सोमवार, १९ एप्रिल, २०२१

पिकासो

पिकासो 

मराठी चित्रपट सृष्टीने नेहमीच वेगळे विषय हाताळले आहेत.  पिकासो हा अशाच वेगळ्या धाटणीचा चित्रपट आहे. कोकण ही कलाकारांची भूमी. कोकणातील दशावताराने नाट्य सृष्टीला अनेक कलाकार दिले. पण दशावतारातील कलाकारांचे आयुष्य नेमके कसे असते याचा विचार आपण कधीच केला नसेल.  पिकासो हा चित्रपट आपल्याला दशावतारातील एका कलाकाराचे आयुष्य दाखवतो. 


प्रमुख कलाकार : प्रसाद ओक यांनी पांडुरंग नामक कलाकाराची भूमिका, बालकलाकार  संजीव तांबे  याने गंधर्व मुलाची भूमिका आणि अश्विनी मुकदाम यांनी पत्नीची भूमिका साकारली आहे.
https://en.wikipedia.org/wiki/Picasso_(film)
पिकासो 
दिग्‍दर्शन व सह-लेखन : अभिजीत वारंग व तुषार परांजपे

चित्रपटाचा प्लॉट : 

चित्रपटाची सुरुवात दशावताराच्या पूर्व तयारी पासून होते. ज्यात सर्व कलाकार  रंगरंगोटी अर्थात मेकअप आणि प्रार्थना करताना दिसत असतात. त्याच वेळी गंधर्व आणि पांडुरंग यांचे चित्रकला कला सोडण्याबद्दल अत्यंत हृदयस्पर्शी प्रसंग दाखवला आहे. संपूर्ण चित्रपट एका कलाकाराचे स्वप्न आणि त्याचा आयुष्य जगण्याचा संघर्ष उत्तमरित्या हाताळला आहे.

गंधर्व : या चित्रपटातील गंधर्व हा इयत्ता ६वी मध्ये शिकणारा विद्यार्थी दाखविला आहे. ज्याच्याकडे वडिलांपासून चित्रकलेची आलेली असते.  तो राज्यस्तरीय पिकासो आर्टस् फेलोशिप परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवतो. तसेच राष्‍ट्रीय पातळीवरील पिकासो आर्टस् फेलोशिपसाठी त्याची निवड होते.  जर या राष्ट्रीय पातळीवर फेलोशिपसाठी निवड झाल्यास स्पेन मधील पिकासो येथे एक वर्ष राहण्याची आणि शिकण्याची संधी मिळणार होती. पण त्या परिक्षेची फी पंधराशे रुपये दुसऱ्याच दिवशी भरायचे असते कारण ती अंतिम तारीख असते. या गंधर्वला आपल्या घरातील सर्व आर्थिक परिस्थितीची जाणीव असते. एकीकडे राज्यपातळीवरील स्पर्धा जिंकण्याचा आनंद असतो सोबतच राष्ट्रीय पातळीची परीक्षा देता येणार नाही ही खंत असते.  तरीही स्वतःचे स्वप्न पूर्ण करण्याच्या जिद्दीने वडिलांकडे अत्यंत नम्रपणे फारसे न बोलताही कलेबद्दलची ओढ आणि स्वप्न किती महत्वाचे आहे हे या संपूर्ण चित्रपटात गंधर्वच्या भूमिकेतून दिसून येते. महत्वाचं म्हणजे पैसे मिळत नाहीत म्हणून येणारी टिपिकल बंडखोरी इथे दाखवली नाही तेच या पात्राचे वेगळेपण आहे.


‌पांडुरंग : हा चित्रपटातील प्रमुख पात्र . पांडुरंग हा दशावतारातील एक कलकार असतो. पांडुरंग एक उत्तम चित्रकार, मूर्तिकार,  दशावतार नाटकातील कलाकार आणि उत्तम गायक ही दाखविला आहे. पण घरातील बिकट परिस्थितीमुळे त्याचे मोठ्या शहरात जाऊन चित्रकार बनण्याचे स्वप्न अर्धवट राहिलेले असते. आपले अधुरे स्वप्न माझा मुलगा नक्की पूर्ण करणार याची खात्री आणि नवे स्वप्न पाहत असतो. पण यावेळीही त्याच्या घरातील आर्थिक परिस्थिती ही बिकटच असते. पत्नीच्या उपचारासाठी पैसे नसतात. गणपतीच्या मूर्ती तयार करण्यासाठी ही उधारीने सर्व वस्तू आणलेल्या असतात. दशावतार नाटकातूनही पुरेसे पैसे मिळत नसतात. त्यासोबतच दारूचे व्यसनाच्या आहारी गेलेला असतो.  आपल्या पत्नीच्या उपचारासाठी आणि मुलाच्या स्वप्ना साठी आपल्याला काहीच करता येत नाही त्याबद्दल निराश आणि हताश झालेला असतो. मनात विचारांचा कल्लोळ सुरू असतानाही  त्यावेळी दशावतार नाटकात आपली भूमिका रंगवत असतो.  

दशावतार करत असतानाही  नवीन कलाकाराकडून, काही प्रेक्षकांकडून आणि मालकाकडून अपमान होतो. पण  अखेरीस त्याच्याकडे असलेली "कला" ही किती गौरवास्पद आणि अभिमानास्पद आहे हे त्या दशावतार नाटकाच्या अखेरीस कळून येते.

माई : या चित्रपटात माईंची भूमिका ही खूप छोटीशी आहे. फारसे संभाषण दाखवले नाही. तसेच पूर्ण चित्रपटात ती आजारी दाखवली आहे पण तरीही तिची भूमिका एका कलाकाराची पत्नी आणि कलेचे  स्वप्न बाळगणाऱ्या मुलाची आई म्हणून उत्तम भूमिका रेखाटली गेली आहे.  


चित्रपटाचा शेवट : मला या चित्रपटाचा शेवट हा खूप आशादायी वाटतो. ज्यात एक बाप ज्याला आपल्या मुलाच्या कलेचे कौतुक वाटते आणि एक मुलगा ज्याला आपल्या वडिलांच्या कलेचा अभिमान वाटतो.  दोघेही आपल्या कला गुणांना फुलण्यास वाव देतात. चित्रपटातील हे क्षण मनाला खूप भावुक आणि प्रेमळ स्पर्श करणारे आहेत.


हा चित्रपट का पाहावा ?

हा चित्रपट का पहावा याची अनेक कारणे आहेत.

१. उत्तम सिनेमॅटोग्राफीमुळे कोकणातील सौंदर्य आणि दशावतार नाट्यकला ही खूप उत्तम पद्धतीने कॅमेरा मध्ये टिपली आहे. जर कोकणप्रेमी किंवा कोकणातले रहिवाशी असाल तर नक्की हा चित्रपट तुम्हाला आवडेल.

२. प्रसाद ओक च्या दमदार अभिनयाने   दशवतारातील कलाकार जिवंत उभा केलाय.

३. उत्तम संगीत - ज्यांनी ज्यांनी दशावतार पहिला आहे त्या सर्वांना या चित्रपटात वापरलेलं लोकसंगीत नक्कीच आवडेल.

4. एकाच व्यक्ती मधला कलाकार आणि बाप यांच्या मधले द्वंद्व काळजात हात घातल्या शिवाय नाही राहत.

5. कलाकार होणं सोपं असत पण कला टिकवण फार कठीण याची प्रचिती हा चित्रपट दर्शकांना देतो.


हा चित्रपट AMAZON PRIME वर उपलब्ध आहे. 

(तसेच दशावतार म्हणजे नेमकं काय असत याची माहिती तुम्हाला  आमच नमन  (https://apaliwritergiri.blogspot.com/2020/06/blog-post.html) या लेखात मिळेल वर मिळेल.  )


लेखकाची ओळख : अंजली प्रवीण, या कोकणात वास्तव्य करणारी आहे.  तसेच त्या महिला, बाल, कुटुंब , क्रिमिनल जस्टीस सिस्टीम सारख्या सामाजिक क्षेत्रात समुपदेशन आणि डेटा विश्लेषक म्हणून कार्यरत आहेत. 

amkar.anju@gmail.com


२ टिप्पण्या:

कांदे पोहे कि सौदेबाजी....की विवाह संस्थेच फाऊंडेशन

 कांदे पोहे कि सौदेबाजी....की विवाह संस्थेच फाऊंडेशन   काही चांगल्या / कमावत्या मुलांची लग्न ठरत नाही मग ती मुलं किंवा त्याच्या घरचे मुलींना...