बुधवार, १३ जानेवारी, २०२१

मराठी माध्यमातील मुलांचे इंग्रजी वाचन कसे उत्तम होईल (2 mins read)

शिक्षण हे मातृभाषेतूनच दिले पाहिजे आणि ते गरजेचेच आहे. पण तरीही इंग्रजीच महत्व नाकारून चालणार नाही. मातृभाषेतून शालेय शिक्षण देऊन मुलांच इंग्रजीवर प्रभुत्व कसे राहील याचा विचार करायला हवा. निव्वळ इंग्रजी सुधारण्यासाठी मुलांना इंग्रजी माध्यमात टाकणे हा समंजसपणा नाही वाटत.

मराठी माध्यमातील मुलांचे इंग्रजी कसे उत्तम होईल यासाठी काय करावे लागेल? या विषयावर थोडक्यात माहिती देणाऱ्या लेखाचा हा पहिला भाग. 

१.     सॅंडविच पद्धत

लहान मूल त्याच्या आईवडिलांकडून तसेच याच्या सोबत असणाऱ्या प्रत्येकाकडून काहीना काही शिकत असतात. या सर्व लोकांचे शब्द त्यांच्या कानावर पडत असतात. निव्वळ ऐकणे या क्रियेवर ते मातृभाषा बोलायला शिकतात. कोणतीही शिकवणी नाही किंवा कोणतेही व्याकरण नाही मूल मातृभाषा त्यांच्या कानावर पडणाऱ्या शब्दांमुळे शिकत असतात. मराठी माध्यमातील मुलांना नेमकी हीच गोष्ट मिळत नाही. कोणतीही भाषा शिकण्यासाठी ती भाषा सतत ऐकण गरजेच आहे त्या व्यतिरिक्त बोलण, वाचन आणि लिहिण ही महत्वच आहे. या चार गोष्टींची सांगड घालून दिली तर मराठी माध्यमातील प्रत्येक विद्यार्थी अस्सलखीत इंग्रजी बोलेल. हे सर्व नेमक करायचे कसे.

विद्यार्थ्यानी सतत इंग्रजी ऐकण्यासाठी इंग्रजी शिकविणाऱ्य शिक्षकांनी विद्यार्थ्यांशी इंग्रजीत शिकवण गरजेचे आहे. आपल्याकडे बऱ्याचदा इंग्रजी हा विषय इंग्रजीतून शिकवलं जात नाही आणि घरात इंग्रजी बोलणार किंवा ते शिकवणार कोण नसत. त्यामुळे मुलांच्या कानावर इंग्रजी शब्द पडत नाहीत. मग इथे असाही विचार येईल की पूर्णपणे जर इंग्रजीमध्ये शिकवल तर विद्यार्थ्याना काही कळणार नाही. त्यासाठी सॅंडविच पद्धतीने शिकवता येईल. शिकवता इंग्रजी आणि मराठी अशा दोन्ही भाषा वापरता येतील. म्हणजेच वर्गात ज्याकाही सूचना दिल्या जातात त्या सर्व इंग्रजी मध्ये आणि मग मराठी मध्ये दिल्या जाव्यात. हळू हळू इंग्रजीचा वापर वाढवत जावा. या पद्धतीने इंग्रजीचे अनेक शब्द कानावर पडत असतात. दुसर पालकांना सूचना करता येईल की मुलांना त्यांचे आवडते कार्टून शोस ही इंग्रजीतून पाहायला सांगा.

२.     रीडिंग फ्लूएनसी

मी बऱ्याच वेळा पहिल आहे की मूल इंग्रजी मधून मराठीतील बाराखडी पाठ करतात. शिक्षक आणि पालक सुद्धा ते करायला सांगतात. मुळात मराठीतील बाराखडी आणि इंग्रजी मधील फोनएटिक साऊंड्स (phonetic sounds) मध्ये भरपूर फरक आहे. इंग्रजी वाचण्यासाठी इंग्रजीतली बाराखडीची मदत खूपच मर्यादित स्वरूपाची आहे पण जर मुलाना फोनएटिक साऊंड्स (phonetic sounds) शिकवले तर मूल खूप जलद गतीने वाचू शकतात.

उदा. १. क साठी इंग्रजी बाराखडी प्रमाणे k वापरतो पण फोनएटिक साऊंड्स (phonetic sounds) मध्ये K आणि C दोन्हीचा वापर होतो. २. MAT या शब्दाला बाराखडी प्रमाणे ‘मत’ असा उच्चार होतो पण त्याचा उच्चार मॅट असा आहे. तसेच MATE हा शब्द बाराखडी प्रमाणे ‘मते’ हा उच्चार होतो पण शेवटच्या अक्षरामुळे (E मुळे ) त्याचा उच्चार ‘मेट’ होतो. त्याला “magic E effect” अस म्हणतात. मराठी प्रमाणेच इंग्रजीतही बाराखडी पद्धत शिक्षक वापरतात आणि त्यामुळे मुलांचा प्रचंड गोंधळ होत असतो.

हे फोनएटिक साऊंड्स (phonetic sounds) ६ पायऱ्यांमधे वापरायची असते.

1.   Drill – यामध्ये मुलांना नवीन फोनएटिक साऊंड्स (phonetic sounds) ची ओळख विशिष्ट पद्धतीन करून दिली जाते. 

2.   Blending – ही दुसरी पायरी वेगवेगळे फोनएटिक साऊंड्स (phonetic sounds) एकत्र जोडून त्यातून शब्दाचा उच्चार कसा करायचं हे शिकवले जाते. (खालील विडियो हा पाहावा)



3.   Segmenting – तिसऱ्या पायरी मध्ये शब्दांमधून फोनएटिक साऊंड्स (phonetic sounds) वेगळेकसे करायचे हे मुलांकडून करून घेतले जाते. (खालील विडियो हा पाहावा)

4.   Decoding and reading – काही शब्द हे खूप मोठे असतात, त्यांची फोड (decode) करून ते मग ते एकत्र करून वाचयचे. तसेच या पायरी मध्ये फोनएटिक साऊंड्स (phonetic sounds) शी संबंधित आणि sight words असलेली वाक्य मुलांना वाचायला सांगितली जाते. Sight words म्हणजे असे शब्द की जे इंग्रजीत सातत्याने वापरले जातात.

5.   Spelling – ही शेवटची पायरी. या मध्ये शिक्षक संबंधित फोनएटिक साऊंड्स (phonetic sounds) चे शब्दउच्चार करतात आणि ते ऐकून मुलांना त्याची स्पेलिंग लिहावी लागते.

प्रत्येक आठवड्याला एक नवीन फोनएटिक साऊंड्स (phonetic sounds) ची मालिका शिकवली जाते. असा प्रयोग सतत १६ ते २४ आठवडे केल्यास मुलांना इंग्रजी वाचण्यात शुद्धता येते. महत्वच म्हणजे  पश्चात देशात सुद्धा हीच पद्धत वापरतात. अशा पद्धतीने मुलांना शिकवल्यास भरपूर फायदा होईल.

(पुढील लेखात रीडिंग कॉमप्रेहेशन पद्धततिने आणि काही फ्री मोबाइल अॅपस् चा वापर करून इंग्रजी मध्ये काशी सुधारणा करता येईल यावर प्रकाश टाकू)


३ टिप्पण्या:

कांदे पोहे कि सौदेबाजी....की विवाह संस्थेच फाऊंडेशन

 कांदे पोहे कि सौदेबाजी....की विवाह संस्थेच फाऊंडेशन   काही चांगल्या / कमावत्या मुलांची लग्न ठरत नाही मग ती मुलं किंवा त्याच्या घरचे मुलींना...