शुक्रवार, २ एप्रिल, २०२१

"त्रिभंग"

  "त्रिभंग"

सभंग, अभंग  आणि त्रिभंग या ओडिसी नृत्यातील तीन  वेगवेगळ्या स्थिती आहेत. एकाच नृत्यातील  तीन स्थितीचे अर्थ हि वेगवेगळे आहेत.  या चित्रपटात देखील  एकाच रक्ताचे नाते असले तर तीन स्वतंत्र विचारसरणी जोपासणाऱ्या स्त्रियांचे आयुष्य रेखाटणारा चित्रपट म्हणजे "त्रिभंग".

 

लेखन आणि दिग्दर्शक  : रेणुका शहाणे
tribhnga-anjali-pravin-apali-writergiri

प्रमुख पात्रे : नयनताराची भूमिका तन्वी आझमी, अनुराधा आपटेची भूमिका काजोल,माशाची भूमिका मिथिला पालकर, मिलनची भूमिका कुणाल कपूर रॉय आणि इतर कलाकार

 

मुव्ही रिव्ह्यू :

या चित्रपटामध्ये नयनतारा म्हणजे अशी स्त्री जी प्रागतिक विचारांची लेखिका असते. लेखन तिच्यासाठी सर्वस्व असते. लेखनासाठी संपूर्ण वेळ देता यावा. लेखनासाठी एकांत मिळावा.  यामुळे कुटुंबाकडे दुर्लक्ष होते.  साहजिकच त्यामुळे कौटुंबीक कलह आणि विभक्त व्हावे लागते. आपल्या दोन मुलांना घेऊन वेगळे झाल्यावर हि आयुष्यात अनेक चढउतार होत असतात. घटस्फोटानंतर हि दोन वेगवेगळ्या कारणाने आयुष्यात पुरुष येतात पण ते हि वेगवेगळ्या कारणाने दुरावले हि जातात. 

या सर्वांचा कळत-नकळत प्रभाव पडत असतो ती म्हणजे नयनताराची मुलगी "अनुराधा आपटे". मुलांपेक्षा हि लेखनाला महत्व आणि वेळ देणारी आई. आई वडिलांचा झालेला घटस्फोट. आईच्या आयुष्यातील बदलत असणारे पुरुष.   आजीच्या आणि कुटुंबाच्या मायेपासून दुरावलेले बालपण. आईच्या प्रियकराकडून बालवयात झालेले लैंगिक शोषण. जे कधी कोणाकडे व्यक्त करता आले म्हणून झालेली निद्रानाश, चीडचीड आणि आक्रस्ताळेपणा.  पण आईच्या आयुष्यातील तिसरा पुरुष भास्कर. यामुळे ओडिसी नृत्याची ओढ तिला लागते. असे असेले तरीही तोंडावर "फ"वरून शिवी आणि आकांडतांडव करणारी अनुराधा. भविष्यात एक उत्तम नृत्यांगणा आणि अभिनेत्री दाखवली आहे. असे असले तरीही आई वडिलांच्या दुर्लक्ष करण्याने तक्रारीचा सूर आणि राग ती आयुष्यभर मनात साठवून ठेवते.    तिच्याही आयुष्यात अनेक पुरुष येतात आणि जातात. यातील लिव्ह-इन रिलेशनशिप मधून एक मुलीचा जन्म होतो. 

ती मुलगी म्हणजे "माशा". जन्मतःच तिचे नाव माशा अनुराधा आपटे असे असते. वडील नाही म्हणून शाळेत कॉलेजमध्ये खूप चिडवले जायचे. तेच टोमणे ऐकत सहन करत लहानाची मोठी होते. पण ती कधी तिच्या आईला याबद्दल अजिबात तक्रार करत नाही. कारण तिला पुन्हा हे भांडण नको हवे असतात. "माशा" एका अश्या कुटुंबात लग्न करते जिथे "सासूसोबत व्हिडीओ कॉलवर बोलताना सुद्धा डोक्यावर पदर घ्यावा लागतो. मनाविरुद्ध गर्भलिंग चाचणी करावी लागते. तरीही त्याची तक्रार करत नाही." पण आपल्या बाळाला एक चांगले - नॉर्मल  कुटुंब मिळावे यासाठी तिची हि धडपड सुरु असते. कारण तिला जे आपल्या आईमुळे सहन करावे लागले ते आपल्या बाळाला सहन करावे लागू नये हि इच्छा असते.

मिलन म्हणजे कुणाल रॉय कपूर जो  नयनताराची ऑटोबायोग्राफी लिहीत असतो.  हि ऑटोबायोग्राफी लिहीत असताना त्यासाठीचे इंटरव्ह्यू आणि माहिती गोळा करत असताना अकस्मितपणे नयनताराला आलेला स्ट्रोकचा झटका. त्यामुळे नयनतारा, अनुराधा आणि माशा या तिघी एकत्र येतात व आयुष्यभर एकमेकांशी बोलू न शकलेल्या प्रश्नांची उत्तरे आपल्या दृष्टीकोनातून मांडू लागतात. आपले मत आणि मुद्दे मांडताना त्यांच्या नात्यातील कनेक्टिव्हिटी आणि निर्णयातील स्वतंत्रपणा हा प्रखरपणे दिसून येतो. 

तीन वेगवेगळ्या  दशकातील तीन स्वतंत्र विचारसरणी असलेल्या एकाच कुटुंबातील तीन वास्तववादी वाटणारी व्यक्तिरेखा रेखाटलेला चित्रपट म्हणजे "त्रिभंग"

1 टिप्पणी:

कांदे पोहे कि सौदेबाजी....की विवाह संस्थेच फाऊंडेशन

 कांदे पोहे कि सौदेबाजी....की विवाह संस्थेच फाऊंडेशन   काही चांगल्या / कमावत्या मुलांची लग्न ठरत नाही मग ती मुलं किंवा त्याच्या घरचे मुलींना...