बुधवार, ९ डिसेंबर, २०२०

इंग्लिश गप्पा - मराठी माध्यमातून शिकून इंग्रजीवर प्रभुत्व मिळवलेल्यांची यशोगाथा

 

मराठी मध्यमातून शालेय शिक्षणपूर्ण करून कॉलेज मध्ये प्रवेश घेतल्यावर इंग्रजी माध्यमातून शिकतान नेमक्या काय भावना असतात? शाळेच्या  मराठमोळ्या वातावरणाची सवय जडलेली असताना इंग्रजाळलेल्या क्लायमेट मध्ये अॅडजस्ट होताना कस वाटत?

इंग्रजीची भीती वाटत असते का? इंग्रजी सफाईदार येत नाही यांची लाज वाटते का? इतरांच फाडफाड आणि स्टाईलीश इंग्रजी ऐकून न्यूनगंड वाटतो का? किंवा आई-वडिलांनी मराठी माध्यमातून का शिकवल यांची खंत वाटते का? मराठी माध्यमातून शालेय शिक्षण झालेल्या प्रत्येकाला  या प्रश्नाच उत्तर हो असेल. त्यात नवीन अस काही नाहीच. आपल्या समाजात इंग्रजी कडे भाषा म्हणून न बघता प्रतिष्ठेचे आणि प्रगतीचे कथित मापदंड म्हणून पहिल जात. पण तुम्हाला माहीत आहे का २३ वर्ष ज्यांनी Multinational कंपन्यांचे सीईओ पद म्हणून काम केलेले डॉ अच्युत गोडबोले यांचे शालेय शिक्षण हे सोलापूर मधील मराठी शाळेत झाले होते. मंदार फणसे हे इंग्रजी वृत्तवाहिन्यासाठी पत्रकार म्हणून काम करत आहेत. त्यांचही शालेय शिक्षण हे पालघर मधील एका मराठी शाळेतून झाले आहे. धानय्या कौटगी हे अक्कलकोट जवळील एका निरक्षर शेतमजूर कुटुंबातील व्यक्ती. दहावी व बारावी ला इंग्रजीत अवघे 36 मार्क आणि आज इंग्रजीत 24 सेट परीक्षा तीन नेट परीक्षा चार वेळा टीईटी परीक्षा पास झाले आहेत. सोलापूरच्या बार्शी मधील एका खेड्यात शालेय शिक्षण घेतलेले पांडुरंग मोरे यांनी इंग्रजी विषयात MA केले. इंग्रजी वर प्रभुत्व मिळवणारा हा शेतकरी ४०० पानांची इंग्रजी कादंबरी लिहितो.

असे अनेक  लोक आहेत ज्यांच शालेय शिक्षण मराठीतून झाले आहे पण शुद्ध इंग्रजी बोलतात. या सर्वांना इंग्रजीची  भीती होती, न्यूनगंड होता पण या सर्वांनी त्यावर मात केली. या सर्व मंडळींनी नेमक काय केल हे जाणून घेणे महत्वाचे आहे. 



हेरंब कुलकर्णी यांनी इंग्लिश गप्पा या यू ट्यूबे चॅनेल च्या मध्यमातून अशाच व्यक्तीची यशोगाथा मांडली आहे. या मध्ये यशस्वी व्यक्तींच्या मुलाखती आहेत ज्यातून इंग्रजीवर प्रभुत्व मिळविण्यासाठी वेगवेगळ्या कल्पना चर्चिल्या आहेत.  हेरंब कुलकर्णी यांचे शिक्षणक्षेत्रात खूप कार्य केले आहे. त्यांचा इंग्लिश गप्पा हा उपक्रम त्यांच्याच कार्याचा भाग आहे. महत्वाचे म्हणजे निव्वळ इंग्रजी येत नाही म्हणून मागे पडत असलेल्या ग्रामीण युवकांसाठी हा उपक्रम प्रेरणा देणार ठरेल असा मला विश्वास आहे.

इंग्लिश गप्पा : https://www.youtube.com/playlist?list=PLejjWHd3sq0HzMpmrWzhk0a-SmLRo8epr



लेखक : प्रवीण, यांची शिक्षण क्षेत्रात फेलोशिप झालेल्या आहेत.  मागील १०+ वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात गावपातळी ते राज्यपातळीवर शिक्षण आणि सामाजिक विकासाच्या अनेक प्रकल्पावर कार्य करीत आहेत. 

संपर्क : ७७३८८८२६९२

  

1 टिप्पणी:

कांदे पोहे कि सौदेबाजी....की विवाह संस्थेच फाऊंडेशन

 कांदे पोहे कि सौदेबाजी....की विवाह संस्थेच फाऊंडेशन   काही चांगल्या / कमावत्या मुलांची लग्न ठरत नाही मग ती मुलं किंवा त्याच्या घरचे मुलींना...