एनिमल फार्म || Animal Farm by George Orwell
सारांश : "एनिमल फार्म" हे पुस्तक जॉर्ज ऑरवेल लिखित असून त्यांनी राजकीय व्यवस्थेवर उपहासात्मक लेखन केले आहे. या लेखकाच्या लेखनाला अनेकदा विरोध झाले कारण यांच्या लेखणीतून, "लोकशाही आणि हुकूमशाही यातील अंतर हे खूप कमी आहे. लोकशाही केव्हा हुकूमशाहीत बदलते आणि लोकप्रतिनिधित्व करणारा नेता कसा हुकूमशहा बनू लागतो." या कांदंबरीच्या माध्यमातून या कडवट राजकारणावर एक प्रकाश टाकला आहे.
जॉर्ज ऑरवेल लिखित ऍनिमल फार्म या पुस्तकाचे १७ ऑगस्ट १९४५ प्रथम इंग्लंडमध्ये या पुस्तकाचे प्रकाशन झाले. या पुस्तकाचे प्रकाशन होण्याआधीपासून दुसरे महायुद्ध सुरु झाले होते. या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी देखील अनेक संघर्ष त्यांना करावा लागला होता. कारण त्याच दरम्यान जर्मनीने इंग्लंडवर हल्ला केला होता. या पुस्तकाच्या माध्यमातून राजकारणातले व्यंगचित्र शब्दांमध्ये मांडण्याचा एक यशस्वी प्रयत्न केलेला दिसेल. या पुस्तकाच्या माध्यमातून 'सोविएत मिथ' सोविएत रशियातील वरकरणी साम्यवादी वाटणाऱ्या व्यवस्थेवर उपहासात्मक लेखन केले होते. या पुस्तकाच्या प्रकाशनाला विरोध होण्याचे मुख्य कारण म्हणजे याच दरम्यान सोविएत युनियनच्या गुप्तचर विभागाने या लेखकाच्या लेखनावर बंदी घातली होती.
खरंतर, हे पुस्तक त्यावेळी होणाऱ्या राजकीय घडामोडीवर प्रकाश टाकणारे होते पण जर याची तुलना आताच्या राजकारणासोबत केली तरीही फारसा काहीच बदल न झालेला आपल्याला लक्षात येईल.
"नेता" हा कायम लोकांनी लोक कल्याणासाठी निवडून दिलेला असतो. जो त्या लोकांचे प्रश्न मांडतो. लोकांना एकत्र करतो. लोकांना योग्य ते मार्गदर्शन करतो. लोकांच्या समस्यांचे निवारण करण्याचा तोडगा शोधतो. पण हा नेता लोकांचे प्रतिनिधित्व करत नसेल तर किंवा लोकांच्या समस्यांचे निवारण न करता चुकीच्या गोष्टींचे नेतृत्व करायला लागला तर.... "एनिमल फार्म" या कादंबरीत अश्याच लोकशाहीचे नेतृत्व करणाऱ्या सत्ताधारी राजकारणाची वास्तविकता मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
"एनिमल फार्म" या कादंबरीतील कथा हि एका फार्म हाऊसची आहे. जिथे मालक, कामगार आणि सगळे प्राणी एकत्र राहतात. कुत्रा, मांजर, डुक्कर, घोडे वैगरे प्राणी एकत्र राहत होते. एकदा या सर्व प्राण्याची एकत्र मिटिंग होते. यात अशी चर्चा होते कि, हे सर्व प्राणी दिवस- रात्र खूप मेहनत करतात. मात्र या मेहनतीचा सर्व फायदा मात्र मनुष्याला होतो. आपल्याला पुरेसे अन्नदेखील मिळत नाही. आपल्याला योग्य न्याय व हक्क मिळत नाही. तेव्हा येथील एक म्हातारा डुक्कर सर्व प्राण्यांना एकत्र करून मालकाविरुद्ध बंड पुकारायला एकत्र येण्याचे ठरवितात. त्याच दरम्यान म्हातारा डुक्कर मरण पावतो तेव्हा येथील दुसरे दोन डुक्कर नेपोलियन आणि स्नोबॉल नावाचे या गटाचे नेतृत्व करत असतात. सर्व मिटिंगमध्ये चर्चेनंतर असे ठरविले जाते कि, आपण क्रांती करायची. आपण फार्म हाऊस आपल्या ताब्यात ठेवायचे. या मीटिंगप्रमाणे सर्व प्राणी एकत्र येतात. त्या "मॅनॉर फार्म" च्या मालकाला फार्म बाहेर काढण्यात यशस्वी होतात. त्याचवेळी "मॅनॉर फार्म" चे नाव "ऍनिमल फार्म" असे ठेवण्यात येते त्यासोबत या फार्म मध्ये प्राणिवादाचे काही नियम ठरविण्यात येतात. जसे सर्व प्राणी समान आहेत, मित्रत्व ठेवणार, कोणताही प्राणी कपडे घालणार नाही, दारू पिणार नाही, दुसऱ्या प्राण्याला मारणार नाही, बिछान्यात झोपणार नाही आणि मनुष्य त्यांचा शत्रू असणार. सर्व प्राणी एकत्र आनंदी राहत असतात. मुबलक अन्न आणि शेती सुरळीत सुरु असते.
त्याच दरम्यान इथले दोन नेतृत्व करणारे लीडर 'नेपोलियन' तत्वांचे महत्व प्राण्यांना शिकवत असतो तर 'स्नोबॉल' शिक्षण आणि आधुनिक शेती शिक्षण यांचे काळानुसार बदल किती महत्वाचे आहे हे प्राण्यांना शिकवत असतो. नेपोलियन मात्र या आधुनिकीकरणाच्या विरोधात असतो. यावेळी नेपोलियन इतर प्राण्यांच्या मदतीने स्नोबॉलला फार्म बाहेर हाकलून लावतो. अखेरीस तो स्वतःला "सर्वोच सेनापती" घोषित करतो. त्यानंतर हळूहळू त्या फार्म च्या नियमात बदल होऊ लागतात. ज्या समस्यांमुळे प्राणी एकत्र आलेले असतात. पुन्हा त्याच समस्यांमध्ये ते प्राणी अडकलेले दिसतात.
एकूणच, लोकशाहीचे रूपांतर हुकूमशाहीत कसे बदलते. हा प्रवास लोकांच्या डोळ्यात अंजन घालणारा आहे . "राज्यव्यवस्था जरी बदलली, तरीही सर्व सामान्य जनतेचे प्रश्न आणि समस्या मात्र बदलत नाही." या पुस्तकात लोकांचा निरपेक्ष नेता सत्ता मिळाल्यावर मात्र आपल्याच लोकांमध्ये मतभेद करू लागतो. हे वर्णन करणारे सुंदर वाक्य यात लिहिले आहे. "All animals are equal, but some animals are more equal than others." " सर्व प्राणी समान आहेत पण काही प्राणी इतरांपेक्षा अधिक समान आहेत."
काळ दशकांत बदलतोय पण राजकारणाचा पॅटर्न मात्र सेम... या पुस्तकाच्या शेवटी अजून एक सुंदर वाक्य आहे.
"The creatures outside looked from pig to man, and from man to pig, and from pig to man again; but already it was impossible to say which was which." " बाहेरून पाहणाऱ्याला कायम भ्रम होत राहतो कि, समोर नेमका डुक्कर आहे कि माणूस, माणूस आहे कि डुक्कर, आणि डुकराकडून पुन्हा माणूस ; पण कोण माणूस आणि कोण डुक्कर, हे सांगणे अशक्य होते.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
amkar.anju@gmail.com
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा