शनिवार, २४ एप्रिल, २०२१

समरहिल - सर्वात जुनी बाल-लोकशाही १

 समरहिल - सर्वात जुनी बाल-लोकशाही १

Summerhill
Summerhill


तुम्हाला तुमची शाळा आठवतेय का? शाळा म्हंटलं की तुम्हाला नेमकं काय आठवत? वर्ग, बेंचेस, फळा, परीक्षा , पुस्तक, कोचिंग क्लास, नोट्स, शिक्षक , शिक्षकांचा मार, मित्र, चोरून चोरून केलेल्या गमंती आणि बरंच काही आठवत असेल. पण तुम्ही शाळेत कधी स्वातंत्र्य अनुभवलं आहे का? एखाद्या तासाला न बसण्याच स्वातंत्र्य, गणित आवडत नाही म्हणून गणित विषयाला गाळायच स्वातंत्र्य, स्वतःच्या आवडीनुसार जे आवडेल तेच शिकण्याच स्वातंत्र्य, परिक्षेपासून स्वातंत्र्य, पालक आणि शिक्षकांच्या अपेक्षांपासूनच स्वातंत्र्य...

मला खात्री आहे बहुतेक जणांनी यातलं काही अनुभवलं नसेल. पण तुम्हला विश्वास बसणार नाही या ग्रहावर अशी शाळा आहे जी हे सर्व स्वातंत्र्य मुलांना देत असते. हे वास्तव आहे कोणताही युटॉपिया नाही आहे. या शाळेचं नाव आहे समरहिल ही शाळा 1921 मध्ये इंग्लंड मध्ये A. S. नील यांनी स्थापन केली. ही शाळा म्हणजे जगातील सर्वात जुनी बाल-लोकशाही आहे. 

हा लेख A. S. नील यांच्या समरहिल या पुस्तकाचा सारांश  (summary) आहे.   


समरहिल ची संकल्पना

मुलं शाळेत गेली की त्या मुलांकडून अशी अपेक्षा बाळगली जाते की मुलांनी शाळेच्या वातावरणाशी जुळवून घ्यायला हवं.  पण समरहिल   ही शाळा  शाळेने मुलांशी जुळवून घ्यायला हवा या संकल्पनेवर आधारित आहे. त्यासाठी या शाळेने इतर शाळेला गरजेच्या वाटणाऱ्या सर्व गोष्टींचा अस्वीकार केला आणि स्वातंत्र्य आणि बाल-लोकशाही या दोन मूल्यांना धरून शाळेची उभारणी केली. आज ही शाळा जगातील सर्वात जुनी बाल-लोकशाही आहे.

समरहिलचे शिक्षण तत्वज्ञान

जे आवडते ते शिका : समरहिल मध्ये इतर शाळेप्रमाणे अनेक विषय शिकवले जातात पण कोणते विषय महत्वाचे आणि कोणते विषय अवांतर म्हणून कमी महत्वाचे असे वर्गीकरण या शाळेत नाही. एखाद्या विषयाला किती महत्व द्यायचे हे विद्यार्थी त्यांच्या आवडीप्रमाणे ठरवतात. जर एखाद्याला चित्रकला आवडत असेल तर त्याला पायथागोरस चा सिद्धांत पाठ करण्याची अजिबात सक्ती नसते. शाळेत अनेक क्लब आहेत, डान्स, थिएटर, क्रीडा, यामध्ये मुले भाग घेतात. त्यांना जे आवडत ते ही मुले करत असतात. मुलांचा सर्वांगीण विकास हा त्यांच्या बंधन टाकून कधीच करता येत नाही.  मूल जर शिकत नसेल तर त्यासाठी त्या मुलांचा आळशी पणा किंवा बौद्धिक पातळी जबाबदार नसते ,  तर त्या मुलामध्ये शिक्षणसंबंधी असलेल्या रुचीची कमतरता जबाबदार असतो. या पायाभूत गोष्टीकडे बहुतेक शाळा आणि पालक दुर्लक्ष करतात. 

लहान मूल हे त्यांच्या कुतूहलाने शिकत असते शालेय पुस्तकांतून नाही.  : लहान मूल हे त्यांच्या कुतूहलाने शिकत असते आणि शिक्षकांनी त्या कुतूहल आणि जिज्ञासू वृत्तीला नेहमी जागा दिली पाहिजे. शिक्षणाचे अंतिम लक्ष्य हे  आनंद शोधण्यात असावा ना की फक्त डिग्री घेऊन कारकुनी करण्यात किंवा 6-7 आकडी पगार घेऊन त्रासदायक आयुष्य जगण्यात. लहान मूल हे कुतूहलाने शिकते आणि पुस्तकातून फार कमी शिकत असते. उदा. मातृभाषा ही केवळ ऐकून आणि निरीक्षण करून लहान मूल शिकते., त्याला कोणत्याही पुस्तकाची गरज लागत नाही. समरहिल मध्ये रिडींग क्लब आहेत पण शालेय पुस्तक हे खूप कमी महत्वाचे मानले जाते. 

खेळला पहिल प्राधान्य : समरहिल मध्ये खेळाला पाहिलं प्राधान्य दिलं जात. खेळातून मुलं शिकत असतात आणि त्यांना त्यापासून रोखणे म्हणजे त्यांच्यातील उत्साह, कुतूहल आणि सर्जनशीलता यांना मारण्यासारखेच आहे.  नैसर्गिकरित्या मुलं शिकत असतात , मस्ती करणे , प्रश्न विचारणे , गोंधळ घालणे , हे सर्व त्यातलेच आहे. सतत या गोष्टी करु नका म्हणून मुलांवर कोणतीही बंधने नसतात. 

बाल मानसिकता केंद्रित शिक्षण : धार्मिक, भांडवलशाही, समाजवाद किंवा साम्यवाद अशा वेगवेगळ्या विचारधारा मानणाऱ्या समाजाने अनेक शाळा सुरू करून लहान मुलांना शिक्षण दिले, देत आहेत पण सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीमुळे मुलांच्या मानसिक खच्चीकरण होत आहे. त्यावर मात करण्यात या शाळा सपशेल अपयशी ठरल्या आहेत. समरहिल मानते की मुलांचे मानसिक नुकसान होत आहे त्यावर मात करेल असे शिक्षण हवं.

स्वयंशासित (self-government)

http://www.summerhillschool.co.uk
Self-Government Meeting at Summerhill
समरहिल चे वेगळेपण हे शाळेच्या गव्हर्नन्स मध्ये आहे. शाळेचे सर्वनियम हे मूळ ठरवता, शाळेचे अंतर्गत कायदे सुद्धा मूल ठरवतात.  जेव्हा शाळेच्या मीटिंग मध्ये एखादी गोष्ट ठरवायची असेल तर सर्वांचे मत घेतले जाते आणि शिक्षकांचे आणि विद्यार्थ्यांच्या मताला सारखेच महत्व आहे. एका गोष्टीचे आश्चर्य वाटेल की स्वतः AS नील यांनी मांडलेले मुद्दे बहुमताने मुलांनी रद्द केले आहेत.  शाळेमध्ये एखाद्या मुलाने जर चोरी केली तर शनिवारी रात्री STUDENT COUNSEL ची बैठक घेऊन त्यावर निर्णय घेतला जातो. पण शिक्षा म्हणून पैसे परत करण्याचे सांगितले जाते. 

यामुळे या शाळेकडे एक प्रगतीशील शाळा म्हणून पाहिले जाते.

Private Lesson. (वैयक्तिक किंवा खाजगी पाठ)

PL पूर्णपणे ऐच्छिक असतात. पण याची खासियत म्हणजे मुलं ही शिक्षकांकडे स्वतःहून याची मागणी करतात. P L ही व्यवस्था ज्या मुलांना काही समस्या  आहेत आणि विशिष्ट दडपणामुळे जी मुले व्यक्त होऊ शकत नाही अशी मुले PL मध्ये व्यक्त होतात.  याच वैष्टिक हे की PL मध्ये मुले कोणतेही दडपण न  बाळगता शिक्षकसोबत कोणत्याही विषयावर बोलतात. अगदी हस्तमैथुन, सिगारेट पिण्याचे फायदे तोटे , प्रेम, राग ..अशा अनेक गोष्टींवर मुलं व्यक्त होतात. हेच या शाळेचं वेगळंपण आहे.

आज शिक्षणव्यवस्था अशी आहे की मुलांना शिक्षक त्यांचे मित्र कधीच वाटत नाहीत, मुलांचा आणि पालकांचा संवाद ही कमी झालाय. मग ही लहान मूल कुठे व्यक्त होणार, मनातले प्रश्न कुठे मांडणार.... यातूनच मूल स्वतःच्या प्रश्नचं उत्तर शोधण्यासाठी चुकीचे रस्ते निवडता. अशा परिस्थितीत समरहिल सारख्या शाळेचे महत्व ठळकपणे जाणवते. मूल हे जन्मापासून स्वतंत्र असते आणि स्वतंत्र हा नैसर्गिक अधिकार आहे हे ज्यांना मान्य आहे त्या सर्वांना ही शाळा नकीच आवडेल.


समरहिल वर आधारित चित्रपट पाहण्यासाठी येथे क्लिक करा Summerhill (2008) -AMAZING- Best Freedom Movie Ever!! (https://www.youtube.com/watch?v=TxngqMavda0)

(समरहिल या शाळेचे पालक-मूल या विषयांवरचे तत्वज्ञान पण खूप प्रभावी आहे. पुढील काही लेखात त्यावर प्रकाश टाकण्याचा नक्की प्रयत्न करू. )


आपली Writergiri

लेखक : प्रवीण, यांची शिक्षण क्षेत्रात फेलोशिप झालेल्या आहेत.  मागील १०+ वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात गावपातळी ते राज्यपातळीवर शिक्षण आणि सामाजिक विकासाच्या अनेक प्रकल्पावर कार्य करीत आहेत. 

संपर्क : ७७३८८८२६९२

मेल: pranju8990@gmail.com

1 टिप्पणी:

  1. Khupch mst.. Asha school asayla hvyat mulana khup fayda hoil.. Swatachya echene ani aavdine mil jagu shaktil.. Kahi vela tote house shaktat pn te mulanvar depend asta😊👍

    उत्तर द्याहटवा

कांदे पोहे कि सौदेबाजी....की विवाह संस्थेच फाऊंडेशन

 कांदे पोहे कि सौदेबाजी....की विवाह संस्थेच फाऊंडेशन   काही चांगल्या / कमावत्या मुलांची लग्न ठरत नाही मग ती मुलं किंवा त्याच्या घरचे मुलींना...