाटतात.  सॅनिटरी नॅपकिन्समुळे होणारे इन्फेक्शनची भीती हि आता राहिली नाही.

मेन्स्ट्रुअल कप” घातल्यावर योनी मार्गात खूप कम्फर्टेबल बसते. पहिल्यांदा मनात अनेक शंका / प्रश्न ठेवून वापरल्याने योनीमार्गात काही तरी आहे असे मनात सारखे वाटत राहिले होते. पण मनातील भीती लगेच दूर झाली. मेन्स्ट्रुअल कप लावल्यानंतर चालताना, उठताना,  झोपताना आणि  भिजताना कोणताही त्रास / लिकेज होत नाही.

मेन्स्ट्रुअल कप” कोणता घ्यावा ? किमंत किती ? कसा घ्यावा ?

मेन्स्ट्रुअल कप” चे लहान, मध्यम आणि मोठा असे तीन साईज आहेत जे वयानुसार, शारीरिक संबंध, रक्तस्त्राव  आणि प्रेग्नन्सीनुसार मेन्स्ट्रुअल कपच्या साईजचे वर्गीकरण करण्यात आलेले आहे. ज्या कंपनीचा कप घेऊ त्यावर याबद्दल सविस्तर माहिती लिहिलेली असते.  मेन्स्ट्रुअल कपची किंमत ३००रु.  ते २००० रुपयांपर्यत आहे. (मी सध्या ३०० रुपये किमतीचा ३०० मेन्स्ट्रुअल कप वापरत आहे.)

मेन्स्ट्रुअल कप” चे फायदे :

१.      अवास्तव खर्च नाही आणि  इन्फेक्शन नाही :

सॅनिटरी नॅपकिन्सने होणारा अवास्तव खर्च टाळला जातो. दर महिन्याला कमीतकमी रुपयांचे म्हंटले तरी ५० ते ६० रुपये वर्षाला ७०० ते ८०० रुपये सॅनिटरी नॅपकिन्सनवर  खर्च होतात. खर्चिक आहे  म्हणून  सॅनिटरी नॅपकिन्स जो पर्यंत पूर्ण ओला होत नाही तो पर्यंत वापरले देखील जाते किंवा  आठ तासाहून अधिक वेळ एकच सॅनिटरी नॅपकिन्स वापरला जातो. ज्यामुळे योनीमार्गात इन्फेक्शनदेखील झालेले दिसते.  या सर्व गोष्टी “मेन्स्ट्रुअल कप” च्या वापराने टाळता येतात. एकदा एक “मेन्स्ट्रुअल कप” घेतले कि, एक कप साधारणत कमीत कमी पाच ते सहा आणि जास्तीत जास्त आठ ते दहा वर्षे चालतो.

२.      पर्यावरण हानी नाही :

सॅनिटरी नॅपकिन्सचे लवकर विघटन होत नाही. यामुळे घनकचरा व्यवस्थापन करताना याबद्दल गंभीर समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. एकाच “मेन्स्ट्रुअल कप”चा वापर वर्षानुवर्षे करता येतो. त्यामुळे दर महिन्याचा – वर्षाचा होणारा सॅनिटरी नॅपकिन्सच्या कचरा विघटनाची समस्या कमी करता येऊ शकते.

 

मेन्स्ट्रुअल कप” वापरताना घ्यावयाची काळजी :

दोन पाळीच्या दरम्यान किंवा पहिल्यांदा वापरताना कप निर्जंतुक (स्टरलाईज) करून आणि  कोरडा करून  ठेवा. नेहमी कपला हात लावण्याआधी हात स्वच्छ धुवावे.

  


लेखिका : अंजली प्रविण, ८+ वर्षांपासून समुपदेशक आणि डेटा विश्लेषक  म्हणून सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. 

amkar.anju@gmail.com 

४ टिप्पण्या:

  1. खूप महत्वाची माहिती...ही भीती मला ही आहे पण तुमचा अनुभव वाचून मनाची तयारी झालीय हे मात्र नक्की👍

    उत्तर द्याहटवा
  2. खूप महत्वाची माहिती...ही भीती मला ही आहे पण तुमचा अनुभव वाचून मनाची तयारी झालीय हे मात्र नक्की👍

    उत्तर द्याहटवा
  3. एक नवीन माहिती मिळाली कारण याबद्दल मला काहीच माहिती नव्हते आणि भीती ने कधी जाणून घेण्याची इच्छा झाली नाही

    उत्तर द्याहटवा
  4. खूप छान माहिती अंजु. तुझा हा अनुभव तू माझ्याशी शेअर केला होतास. आशा खाजगी गोष्टीवर मुली बोलायला घाबरतात. पण बरं झालं तू हे शेअर केलस. आता ज्यांच्या मनात ह्या बद्दल भीती किंवा काही अज्ञान असेल ते नक्की दूर होईल. Thanks once again.

    उत्तर द्याहटवा

कांदे पोहे कि सौदेबाजी....की विवाह संस्थेच फाऊंडेशन

 कांदे पोहे कि सौदेबाजी....की विवाह संस्थेच फाऊंडेशन   काही चांगल्या / कमावत्या मुलांची लग्न ठरत नाही मग ती मुलं किंवा त्याच्या घरचे मुलींना...