बुधवार, २७ जानेवारी, २०२१

सोशल मीडिया आणि "we the people of India”

 सोशल मीडिया आणि "we the people of India”

We the people of India (Source: Facebook)


देश स्वतंत्र होऊन अनेक वर्ष झाली, देशाने अनेक संकटे झेलली, विविध क्षेत्रात प्रगती केली. पण जेव्हा जेव्हा सत्ताधारी बैल सत्तेच्या माजावर पिसळत होता तेव्हा तेव्हा याच जनतेन त्याच्या मुसक्या ही आवळल्या आहेत. आणीबाणी च्या काळात असाच सत्ताधारी उसळला आणि जनतेने त्याला घरी बसवल, UPA II मध्ये भ्रष्टाचाराने सीमा गाठली जनतेने पुनः आपले काम करून सत्तेला पाणी पाजल. वेळोवेळी अशीच ताकद जनतेने राज्यपातळ्यांवरही दाखवली. पण सध्या परिस्थिती खूप वेगळी आहे.

Source: Facebook.com

एक नागरिक म्हणून माझे म्हणणे मांडणे हे नेहमीच योग्य आहे पण ते मांडताना मनात we the people of India” ची भावना असणे गरजेचे आहे. पण विशिष्ठ पक्षांच्या समर्थणात किंवा विरोधात  आपण इतके गुंतून गेलो आहोत की आपण we the people of India” आहोत हे विसरून एखाद्या पक्ष्याच्या कार्यकर्त्या सारखे नुसते झुंजत आहोत. शेतकरी आंदोलनाचा मुद्दा घ्या. शेतकरी आंदोलनाला समर्थन देणारे आणि विरोध करणारे यामध्ये किती जण असे आहेत की ज्यांनी हा कायदा वाचला आहे. बहुतांश लोक ही मनात पूर्वग्रह बाळगून याच समर्थन करत आहेत किंवा विरोध करत आहेत. स्वतःच्या बापावर विश्वास न ठेवणारे डोळे झाकून एखाद्या whats app फॉरवर्ड वर विश्वास ठेवतात. सरकार स्पष्ट बहुमतच असू दे किंवा आघाड्यांच असू दे किंवा अल्पमतात असू दे , “we the people of India” नेहमीच विरोधी पक्षाची भूमीका निभावली पाहिजे. संसदेतला विरोधी पक्ष कमजोर असो वा प्रबळ असो “we the people of India” नेहमीच सरकार वर वचक ठेवणार प्रभावी विरोधी पक्ष असाल पाहिजे.

सोशल मीडिया (Social Media) पासून थोड सावधान?

अनेक लोक स्वतःच मत हे त्यांच्या टाइम लाइन वर पोस्ट होणाऱ्या माहिती वरुन ठरवत असतात. मग ते कहर आहे की खोट आहे यांची शहानिशा कोणीही करत नाही. असे अनेक पेज आहेत जे FB (Facebook) यूजर्स ला अक्षरशः प्रोग्रॅमड् करत आहेत. अमुक अमुक एक करोंड समर्थकांच ग्रुप, Nation with अमुक अमुक, कट्टर अमुक अमुक चा ग्रुप वैगरे वैगरे. अशा ग्रुप मध्ये फक्त विशिष्ट विचारांचेच पोस्ट येतात आणि त्या ग्रुप चे सभासद तेच वाचून आपल्या मेंदूचा कचरापेटी करतात. हेच व्हॉटस्एप वर ही चालते. मग लोक रागात, पोकळ अभिमाणात असले पोस्ट इकडे तिकडे फॉरवर्ड करतात. अशा सोशल मीडिया च्या प्रभावात संवाद होत नाहीत निव्वळ वाद होतात. आजकाल ओन्ली कॉंग्रेस, ओन्ली बीजेपी .. सारख्या कॉमेट सर्रास वाचायला मिळतील. यांचा जन्म हा या पेज वरन लावलेल्या झुंजीतून होत असतो. कोणातही पक्ष, विचारधारा किंवा व्यक्ती परिपूर्ण नसतो. आम्ही ज्या पक्षाला किंवा विचारधारेला किंवा व्यक्ती ला मानतो ती सुद्धा परिपूर्ण नाही हे आपल्याला स्वीकारायला जड जाते हीच आपली शोकांतिका आहे. हयातून स्वतःला कसे वाचवायचे.

सर्व राजकीय समर्थकांचे किंवा विरोधकांचे पेज अनफॉलो करून टाका, सर्व वृत्तवाहिन्यांचे पेज, यूट्यूब चॅनेल, एपस् अनफॉलो करून टाका. जितक जमेल तितक FB, व्हाटस एप , यूट्यूब, ट्वीटर इ चे डिटोक्स करा नाहीतर सोशल मीडिया ची घाण पूर्ण भिनली की बाहेर पडण कठीण होऊन जाईल. असो, हे वाचून काही लोकांनातरी माझे मत पटेल ही अपेक्षा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

कांदे पोहे कि सौदेबाजी....की विवाह संस्थेच फाऊंडेशन

 कांदे पोहे कि सौदेबाजी....की विवाह संस्थेच फाऊंडेशन   काही चांगल्या / कमावत्या मुलांची लग्न ठरत नाही मग ती मुलं किंवा त्याच्या घरचे मुलींना...