पुरुषार्थ बदलण्याचा एकच मार्ग म्हणजे: "स्वतःपासून आणि आजपासून"
पुरुषार्थामते, "स्त्री हि फक्त उपभोगाची वस्तू तर आहेच पण तिच्या अब्रूवर अत्याचार केले. पुरुषार्थ गाजवता येतो."
काल जे मणिपूरला झाले ती पहिली घटना नाही. अगदी हिंदू धर्माच्या ग्रंथापासूनच स्त्रीच्या अब्रूवर सत्ता मिळवणे आणि अत्याचार करणे या घटनाक्रम चालत आल्या आहे. मग ती रामायणातील सीता असो किंवा महाभारतातील द्रौपदी. "स्त्री अत्याचार" फक्त हिंदू धर्म किंवा भारतापुरते मर्यादित नाही. अगदी जगभर आणि विविध कालखंडातदेखील "स्त्री" ला एक असे हत्यार समजले जाते कि, हिच्या अब्रूचे धिंडवडे उडवले तर आपल्या पुरुषार्थाचा / देशाचा / जातीचा / धर्माचा विजय होतो.
"स्त्रियांच्या असुरक्षिततेचा विचार केला तर 'स्त्री' हि फक्त देशात, राज्यात, बाहेरच्या देशात किंवा घरात असुरक्षित आहे असे नाही तर जिथे जिथे हा घाणेरडा पुरुषार्थ आहे तिथे तिथे स्त्री असुरक्षित आहे."
घटना क्र. १
दुसऱ्या महायुद्धापासून "स्त्रियांचे लैंगिक शोषण आणि अत्त्याचार " हे मुख्य हत्यार मानले आहेत. जनमानसात भीतीचे साम्राज्य पसरविण्यासाठी शत्रूला अपमानित करण्यासाठी स्त्रियांवरील लैंगिक अत्याचार हेच महत्वाचे साधन मानण्यात आले.
घटना क्र. २
१९७१ बांगलादेश स्वातंत्र्य युद्धात २लक्ष ते ४ लक्ष महिला आणि मुलींवर अत्याचार झाले होते.
घटना क्र. ३
१९९४ मध्ये रवांडाचा नरसंहार झाला होता. यात १०० दिवसांत १० लाख लोकांना मारले होते. लाखो स्त्रियांवर क्रूरपणे सामूहिक अत्याचार करून मारण्यात आले होते. यातील काही महिला एड्सने पीडित आहे. त्या आज हि त्यातून जन्माला आलेल्या मुलांना स्वतःचे मूल मानत नाहीत.
घटना क्र. ४
२००२ च्या गुजरात हिंदू मुस्लिम दंग्यात २६ आरोपीना गँगरेपच्या आरोपाखाली अटक करण्यात आले होते. ज्या मुस्लिम स्त्रियांचे रेप झाले होते त्यांच्या योनी मार्गात हिंदू धर्माचे धार्मिक चिन्ह घालण्यात आले होते. संदर्भ : international fact-finding committee तील आंतरराष्ट्रीय आक्टिविस्टने दिलेला अहवालात याची नोंद करण्यात आली होती. या २० वर्षाच्या कालावधीनंतर २०२३ मध्ये या २६ आरोपीना निर्दोष मुक्तता करण्यात आली.
घटना क्र. ५
काश्मीर सीमा भारत विरुद्ध पाकिस्तान वादात अनेकदा वेगवेगळ्या जवानांकडून अगणित स्त्री बलात्काराच्या घटना घडून आल्या आहेत.
घटना क्र. ६
हाथरस गेंगरेप आणि खून : उत्तर प्रदेशातील हाथरस बलात्कार आणि हत्या प्रकरणाने संपूर्ण देश हादरला होता. 14 सप्टेंबर 2020 मध्ये उत्तर प्रदेशातील हाथरस यथे १९ वर्षीय दलित मुलीवर पाशवी अत्याचार करण्यात आले. आरोपींनी क्रूरतेची परिसीमा गाठत तरुणीची जीभ कापली. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. पोलिसांनी परवानगीशिवाय त्या पीडितेच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केल्याचा आरोपही कुटुंबीयांनी केला होता. त्याचे व्हिडीओ देखील वायरल झाले होते.
चार आरोपीना अटक तर करण्यात आली पण बलात्काराचा गुन्हाच सिद्ध झाला नाही म्हणून ३ जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली.
घटना क्र. ७
बदायू गेंगरेप आणि खून : २०२१ मध्ये एका ५० वर्षीय अंगणवाडी सेविकांवर पुजारी आणि गावातील ३ लोकांनी सामूहिक बलात्कार करून मारून टाकले. तिच्या योनीमार्गात लोखंडी रॉड घालण्यात आला होता. १७ तास तिचे शव बाहेर पडून होते. ४८ तास होऊनही पोलिसांनी ते शव विच्छेदनासाठी पाठविले नाही.
अजूनही केस चा निकाल लागला नाही.
घटना क्र. ८
बदायू मध्येच २०१४ मध्ये २ अल्पवयीन दलित जातीतल्या मुलींवर सतत गँगरेप करून मारण्यात आले. आणि त्यांचे शव झाडांना लटकविण्यात आले. अजूनही केस चा निकाल लागला नाही. आरोपीना बेल मिळाली ते जेल बाहेर आहेत.
हा घटनाक्रम तसा न संपणारा आहे. आणि आज हि मणिपूरची घटना जी झाली आहे तीन महिण्यापूर्वी आणि यात त्या महिला पोलिसही त्या जमावात असल्याचे सांगत आहेत.
एकीकडे कठोर शिक्षा झाली पाहिजे बोलतो. कॅपिटल पनिशमेंट सारख्या शिक्षा देखील आहेत. पण
डोक्यातला पुरुषार्थ कसा मरणार ?
समाजातला पुरुषार्थ कसा बदलणार ?
न्यायव्यवस्थेत पुरुषार्थ गाजविणाऱ्या विरुद्ध शिक्षा कोणती असेल ?
माझा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे.
पण न्याय व्यवस्था विश्वासार्ह आहे का ?
पुरुषी मानसिकता बदलायला सुरुवात केली पाहिजे पण कोणी ? कधी ? कशी ?
याचे उत्तर एकच आहे " स्वतःपासून आणि आजपासून "
(हे उत्तर स्त्री आणि पुरुष या दोघांसाठी हि आहे. )
amkar.anju@gmail.com
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा