शुक्रवार, ६ मे, २०२२

खंडोबा...अनभिषिक्त सम्राट - नितीन थोरात


खंडोबा...अनभिषिक्त सम्राट 


जेजुरीचा खंडोबा म्हणजे महाराष्ट्रच दैवत... अशा खंडोबाच चित्रण नितीन थोरात यांनी त्यांच्या खंडोबा...अनभिषिक्त सम्राट या पुस्तकात केलं आहे.

हे पुस्तक वाचताना , फक्त वाचत राहावंसं वाटेल अशी या पुस्तकाची मांडणी केली आहे... या पुस्तकात वाचकाला रहस्य, थरार, रोमांच, प्रेम, आश्चर्य , विरह, दुःख, वेदना, मैत्री, शौर्य आणि महत्वाचं म्हणजे आनंद अनुभवायला मिळतो. 
कथेची पार्श्वभूमी हे या पुस्तकाचा बलस्थान वाटत. 
कलयुगातला म्हणजे आजच्या का
काळातला आदित्य, एक चित्रपट दिग्दर्शक असतो. खंडोबावर चित्रपट बनविण्याची ऑफर त्याला असते. वडिलांसोबत तो खंडोबाच्या दर्शनाला जात असतो. तसा आदित्य खंडोबाचा भक्त वैगरे असतो अस काही नसतं पण वडिलांच्या इच्छेखातर तो जेजुरीला निघतो.  वाटेत गाडी पंक्चर होते तेव्हा त्याला रस्त्यात तुटलेल्या रुद्राक्ष माळा दिसतात. त्या घेऊन तो खंडोबाच्या मंदिरात जातो आणि अचानक 5000 वर्ष मागे जातो? भूतकाळात गेलेल्या आदित्यच्या खंडोबा शोधण्याचा प्रवास चालू होतो.. त्यांच्या वर अनेक संकटे येतात, अनेक समस्यांना त्याला तोंड द्यावं लागतं,  अनेक चांगले आणि विचित्र लोकही भेटतात....

पण त्याला खंडोबा भेटतो का?
तो पुन्हा वर्तमानात परत येतो का?
त्याला खंडोबावर चित्रपाट बनवता येईल का?

या सगळ्या प्रश्नांची उत्तरे हवीत तर खंडोबा वाचलाच पाहिजे... देव्हाऱ्यातुन जनमानसात रमलेला खंडोबा अनुभविण्यासाठी खंडोबा वाचलाच पाहिजे.... मी हे पुस्तक 2 बैठकीत संपवलं आणि आनंद झाला ... आनंदच कारण खंडोबा होता......

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

कांदे पोहे कि सौदेबाजी....की विवाह संस्थेच फाऊंडेशन

 कांदे पोहे कि सौदेबाजी....की विवाह संस्थेच फाऊंडेशन   काही चांगल्या / कमावत्या मुलांची लग्न ठरत नाही मग ती मुलं किंवा त्याच्या घरचे मुलींना...