रविवार, १० मे, २०२०

मी देव पहिल

मी देव पहिला

“देव आहे की नाही” या खुप लोकानी चर्चिलेल्या विषयावर में अनेक वेळा बोललो, प्रेजेंटेशन दिले आहेत, डिबेट केलि आहे. "व्हाई आय ऍम अथेइस्त"  या भगतसिंह ने लिहिलेल्या लेखाचे रिफरेन्स देऊन माझी मते मांडली आहेत. लेनिन ची उदाहराने देऊन नास्तिकवादाची बाजू मांडली आहे. कम्युनिस्ट विचारसरणीचा नसलो तरी थोडा नास्तिकच आहे. पण कधी कधी अशी माणसे भेटतात की ते तुम्हाल क्षणभर का होइना पण विचार करायला भाग पडतात.

लातूर जिल्ह्यात मावलागाव नावाच लहानस खेड आहे. तेथील महिलांना सेल्फ् हेल्प ग्रुप मैनेजमेंट बद्दल मागदर्शन करायचे प्लान अचानक ठरले. त्याप्रमाणे मावलगाव इथे बचत गटाची मीटिंग बोलावाली. मीटिंगची वेळ रात्रि ८ वाजताची ठरली. सवायीप्रमाने मी अर्धा तास आधीच उपस्थित होतो. महिलना जमा व्हायला अवकाश होता. बचत गटाच्या अध्यक्षंच्या घरी थांबलो. त्या घरात एक ७५-८० वयोगाटतले वृद्ध गृहस्थ होते. ३५ वर्ष त्यानी शिक्षण क्षेत्रात कार्य केले. पायाने थोड़े अधु होते. पण बोलन शुद्ध आणि स्पष्ट होत. कपळावर चंदनाचा गंध आणि गळ्यात तुळशीमाळ घातलेली होती. त्यांच्या कड़े पहुनच कळल की ते वारकरी आहेत. त्यानी आतल्या रूम मधे बसायला सांगितले. दोघाही चहाचा अस्वाद घेत बचत गटावर चर्चा करू लागलो. आणि बोलायच्या ओघात आमची चर्चा संत तुकारामवर चालू झाली. ते वृद्ध गृहस्थ तुकारामांविषयी अगदी भक्तीभावाने बोलायला लागले. त्यानी १८ वर्षे वारि केली. ते जेव्हा वारीबद्दल सांगत होते तेव्हा मी ते जणू काही प्रत्यक्ष अनुभवत आहे असेच वाटत होते. त्यानी मला त्यांच्या शिक्षकी वाकृत्वाने  आळंदीहून निघालेली पालखी दाखवली, फलटन वरुण पंढरपुर चा प्रवास घडविला, पंढरपुर चे गोल रिंगन फिरवले. अक्षरशा मी वारि करत असल्याचा अनुभव त्यानी दिला. वारीतला प्रत्येक  क्षण मी अनुभवला. मी इतक मन लावून एकत होतो की त्या क्षणी लेनिन, विज्ञानवाद, नास्तिकवाद इ.इ.इ.इ. सर्व विसरून गेलो होतो. चर्चा रंगात आली असताना मी त्याना एक प्रश्न विचारला. “बाबा एवढा लाखोंचा जनसमुदाय एकत्र येतो पण एकही दुर्घटना कशी घडली नाही आजपर्यंत? “ ते म्हणाले “त्याच (देवाच) लक्ष आहे सर्वांवर.” मी मिश्किल पने हसलो. (नास्तिक पुन्हा डोक वर काढू लागला होता पण त्या उत्तरापुरता).
त्यानी सांगीतल “बाळ तुला विश्वास बसणार नाही पण मी देव पाहिलाय” माझ्या चेहर्यावरचे आश्चर्याचे भाव त्यांनी अचूक टिपले असतील. त्यानी त्यांच्या पत्नी ला बोलावले अणि पूर्ण प्रसंगाचे वर्णन करायला चालू केले. त्यावेळी बाबा आणि त्यांची पत्नी रिंगणातल्या गर्दित होते. ते दोघाही अनोळखी उर्जेने गर्दी बरोबर धावत होते. दोघांचा अचानक तोल गेला अणि ते खाली पडले. दोघांच्या पण गुडघ्यामधे बारीक खड़े रुतले. त्यांना कळून चुकले आता ही सारी गर्दी आपल्याला तुडवून जाणार. तोच भगवा पताका घेउन एक जण त्यांच्या समोर उभा राहिला. गर्दिताला एकही माणूस त्याच्या जवळून धावत नव्हता.त्याने जणू स्वताची भिंत बाबांच्या रक्षाणासाठी उभी केली होती. त्या तरुणाने त्याना हात दिला, थोड़ी मलमपट्टी केली आणि क्षणार्धात अदृश्य झाला. नंतर पुन्हा दिसलाच नाही. बाबा पुढे म्हणाले “ बाळ तुला विश्वासनाही बसणार पण तोच देव होता. ह्या वारिने आम्हाला माणुसकी शिकवली, आम्हाला देव दाखवला.”  बाबा बोलत असताना त्यांच्या पत्नीच्या चेहऱ्यावरचे भाबडे भाव माझ्या नजरेतून नाही सुटले.
हे सर्व ऐकत असताना सेल्फ् हेल्प ग्रुप मैनेजमेंट बद्दल विसरुनाच गेलो होतो. त्यांनी देव पहिला की त्यांना भास झाला हा प्रश्न इथे गौण आहे. बाबांची निखळ भक्ति, त्यांचा देवावरचा विश्वास मला खुप काही शिकवून गेला. त्यांच आणि माझ नात काहीच नव्हत. पण एक हा प्रसंग एक वेगळच नात निर्माण करून गेला. त्यांचा निरोप घेता घेता हात अपोआप त्यांच्या पायाकडे झुकले.



३ टिप्पण्या:

  1. हल्लीच नास्तिक आणि आस्तिक या विषयावर एका मित्रासोबत चर्चा झाली. मला वाटतं आपले विचार काहीही असो फक्त गरज असते ती एकमेकांच्या विचारांचा सन्मान करण्याची ...
    खूप छान वाटले तुझा हा लेख वाचून

    उत्तर द्याहटवा
  2. छान लेख, आस्तिक आणि नास्तिक पेक्षा भोळाभाव महत्वाचा👍👍

    उत्तर द्याहटवा
  3. छान लेख, आस्तिक आणि नास्तिक पेक्षा भोळाभाव महत्वाचा👍👍

    उत्तर द्याहटवा

कांदे पोहे कि सौदेबाजी....की विवाह संस्थेच फाऊंडेशन

 कांदे पोहे कि सौदेबाजी....की विवाह संस्थेच फाऊंडेशन   काही चांगल्या / कमावत्या मुलांची लग्न ठरत नाही मग ती मुलं किंवा त्याच्या घरचे मुलींना...