राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० मध्ये , सामाजिक- भावनिक शिक्षणाला महत्व दिले गेले आहे. या बद्दल मी आधीच्या लेखात लिहिले आहे. हा लेख तुम्हाला इथे मिळेल (click here). आजच्या लेखात आपण सामाजिक-भावनिक क्षमतेच्या पहिल्या दोन क्षमता आणि त्यांची वर्गात अमलबजावणी कशी करायची हे पाहणार आहोत.
स्वजागरुकता आणि स्वव्यवस्थापन म्हणजे काय ?
स्वजागरुकता Self Awareness
स्वतःच्या भावना, विचार आणि मूल्ये आणि त्यांचा स्वतःच्या एकंदर आचारणावर होणार परिणाम समजून घेण्याची क्षमता म्हणजे स्वजागरुकतात. यामध्ये स्वतची बलस्थाने आणि मर्यादा ओळखण्याच्या क्षमतेचा ही समावेश होतो. या क्षमता सुधारण्यासाठी पद्धतशीर प्रमाणे काही activities मुलांसोबत करता येतील.
स्वव्यवस्थापन Self Management
स्वतच्या भावनांचे, विचारांचे आणि स्वभावाचे वेगवेगळ्या परिस्थितीत प्रभावी व्यवस्थापन करण्याची क्षमता, म्हणजे स्वव्यवस्थापन. यामध्ये स्वतच्या आवडी-निवडी ओळखणे, स्वयंशिस्त पाळणे , सांघिक आणि वैयक्तिक ध्येय ठरविणे आणि नियोजन कौशल्य यांचा समावेश होतो.
वरील दोन क्षमतांचा विचार केला तर विद्यार्थ्यांना दोन महत्वाची कौशल्ये अवगत असणे किंवा शिकविणे महत्वाचे आहे. १. भावना ओळखणे आणि २. भावनांचे व्यवस्थापन करणे. मी माझे विद्यार्थ्यंनसोबत काही उपक्रम केले होते त्याचा फायदा वरील दोन क्षमता विकसित करण्यासाठी झाला. या लेखाच्या माध्यमातून मी हे उपक्रम शिक्षक तसेच पालकांपर्यंत पोहचवू इच्छितो.
1. भावनिक साक्षरता - माइंडफूल सर्कल
लहान मुलांना भावनिक दृष्टी सक्षम करणे गरचे आहेत हे तर स्पष्टच होत. पण हे नेमके कसे करायचे हाही प्रश्न होताच. आम्ही यासाठी एक महत्वाचा बदल वेळापत्रकात केला. पहिली 15 मिनिटे ही माइंडफूल सर्कल हा उपक्रम चालू केला ज्यात विद्यार्थी 5-7 मिनिटे ब्रेथ एक्सरसईज आणि बॉडी स्कॅन ही कृती करायची आणि 8 -10 मिनिटे भावनांचा कप ही कृती करायचे. वर्गात 8 कप लावले होते, प्रत्येक कप वर एक भावनेच नाव लिहिल होत. विद्यार्थी त्यांच्या नावाची चिट्टी त्यांची जी भावना आहे त्या कपात ठेवत असत. हा बदल करण्याआधी विद्यार्थ्यंसोबत भावनिक साक्षरतेची कार्यशाळा घेतली होती. त्या प्रत्येक भावनेचा अर्थ, त्याची कारणे आणि परिणाम या सर्वांवर त्याच्याशी चर्चा केली. एकंदर या उपक्रमामुळे मुलांमध्ये स्वजाण आणि स्वव्यवस्थापन विकसित होत होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा