गुरुवार, १९ ऑगस्ट, २०२१

सेपियन्स - युव्हाल नोआ हरारी

 माणसाचा इतिहास माणसाला माहीत असणे गरजेचे आहे. इथे इतिहास म्हणजे केवळ एखाद्या साम्राज्याचा, धर्माचा किंवा ठराविक व्यक्तीचा नाही तर संपूर्ण मानव वंशाचा इतिहास माहीत असणे गरजेचे आहे. हा इतिहास अगदी सोप्या भाषेत सेपियन्स (लेखक युव्हाल नोआ हरारी अनुवादक: वासंती फडके) हे पुस्तक मांडते. 

 गेले 40 लाख वर्ष माणूस या पृथ्वीवर राहात आहे, साधारणतः 1 लाख वर्षांपूर्वी मानवाच्या 6 जाती या पृथ्वीवर अस्तित्वात होत्या. याचा अर्थ ब्रह्मा, येशू, अल्ला आणि   यांच्या पेक्षा मानव हा सिनियर आहे.  होमोहिबिलिस , होमो निअंडरथल पासून ते होमो सेपियन्स पर्यंतच्या प्रवासाची  मर्मभेदी मांडणी , भविष्यातील माणसाच्या शक्यताचे थरारक वर्णन  आणि वेळोवेळी प्रचलित समज आणि विचारांचा पद्धतशीर कार्यक्रम हे पुस्तक करत असते.  त्याच वेळी भविष्यातील धोके ही दाखवते.

साधारणतः 70000 वर्षांपूर्वी 'मी बरं माझं काम बरं अस मानून' आफ्रिकेच्या  एका कोपऱ्यात राहणारा बिन महत्वाचा प्राणी असलेला होमो सेपियन्स (आजचा प्रगत मानव - आपण) नंतरच्या काही हजार वर्षांत धडकी भरावणारी प्रगती कशी करतो?


Source : amzon.in


पृथ्वीवर अधिसत्ता कशी स्थापन करतो? 

देव, राक्षस, धर्म, जात, कायदा, श्रद्धा वैगरे चा उदय कसा झाला? 

पृथ्वीवर एकाच वेळी पुरुषप्रधानात कशी पसरली ?

मोठ मोठी शहरे, साम्राज्य कसे उभारले गेले ?

जिथे जिथे सेपियन्स (आपण) वास्तव्य केले त्यावेळेच्या मॅमथ सारख्या जनावारे कशी संपुष्टात आली ?

सेपियन्स नंतर ही माणूस प्रगत होणार आहे का? की त्याचा शेवट होणार आहे?

या एक ना अनेक प्रश्नांची उत्तरे मुद्देसूद भाषेत युव्हाल नोआ हरारी यांनी या पुस्तकात मांडली आहे.

हे पुस्तक प्रत्येक माणसाने वाचावे कारण हा आपला इतिहास आहे, माणसांचा इतिहास आहे.  आपल्या चुका आपल्याला कळाव्या आणि पुढे येणारे धोके टाळावे तर हे पुस्तक एकदा वाचाच.  जाता जाता एक प्रश्न हे पुस्तक विचारत.

चंद्रावर सेपियन्स च्या पावलांच्या खुणा उमटविणार निल आर्मस्ट्राँग हा हजारो वर्षांपूर्वी चेवट गुहेत हाताचे ठसे उमठविणाऱ्या सेपियन्स पेक्षा सुखी असेल का? जर उत्तर नसेल अस आहे तर मग या प्रगतीचा नेमका कोणाला फायदा झाला?


पुस्तक : सेपियन्स

लेखक : युव्हाल नोआ हरारी

अनुवादक: वासंती फडके

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

कांदे पोहे कि सौदेबाजी....की विवाह संस्थेच फाऊंडेशन

 कांदे पोहे कि सौदेबाजी....की विवाह संस्थेच फाऊंडेशन   काही चांगल्या / कमावत्या मुलांची लग्न ठरत नाही मग ती मुलं किंवा त्याच्या घरचे मुलींना...