रविवार, ३ जानेवारी, २०२१

महिला शिक्षण दिन आणि स्त्री शिक्षण – (2 min read)

 महिला शिक्षण दिन आणि स्त्री शिक्षण

भारतीय स्त्रीवादाचा चेहरा आणि महिला शिक्षणाची मेढ ज्यांनी रचली त्या सावित्रीबाई फुलेंचा आज जन्मदिन (3 जाने 1848). शिक्षणासाठी त्यांनी तत्कालीन सनातनी आणि पुरुषसत्ताक व्यवस्थेविरुद्ध पुकारलेले बंड हे सर्वश्रुत आहेच. महाराष्ट्र सरकारने त्यांचा जन्मदिन महिला शिक्षण दिन म्हणून जाहीर केला हा सावित्रीबाईंना दिलेला सन्मानच आहे. पण या निमित्ताने स्त्रीशिक्षणची देशातील स्थिति (अवस्था) नेमकी काय आहे हे जाणून घेण खरंच गरजेचे वाटले. खाली दिलेल्या काही आकडेवारी वरून स्त्रीशिक्षण आणि एकंदर शिक्षणाच्या अवस्थेचा अंदाज येतो.

Source : India Post: सावित्रीबाई फुलें



1.   समाजातील कोणतीही विकृती किंवा अनिष्ट प्रथेचा सर्वात जास्त परिणाम हा स्त्री वर्ग आणि लहान मुलांवर होत असतो. समाजातील शतकानुशतके चालत आलेल्या जाती व्यवस्थेने समाज पोखरला गेला आहे. देशात 51 % दलित मुलांना प्राथमिक शिक्षणानंतर शाळा सोडावी लागली आहे. (UNICEF). याच प्रमाण ही आदिवासी आणि भटक्या विमुक्त जातींमध्ये खूपच जास्त आहे. (Video link https://www.youtube.com/watch?v=kZcwyGTIluI&feature=youtu.be)

2.   शिक्षणात नुसता जातीभेद नाही तर लिंगभेद ही आहे. 2017 मध्ये 32% मुली शाळेत प्रवेश नाही घेऊ शकल्या. हाच आकडा मुलांसाठी 28% आहे.

3.   बालविवाह चे प्रमाण चिंताजनक आहे. 40% पेक्षा जास्त मुलींचे विवाह हे बालविवाह आहेत. याचे प्रमाण बिहार (43%) आणि प. बंगाल (42%) मध्ये सर्वाधिक आहे. ज्या 70 जिल्ह्यात बालविवाहाचे प्रमाण सर्वाधिक आहे त्यात 17 जिल्हे हे महाराष्ट्रातील आहेत.

Source : UNISEF

4.   प्राथमिक शाळेतून गळतीचे प्रमाण हे स्थलांतरित मंजूरी करणाऱ्या समाजात खूप आहे. मध्यप्रदेश तसेच राजस्थान भागातील अनेक आदिवासी कुटुंबे हे इंदौर, अहमदाबाद, कोटा, मुंबई , नागपूर आदि शहरांमध्ये स्थलांतर करत असतात.  त्यावेळी या लोकांसाठी शाळेपेक्षा भुकेला महत्व असते. तसेच महाराष्ट्रात बीड मध्ये उसतोड कामगारांच्या ही याच समस्या आहेत. बीड मध्ये जवळजवळ 45%  बालविवाह आहेत त्यात स्थलांतरित उसंतोड कामगारांचे प्रमाण जास्त आहे.

5.   दरवर्षी 23 दशलक्ष मुली या मुली मासिक पाळी चालू झाल्या नंतर शिक्षण सोडून देतात. याच मुख्य कारण म्हणजे सॅनिटरी नॅप्किन तसेच शाळांमध्ये इतर संबंधित सुविधांची कमतरता.

(https://swachhindia.ndtv.com/23-million-women-drop-out-of-school-every-year-when-they-start-menstruating-in-india-17838/)

6.   समाजातील लैगिक विकृती हा स्त्रीशिक्षणामधील अजून एक अडथळा. देशातील वेश्याव्यवसायात 40% या 18 पेक्षा  कमी वयाच्या मुली आहेत. त्यांच्या शिक्षणाची अवस्था काय असू शकते याची कल्पनाच न केलेली बरी.

7.   एका अभ्यासात असा दावा केला आहे की 20 % मुली या कोरोना महामारी मुळे शिक्षणाबाहेर फेकले जाऊ शकतात. याच मुख्य कारण हे अचानक बंद झालेली उत्पन्नाची साधने.

8.   वर्ल्ड बँकच्या एका अवहालात नमूद केल्याप्रमाणे मुलींसाठी असलेल्या मर्यादित शिक्षण संधी तसेच मुलेंच्या शिक्षणात असलेल्या अडथळ्यांमुळे 15 ट्रिल्यन ते 30 ट्रिल्यन अमेरिकन डॉलर इतके नुकसान होत आहे.  (http://sdg.iisd.org/news/world-bank-report-not-educating-girls-costs-countries-trillions/#:~:text=11%20July%202018%3A%20A%20World,lost%20lifetime%20productivity%20and%20earnings.)

हे नुसते आकडे नाहीत तर समाजातील शैक्षणिक दरीचा लेखाजोखा आहे. राज्यसरकारने महिला शिक्षण दिन घोषित करून सावित्रीबाईंचा सन्मान केला पण महिला शिक्षणात आजही राज्य संकुचित आहे. भिडेवाड्यातील शाळेचा मुद्दा अजूनही कोर्टाच्या लालफिती अडकून पडला आहे यातून सरकारची उदासीनताच दिसून येते. त्यामुळे स्त्रीशिक्षणात ठोस पाऊले उंचलूनच महिला शिक्षण दिन साजरा केला जाऊ शकतो आणि तोच सावित्रीमाईसाठी खरा सन्मान असेल.


लेखक : प्रवीण, यांची शिक्षण क्षेत्रात फेलोशिप झालेल्या आहेत.  मागील १०+ वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात गावपातळी ते राज्यपातळीवर शिक्षण आणि सामाजिक विकासाच्या अनेक प्रकल्पावर कार्य करीत आहेत. 

संपर्क : ७७३८८८२६९२


५ टिप्पण्या:

कांदे पोहे कि सौदेबाजी....की विवाह संस्थेच फाऊंडेशन

 कांदे पोहे कि सौदेबाजी....की विवाह संस्थेच फाऊंडेशन   काही चांगल्या / कमावत्या मुलांची लग्न ठरत नाही मग ती मुलं किंवा त्याच्या घरचे मुलींना...