शनिवार, १० एप्रिल, २०२१

संन्यासी व्यक्ती सारखा विचार करू (२ min read)

 

Think Like Monk


आध्यात्मिक (spiritual) आणि सेल्फ हेल्प पुस्तकांचा बाजारात भरणा आहे. प्रत्येक आध्यात्मिक पुस्तक आत्मशांततेची आणि प्रत्येक सेल्फ हेल्प पुस्तक यशाची खात्री वाचकाला देत असते. अध्यात्म आणि सेल्फहेल्प यांची सांगड घालणारी पुस्तके फारच कमी आहेत. पॉवर ऑफ नाऊ या एकहार्ट टोले यांच्या पुस्तकानंतर थिंक लाइक ए मोंक (Think Like Monk) या जय शेट्टी लिखित पुस्तकाने खूप प्रभाव टाकला. आजच्या ब्लॉग मध्ये याच पुस्तकाविषयी थोडक्यात माहिती देणार आहे.

पुस्तकाच्या नावात आणि लेखकात एक साम्य आहे आणि हेच या पुस्तकाच वेगळपण आहे. जय शेट्टी यांनी स्वतः 3 वर्षे संन्यास (monk)चे आयुष्य जगले. त्यांच्या त्याच अनुभवरून त्यांनी या पुस्तकाची मांडणी केली आहे. संन्यासी आयुष्य जगलेला माणूसच संन्यासी कसा विचार करतात ही सांगू शकतो. पुस्तकाची सुरवाती च चार्ल्स कूले च्या विधानाने होते. I am not what I am think I am, and I am not what you think I am. I am what I think you think I am.” आणि पहिल्याच प्रकरणात लेखक वाचकांचा ताबा घेतो.

संन्यासी जसा विचार करतो तसा विचार करून एखादा सामान्य माणूस त्याच्या आयुष्यात अनेक सकारात्मक बदल घडवू शकतो असे या पुस्तकात लिहिले आहे.

पुस्तकाची मांडणी ही तीन भागात केली आहे. पहिला भाग “Let Go. पहिल्या भागात एक संन्यासी त्याच्या वैयक्तिक प्रगती साठी काय काय करतो आणि आपण त्या गोष्टी स्वतःच्या आयुष्यात अंमलात आणून स्वतःचा  वैयक्तिक विकास कसा करू शकतो यावर खूप सोप्या भाषेत लिहिले आहे. यात वारंवार नकारात्मक विचाराना let go म्हणजेच दुर्लक्ष करून स्वतःमधल्या स्वतःला शोधल पाहिजे असे सांगितले आहे. मुळात, नकारात्मक विचार येणे हे नैसर्गिक आहे त्यामुळे ते कुठे नाकारले नाहीत, त्यामुळे यातले विचार वास्तविक वाटतात.

दुसरा भाग “GROW. या भागात व्यावसायिक आणि आध्यात्मिक अंगावर प्रकाश टाकला आहे. संन्यासी व्यक्तीचे एक वेळापत्रक असते, त्याला माहीत असत कोणत्या वेळी काय करायचे. तसेच त्याच्या जीवनाला एक ध्येय असते. एक सर्व साधारण व्यक्ति वेळ आणि स्थळ  या दोन गोष्टीवर विचार आणि त्यावर मेहनत करून स्वतःची व्यावसायिक आणि आध्यात्मिक प्रगती कशी करू शकेल याची समर्पक उत्तरे या भागात मिळतात. या भागातल्या दोन विधानांनी मला खुपच प्रभावित केल. Time has memory and location has energy” आणि “Routine root us”.

तिसरा भाग GIVE – या भागाचा भर वैयक्तिक नातेसंबंध, त्यात येणाऱ्या अडचणी आणि इतरांना देण्याची वृत्ती विकसित करून नातेसंबंध कसे मजबूत करता येतील यावर आहे. यात सुद्धा तुम्हाला संन्यासी व्यक्तीचे विचार मदत करतात. हे पुस्तक प्रत्येकाने एकदातरी वाचावे. पुस्तक मराठी-हिन्दी मध्ये सुद्धा उपलब्ध आहे.


पुस्तकाच्या लिंक साठी येथे क्लिक करा.

आपली Writergiri

मोबा क्र. ७७३८८८२६९२ 


1 टिप्पणी:

कांदे पोहे कि सौदेबाजी....की विवाह संस्थेच फाऊंडेशन

 कांदे पोहे कि सौदेबाजी....की विवाह संस्थेच फाऊंडेशन   काही चांगल्या / कमावत्या मुलांची लग्न ठरत नाही मग ती मुलं किंवा त्याच्या घरचे मुलींना...