child लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
child लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, ३ जानेवारी, २०२१

महिला शिक्षण दिन आणि स्त्री शिक्षण – (2 min read)

 महिला शिक्षण दिन आणि स्त्री शिक्षण

भारतीय स्त्रीवादाचा चेहरा आणि महिला शिक्षणाची मेढ ज्यांनी रचली त्या सावित्रीबाई फुलेंचा आज जन्मदिन (3 जाने 1848). शिक्षणासाठी त्यांनी तत्कालीन सनातनी आणि पुरुषसत्ताक व्यवस्थेविरुद्ध पुकारलेले बंड हे सर्वश्रुत आहेच. महाराष्ट्र सरकारने त्यांचा जन्मदिन महिला शिक्षण दिन म्हणून जाहीर केला हा सावित्रीबाईंना दिलेला सन्मानच आहे. पण या निमित्ताने स्त्रीशिक्षणची देशातील स्थिति (अवस्था) नेमकी काय आहे हे जाणून घेण खरंच गरजेचे वाटले. खाली दिलेल्या काही आकडेवारी वरून स्त्रीशिक्षण आणि एकंदर शिक्षणाच्या अवस्थेचा अंदाज येतो.

Source : India Post: सावित्रीबाई फुलें



1.   समाजातील कोणतीही विकृती किंवा अनिष्ट प्रथेचा सर्वात जास्त परिणाम हा स्त्री वर्ग आणि लहान मुलांवर होत असतो. समाजातील शतकानुशतके चालत आलेल्या जाती व्यवस्थेने समाज पोखरला गेला आहे. देशात 51 % दलित मुलांना प्राथमिक शिक्षणानंतर शाळा सोडावी लागली आहे. (UNICEF). याच प्रमाण ही आदिवासी आणि भटक्या विमुक्त जातींमध्ये खूपच जास्त आहे. (Video link https://www.youtube.com/watch?v=kZcwyGTIluI&feature=youtu.be)

2.   शिक्षणात नुसता जातीभेद नाही तर लिंगभेद ही आहे. 2017 मध्ये 32% मुली शाळेत प्रवेश नाही घेऊ शकल्या. हाच आकडा मुलांसाठी 28% आहे.

3.   बालविवाह चे प्रमाण चिंताजनक आहे. 40% पेक्षा जास्त मुलींचे विवाह हे बालविवाह आहेत. याचे प्रमाण बिहार (43%) आणि प. बंगाल (42%) मध्ये सर्वाधिक आहे. ज्या 70 जिल्ह्यात बालविवाहाचे प्रमाण सर्वाधिक आहे त्यात 17 जिल्हे हे महाराष्ट्रातील आहेत.

Source : UNISEF

4.   प्राथमिक शाळेतून गळतीचे प्रमाण हे स्थलांतरित मंजूरी करणाऱ्या समाजात खूप आहे. मध्यप्रदेश तसेच राजस्थान भागातील अनेक आदिवासी कुटुंबे हे इंदौर, अहमदाबाद, कोटा, मुंबई , नागपूर आदि शहरांमध्ये स्थलांतर करत असतात.  त्यावेळी या लोकांसाठी शाळेपेक्षा भुकेला महत्व असते. तसेच महाराष्ट्रात बीड मध्ये उसतोड कामगारांच्या ही याच समस्या आहेत. बीड मध्ये जवळजवळ 45%  बालविवाह आहेत त्यात स्थलांतरित उसंतोड कामगारांचे प्रमाण जास्त आहे.

5.   दरवर्षी 23 दशलक्ष मुली या मुली मासिक पाळी चालू झाल्या नंतर शिक्षण सोडून देतात. याच मुख्य कारण म्हणजे सॅनिटरी नॅप्किन तसेच शाळांमध्ये इतर संबंधित सुविधांची कमतरता.

(https://swachhindia.ndtv.com/23-million-women-drop-out-of-school-every-year-when-they-start-menstruating-in-india-17838/)

6.   समाजातील लैगिक विकृती हा स्त्रीशिक्षणामधील अजून एक अडथळा. देशातील वेश्याव्यवसायात 40% या 18 पेक्षा  कमी वयाच्या मुली आहेत. त्यांच्या शिक्षणाची अवस्था काय असू शकते याची कल्पनाच न केलेली बरी.

7.   एका अभ्यासात असा दावा केला आहे की 20 % मुली या कोरोना महामारी मुळे शिक्षणाबाहेर फेकले जाऊ शकतात. याच मुख्य कारण हे अचानक बंद झालेली उत्पन्नाची साधने.

8.   वर्ल्ड बँकच्या एका अवहालात नमूद केल्याप्रमाणे मुलींसाठी असलेल्या मर्यादित शिक्षण संधी तसेच मुलेंच्या शिक्षणात असलेल्या अडथळ्यांमुळे 15 ट्रिल्यन ते 30 ट्रिल्यन अमेरिकन डॉलर इतके नुकसान होत आहे.  (http://sdg.iisd.org/news/world-bank-report-not-educating-girls-costs-countries-trillions/#:~:text=11%20July%202018%3A%20A%20World,lost%20lifetime%20productivity%20and%20earnings.)

हे नुसते आकडे नाहीत तर समाजातील शैक्षणिक दरीचा लेखाजोखा आहे. राज्यसरकारने महिला शिक्षण दिन घोषित करून सावित्रीबाईंचा सन्मान केला पण महिला शिक्षणात आजही राज्य संकुचित आहे. भिडेवाड्यातील शाळेचा मुद्दा अजूनही कोर्टाच्या लालफिती अडकून पडला आहे यातून सरकारची उदासीनताच दिसून येते. त्यामुळे स्त्रीशिक्षणात ठोस पाऊले उंचलूनच महिला शिक्षण दिन साजरा केला जाऊ शकतो आणि तोच सावित्रीमाईसाठी खरा सन्मान असेल.


लेखक : प्रवीण, यांची शिक्षण क्षेत्रात फेलोशिप झालेल्या आहेत.  मागील १०+ वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात गावपातळी ते राज्यपातळीवर शिक्षण आणि सामाजिक विकासाच्या अनेक प्रकल्पावर कार्य करीत आहेत. 

संपर्क : ७७३८८८२६९२


शनिवार, १५ ऑगस्ट, २०२०

"CAPERNAUM"

"CAPERNAUM"


एक बारा वर्षाचा मुलगा रिमांड होममधून लाइव्ह  टीव्हीवर येऊन.... आपल्या आई वडिलांवर केस दाखल करायची मागणी करतो आणि ती मागणी मान्य हि होते आणि ...... सुरु होतो त्याचा खटला.....

न्यायाधीश पहिलाच प्रश्न करतात कि....

Judge asked him, “Why do you want to sue your parents?”

Zain : Because I was born.   

एका १२ वर्षीय मुलाला आपल्याला जन्म देणेच का गुन्हा वाटू शकतो..... यावर अतिशय बारकाईने भाष्य करणारा हा “Capernaum” चित्रपट आहे.  हा चित्रपट नदीने लाबाकीने (Directed by Nadine Labaki) दिग्दर्शित आणि  खालेद मौझुनार  निर्मित (Produced by Khaled Mouzanar) केला आहे. मूळ चित्रपट अरेबिक भाषेतील आहे. या चित्रपटाने Cannes Film Festival-2018 मध्ये Jury Prize जिंकले आहे.  या चित्रपटातील मुख्य पात्र ‘झैन’(Zain) हा १२ वर्षाचा मुलगा आहे त्याच्या बालपणातील गुन्हेगारीकडे जाण्याचा प्रवास या चित्रपटात मांडला आहे. बैरुट या ठिकाणी झोपडपट्टीत राहणाऱ्या १२ वर्षीय  मुलावर एका माणसाला चाकूने प्राणघातक हल्ला (चाकूने भोकसणे )या गुन्ह्यासाठी अटक होते. या पासून चित्रपटाची सुरवात दाखवली आहे.  झैनला जेव्हा विचारतात कि, तुला का अटक केली तेव्हा “son of bitch” म्हणत त्या इसमाला मारले हे कोणतेही संकोच न आणता सांगतो.  आणि येथूनच फ्लॅश बॅक मधून झैनच्या गुन्हेगारी  पर्यंतचा प्रवास सुरु होतो.

या चित्रपटात झैनच्या घराची आर्थिक परिस्थिती गरीब दाखवली आहे. सोबत चार  लहान भावंडे हि असतात. झैन शाळेत न जाता जे जमेल ते मजुरी काम करत असतो. त्यासोबतच खोटे  बोलून आणि डॉक्टरचे प्रिस्क्रिप्शन दाखवून गोळ्या आणून त्याचा गैरवापर करत होते.  या चित्रपटात एक दृश्य वारंवार दाखवले आहे कि, जेव्हा त्याच्या वयाची मुले शाळेच्या गाडीतून यायचे त्या वेळेला तो मजुरी काम करत असायचा.  एके दिवशी अचानक कळते कि, ‘सेहेर’ त्याच्या बहिणीला मासिक पाळी आली आहे.  तिचे रक्ताचे कपडे तो धुतो तसेच स्वतःचे टी-शर्टची घडी घेऊन तिला कसे वापरायचे ते शिकवतो. दुकानातून सॅनेटरी नेपकीन चोरून आणून देतो. तसेच सेहेरला याबाबत आई-वडिलांना न सांगण्याची ताकीद देऊन ठेवतो. कारण कदाचित त्याला माहिती होते कि, जर सेहेरला  मासिक पाळी आल्याचे कळले तर तिचे लग्न लावून देतील.  तो ज्या दुकानात काम करायचा तेथील दुकानदार त्याच्या बहिणीवर कायम नजर ठेवून असायचा आणि हे झैनला कधीच आवडत नव्हते. अचानक एके दिवशी त्याला कळते कि, त्याच्या बहिणीचे त्या दुकानदारासोबत लग्न होत आहे. तेव्हा तो तिला पळवून नेण्याचे ठरवतो पण या आधीच तिला त्याच्या कडे दिले जाते. यात बालविवाह आणि त्या मुलीला विकलेले दाखवले आहे. हे सर्व पाहून झैन घर सोडून पळून जातो. त्याच बसमध्ये एक स्पायडर मॅनच्या वेशातील एक कोकऱोज मॅन त्याला भेटतो जो एका जत्रेच्या गेटवर उभा राहणारा वृद्ध इसम असतो.  तिथले मोठे खेळणी – आकाश पाळणे बघून तो हि त्या ठिकाणी उतरतो.  तो तिकडेच रस्त्यावर राहतो – खातो – झोपतो- काम शोधत असतो पण कोणी काम देत नाही. तिकडेच त्याला ‘राहील’ हि इथोपिअन स्थलांतरीत महिला भेटते. जी त्याला खायला देते म्हणून तिच्या मागे मागे तो तिच्या झोपडीत राहायला हि येतो.  ‘राहिल’ एक रेस्टोरंटमध्ये सफाई कामगार दाखवली आहे. ती कामच्या ठिकाणीच एका बाथरूममध्ये आपल्या तान्ह्या मुलाला लपवून ठेवत असते असे दाखविले.   झैन राहीलच्या झोपडीत राहू लागला आणि सोबत तिच्या लहान मुलाला ‘योनस’चा पण सांभाळ करू लागला.  राहील हि  स्थलांतरीत आणि नाव बदलून नोकरी करत असते.  तिचे ते काम हि जाते. तिला अटक होते. तर दुसऱ्याबाजूला झैन आणि योनस तिची वाट पाहत असतात. दुसऱ्या दिवशी तो कामाच्या ठिकाणी जाऊन तिचा शोध सुरु करतो. राहील सापडत नाही तर योनस चा सांभाळ आपल्यालाच करावे लागेल म्हणून पुन्हा काम शोधायला सुरवात करतो. हा सर्व प्रवास इतका वेदनादायक आणि भावनात्मक दाखवला आहे कि अनेक गोष्टी शब्दांत मांडणे हि अवघड होऊन जाते. त्याला नवीन काम मिळते पण त्यासाठी योनसला सोडावे लागणार होते आणि त्याचे ओळखपत्र किंवा जन्मदाखला हि कागदपत्रे लागणार होती. योनसच्या सोबतचे  काम करताना – खेळताना – त्याला जेवण भरवताना – त्याच्या सोबत झोपताना आणि अखेरीस त्याला परिस्थितीमुळे सोडून जातानाचा  क्षण हा पटकन डोळ्यात पाणी आणणारा अतिशय भावनात्मक क्षण दाखविला आहे. जेव्हा कागदपत्रे शोधायला घरी येतो तेव्हा त्याला त्याचे कागदपत्र तर सापडत नाही तसेच त्याला सेहेरचा मृत्यू झाल्याचे कळते. हे कळल्यावर तो खूप आकांडतांडव चिडचिड व्यक्त करतो आणि घरातील चाकू घेऊन पळत आसादला म्हणजेच सेहेरच्या नवऱ्याला मारायला जातो.  तेव्हा त्याला पोलीस अटक करतात.

चित्रपटाच्या अखेरीस कोर्ट रूम मध्ये तो आपल्याला , सेहर ला इतर भावंडाना आणि त्याची आई तेव्हा प्रेग्नंट असते त्याबद्दल खंत व्यक्त करत म्हणतो कि, जर आम्हाला सांभाळायला जमत नसेल किंवा चांगले पालनपोषण करता येत नसेल तर आम्हाला जन्म का दिला? आम्हाला जन्म देण्याचा अधिकार नाही. सेहेरचा बालविवाह ते हि एका प्रौढ इसमासोबत होतो. तसेच तिला त्या बालवयातच प्रेग्नसीमुळे मृत्यूला सामोरे जावे लागते.  झैनचा लहानापासूनचा प्रवास आज त्याला गुन्हेगारीकडे न्यायला प्रवृत्त केला. या सर्व परिस्थितीत  आई-वडील हि तितकेच दोषी होते.  हे अतिशय वास्तवादी चित्रण या चित्रपटात केले आहे.

या चित्रपटाचा शेवट झैनचा आयडी कार्ड साठी फोटो काढताना केला आहे...

ज्यात तो आधी नाराज उभा असतो पण फोटोग्राफरच्या एका वाक्याने "It's your ID card, not your death certificate" तो स्मित हास्य देतो.    कदाचित इथूनच त्याचे पुढील भविष्य चांगले होईल असे गृहीत केले असावे.

 

कोणीही जन्मतः गुन्हेगार नसतो हे वारंवार ऐकत आलो आहोत पण परिस्थिती कशी गुन्हेगार बनवते याचे उत्तम उदाहरण देणारा हा चित्रपट आहे. अनेक छोट्या छोट्या गोष्टी अतिशय उत्तम रीतीने या चित्रपटात मांडल्या आहेत जसे कि, राहील - योनस - सेहर या प्रत्येक पात्राचा हि वेदनादायक प्रवास या चित्रपटातून दिसून येतो.  बालगुन्हेगारीवर भाष्य करणारा हा एक उत्तम चित्रपट म्हणता येईल. तर नक्की बघा आणि या बाबत तुमची प्रतिक्रिया कळवा. 



  


कांदे पोहे कि सौदेबाजी....की विवाह संस्थेच फाऊंडेशन

 कांदे पोहे कि सौदेबाजी....की विवाह संस्थेच फाऊंडेशन   काही चांगल्या / कमावत्या मुलांची लग्न ठरत नाही मग ती मुलं किंवा त्याच्या घरचे मुलींना...