कोकणावर आधारित झी मराठीवर अनेक सिरियल्स
प्रदर्शित झाल्या पण “गाव गाता गजाली या सिरियल्सचे पर्व १ आणि पर्व २ हे दोन्ही पर्व
खरोखरच खूप दर्जेदार असे आहेत. कोकणी बोलीभाषा, गावे, निसर्ग, इथल्या लोकांच्या
भावना, इथली संस्कृती आणि परंपरा यांचा सखोल अभ्यास आणि निरीक्षण करून बारकाईने या
सिरियल्सच्या सर्व एपिसोड्सचे चित्रीकरण करण्यात आलेले आहे. या सिरियल्समधील सर्व
कलाकारांची देखील एक स्वतःची वेगळी ओळख आणि महत्व या सिरियल्समध्ये वेगळेपणाने
सादर केलेले आहे. या सिरियल्समध्ये ना कोणी एखादा ठराविक हिरो किंवा हिरोईन आहे.
ना व्हिलन आहे. यात सर्वच जण एकाच गावातील वेगवेगळ्या स्वभावाचे हसून-खेळून कधी
भांडून -रागावून पण कायम एकजुटीने राहणारे आणि एकमेकांवर जीवापाड प्रेम करणारे
गावकरी आहेत. या सिरियल्स मधील सर्वच कलाकार हे प्रमुख कलाकार म्हणून सादरीकरण
केलेले आहे. गाव गाता गजाली या सिरियल्सच्या दोन्ही पर्वाचे २०१७ – २०१८
चित्रीकरण आणि झी मराठी टीव्हीवर सादरीकरण झाले. प्रल्हाद कुरतडकर –
लेखक, राजू सावंत – दिग्दर्शित, संतोष काणेकर -निर्मित या सिरीयलचे चित्रीकरण
करण्यात आले आहे.
या सिरीयलमधील गावाचे नाव सिंधुदुर्ग
जिल्ह्यातील “मिठबाव” असे दाखविले आहे. यातील प्रत्येक वल्लीची दोन ओळीत ओळख लिहिणे
महत्वाचे कारण याच वाल्लीमुळे या सिरीयलला एक उत्तम दर्जा मिळाला आहे.:
प्रल्हाद कुरतडकर – म्हणजे “संदीप” रिक्षावाला
ज्याला स्वप्न आणि ध्यास आहे... “सरपंच” बनायचे. त्याच्या प्रत्येक वाक्याची
सुरुवात “मेड झालस का ?, आज या ठिकाणी
माझ्या मतदार संघात....” असे बोलून होते.
दिगंबर नाईक – सुहास नावाची भूमिका साकारली आहे.
जो सर्व कामे अर्धवट ठेवतो आणि “व्ह्तल व्ह्तल सगळ व्हतल.” बोलून विषय टाळतो. आणि “विषय
कसो हा.. “ बोलून नवीन मुद्द्याला हात घालतो.
लीना पाटकर – शोभा म्हणजे सुहासची पत्नी जी सुख –
दुख कोणत्याही क्षणी रडून आणि तोंडाला पदर लावूनच आपल्या भावना व्यक्त करते.
सार्थक वाटवे – क्रिश म्हणजे सुहासचा मुलगा
ज्याला “अभ्यास केल कि माका गरगरता”
सर्वात लहान आणि मस्तीखोर कलाकार.
भरत सावले – विष्णू आबा म्हणजे गावातील गुरव.
देवाला गाऱ्हाणे घालणारा कौल लावणारा आणि देवाशी थेट सवांद करणारा.
अस्मिता खटखटे – गोदा म्हणजे आबाची पत्नी जी खूप
कंजूस आणि काटकसर करणारी दाखवली आहे.
किशोर रावराणे – वामन चहाचा घोट घेत घेत छोटीशी
बातमी संपूर्ण गावभर पसरवणारा गावातील सोशल मिडिया. “मी कधी कुणाक काय सांगतय काय ?” असे बोलून सर्व
गावभर बातमी पसरवतो.
रोहित रोहन कोटेकर - करण अर्जुन म्हणजे जुळी भावंडे. जे प्रत्येक
गोष्ट एकसारखी बोलतात – करतात आणि एकाच मुलीवर प्रेम करतात. रुचिता शिर्के –
शिल्पा म्हणजे आबाची मुलगी जिच्यावर करण – अर्जुनाचे प्रेम असते.
मिथिल म्हाडेश्वर – बैल ज्याला सतत भूक लागलेली
असते. त्यांच्या तोंडी कायम “मला ना आता
भूक लागलीय.“ हे वाक्य हमखास असणार. याच्यासाठी “खाणे आणि खात राहणे” हेच अतिंम
सत्य आहे
विश्वजित पालव - प्रसाद म्हणजे शाहरुख अंगात आलेला त्याची नक्कल
करणारा कलाकार. ज्याचे गावातील पद्मा
नावाच्या मुलीवर प्रेम असते. दिपाली
जाधव – पद्मा म्हणजे नाम्या काकाची मुलगी. जिला प्रसाद म्हणजे चित्रपटातील
हिरो सारखा वाटत असतो.
रोहन सुर्वे – मनोहर
म्हणजे ज्याला “बळी” म्हणून चिडवतात. अर्थात बायको आणि आईच्या भांडणात निराश
झालेला व्यक्ती. भाग्यश्री राणे –
गायत्री म्हणजे मनोहरची बायको जी भांडखोर असली तरी तितकीच मायाळू असते. प्रतिभा
पाटील – बहिरी आजी म्हणजे मनोहरची आई. जी एका कानाने बहिरी असते. ऐकू येत नाही
म्हणून अर्थाचे अनर्थ करून भांडत असते.
मुकेश जाधव – बबन धा
रुपये दे मग सांगतो. नेहमी दारूच्या नशेत असतो आणि वेगवेगळ्या प्रसंगावर गाणी बोलत
असतो. कवि बनण्याचे स्वप्न भांग्ल्याने
निराश झालेला असतो. पण तरीही गावातील प्रत्येक प्रसंगावर गाणी बोलत असतो.
अभय नेवगी – नाम्या काका
म्हणजे ज्यांचे गावात स्वतःचे सलून आहे. जिथे एकत्र बसून गजाली करतात. “ वस्तारो
मारेन “ असे बोलून आपला राग व्यक्त करत असतात. शुभा कदम – शकू काकू म्हणजे नाम्या काकाची पत्नी
कल्पना सारंग – सरकती आजी म्हणजे
जिला वयामुळे चालायला जमत नाही. जी सरकून सरकून चालते. बहिरी आजीची बाल मैत्रीण
असते. जिचा मुलगा शहरांत राहत असतो. ती
एकटीच गावी राहत असते.
निलेश पवार - शाळेतील मास्तर शुभांगी भुजबळ – सविता मास्तरची
बायको यांची दुसऱ्या जिल्हात वरच्या पदासाठी बदली झाली तरीहि ते आपलं गाव सोडून
जात नाही. ज्यांचे गावात स्वतःचे छोटेसे किराणामालाचे दुकान आहे.
या सिरीयलमध्ये नेमकं काय विशेष आहे ?
या सिरियलमध्ये वरील सर्व प्रमुख कलाकार मिळून
एक गाव दाखवले आहे. गाव म्हंटले कि गावात कोणत्याही गोष्टीवरून चर्चा – गप्पा होत
असतात. पण “गजाली” म्हणजे एका मुद्द्याने
गप्पांची सुरुवात होते ते भलत्याच गोष्टीवर जाऊन पोहचतात. गावातील गल्ली ते दिल्ली
पर्यंतच्या गप्पा म्हणजे “गजाली”. या सिरीयलमध्ये अश्याच गावातील प्रत्येक छोट्या
गप्पाचा विषय ठरणारे “ गावातील प्रसंग “ कथेच्या स्वरुपात मांडले आहे. ज्यात “
पद्मा- प्रसादचे प्रेम प्रकरण” “मनोहरचा बळी” “शाळेतील खिचडी प्रकरण” “गाऱ्हाणे”
असे अनेक मुद्दे त्यामागील गावातील सुख -दुःखाचे प्रसंग आणि आपुलीकीची –
जिव्हाळ्याची भावना या सिरीयलमध्ये खूप
अचूक पद्धतीने मांडली आहे.
जर तुम्ही हि सिरीयल पाहिली नसेल तर युट्युबवर
याचे दोन्ही पर्व आहेत... नक्की पाहा.. तुम्हाला तुमचे गाव आणि गावातील गजाली
नक्की आठवतील.
लेखकाची ओळख : अंजली प्रवीण, या कोकणात वास्तव्य करणारी आहे. तसेच त्या महिला, बाल, कुटुंब , क्रिमिनल जस्टीस सिस्टीम सारख्या सामाजिक क्षेत्रात समुपदेशन आणि डेटा विश्लेषक म्हणून कार्यरत आहेत.
amkar.anju@gmail.com
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा