रविवार, १७ जानेवारी, २०२१

बम बम भोले.....हम पंचमढी चले....

 बम बम भोले.....हम पंचमढी चले....


वाचन आणि भटकंती हे सर्वात आवडते विषय. त्यात भटकंती करायला सोबत भटकंती करणारे असले की खूप धमाल येते. गेल्याच आठवड्यात एक अनप्लान पिकनिक ठरली. नागपूर वरुन सरळ पंचमढी गाठले. (रस्ते इतके नागमोडी वळणाचे होते की त्याला सरळ जाणे म्हणण हा भाषेचा फॉल्ट वाटला) . नागपूर वरुन २५७ किमी अंतरावर सातपुडा पर्वतरांगांत वसलेले पंचमढी हे एक छोटस पण तितकाच प्रसिद्ध हिल स्टेशन आहे. या हिल स्टेशन च्या आजूबाजूचे घाट तुम्हाला केरळच्या किंवा आसामच्या चहाच्या मळ्याभोवताली असलेल्या नागमोडी रस्त्यांची आठवण करून देतात. पंचमढी मधील हॉटेल्स, नावांचे फलक, बस स्टॉपस, रस्त्यावरचे दिवे , चर्च, ई गोष्टी तुम्हाला थेट युरोप मध्ये घेऊन जातात.

panchmarhi-panchmadhi-apali-writergiri-anjali-pravin

भटकंतीची सुरुवात :
रानगवाचे विशेष आकर्षण –  बायसन लॉज

खरतर पंचमढी फिरण्याची सुरुवात या बायसन लॉज पासूनच होते. १८६२ मध्ये कॅप्टन फोरसिथ यांचे पंचमढीला वास्तव्य सुरु झाले तेव्हा त्यांनी रानगव्यांची मोठी झुंड पाहिली होती. त्या रानगव्यांचा झुंडीला आकर्षित होऊन त्यांनी आपल्या घराचे नाव बायसन लॉज असे ठेवले (इंग्रजीत रानगव्याला बायसन म्हणतात). सन १९८६ मध्ये या लॉजचे रुपांतर वन्यजीव संग्राहलय म्हणून करण्यात आले.  हे संग्राहलय खूप अनोख्या पद्धतीचे आहे. पंचमढीमध्ये जे वन्यजीव पशु- पक्षी वास्तव्य करतात त्यांचे फोटो स्वरूप आणि मूर्ती स्वरूप संग्रह आहे. तसेच पंचमढीमधील स्थानिक आदिवासी संस्कृती यांची माहिती देणारे फोटो संग्रलाय पाहण्यासारखे आहे.

या संग्रहालयाच्याच आवारात तुम्हाला वनखात्याचे कार्यालय दिसेल जिथे पंचमढी फिरण्यासाठी प्रवेश / परवानगी पास घ्यावा लागतो आणि जिप्सी, बाईक किंवा सायकल भाड्याने मिळते. पंचमढी मध्ये चाळीसहून अधिक फिरण्याचे ठिकाणे आहेत. त्यापैकी  नेमकी कोणती ठिकाणे आपल्याला पाहायची आहेत याची इंटरनेटच्या माध्यमातून अभ्यास करून आधीच ठरवून ठेवले तर अधिक योग्य राहील. एका जिप्सी मध्ये सहा व्यक्ती बसण्याची परवानगी आहे. या जिप्सीचे पाच फिरण्याचे मार्ग व ठिकाणे आहेत त्यातील आपल्याला कोण-कोणती ठिकाणे पाहायचे आहे तो मार्ग आपल्याला ठरवावा लागतो. य मार्गांचे फलक हि तिकडे लावलेले आहेत.  प्रती दिन जिप्सीचे भाडे १७०० रुपये व गाईडचे ६०० रुपये द्यावेच लागतात.  खाजगी गाडीने हि पंचमढी फिरू शकतो पण काही ठिकाणी जाण्यासाठी  वनखात्याची परवानगी असलेला पास गरजेचा आहे. तसेच बहुतेक पर्यटन स्थळांवर खाजगी गाड्यांना परवानगी नाही. तिकडे फ़क़्त वनखात्याच्या जिप्सीच जाऊ शकतात. येथे बहुतेक ठिकाणी ट्रेकिंग करावी लागते. जिप्सी वनविभागाशी संबंधित असल्याने काही पर्यटन स्थळावर थोड्या कमी अंतरावर जिप्सीगाड्यांना थोडे जवळ सोडण्याची परवानगी आहे. आम्ही कोणतीही जिप्सी न घेता पायपीट करायचे हे ठरवले होते त्यामुळे जितके शक्य तितके आम्ही ट्रेकिंग करतच पंचमढी फिरलो.

पंचमढीतील पाहण्याची ठिकाणे:

बायसन लॉज, जयस्तंभ, ब्रिटीशकालीन  प्रोटेस्टेट चर्च, बि फॉल, पांडव गुफा, अप्सरा विहार, रजत प्रपात, धूपगढ, राजेंद्र गिरी, हंडी खोह, बडा महादेव, प्रियदर्शनी,  डचेस फॉल, पांचाली कुंड, गुप्त महादेव, जटाधारी  शंकर, रिछगढ, चौरागढ ट्रेक, निम घन पनारपानी  गेट जंगल सफारी आणि इतरही बरेच काही.

इथे काही एडव्हेन्चर क्लब आहेत जिथे पेरासिलिंग, झिप लाईन क्रोसिंग, बंजी जम्पिंगसारखे एडव्हेन्चर गेम खेळू शकता. 

पंचमढीला फिरण्याचा कालावधी :

पंचमढी हे हिलस्टेशन / थंड हवेचे ठिकाण आहे. त्यामुळे इथे पावसाळा सोडून केव्हा हि  येऊ शकता. तसेच पंचमढीला  आदिवासी संस्कृतीचा वारसा आहे. जर डिसेंबर महिन्याच्या अखेरीस  २५ डिसेंबर ते १ जानेवारी पर्यंत पंचमढीतील आदिवासी संस्कृतीचे पारंपारिक उत्सव हि पाहायला मिळतात. पंचमढीला महादेव शंकराचे अनेक मोठी मंदिरे आहेत. त्यामुळे महाशिवरात्रीला हि येथे खूप मोठा उत्सव पाहायला मिळतो. पंचमढीतील कोणत्याही ठिकाणी सकाळी ९ ते ५ या वेळेत फिरता येते.  साधारणत ३.३० नंतर काही पॉइंटस (स्थळे) पाहण्यासाठी प्रवेश दिला जात नाही कारण बहुतेक ठिकाणे हि जंगलात आहेत व दोन ते तीन किलोमीटरचे अंतर पायी चालावे लागते. जंगलात अंधार लवकर होतो आणि वन्यजीवपासून संरक्षण व्हावे म्हणून प्रवेश लवकर बंद केला जातो.  

पंचमढीचे खास आकर्षण :

पंचमढीला सातपुडाची राणी असे देखील ओळखले जाते. चहूबाजूंनी हिरवी कीर्द झाडी आणि जंगल, लांबच्या लांब सातपुडाच्या डोंगर रांगा, मोठ मोठ्या विशिष्ट आकराचे दगड आणि डोंगरातील छोट्या वाटा अनुभवणे म्हणजे एक वेगळीच पर्वणी आहे. 

जटाधारी शंकराचे एक मंदिर आहे, ते ही दरीत. लवकर तळ न दिसणारी ही दरी आणि जेव्हा दरीच्या तळाला पोहचल्यावर अगदी चिंचोळ्या गुहेतून मार्ग काढत तुम्हाला शंकराच्या मूर्तीचे दर्शन होते. तुम्ही देव मानता की नाही हा प्रश्न येथे गौण आहे कारण गुहेतल्या थरारा एक वेगळाच अनुभव देऊन जातो. 

बी फॉल - 150 फुटांवरून कोसळणारा धबधबा अनुभवायचं असेल तर तुम्हाला 3.5 किमीचा ट्रेक करावा लागतो. 2.5 किमी जंगलातून छोट्या छोट्या वाट तुडवत आगेकूच करत गेलं की एक छोटासा पाण्याचा वाहता ओहोळ दिसेल. तिथून जवळ जवळ 1 ते 1.5 किमी दरीत 500+ पायऱ्या उतरून जावे लागते. खाली पोहचल्यावर दिसणारा तो धबधबा पाहून अस वाटत की धबधब्याखाली कचरा करणाऱ्या मानव प्राण्याकडे धबधबा किती तुच्छतेने पाहत आहे.

तसेच  ३५० फुट उंचावरून कोसळणारा रजत प्रपात धबधबा ही पंचमढी चे आकर्षण आहे. या व्यतिरिक्त अप्सरा विहार  सारखे खूप छोटे मोठे धबधबे, प्रियदर्शनी पॉइट जिथे इंदिरा गांधीनी भेट दिली होती, राजेंद्र गिरी पॉइट जिथे डॉ राजेंद्र प्रसाद यांनी भेट दिली होती. पांडव गुफांवरून दिसणारे पंचमढी,  धूपगढ वरील मनोरम्य असा सनसेट, प्रत्येक ट्रेक पॉइटवरील रानमेवाचा आस्वाद, जंगल सफारी करताना सहज दिसणारे बायसन (रानगवा),  पंचमढी शहरातील पाणीपुरी, पोहा, आलूबोंडा आणि कुल्लड चहा म्हणजे स्वर्गीय सुख .... फुल ऑन मस्ती.... पैसा वसूल ट्रीप             

     इथे कसे पोहचावे

१.   जर आपण ट्रेन ने येणार असाल तर पिपरिया हे जवळचे स्टेशन आहे, तिथून ४५-५० किमी च्या अंतरावर पंचमढी आहेजर विमानाने येत असाल तर नागपूर वरुन २५७ किमी आणि भोपाळ वरून १७७ किमी वर पंचमढी आहे.

किती दिवसांत पंचमढी फिरून होईल ?

पंचमढी फिरण्यासाठी चार ते पाच पूर्ण दिवस पाहिजेच. जर विकेंड प्लान करून आले तर कमी ठिकाणे फिरू शकाल पण तरीही पंचमढीतील एखादा ट्रेक नक्कीच पूर्ण करता येईल. पण बरेच प्रेक्षणीय स्थळे फिरण्याची राहुन जातील. 

महत्वाच्या बाबी :

·        बायसन लॉजवर लवकर रांग लावून वनखात्याची प्रवेश पास मिळविणे.

·        वनखात्याच्या  बिना परवानगीचे हि बरेच ठिकाणे हि फिरू शकता. (चालण्याची तयारी ठेवणे)

·        माकडांपासून सावधान सतर्क राहा. 

·        पाण्याची बॉटल कायम जवळ ठेवावी.

·        शक्य तितके कमी सामान बाळगावे.    

मी आणि माझ्या सोबतचे भटके यांचा अनुभव:

साधारणत: सकाळी चार वाजता आम्ही पंचमढीला आमच्या हॉटेलला चेक-इन केले. पहाटे चार ते सहा दोनतास  आराम करून लगेच मी, प्रविण आणि शिरीष दादा आम्ही तीन भटके रूम बाहेर पडलो.  पहाटे पासूनच परेडचे आवाज कानावर येत होते. छावणी परिसरात राहण्याचा आणि  फिरण्याचा आनंद अनुभवत होतो.    हॉटेल समोरचे तलाव, टायरवर बसून सकाळच्या धुक्यात  मासे पकडणारे मच्छीमार,  नुकतीच फुललेले कमळाची खुप सारे  फुले, बगळे आणि विविध पक्ष्यांचे किलबिलाट, थोडेसे धुके आणि खूप साऱ्या माकडांची धावपळ अनुभवत पंचमढीच्या रस्त्यावरून चालू लागलो.  पंचमढी ट्रीपचे ट्रेक करताना जितकी धम्माल केली तितकीच  मॉर्निग वॉकला धम्माल केली. आमच्या सोबतचे मित्र मैत्रिणी जे प्रोफेशनल ट्रेकर नव्हते पण तरीही त्यांनी फुल ऑन स्पिरीट मध्ये ट्रेक केले. जिथून जाण्याची वाट नाही तिथूनहि आम्ही जंगलातील वाट शोधत मुक्कामी पोहोचलो. 

इको पॉइटला तीन वेळा आवाज ऐकू आला नाही म्हणून कानाजवळ तीन वेळा इको साउंड इफेक्ट देणारे धनश्री आणि प्रशांत यांची जोडी धमाल होती.एक दिवस आधी प्रशांताचा रॉयल इनफिल्ड बुलेटवर अपघात होऊन बुलेटची चकनाचूर दशा झालेली असताना आणि पूर्ण हाताला सूज असतानाही ट्रीपचा प्लान रद्द न करता आला होता. हिल स्टेशनवर High हिलची सेण्डल घालून अर्थात थोड्यावेळाने  सेण्डल काढून अनवानी चालणारी श्रद्धा आणि न खाता पिता उपाशी पोटी चालत राहणारी तिची मम्मी म्हणजेच डोंगरे काकू यांनीही ट्रेक मध्ये खूप धमाल केली होती. ट्रेकिंग करतानाचे वय २० वर्षे सांगणारे आणि ३० वर्षाची अनुभवाची शिदोरी जोडून एकूण पन्नाशी उलटलेले शिरीष दा हे ट्रेक करणे म्हणजे निसर्गाचा अनुभव घेत घेत त्यांच्या अगाध ज्ञानाचा आनंद लुटणेच म्हणावे लागेल. शिरीष दा महिनाभर शहेनशहा सारखा आपला हात प्लास्टर मध्ये घेऊन फिरत असतानाही पंचमढीच्या ट्रेकला तितक्याच उत्साहाने सामील झाले होते.  अश्या भिन्न व्यक्तिमत्वाच्या अवलियासोबत एक दिवस आधी कुठलेही नियोजन न करता सुनियोजित ठरलेली आमची पंचमढी ट्रीप. एकूणच खूप मजेदार.. पैसा वसूल.. धमाकेदार  होती.   

जर तुम्ही कपल म्हणून या किंवा ग्रुप ने या किंवा एकटे या तरीहि  पंचमढी तितक्याच कुतूहलतेने निसर्गाचा आल्हाददायी आस्वाद घेत अनुभवू शकता.    

मला निसर्गाच्या कुशीत जायचे आहे.... असे जर वाटत असेल तर नक्की पंचमढीला भेट देऊ शकता.  पंचमढी तुम्हाला निसर्गाच्या कुशीत जाण्याचा आनंद नक्कीच देते. 

५ टिप्पण्या:

  1. ट्रेकचे फोटो असते तर अजुन मजा आली असती...ट्रेकदरम्यान बघितलेली पचमढीची उडनपरी जॉयंट स्क्विरल भान हरपवणारी होती... आंटी पुलिस बुलायेगी ची धमाल व रॉबर्ट कथाचा थरार नेहमीसाठी चेहऱ्यावर हास्य फुलवणारा राहणार... गुहेतील प्रविणांनद महाराज व पाणीपुरीची अविट चव ही डोकावत राहणार आठवणींच्या खजान्यातुन... बी फॉल ला घेतलेल्या नागपुरी संत्र्यांचा आस्वाद कायम लक्षात राहणार... स्वप्नवत दोन दिवस... पचमढी रॉक !!

    उत्तर द्याहटवा
  2. इतकं छान प्रवासवर्णन केलंय की तिथेच जाऊन आलो असे वाटते

    उत्तर द्याहटवा

कांदे पोहे कि सौदेबाजी....की विवाह संस्थेच फाऊंडेशन

 कांदे पोहे कि सौदेबाजी....की विवाह संस्थेच फाऊंडेशन   काही चांगल्या / कमावत्या मुलांची लग्न ठरत नाही मग ती मुलं किंवा त्याच्या घरचे मुलींना...