रविवार, २० जून, २०२१

माकडांचा फोटो ब्लॉग

मानव उत्क्रांतीचा  उगम  माकडापासून सुरु झाला.. म्हणजेच  माकड हे आपले  सिनियरच आहेत. हे सिनियर माकड  इतके हुशार होते म्हणून मानव उत्क्रांती शक्य झाली. पण आज मानव त्या माकडाला निर्बुद्ध  समजून  "ए माकड" किंवा " असा माकडासारखा का बघत आहे ?" असे सहज चिडवले जाते.  पर्यटनस्थळावर माकडांना बिस्कीट-चणे-चिप्स खाद्य देऊन त्यांना स्वतःचे अन्न स्वतः शोधण्याची सवय मोडली जाते. यामुळे सहज त्या पर्यटनस्थळावर तीच माकडे कालांतराने पर्यटकांच्या हातातील वस्तू हिसकावून घ्यायला सुरु करू लागले. जंगले तोडली गेली म्हणून  माकडांनी  गावात आणि शहरांत वावर सुरु केला याच्या बातम्या दिवसेदिवस वाढत आहे. एकूणच प्रत्येक गोष्टीत माकडांना दोषी ठरवले जाते.  पण खरतर  माकड गावात किंवा शहरांत आले नसून आपण जंगले तोडली त्यांचे घर - त्यांचे अन्न यावर सत्ता मिळवत चाललो आहोत.   आपण  इतिहास शिकण्याची सुरुवात करताना माकडा पासूनच्या मानव उत्क्रांती पासून करतो हे सहज विसरले जाते. आपण त्यांच्या  जंगलात घुसलो हे देखील विसरले जाते.  त्यांची अन्न शोधण्याची सवय आपण मोडली हे पण विसरले जाते. 

तर या बेसिक गोष्टीवर थोडा विचार केला पाहिजे. एकूणच  "माकड - वनसृष्टी - आपण"  एकमेकांवर  अवलंबून आहोत.  "जंगले -वनसंपदा " यांचे जतन केले पाहिजे.  

मी या ब्लॉग मध्ये अश्याच  काही निरागस माकडांची क्षणचित्रे:

Anjali-Pravin-apali-writergiri-blog

Anjali-Pravin-apali-writergiri-blog

Anjali-Pravin-apali-writergiri-blog-monkies-monkey

Anjali-Pravin-apali-writergiri-blog-monkies-monkey

Anjali-Pravin-apali-writergiri-blog-monkies-monkey

Anjali-Pravin-apali-writergiri-blog-monkies-monkey

Anjali-Pravin-apali-writergiri-blog-monkies-monkey

Anjali-Pravin-apali-writergiri-blog-monkies-monkey

Clicked & Written by Anjali Pravin


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

कांदे पोहे कि सौदेबाजी....की विवाह संस्थेच फाऊंडेशन

 कांदे पोहे कि सौदेबाजी....की विवाह संस्थेच फाऊंडेशन   काही चांगल्या / कमावत्या मुलांची लग्न ठरत नाही मग ती मुलं किंवा त्याच्या घरचे मुलींना...