शुक्रवार, १६ एप्रिल, २०२१

The Great Indian Kitchen Movie Review

पितृसत्ताक पद्धती आणि मासिक पाळीच्या वेळी होणारी स्त्री ची घुसमट व्यक्त करणारा चित्रपट


प्रमुख कलाकार :  निमिषा सजयन  आणि सुरज (कलाकारांचे चित्रपटात ही हेच नाव आहे)
apali-writergiri-the-great-indian-kitchen-movie-review


लेखन व दिग्दर्शन : जिओ बाबी 

भाषा : मल्याळम 

कथा : या चित्रपटाची सुरुवात निमिषापासून होते. ती एक उत्तम नृत्य कलाकार असते. लगेचच दुसऱ्या क्षणी तिच्या लग्नाच्या बोलणीचा प्रसंग दाखविला आहे. ज्यात तिच्या होणाऱ्या नवऱ्या विषयी कोणतीही चर्चा न होता. तो प्रतिष्ठित घरातला आहे असे बोलून लगेच लग्न ठरविले जाते.  तिचे लग्नापूर्वीचे घर आणि वातावरण हे लग्नानंतर पूर्णतः उलट होऊन जाते. या संदर्भात चित्रपटात पुढील प्रसंग येत जातात.
 
लग्नानंतरची पहिली गुलाबी सकाळ तिला खूप आनंददायी वाटते. पण लगेचच तिचा पती आणि सासऱ्याचे जेवण झाल्यानंतर टेबलावरील टाकलेले तोंडातील उष्टे खरकटे बघून तिचे मन उदास होऊन जाते. तरीही ती या नवीन घरातील या पितृसत्ताक पद्धतीला आत्मसात करण्याचा परिपूर्ण प्रयत्न करते. सकाळी उठल्या पासून ते रात्र झोपे पर्यंत पूर्ण वेळ स्वयंपाक घर ते घरातील साफसफाईचे काम करणे हेच आयुष्य असल्यासारखे कामाला जुंपते. या चित्रपटात दररोजची सकाळ तिचे स्वयंपाक घरातील कचरा टाकण्यापासून, सांडपाण्याची बादली बाहेर ओतणे, साफसफाई करणे, विविध जेवणाचे पदार्थ बनविणे,  कपडे धुणे, पाहुणचार करणे, पती आणि सासऱ्यांला टूथपेस्ट ब्रश ते चहाचा प्रत्येक कप  आणि गरम जेवण देणे अशी बरीच कामे खूप बारकाईने सारखी सारखी दाखविले गेली आहेत.  जेवणाच्या टेबलावरील उष्टी-खरकटे आणि स्वयंपाक घरातील सांडपाण्याचा वास  हि अस्वच्छता दररोज बघून तिला खूप किळसवाणे वाटत असते म्हणून सारखी साबणाने हात धुवत असते तरीही हाताला तो घाण वास जात नाही असे तिला जाणवते. या घरातील सर्व कामानंतर रात्री तिचा पती सेक्स करताना तिला आनंद न वाटता दिवसभरातील या किळसवाण्या गोष्टी डोळ्यासमोर तिच्या येत असतात.  लग्नानंतर निवांत बसलेला एक हि क्षण या चित्रपटात दिसला नाही. दररोजचे काम  थोडे हलके होण्यासाठी भात चुलीवर न करता कुकर मध्ये केला तर ते सासऱ्यांना नापसंत पडते, कपडे वॉशिंग मशीनला न धुण्याचा सल्ला दिला जातो,  शीळ अन्न खायला नकार दिला जातो, तिला नृत्य शिक्षक म्हणून काम करण्याच्या इच्छेला ही नकार दिला जातो.  तिचा दिवस पूर्णतः घरातील काम , उष्टी खरकटी आणि साफसफाई यातच व्यस्त झालेला दिसतो. 

तर दुसरीकडे तिचा पती उठून योगासने करणारा, वडिलांच्या प्रत्येक गोष्टीला समर्थन करणारा, पत्नीला कधीच समजून न घेणारा, पत्नीने अनेकदा प्लंम्बरला बोलवायला सांगितले असताना तो हि गोष्ट विसरणारा, तिने सेक्स करण्याआधी फॉरप्ले केला तर मला त्रास होणार नाही हे सांगितले की त्याचा इगो दुखावला जाणारा, हॉटेल मध्ये उष्टे खरकटे टाकण्याबद्दल टेबल मॅनर्स सांगितले की रागाने जेवण टाकून देणारा आणि तिला अनेकदा मॅनर्स वरून टोमणे मारणारा दाखवला आहे.  तसेच शाळेत विद्यार्थ्यांना कुटुंब पद्धती म्हणजे काय ? हे शिकवणारा दाखविला आहे. 

तिची सासू हे सर्व काम कोणतीही तक्रार न करता गपगुमान सर्व काम करणारी आणि मुलीच्या प्रसूतीसाठी बॅग भरून खुराक घेऊन तिच्या सासरी गेलेली दाखवली आहे. जी आपल्या मुलीला काही काम करू देत नाही.

तिचा सासरा हा खुर्चीवर पेपर वाचत बसलेला , हातात प्रत्येक गोष्ट यायला पाहिजे, त्याच्या चवीप्रमाणे जेवण झाले पाहिजे , स्त्रियांनी कसे असावे याचे सल्ले देणारा दाखवला आहे. हाच पितृसत्ताक पद्धतीचा वारसा तो आपल्या मुलाला पूर्णतः देतो. 

या चित्रपटात पितृसत्ताक पद्धतीतील बारकावे जितक्या उत्तम पद्धतीने मांडले आहेत त्याच प्रमाणे जेव्हा तिचा मासिक धर्म किंवा मासिक पाळी सुरू होते तेव्हा अनुभव ही खूप बारकाईने मांडले आहेत. जेव्हा   तिला   लग्नानंतर पहिल्यांदा पाळी येते तेव्हा तिला स्वयंपाक घरात काम करायला मनाई केली जाते. शेजारीची बाई येऊन घरातील सर्व काम करते. पहिल्यांदा थोडे साफसफाईला मदत करत असते पण नंतर ते ही करायला मनाई होते. तिचा सासरा त्याच्या बहिणीला घरी बोलवून घेतो कारण निमिषा घरात मासिक पाळीच्या वेळेचे आणि अस्पृश्यतेचे नियम फारसे नीट पाळत नसते.  आत्या आल्या आल्या तिला गादीवर न झोपता एका फाटक्या चटईवर झोपायला बसायला लावते.  तिला त्या खोली बाहेर येण्यास ही मनाई करते.  तिला स्पर्श न   करता जेवण लांबून ताट दिले जाते.  तिला घरात आंघोळ न करता बाहेर आंघोळ करायला लावले जाते.  कपडे बाहेर सुकायला घालण्यावरून  पण मनाई केली जाते.   तिचा नवरा कामावर जात असताना स्कुटर वरून पडतो ही त्याला उठायला मदत करते तर उलट तिलाच रागावतो आणि पंडिताला फोन करून शुद्ध होण्यासाठी काय करू? याची उपाययोजना विचारतो. 
एकीकडे हिचा पती आणि सासरा सबरीमाला आयप्पाची भक्ती करणारे दाखवले आहे त्याच दरम्यान टीव्हीवर सबरीमाला प्रवेशा बद्दल सुप्रीम कोर्टाची सुनावणी बद्दलचीबातमी दाखवली आहे. जी या प्रकरणाची बातमी देते त्या पत्रकारितेच्या घरी काही सबरीमालाचे कट्टर भक्त जाऊन तिला धमकवणारे तिची गाडी जाळताना दाखविले आहे. जेव्हा निमिषा तीच सबरीमालाची बातमी सोशीलमीडियाला शेअर करते तर तिला ही तिचा पती ती बातमी काढून टाकण्याचा आदेश देतो . पण त्यावेळी ती  ठामपणे "मला ही अशीच शूद्र वागणूक मिळते. मला वाईट वाटतं म्हणून मी हा व्हिडिओ शेअर केला असे सांगते." 
चित्रपटाच्या शेवटी ती सकाळी लवकर उठून स्वयंपाक शांत बसलेली दाखवली आहे, कचऱ्याचा डबा आणि सांडपाण्याची बादली पुन्हा नेहमी प्रमाणे भरलेली असते. जी लहान मुलगी दुधाची बाटली द्यायला येते तिला मागील दरवाजा बाहेरून कडी लावायला सांगते. दुसरीकडे त्यांच्या घरात सबरीमालाचा कार्यक्रम होताना दाखवला आहे. तिच्याकडे  चहा बनवून देण्याची मागणी केली जाते व ती रागाने त्या सांडपाण्याने कप भरून बाहेर देते. जेव्हा रागाने तिचा पती व सासरा स्वयंपाक घरात येतात तेव्हा ती सांडपाणीने भरलेली बादली त्यांच्यावर फेकून घर सोडून निघून जाते. माहेरी आल्यावर तिची आई आणि बहीण तिची समजूत घालत असतात व पुन्हा " ते एक प्रतिष्ठित कुटुंब आहे" अशी समजूत घालत असतात. पण ती या वाक्यावर खूप चिडचिड व्यक्त करते. त्याच वेळी तिच्या भावाने आईकडे पाणी देण्याची मागणी करतो पण ती याच छोट्याश्या वाटणाऱ्या गोष्टीवर खूप रागावते कारण इथेच पितृसत्ताक पद्धतीची मूळ सुरुवात तिला दिसत असते.  अखेरीस  ती उत्तम नृत्य शिक्षक बनते तर दुसरीकडे तिचा पती दुसरे लग्न करून पुन्हा चित्रपटाच्या सुरुवातीसारखी गुलाबी पहाट आणि दुसरी नववधू  स्वयंपाकघरात चहाचा कप धुताना होतो.


माझे मत : मला हा चित्रपट पाहताना माझे संपूर्ण बालपण समोर उभे राहिले. बाबांपासून भाऊकडे आलेली पितृसत्ताक पद्धती ते मासिक पाळीतील अस्पृश्यता या दोन्ही गोष्टी मी अनुभवल्या होत्या आणि अजूनही कोकणात ही परिस्थिती दिसून येते.  मला हि या पितृसत्ताक पद्धती आणि मासिक पाळीतील अस्पृश्यता  विरुद्ध बदल करताना अनेक विरोध झाले  अजूनही होतात. 
 
एकूणच पितृसत्ताकपद्धतीची मूळ इतकी खोलवर रुजली आहेत तिचे उच्चाटन करताना प्रत्येकवेळी हा संघर्ष अटळ आहे. हेच वास्तव दर्शविणारा हा चित्रपट आहे. हा चित्रपट मल्याळम भाषेत आहे पण इंग्रजी शीर्षक मिळू शकतील. या चित्रपटात तसे डायलॉग्ज कमी आहेत आणि जास्तीत जास्त चित्रपट सिनेमॅटोग्राफीतुन व्यक्त झालेला आहे. अमेझॉन प्राईमवर हा चित्रपट पाहता येऊ शकेल. 
प्रत्येकाने नक्की हा चित्रपट पाहावा.  नक्कीच या चित्रपटातील अनेक प्रसंगांना तुम्ही तुमच्या जीवनासोबत अनुभवताना किंवा पहाताना बघाल. 


जर तुम्हांलाहि असा अनुभव आला असेल किंवा पाहिले असेल  तर कमेंट बॉक्स / मेसेज / ईमेल मध्ये नक्की व्यक्त व्हा. 


- apali writergiri 
- 7738882692
- pranju8990@gmail.com


१२ टिप्पण्या:

  1. वास्तविकता लिखाणातून दिसून आली आहे.

    उत्तर द्याहटवा
  2. आपल्या पिढीने भोगलेलं वास्तव आहे हे! त्यातून आपली सुटका करून घेऊन तसेच पुढच्या पिढीची सुटका होण्यासाठी आपणच आपल्या घरातील मुलांवर योग्य संस्कार करायला हवेत. वेगळा पण महत्वाचा विषय मांडला आहे.

    उत्तर द्याहटवा
  3. खरंच पाहण्यासारखा आणि शिकण्यासारखा चित्रपट असेल अशी आशा आहे. असेच वेगळे विषय हाताळले गेले पाहिजेत. मी सुध्दा अशाच वेगळ्या विषयावर एक नाटक लिहीत आहे. वेळ काढून नक्की माझ्या Blog ला भेट द्या.
    ssameervengurlekar123.blogspot.com

    उत्तर द्याहटवा
  4. खरंच पाहण्यासारखा आणि शिकण्यासारखा चित्रपट असेल अशी आशा आहे. असेच वेगळे विषय हाताळले गेले पाहिजेत. मी सुध्दा अशाच वेगळ्या विषयावर एक नाटक लिहीत आहे. वेळ काढून नक्की माझ्या Blog ला भेट द्या.
    ssameervengurlekar123.blogspot.com

    उत्तर द्याहटवा
  5. माफ करा पण संपूर्ण सिनेमाची कथाच सांगून टाकलेली आहे. शेवटचा सीन काय आहे इथपर्यंत. परिचय किंवा परीक्षण करताना तेवढी काळजी घ्यायलाच हवी

    उत्तर द्याहटवा

कांदे पोहे कि सौदेबाजी....की विवाह संस्थेच फाऊंडेशन

 कांदे पोहे कि सौदेबाजी....की विवाह संस्थेच फाऊंडेशन   काही चांगल्या / कमावत्या मुलांची लग्न ठरत नाही मग ती मुलं किंवा त्याच्या घरचे मुलींना...