बालपण लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
बालपण लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, १३ जानेवारी, २०२१

मराठी माध्यमातील मुलांचे इंग्रजी वाचन कसे उत्तम होईल (2 mins read)

शिक्षण हे मातृभाषेतूनच दिले पाहिजे आणि ते गरजेचेच आहे. पण तरीही इंग्रजीच महत्व नाकारून चालणार नाही. मातृभाषेतून शालेय शिक्षण देऊन मुलांच इंग्रजीवर प्रभुत्व कसे राहील याचा विचार करायला हवा. निव्वळ इंग्रजी सुधारण्यासाठी मुलांना इंग्रजी माध्यमात टाकणे हा समंजसपणा नाही वाटत.

मराठी माध्यमातील मुलांचे इंग्रजी कसे उत्तम होईल यासाठी काय करावे लागेल? या विषयावर थोडक्यात माहिती देणाऱ्या लेखाचा हा पहिला भाग. 

१.     सॅंडविच पद्धत

लहान मूल त्याच्या आईवडिलांकडून तसेच याच्या सोबत असणाऱ्या प्रत्येकाकडून काहीना काही शिकत असतात. या सर्व लोकांचे शब्द त्यांच्या कानावर पडत असतात. निव्वळ ऐकणे या क्रियेवर ते मातृभाषा बोलायला शिकतात. कोणतीही शिकवणी नाही किंवा कोणतेही व्याकरण नाही मूल मातृभाषा त्यांच्या कानावर पडणाऱ्या शब्दांमुळे शिकत असतात. मराठी माध्यमातील मुलांना नेमकी हीच गोष्ट मिळत नाही. कोणतीही भाषा शिकण्यासाठी ती भाषा सतत ऐकण गरजेच आहे त्या व्यतिरिक्त बोलण, वाचन आणि लिहिण ही महत्वच आहे. या चार गोष्टींची सांगड घालून दिली तर मराठी माध्यमातील प्रत्येक विद्यार्थी अस्सलखीत इंग्रजी बोलेल. हे सर्व नेमक करायचे कसे.

विद्यार्थ्यानी सतत इंग्रजी ऐकण्यासाठी इंग्रजी शिकविणाऱ्य शिक्षकांनी विद्यार्थ्यांशी इंग्रजीत शिकवण गरजेचे आहे. आपल्याकडे बऱ्याचदा इंग्रजी हा विषय इंग्रजीतून शिकवलं जात नाही आणि घरात इंग्रजी बोलणार किंवा ते शिकवणार कोण नसत. त्यामुळे मुलांच्या कानावर इंग्रजी शब्द पडत नाहीत. मग इथे असाही विचार येईल की पूर्णपणे जर इंग्रजीमध्ये शिकवल तर विद्यार्थ्याना काही कळणार नाही. त्यासाठी सॅंडविच पद्धतीने शिकवता येईल. शिकवता इंग्रजी आणि मराठी अशा दोन्ही भाषा वापरता येतील. म्हणजेच वर्गात ज्याकाही सूचना दिल्या जातात त्या सर्व इंग्रजी मध्ये आणि मग मराठी मध्ये दिल्या जाव्यात. हळू हळू इंग्रजीचा वापर वाढवत जावा. या पद्धतीने इंग्रजीचे अनेक शब्द कानावर पडत असतात. दुसर पालकांना सूचना करता येईल की मुलांना त्यांचे आवडते कार्टून शोस ही इंग्रजीतून पाहायला सांगा.

२.     रीडिंग फ्लूएनसी

मी बऱ्याच वेळा पहिल आहे की मूल इंग्रजी मधून मराठीतील बाराखडी पाठ करतात. शिक्षक आणि पालक सुद्धा ते करायला सांगतात. मुळात मराठीतील बाराखडी आणि इंग्रजी मधील फोनएटिक साऊंड्स (phonetic sounds) मध्ये भरपूर फरक आहे. इंग्रजी वाचण्यासाठी इंग्रजीतली बाराखडीची मदत खूपच मर्यादित स्वरूपाची आहे पण जर मुलाना फोनएटिक साऊंड्स (phonetic sounds) शिकवले तर मूल खूप जलद गतीने वाचू शकतात.

उदा. १. क साठी इंग्रजी बाराखडी प्रमाणे k वापरतो पण फोनएटिक साऊंड्स (phonetic sounds) मध्ये K आणि C दोन्हीचा वापर होतो. २. MAT या शब्दाला बाराखडी प्रमाणे ‘मत’ असा उच्चार होतो पण त्याचा उच्चार मॅट असा आहे. तसेच MATE हा शब्द बाराखडी प्रमाणे ‘मते’ हा उच्चार होतो पण शेवटच्या अक्षरामुळे (E मुळे ) त्याचा उच्चार ‘मेट’ होतो. त्याला “magic E effect” अस म्हणतात. मराठी प्रमाणेच इंग्रजीतही बाराखडी पद्धत शिक्षक वापरतात आणि त्यामुळे मुलांचा प्रचंड गोंधळ होत असतो.

हे फोनएटिक साऊंड्स (phonetic sounds) ६ पायऱ्यांमधे वापरायची असते.

1.   Drill – यामध्ये मुलांना नवीन फोनएटिक साऊंड्स (phonetic sounds) ची ओळख विशिष्ट पद्धतीन करून दिली जाते. 

2.   Blending – ही दुसरी पायरी वेगवेगळे फोनएटिक साऊंड्स (phonetic sounds) एकत्र जोडून त्यातून शब्दाचा उच्चार कसा करायचं हे शिकवले जाते. (खालील विडियो हा पाहावा)



3.   Segmenting – तिसऱ्या पायरी मध्ये शब्दांमधून फोनएटिक साऊंड्स (phonetic sounds) वेगळेकसे करायचे हे मुलांकडून करून घेतले जाते. (खालील विडियो हा पाहावा)

4.   Decoding and reading – काही शब्द हे खूप मोठे असतात, त्यांची फोड (decode) करून ते मग ते एकत्र करून वाचयचे. तसेच या पायरी मध्ये फोनएटिक साऊंड्स (phonetic sounds) शी संबंधित आणि sight words असलेली वाक्य मुलांना वाचायला सांगितली जाते. Sight words म्हणजे असे शब्द की जे इंग्रजीत सातत्याने वापरले जातात.

5.   Spelling – ही शेवटची पायरी. या मध्ये शिक्षक संबंधित फोनएटिक साऊंड्स (phonetic sounds) चे शब्दउच्चार करतात आणि ते ऐकून मुलांना त्याची स्पेलिंग लिहावी लागते.

प्रत्येक आठवड्याला एक नवीन फोनएटिक साऊंड्स (phonetic sounds) ची मालिका शिकवली जाते. असा प्रयोग सतत १६ ते २४ आठवडे केल्यास मुलांना इंग्रजी वाचण्यात शुद्धता येते. महत्वच म्हणजे  पश्चात देशात सुद्धा हीच पद्धत वापरतात. अशा पद्धतीने मुलांना शिकवल्यास भरपूर फायदा होईल.

(पुढील लेखात रीडिंग कॉमप्रेहेशन पद्धततिने आणि काही फ्री मोबाइल अॅपस् चा वापर करून इंग्रजी मध्ये काशी सुधारणा करता येईल यावर प्रकाश टाकू)


रविवार, ११ ऑक्टोबर, २०२०

Do we need a school for parents?

People, institute, and overall society contribute to the process of child development. Child development is not an isolated process. The child is being developed with help of his surrounding environment, thoughts receive from different people, the social-economic status of the family as well as the entire society, and so on.  In the same process parents and schools are the most important factors in children’s lives because they spent most of the time with them. School education is the foundation for all children to lead the life meaningfully. There is no doubt about the importance of schooling for children. In the case of school education, it is said that there are not bad students but there are bad teachers. But in the case of home education, there are not bad children but there are bad parents. Confused?

PC: United Nation website


Ownership vs Trusteeship

Last week I got a call from one of the parents of my students. She is the mother of that child. She told me “Sir, my daughter is not at all studying, I scold her, beat her but she is not at all understanding me. She is always busy with her drawing books. Sir, tell me what shall I do?”. Same things one can find with other parents too. If any child is not performing well in the school what would be the possible reaction of parents in general.  They will scold their child or they will blame the school teacher or they will change the school or they will change the tuition or they will abuse or beat the child.  Why does it happen? Why is that the story of most of the home?  A.S. Neil, the founder of Summerhill School, used to say that “….as we train our dogs to suit our own purposes, so we train our children…….There is never a problem child. There are only problem parents.”

I am speaking with 4-5 parents, daily. They have a concern about their child’s future. Because of that concern, they become owners of the child unknowingly. This attitude can come out pf a societal understanding of child development. Parents always have expectations from their children. It is not a wrong thing to have expectations from the children. But it is wrong when parents are forgetting their own childhood and they expect something which they could not do in their childhood. Parents should be in the role of trustee of their children.

The prestige of parents vs freedom of the child

Child should be free from birth but as A S Neil said unfreedom start from birth itself, even, he said, it started before birth. If a repressed woman with a rigid body bears a child, who can say what effect the maternity rigidity has on the new born baby. (p. 83, Summerhills).

Parents are taking care of their prestige rather than the freedom of choice of children. The family with weaker economic backgrounds enrolled students in the English medium. Students' home language and school language is different. How would students get an education?

A friend’s child gets 90% why not my child… that another prestigious dilemma of parents.  One of the parents called me and started complaining about the child,…. “my child is always playing and he is too much lazy, he is not at all opening books” It is not laziness, but it is a lack of interest that parents could not understand. In the name of prestige, parents are denying freedom to children. They want that their child should be an engineer or doctor irrespective of choice. They want their child should be trained to survive in the rat race irrespective of freedom of life. want to give a standard life to children at the cost of quality life.

School is not only important for the child but it also important for the parents. There is a need for schools for parents where all parents should be shaped to free the child not to arrest them in the shackles of prestige, concern about the future, rat race, and so on. 

शनिवार, ४ जुलै, २०२०

कोकणातील अंगणात खेळले जाणारे खेळ....

कोकणातील अंगणात खेळले जाणारे खेळ....

Angan-अंगण-apali-writergiri-kokan-diary
PC : Instagram 

अटक मटक चवळी चटक... चवळी झाली गोड गोड जिभेला आला फोड फोड.. जिभेचा फोड फुटेना... घरचा पावना उठेना .. जिभेचा फोड फुटला... घरचा पावना उठला..

Angan-अंगण-apali-writergiri-kokan-diary
PC : Instagram

लहानपणी मुंबईला राहत असताना हे गाण इतकेच म्हणायचो.  तसेच चाळणी शब्द ऐवजी  आम्ही चवळी म्हणायचो.  पण हे गाणे अर्धवट आहे हे माहिती नव्हते.  याच्या पुढच्या ओळी गावातील अंगणात शिकले...

पुन्हा याच गाण्यापासून सुरुवात करू...

अटक मटक चवळी  चटक... चवळी झाली गोड गोड जिभेला आला फोड फोड.. जिभेचा फोड फुटेना... घरचा पावना (पाहुणा) उठेना .. जिभेचा फोड फुटला... घरचा पावना उठला..

उठ उठ पावण्या बत्तीला... बत्ती गेली वाऱ्याने... गोंगाट घातला मुलांनी...

आज आता हे गाणे लिहितानाच मला तो लहानपणीचा सर्व आवाज कानात घुमू लागला आणि  अंगणातील आठवणीची रांग समोर उभी राहत गेली.

लहानपणी दर मे महिन्याच्या सुट्टीत गावी जाताना.... ‘का गावी जायचं?’ असे वाटायचे तर गावावरून परत मुंबईकडे निघताना  ‘इतक्या लवकर का सुट्टी संपली?’ असे वाटायचे. आमच्या गावचे  घर बंद असायचे म्हणून घरात विंचू, इंगळी, साप, मोठे मोठे कोळी  यांसारखे कीटक आणि छोटे प्राणी पण हक्काचं घर म्हणून राहायचे.  आमचे गाव  खूप डोंगराळ भागात होते. तिकडे ना रस्ता, ना  धड लाईट, ना  कसले दुकान... आजूबाजूला फ़क़्त हिरवेगार रान... गर्द झाडी आणि जंगल. असे सर्व असले तरी जितकी भीती वाटायची तितकेच गाव आवडायचे.

माझी दर मे महिन्याची सुट्टी हि गावाकडे हमखास ठरलेलीच असायची. पण मी एकदाही मुंबई वरून खेळणी घेऊन गावी गेली नाही. तशी कधी गरजच पडली नाही.    कारण इथल्या मातीत आणि निसर्गात सर्व खेळणी मिळून जायची.  त्यासोबत खेळायला हक्काची जागा म्हणजे अंगण  हि मिळायचे.  मुंबईला विकत  खेळणी मिळतात पण  खेळायला हक्काची जागा मिळेल हे सांगू शकत नाही.  पण गावी हक्काचं अंगण आणि निसर्गातून मिळालेली खूप सारी खेळणी होती. ज्यासाठी एक पैसा हि खर्च करायची गरज नसायची.  पैशाने सुख विकत घेता येत नाही म्हणतात... तसेच काही मला गावी निसर्गाच्या सानिध्यात  आल्यावर नेहमी वाटायचे.

आता अंगणातील खेळ समजून घेण्यासाठी आधी कोकणातील अंगण समजून घेऊ.

कोकणात  काही ठिकाणी अंगणाला ‘खळ’ असे म्हणतात. कोकणातील प्रत्येक घरासमोरील काही भाग मातीने सपाट (चोप देऊन ) करून त्याला शेणाने सारवून ‘अंगण’ तयार केले जाते. अंगणाच्या तिन्ही कडेला प्याळ किंवा प्यालं म्हणजे  एक छोटा कट्टा सारखा भाग तयार केला जातो. ज्यामुळे अंगणातील माती भक्कम बसते. पावसाळ्यात वाहून जात नाही.      अंगणाच्या एका कोपऱ्यात तुळस लावली जाते. सर्व साधारण याच ढाच्याप्रमाणे सर्व अंगण असतात.  पण प्रत्येक जण आपल्या आवडीनुसार त्याची रचना बदलतात  म्हणून खूप वेगवेगळ्या प्रकारचे  अंगण बघायला मिळतात. जसे कि, आमच्याच गावी आमचे अंगण शेणामातीचे आणि बिना मांडवाचे ( मांडव म्हणजे अंगणालावरून नारळाच्या झावळीच्या साहाय्य्याने  केलेले छप्पर).  काही ठिकाणी अंगणाला जोडून फाटीचे (झाडाच्या बारीक फांद्या / लाकडाचे)  कुंपण केलेले असते त्याला ‘बेड’ असे म्हणतात.   काही अंगणाला  नारळाच्या झावळीचे आणि गवताचे मांडव म्हणजे छप्पर केलेले असतात. काही अंगणाच्या भोवती आबोली, शेवंती, कचकडी, मखमल(झेंडू), अनंत आणि मोगरा या फुलांचे कुंपण असते. काही घरांना पुढे आणि मागे दोन अंगण हि असतात. इथे प्रत्येकाच्या अंगणात कोणत्यातरी फळाचे झाड हमखास दिसणार. सर्वात जास्त अंगणाला लागुनच आंब्याचे झाड असतेच असते. अन्यथा फणस, काजवीन (काजू), पेरविन (पेरूचे झाड), लिंबिन (लिंबाचे झाड),    चीकवीन (चिकूचे झाड), नारळीन (नारळ) तरी असतेच असते. बदलत्या काळानुसार अंगणाचे स्वरूप हि बदलत गेले. नारळाच्या झावळीची जागा पत्र्याने घेतली. शेणामातीऐवजी सिमेंटचा  कोबा किंवा फरशी वाले अंगण हि दिसू लागले. पण अंगणाचे महत्व अजूनहि तितकेच महत्वाचे राहिले.  काळ बदलला तरी काही गोष्टी मात्र तश्याच राहिल्या. जसे कि,  प्रत्येक अंगणात लाकडाचे बाकडे मात्र कायम होते आणि अजूनही आहेत. काही ठिकाणी लाकडाचे झोपळे आज हि दिसतील.

आता परत येऊ आमच्या अंगणात...

आमच्या घराला पुढे आणि मागे दोन अंगण... ते हि शेणामातीचे भले मोठे अंगण. शेणाने सारवताना दोन व्यक्ती तरी लागतातच. माझा तर दिनक्रम या अंगणापासून सुरु व्हायचा. सकाळी उठल्यावर  तांब्यात पाणी घेऊन मागच्या अंगणाच्या प्याळावर बसून दात घासायचे. मग दोन्ही अंगण कचरा काढून स्वच्छ करायचे. (कचरा फ़क़्त झाडांची पाने असायची)त्यानंतर  बाबांसोबत देव पूजा करून तुळशीला पाणी घालायचे. आमच्या अंगणाभोवती खूप साऱ्या तुळशी आहेत. मग पुढच्या अंगणाच्या चहा आणि नाश्ता घ्यायचा.  त्यानंतर काही तरी वाचत, चित्र काढत वैगरे अंगणातच बसायचे.  अंगणाच्या दोन्ही बाजुला मोठे आंब्याचे झाड असल्यामुळे कायम  सावली आणि आल्हाददायक वारा असायचा.  अंगणात बसून मध्येच मधुर असा निरनिराळ्या पक्षांचा आवाज ऐकायचा. मग तो पक्षी कोणत्या झाडावर आणि फांदीवर  बसला असेल हे त्या अंगणातूनच शोधयाचे.     पक्ष्यांचे आवाज, पानांची सळसळ, कोंबडी- गुर (गाय /बैल ) यांचे आवाज आणि  आजूबाजूला असणारे त्यांचे अस्तित्व अनुभवयाला त्यात रमून जायला खूप मज्जा यायची.

Angan-अंगण-apali-writergiri-kokan-diary
PC : Instagram

दुपार होत आली कि, हळूहळू खेळायला मुल-मुली जमायचे.  नेहमी वेगवेगळ्या  घरासमोरील   अंगणात जमायचे त्या ठिकाणी  वेगवेगळे खेळ खेळायचो.  ज्यांच्या अंगणाला मांडव असायचा तर त्यांच्या अंगणात खांब पण असायचे. मग तिकडे आम्ही ‘खांब- खांब’ खेळायचो. ज्या अंगणातील प्याळ मोठे होते तिकडे ‘डोंगर कि दरी’ किंवा ‘तळ्यात कि मळ्यात’ खेळायचो.  जे अंगण मोठे असायचे तिकडे कब्बडी, पकडापकडी, सोनसाखळी, खो-खो, लगोरी सारखे खेळ खेळायचो. लगोरी साठी नारळाच्या करवंटी किंवा बेलटीचा (नारळाचे वरील टणक आवरण) वापर करायचो आणि बॉल म्हणून पिशवी, फाटके चिंधी कपडे यांचा बॉल तयार करायचो. त्यानंतर  लपाछपी / लपवाछपवीला इथे ‘कुकडी कुक’ म्हणायचे. हा खेळ  खेळताना पूर्ण गाव भर कुठे हि लपायचो.  ज्या अंगणाला लागून शेताचे मळे किंवा खळे असतील तिकडे ‘विटीदांडू’ खेळायचो.  

भातुकली खेळायचे म्हटले तरी आम्ही ज्याच्या त्याच्या अंगणातून आमची खेळायचे साहित्य जमा करायचो.

Angan-अंगण-apali-writergiri-kokan-diary
PC : Instagram
 फणसाच्या पानांचे बैल, नांगर, छोट्या दगडांची चूल,  आंबा किंवा चाफ्याच्या पानांची पिशवी किंवा  बॅग बनविणे, पानांपासूनच भातुकलीची जमतील तशी भांडी, बाहुल्या बनविणे.  इटुकल्या चुलीसाठी छोटी छोटी काटकी (बारीक काटे) जमा करणे. माती, पाना – फुलांचे  जेवण बनविणे. पाच दगडांनी सागरगोट्यांचा खेळ खेळणे त्याला गावी  पाचखडे किंवा खड्या पाच म्हणतात. ,  समुद्रातील शंख- शिम्प्ल्यांचे खेळ खेळणे, कवड्यांचे हातचाल्लस खेळणे,  कावळा उड – चिमणी उड खेळणे. चोर पोलीस चा चिठ्ठ्यासोबतचा खेळ,  तर कधी गाणी म्हणत अंगणात खेळायचो...      

डोंगराला आग लागली पळा पळा...

आईचं पत्र हरवलं ते मला सापडलं...

शाळेतल्या मुली आल्या कशाला.... खेळता खेळता खोकला झाला खो खो खो ...

Angan-अंगण-apali-writergiri-kokan-diary
PC :Instagram
जर एखादा पेप्सीवाला किंवा आईसक्रिमवाला आला तर तो हि एखाद्या अंगणातच थांबायचा. मग आम्ही सर्व जन तिकडे येऊन एकत्रपणे पेप्सी विकत घ्यायचो. जेव्हा रानात आंबे, करवंद, जांभूळ, तोरण, पेरू, चिंच, आवळा वैगरे रानमेवा गोळा करून आणला तरी तो अंगणात बसूनच एकत्र खायचो. ते खात असताना देखील  वेगेवगळे खेळ खेळायचो. करवंद खाताना ‘कोंबडा कि कोंबडीचा खेळ’. म्हणजे  हातात उचललेले करवंद आतून कोणत्या रंगाचे असेल  याचा तर्क लावणे. कोंबडा म्हणजे ते करवंद गडद लाल रंग  आणि फिकट लाल किंवा पांढरा असेल तर कोंबडी. जांभूळ खाताना कोणाची जीभ गडद जांभळी होते याची शर्यत लावणे.  उरलेला रानमेवा अंगणात सुकायला ठेवण्यासाठी जमा करायचो.    उन्हाळ्यात काही अंगणे यासाठीच जणू आरक्षित करून ठेवलेली असायची.  सर्व अंगण साखर – मीठ लावलेले करवंद, कोकम,  राताम्ब्याच्या बिया, (कोकम फळाच्या बिया), कोकम, आमसूल, आंबा - फणसाची साठ (पोळी) ,  फणसाचे गरे,  सुकवलेला आवळा, नारळ / खोबर ,  काजू, मासे यांनीच खच्चून भरलेले असायचे.  लहान मुलांना या अंगणात त्या रानमेव्याचे गाय ,बैल आणि पक्षी पासून राखण (रक्षण) करायला बसवले जायचे. त्याचे बक्षीस म्हणून त्यातील रानमेवा खायला मिळायचा. मे महिन्यात प्रत्येक घरात मोठ्या पातेल्यात (भाजी बनवायचे मोठे भांडे)  फणसाची भाजी बनवली जायची आणि अंगणात बसून सर्वजण एकत्रपणे गजाल्या करत खायचे.  कधी कधी कोणाच्या अंगणात लग्न असेल तर दिवसभर त्या रंगबिरंगी पडदे आणि पताके लावलेल्या अंगणातच दिवसभर राहायचो.
Angan-अंगण-apali-writergiri-kokan-diary
PC : Instagram

रात्रीच्या वेळी  अंगणात एक मोठी चटई रोज घालायची.  वरती मस्त चांदण्यांनी भरलेलं आभाळ, थंडगार वारा, काजव्यांची लकलक, बेडकांचे आवाज आणि रातकिड्यांची कीरकीर  हि रात्री अंगणातून अनुभवायला मिळायची.  त्यानंतर हळूहळू मोठी माणस हि अंगणात जमायला सुरु व्हायचे. दिवसभर शेतातील कामे करून अंगणातच थोड्या गजल्या (गप्पा-गोष्टी) करून करमणूक व्हायची. रात्रीचे पत्त्यांचे खेळ जागरणासारखी उशिरा पर्यंत अंगणात रंगायचे.  लहान मुलांसोबत मोठेदेखील हौशीने सामील व्हायचे. तेवढाच दिवस भराच्या शेतातील कामातून थोडा विरंगुळा आणि आराम हा रात्रीच्या वेळी अंगणातूनच मिळायचा. 

कोकणात अंगणातील हि मज्जा अनुभवायची असेल तर  हिवाळा आणि उन्हाळ्यात अनुभवता येईल. पावसाळ्यात हेच अंगण  लाल मातीने रंगून जाते. सुरवातीच्या पावसात अंगणात मस्त भिजायला आणि नाचायला हि मिळते.  चिखलात हवे तसे खेळायला हि मिळते. असे हे अंगणातील ऋतू नुसार खेळ मी लहानपणी खूप अनुभवले.  

Angan-अंगण-apali-writergiri-kokan-diary
माझे कोकणातील जुने घर आणि पावसाळ्यातील अंगण 

अगदी भरभरून आनंद मला फ़क़्त अंगणामुळे अनुभवायला मिळायचा. म्हणूनच पुन्हा मुंबईला निघायला पाय जड होऊ लागायचे. आणि व पू काळेच्या कवितेतील  ओळी कानावर पडू लागायच्या.

मला गाव जेव्हा दिसू लागले..... लुळे पाय माझे रुसू लागले......


लेखकाची ओळख : अंजली प्रवीण, या कोकणात वास्तव्य करणारी आहे.  तसेच त्या महिला, बाल, कुटुंब , क्रिमिनल जस्टीस सिस्टीम सारख्या सामाजिक क्षेत्रात समुपदेशन आणि डेटा विश्लेषक म्हणून कार्यरत आहेत. 

amkar.anju@gmail.com



कांदे पोहे कि सौदेबाजी....की विवाह संस्थेच फाऊंडेशन

 कांदे पोहे कि सौदेबाजी....की विवाह संस्थेच फाऊंडेशन   काही चांगल्या / कमावत्या मुलांची लग्न ठरत नाही मग ती मुलं किंवा त्याच्या घरचे मुलींना...