जोहर माय बाप जोहार म्हणत तुकारामांचा जातभेद आणि वर्णभेद विरोधात विद्रोह
आ. ह. साळुंखेनी
लिहिलेला विद्रोही तुकाराम हे पुस्तक संतपरंपरेवर लिहिलेलं एक अतिशय वेगळ आणि क्रांतिकारक
असं पुस्तक म्हणाव लागेल. तुकारामांची ओळख हि अभंग रचणारा आणि कीर्तन करणारा एक
विठ्ठल भक्त भोळा संत अशीच होती. पण जसजशी या पुस्तकाची पान पालटत जातात तसतसा एक
वेगळाच माणूस समोर येतो. जो सामाजिक क्रांतीचा जनक आहे, जो बंडखोर आहे, जो
क्रांतीकारी आणि जो विद्रोही आहे. मागील दोन सारांश मध्ये आपण तुकारामांचे एकूण
व्यात्कीमात्व आणि त्यानी वेन्दांवर मांडलेले परखड विचार आपण वाचले असतील. सारांश
३ मध्ये तुकारामांनी जातीभेद आणि वर्णभेदावर
उगारलेले आसूड पाहणार आहोत.
जातीवादा विरुद्ध विद्रोह
एखाद्याच
श्रेष्ठत्व हे त्याच्या जातीवरून ठरवणे हे आपल्या समाजाचे एक वैशिष्ट आहे. आजहि
अशा वृत्तीची माणसे आढळतात. तुकारामांच्या काळात तर जातीवादाच स्तोम बरच बोकाळल
होत. श्रेठत्वासाठी जातीची कसोटी लावणे तुकारामांना मान्यच नव्हत. ते म्हणत कि एखाद्याच
कुळ उत्तम असेल पण आचरण वाईट असेल तर ती व्यक्ती परमेश्वरापासून दूरच राहील असे कूळ
काय कामाचे. “यातिशी कारण नाही देवा” असे ते
ठणकावून सांगतात.
वर्ण, जात, कुळ यांचा
अभिमान खरा नसतो तो मृगजालासारखा असतो. असे मानणाऱ्या तुकारामांनी वर्णव्यवस्था हि
झिडकारली. ते म्हणत वर्णांनी सांगितलेल्या कर्तव्याचे पालन करने हे निव्वळ व्यर्थ श्रम
आहे. वर्णांचा अभिमान बाळगून कोणीही पावन झालेला नाही.
गुण अवगुण हे दोन्ही प्रमाण| यातिशी कारण नाही देवा|| १२३.२
याति कुळ येथे असे अप्रमाण | गुणांचे कारण असे अंगी|| ३३७.२
वर्णाभिमाने कोण झाले पावन| ऐसे द्या सांगून मजपाशी|| ४२९९.३
तुकारामनी जातीभेदा
विरोधात भेदाभेद भ्रम अमंगळ असे म्हणत रणशिंग फुंकले. ते नेहमी समता
आणि बंधुता यावर विश्वास ठेवायचे आणि भेदभावाला अमंगल म्हणजेच वाईट म्हणत होते ते
एका अभंगात म्हणतात कि सर्व माणसे हि परमेश्वराचीच लेकरे असतील तर असा भेदाभेद का?
एका देहाच्या वेगवेगळ्या अवयावाना भोगावे लागणारे सुखदुख जीवालाच अनुभवावे लागते. त्यानी हा प्रश्न थेट ईश्वरालाच केला आहे.
अवधी एकाचीच विण| तेथे कैचे भिन्नाभिन्न? ||
विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म| भेदाभेद भ्रम अमंगळ|| ३५४. ४
तुका म्हणे एका देहाचे अवयव|सुख दुख जीव भोग पावे|| ४६.४
वेद, पुराणकथा तसेच
इतर कर्मकांडे करतना परमेश्वर हा सर्वांचा पिता असे म्हटले आहे. हे जर सत्य असेल
तर माणसाला त्याच्या आप्त-बंधूंमध्ये
भेदाभेद करायला वाव कुठे मिळतो, असा जाब रुपी प्रश्न ते परमेश्वराला विचारतात. एका
बाजूला परमेश्वावला सर्वांचा पिता मानायचं आणि दुसरीकडे माणसा माणसा मध्ये भेद हि
करायचा. या विसंगतीवर तुकोबांनी अचूक बोट ठेवले आहे. तुकारामांना ते स्वतः उच्च वर्णातले नाहीत याचा
त्यानं कधीच खेद नव्हता उलट त्यानी देवाचे आभार मानले कि देवाने त्याना कुणबी
म्हणून जन्माला घातले. ते म्हणतात कि उच्च वर्णात जन्माला आलो असतो तर कदाचित मी
हि दांभिक झालो असतो. (शुद्रवंशी
जन्मलो| म्हणोनी दंभे मोकलिलो||)
जोहार मायबाप जोहार - प्रातनिधिक चित्र |
तुकारामांच्या
दृष्टीने परंपरागत जात महत्वाची नव्हती. आचार, विचार, भावना यांना ते खर महत्व
देतात. त्यानी स्वतःला केवळ कुणबी नाही तर महाराहि म्हटले आहे. असे म्हणताना
त्यांना कोणताही कमीपणा वाटला नाही. जोहार माय बाप जोहार असा म्हणत त्यानी जाती
व्यवस्थेलाच आव्हान दिल. मी वेसकर (महार)
जोहार करत आहे असे त्यानी एका अभंगात म्हटले. (जोहार मायबाप जोहार| सारा
साधावया आलो वेसकर || १२७.१ )उच्चजातीला नाव ठेवणारी त्यांच्यापेक्षा खालच्या
जातीला हिनच मानतात. अशा स्थितीत स्वतःला महार संबोधणे हा स्वतः मध्येच एक विद्रोह
होता. प्रतीकाचा स्वीकार करताना माणसे स्वतःचा सबंध केवळ प्रतिष्ठित प्रतीकांबरोबर
जोडण्यासाठी धडपडत असतात, त्यात अस्पृश्य मानल्या गेलेल्या समाजाशी एकरूपता
दाखवणे म्हणजे समतेचा पुरस्कार करणेच होय. शोषित समाजाने आखून दिलेल्या सीमा
तोडण्यासाठी तुकारामांनी प्रतिष्ठेपणाचे विसर्जन केले.
संकलन आणि संपादन
प्रविण अंजली
हे पुस्तक वाचल्याशिवाय तुकोबा कळणार नाहीत.
उत्तर द्याहटवाधन्यवाद, आपल नाव समजू शकेल का
हटवातुकाराम चांगली माहिती समजली
उत्तर द्याहटवाधन्यवाद, आपल नाव समजू शकेल का
हटवा