"CAPERNAUM"
एक बारा वर्षाचा मुलगा रिमांड होममधून लाइव्ह टीव्हीवर येऊन.... आपल्या आई वडिलांवर केस दाखल
करायची मागणी करतो आणि ती मागणी मान्य हि होते आणि ...... सुरु होतो त्याचा खटला.....
न्यायाधीश पहिलाच प्रश्न करतात कि....
Judge asked him, “Why do
you want to sue your parents?”
Zain : Because I was
born.
एका १२ वर्षीय मुलाला आपल्याला जन्म देणेच का गुन्हा वाटू शकतो..... यावर
अतिशय बारकाईने भाष्य करणारा हा “Capernaum” चित्रपट आहे. हा चित्रपट नदीने लाबाकीने (Directed by Nadine Labaki) दिग्दर्शित आणि खालेद मौझुनार निर्मित (Produced by Khaled Mouzanar) केला आहे. मूळ चित्रपट
अरेबिक भाषेतील आहे. या चित्रपटाने Cannes
Film Festival-2018 मध्ये Jury Prize जिंकले आहे. या चित्रपटातील मुख्य पात्र ‘झैन’(Zain) हा १२ वर्षाचा मुलगा आहे
त्याच्या बालपणातील गुन्हेगारीकडे जाण्याचा प्रवास या चित्रपटात मांडला आहे. बैरुट
या ठिकाणी झोपडपट्टीत राहणाऱ्या १२ वर्षीय
मुलावर एका माणसाला चाकूने प्राणघातक हल्ला (चाकूने भोकसणे )या
गुन्ह्यासाठी अटक होते. या पासून चित्रपटाची सुरवात दाखवली आहे. झैनला जेव्हा विचारतात कि, तुला का अटक केली तेव्हा
“son of bitch” म्हणत त्या इसमाला
मारले हे कोणतेही संकोच न आणता सांगतो. आणि
येथूनच फ्लॅश बॅक मधून झैनच्या गुन्हेगारी
पर्यंतचा प्रवास सुरु होतो.
या चित्रपटात झैनच्या घराची आर्थिक परिस्थिती गरीब दाखवली आहे. सोबत चार लहान भावंडे हि असतात. झैन शाळेत न जाता जे जमेल ते मजुरी काम करत असतो. त्यासोबतच खोटे बोलून आणि डॉक्टरचे प्रिस्क्रिप्शन दाखवून गोळ्या आणून त्याचा गैरवापर करत होते. या चित्रपटात एक दृश्य वारंवार दाखवले आहे कि, जेव्हा त्याच्या वयाची मुले शाळेच्या गाडीतून यायचे त्या वेळेला तो मजुरी काम करत असायचा. एके दिवशी अचानक कळते कि, ‘सेहेर’ त्याच्या बहिणीला मासिक पाळी आली आहे. तिचे रक्ताचे कपडे तो धुतो तसेच स्वतःचे टी-शर्टची घडी घेऊन तिला कसे वापरायचे ते शिकवतो. दुकानातून सॅनेटरी नेपकीन चोरून आणून देतो. तसेच सेहेरला याबाबत आई-वडिलांना न सांगण्याची ताकीद देऊन ठेवतो. कारण कदाचित त्याला माहिती होते कि, जर सेहेरला मासिक पाळी आल्याचे कळले तर तिचे लग्न लावून देतील. तो ज्या दुकानात काम करायचा तेथील दुकानदार त्याच्या बहिणीवर कायम नजर ठेवून असायचा आणि हे झैनला कधीच आवडत नव्हते. अचानक एके दिवशी त्याला कळते कि, त्याच्या बहिणीचे त्या दुकानदारासोबत लग्न होत आहे. तेव्हा तो तिला पळवून नेण्याचे ठरवतो पण या आधीच तिला त्याच्या कडे दिले जाते. यात बालविवाह आणि त्या मुलीला विकलेले दाखवले आहे. हे सर्व पाहून झैन घर सोडून पळून जातो. त्याच बसमध्ये एक स्पायडर मॅनच्या वेशातील एक कोकऱोज मॅन त्याला भेटतो जो एका जत्रेच्या गेटवर उभा राहणारा वृद्ध इसम असतो. तिथले मोठे खेळणी – आकाश पाळणे बघून तो हि त्या ठिकाणी उतरतो. तो तिकडेच रस्त्यावर राहतो – खातो – झोपतो- काम शोधत असतो पण कोणी काम देत नाही. तिकडेच त्याला ‘राहील’ हि इथोपिअन स्थलांतरीत महिला भेटते. जी त्याला खायला देते म्हणून तिच्या मागे मागे तो तिच्या झोपडीत राहायला हि येतो. ‘राहिल’ एक रेस्टोरंटमध्ये सफाई कामगार दाखवली आहे. ती कामच्या ठिकाणीच एका बाथरूममध्ये आपल्या तान्ह्या मुलाला लपवून ठेवत असते असे दाखविले. झैन राहीलच्या झोपडीत राहू लागला आणि सोबत तिच्या लहान मुलाला ‘योनस’चा पण सांभाळ करू लागला. राहील हि स्थलांतरीत आणि नाव बदलून नोकरी करत असते. तिचे ते काम हि जाते. तिला अटक होते. तर दुसऱ्याबाजूला झैन आणि योनस तिची वाट पाहत असतात. दुसऱ्या दिवशी तो कामाच्या ठिकाणी जाऊन तिचा शोध सुरु करतो. राहील सापडत नाही तर योनस चा सांभाळ आपल्यालाच करावे लागेल म्हणून पुन्हा काम शोधायला सुरवात करतो. हा सर्व प्रवास इतका वेदनादायक आणि भावनात्मक दाखवला आहे कि अनेक गोष्टी शब्दांत मांडणे हि अवघड होऊन जाते. त्याला नवीन काम मिळते पण त्यासाठी योनसला सोडावे लागणार होते आणि त्याचे ओळखपत्र किंवा जन्मदाखला हि कागदपत्रे लागणार होती. योनसच्या सोबतचे काम करताना – खेळताना – त्याला जेवण भरवताना – त्याच्या सोबत झोपताना आणि अखेरीस त्याला परिस्थितीमुळे सोडून जातानाचा क्षण हा पटकन डोळ्यात पाणी आणणारा अतिशय भावनात्मक क्षण दाखविला आहे. जेव्हा कागदपत्रे शोधायला घरी येतो तेव्हा त्याला त्याचे कागदपत्र तर सापडत नाही तसेच त्याला सेहेरचा मृत्यू झाल्याचे कळते. हे कळल्यावर तो खूप आकांडतांडव चिडचिड व्यक्त करतो आणि घरातील चाकू घेऊन पळत आसादला म्हणजेच सेहेरच्या नवऱ्याला मारायला जातो. तेव्हा त्याला पोलीस अटक करतात.
चित्रपटाच्या अखेरीस कोर्ट रूम मध्ये तो आपल्याला , सेहर ला इतर भावंडाना आणि त्याची आई तेव्हा प्रेग्नंट असते त्याबद्दल खंत व्यक्त करत म्हणतो कि, जर आम्हाला सांभाळायला जमत नसेल किंवा चांगले पालनपोषण करता येत नसेल तर आम्हाला जन्म का दिला? आम्हाला जन्म देण्याचा अधिकार नाही. सेहेरचा बालविवाह ते हि एका प्रौढ इसमासोबत होतो. तसेच तिला त्या बालवयातच प्रेग्नसीमुळे मृत्यूला सामोरे जावे लागते. झैनचा लहानापासूनचा प्रवास आज त्याला गुन्हेगारीकडे न्यायला प्रवृत्त केला. या सर्व परिस्थितीत आई-वडील हि तितकेच दोषी होते. हे अतिशय वास्तवादी चित्रण या चित्रपटात केले आहे.
या चित्रपटाचा शेवट झैनचा आयडी कार्ड साठी फोटो काढताना केला आहे...
ज्यात तो आधी नाराज उभा असतो पण फोटोग्राफरच्या एका वाक्याने "It's your ID card, not your death
certificate" तो स्मित हास्य देतो. कदाचित
इथूनच त्याचे पुढील भविष्य चांगले होईल असे गृहीत केले असावे.
कोणीही जन्मतः गुन्हेगार नसतो हे वारंवार ऐकत आलो आहोत पण परिस्थिती कशी गुन्हेगार बनवते याचे उत्तम उदाहरण देणारा हा चित्रपट आहे. अनेक छोट्या छोट्या गोष्टी अतिशय उत्तम रीतीने या चित्रपटात मांडल्या आहेत जसे कि, राहील - योनस - सेहर या प्रत्येक पात्राचा हि वेदनादायक प्रवास या चित्रपटातून दिसून येतो. बालगुन्हेगारीवर भाष्य करणारा हा एक उत्तम चित्रपट म्हणता येईल. तर नक्की बघा आणि या बाबत तुमची प्रतिक्रिया कळवा.
Nice
उत्तर द्याहटवाWow well said anjali
उत्तर द्याहटवाखरच इतका विचार केला तर कदचित सामाजिक दृश्य वेगळं असेल.
उत्तर द्याहटवाछान
उत्तर द्याहटवाHa movie कुठे पाहायला मिळेल कृपाया लिंक शेअर करावी
उत्तर द्याहटवा