शनिवार, ११ जून, २०२२

आजच्या अनेक गावाचं, खेड्याच जे शहरात रूपांतर झाले आहे त्या मागची कारणं, दुःख यांचं नक्कीच भान करून देणारं पुस्तक म्हणजे "धरणकळा"...

 


"खारीच्या वाटा" हे . . कडू सरांचं पुस्तक वाचल्यानंतर लेखकाशी फोनवर संवाद साधला. हिरवंगार,भरलेल्या सुखी आनंदी नांदत असलेल्या गावात धरण बांधण्याचा फतवा येतो आणि मग वाताहत, तुटातुट झालेल्या मनांचं, भावनांचं जे मन सुन्नं करणारं लिखाण लेखकाने केलंय त्याने भारावून गेलो होतो, त्यावर आधारित अनेक प्रश्न लेखकांना विचारले पण एकाही प्रश्नाचं उत्तर देता लेखकांनी थेट त्यानंतर काय झालं या प्रश्नाच्या उत्तरासाठी "धरणकळा" हा खारीच्या वाटा चां पुढील भाग पाठवून दिला.

पुस्तक ज्यादिवशी मिळालं त्याच दिवशी वाचनाला सुरुवात केली पहिल्या पुस्तकाप्रमाणे याही पुस्तकाने मनाचा ठाव घेतला आणि खिळवून ठेवत पुस्तक संपेपर्यंत त्या कळा समजून घेण्यास भाग पाडलं. तात्यांनी सोसलेलं आयुष्य, भोगलेल्या कळा लेखकाने जाणल्यात , शेवंता, लंगडा सदू, गणाफु यांचा जीवनपट एका वेगळ्या दुनियेत घेऊन जातो. राहीचा थांबा मनाला चटका लावून जातो, धुरपा काकुची तळमळ विचार करायला लावते, लेखकाला तुकाराम या सगळ्यातून जे सांगतात ती वचनं आजच्या भरकटलेल्या पिढीला मार्ग देणारे आहेत. धरण बांधून झाल्यावर लेखकाची हळहळ आणि धरण फुटल्यावर लेखक आणि गावातल्या लोकांना झालेला आनंद या सगळ्याच वर्णन मनाला भिडतं. मग हे फुटलेले धरण पुन्हा कधी उभं राहू नये असं वाटत असताना ते उभं राहतं मग त्यानंतर जी पुढे पिढी आणि त्यांचे विचार भरकट जातात त्याने काळजाचे धरण नक्कीच फुटते.

आजच्या अनेक गावाचं, खेड्याच जे शहरात रूपांतर झाले आहे त्या मागची कारणं, दुःख यांचं नक्कीच भान करून देणारं हे पुस्तक आहे.

शेवटी आपली वाडवडीलांची जमीन, तात्याच रक्त असलेली जमीन विकायची नाही असं मनात खूण गाठ करून बसलेला लेखक आपली जमीन विकतो का? लेखकाची मुलं यावर नक्की काय आणि कसे वागतात? एकाकी पडलेल्या राही, धूरपा काकू आणि तात्यायांसारखे लेखक पण शेवटी एकटा पडतो काया सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी हे पुस्तक नक्की वाचायला हवं. लेखकाने याही पुस्तकात लहानपणीच्या अनेक गमती जमती, गोड आठवणी सुंदररीत्या मांडल्या आहेत ज्याने पुस्तकाला एक वेगळा रंग येतो. मोराला पकडण्यासाठी लेखकाने केलेल्या करामती नक्की वाचाव्या. अनेक ठिकाणी लेखकाच्या लिखाणातून लेखकामधला कवी ही जाणवतो. अनेक ठिकाणी म्हणी, ओव्या ह्या वाचण्यासारखा आहेत. लेखकाने प्रस्तुत केलेल्या धरणातल्या यातना इतक्या काठो काठ भरलेल्या आहेत की प्रत्येक वाचकाने यात एक तरी दगड मारून तो ..डबाॅक डबाॅक..आवाज ऐकून घ्यावा ज्यात दुःख, वेदना आणि रितेपण आहे. पुस्तक भारीच आहे, लेखकाची लिखाणाची शैली ही तितकीच भारी आहे.. धन्यवाद सर हे पुस्तक भेट दिल्याबद्दल...नक्की वाचावं आणि संग्रही करावं.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

कांदे पोहे कि सौदेबाजी....की विवाह संस्थेच फाऊंडेशन

 कांदे पोहे कि सौदेबाजी....की विवाह संस्थेच फाऊंडेशन   काही चांगल्या / कमावत्या मुलांची लग्न ठरत नाही मग ती मुलं किंवा त्याच्या घरचे मुलींना...