आजकाल कुठेही थोडासा निवांत क्षण मिळाला तर त्यावेळी लगेच हात आपल्या मोबाईलकडे जातो. त्यातही साहजिकच कोणते ना कोणत्या सोशल मीडिया अप्लिकेशन आपल्याकडून कळत नकळत ओपन होते. एक एक पोस्ट स्क्रोल करू लागतो. आपल्या इंटरेस्टनुसार आपल्याला त्याच आवडीच्या प्रकारातील वेगवेगळ्या व्हिडीओ पोस्टचे अनेक ऑप्टशन्स प्रत्येकवेळी मोबाईलला पॉअप होऊ लागतात. ऑफिस, घर, शाळा किंवा कॉलेज कोणत्याही वयाचा कोणत्याही गाव किंवा शहरातील करोडोने व्यक्ती आज व्हिडीओ रिल्स बघणे किंवा बनवणे हे एक करमणुकीचे साधन म्हणून स्वीकारले आहे.
"एस्केप लाइव" या सिरीज मधून आपल्या आजूबाजूला अनेक घटनांचा संबंध घेऊन एक थ्रिलर सिरीज तयार केली आहे. ज्यात एस्केप लाइव नामक एक अप्लिकेशन लोकप्रिय होऊ लागते ज्यात पूर्ण भारतभरातून वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातून वेगवेगळ्या वयाचे लोक आपले टेलेन्टचे किंवा करमणुकीचे व्हिडीओ बनवून टाकतात तर लाखो करोडो लोक ते बघतात. या कंपनीचे मूळ उद्देश हा कि, " एस्केप लाइव या नावाप्रमाणे हि कंपनी खऱ्या आयुष्यातून आपल्याला बाहेर काढून आपले टेलेन्ट लोकांसमोर प्रदर्शित करण्याचे एक प्लॅटफॉर्म तयार करून देते." ज्यांचे व्हिडीओ जास्त फॉलोअर, लाईक्स आणि डायमंड जास्त त्यांना काही रक्कम मानधन म्हणून मिळू लागते. पण खरी स्पर्धा इथूनच सुरु होते कि दररोज खूप सारे फॉलोअर, लाईक्स आणि डायमंड मिळावे म्हणून ती व्यक्ती स्वतःला इतकी हरवून बसते कि वास्तवाशी पूर्णतः संबंधच तुटला जातो. .
या सिरीज मधील सोशल मीडिया अँप मध्ये ते सर्व कथित इन्फ्लुइन्सर पाहायला मिळतील की जे डान्स, प्रॅन्क,स्टंट, गायन वैगरे करतात. ही स्पर्धा जिंकण्यासाठी सगळे स्पर्धक जीवांच रान करताना पाहायला मिळतात. ही सिरीज 5 पात्रं भोवती फिरत असते.
पहिला डार्की, जो सतत सोशल मीडिया च्या आहारी गेल्यामुळे रागावर नियंत्रण हरवुन बसला आहे. दुसरी डान्स राणी, जी 10 वर्षाची मुलगी जीला तिच्या मामाने पैशासाठी हार्मोन्स ची इंजेक्शन देऊन तिच बालपण बरबाद केलं आहे. तीसरी मीना, जी ट्रान्सवूमन आहे पण समाजापासून ओळख लपवली आहे फक्त व्हिडिओस मधून ती स्त्री म्हणून लोकांसमोर येते. चौथी आहे कृष्णा, जी fetish girl या नावाने मास्क घालून व्हिडिओ बनविणारी North-East राज्यातील एक मुलगी की जीला समाज सतत तिच्या वांशिकतेमुळे जज करत असतो. आणि पाचवं पात्र आहे स्वामी, जो एस्केप लाईव्ह साठी काम करत असतो जो थोडासा जुन्या विचारांचा पण बंडखोर असतो.
या प्रत्येक पात्राची एक चांगली बाजू आहे आणि तितकीच काळी बाजू ही आहे. आभासी जगाची स्पर्धा जिंकण्यासाठी वास्तविक जीवनाची कशी नासाडी होतें याच भयाण चित्रण या सिरीज मधून केलं आहे.
सिद्धार्थ, जावेद जाफरी , श्वेता त्रिपाठी , स्वस्तिका मुखर्जी, ऋत्विक साहोरे,प्लाबिता बोरठाकुर, वलूचा , सुमेध मुदगलकर, गीतिका विद्या ओहल्यान, जगजीत संधू, रोहित चंदेल असे अनेक कलाकार या सिरीज मध्ये दिसून येतात. हॉटस्टारवर हि सिरीज स्ट्रीमिंग होत आहे.
ही सिरीज का बघावी?
1. आजकाल लहान मुलांच सोशल मीडिया प्रोफाईल्स असतात पण त्याचे दूरगामी परिणाम काय होतील ? हे जाणून घेण्यासाठी
2. सतत च्या सोशल मीडिया मुळे मानसिक ताण येतो किंवा येऊ शकेल याची कल्पना सहसा नसते, ते किती भयंकर असू शकते याच उत्तर ही सिरीज द्यायचा प्रयत्न करते.
3. खास पालकांसाठी, रिल्स बनविणे या कडे करिअर म्हणून बघण्याआधी ही सिरीज बघा. लहान मुलं ही त्यांच्या बाल्य अवस्थेत चांगली वाटतात.
4. सोशल मीडिया सर्वच वास्तवापासून दूर जात आहोत. हे या सिरीज च्या माध्यमातून समोर येते. आणि अनेक निरुत्तर करणारे प्रश्न समोर येतात .
लहान मुलांचे बालपण व्हिडिओ टेलेन्टच्या नावाने खरच हरवून बसतो का ?
मुलांना मोबाईलच्या व्यसनाच्या आहारी आपण लावतो का ?
आपण स्वतः हि या सोशल मीडियाच्या आहारी गेलो आहात का ?
मुलांना मोबाईलच्या व्यसनाच्या आहारी आपण लावतो का ?
आपण स्वतः हि या सोशल मीडियाच्या आहारी गेलो आहात का ?
सर्वांनी आवर्जून पहा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा