शनिवार, ३० मे, २०२०

विद्रोही तुकाराम - सारांश भाग ४


जेव्हा फिर्यादीच न्यायाधीश असतो..........


आ. ह. साळुंखेनी फक्त तुकारांमांचे सत्य लोकांसमोर आणले नाही तर तत्कालीन समाजाच्या एककल्ली न्यायव्यवस्थेचा बुरखा फाडला आहे. तात्कालिक उच्चवर्णातल्या लोकांनी तुकारामंवर चालवलेल्या एकतर्फी खटल्याचा खरपूस समाचार विद्रोही तुकाराम मध्ये घेण्यात आला आहे.
वैदिक पंडितांचे वर्चस्व असलेली जीवनपद्धती व धार्मिक व्यवस्था याना जोरदार हादरे बसतील , अशा आचारविचाराचा पुरस्कार तुकाराम करीत होते आणि त्याच्या उपदेशाचा लोकाच्या मनावर मोठा प्रभावही पडत होता. तुकारामाच्या या हल्ल्यामुळे त्या पडिताची सामाजिक प्रतिष्ठा , समाजावरील नियंत्रण , आर्थिक उत्पन्न आणि त्याचे एकूणच हितसबध याना तडे जाण्याची शक्यता निर्माण झाली होती . पिढ्यान्पिढ्या पुष्ट होत असलेला त्यां पंडितांचा अहंकार दुखावला गेला . आपल्या हितसंबधाच्या रक्षणासाठी तुकारामाचे तोंड बंद करणे आवश्यक आहे , असे त्यांना वाटू लागले . त्यांचे तोंड बंद करण्याचे जे काही मार्ग त्यांच्या हाताशी होते , त्यापैकी त्यांना न्यायालयात खेचणे हा एक महत्त्वाचा मार्ग होता . तुकारामांची अभंगगाथा बुडवण्यात आली , त्यांचा छळ झाला इ . गोष्टी लोकाना स्पष्टपणे माहीत असतात , पण खटल्याची मात्र फारशी चर्चा होत नाही . प्रत्यक्षात त्याच्यावर खटला भरण्यात आला होता , ही ऐतिहासिक वस्तुस्थिती आहे . मग तो खटला नीट चालवण्यात आलेला असो , वा नसो .

तुकारामंवर तीन आरोप करण्यात आले होते.

तुकोबांनी तात्कालिक धर्म आणि समाजव्यवस्थेवर चढवलेले हल्ले तसेच त्यांचा लोकांवरचा वाढता प्रभाव लक्षात घेता न्यायपीठाने त्यांच्यावर अनेक कलमे चढवली असतील. खटला भरवताना तुकोबांवर तिने प्रमुख आरोप ठेवण्यात आले हे स्पष्टपणे दिसते.

१. तुकाराम क्षुद्र होते. तुकोबांना वेदाचा अधिकार नव्हता आणि त्यंनी वेदांवर भाष्य केले, लिखाण केले
वर्णव्यवस्थे प्रमाणे चार वर्ण पडले गेले होते पण तुकारामांच्या काळात ब्राह्मण आणि सर्व ब्राह्मणेत्तर हे क्षुद्र वर्णातच मोडत होते. त्यासाठी विद्रोही तुकाराम मधील ६ प्रकरणाचा एक उतारा जसाच्या तसा देत आहे
(.....प्राथमिक गोष्ट म्हणजे तुकारामांचे शूद्रत्व होय . वर्णव्यवस्थेच्या नियमानुसार तुकारामांच्या काळात ब्राह्मण आणि शूद्र हे दोनच वर्ण होते . तुकाराम ब्राह्मणेतर असल्यामुळे शूद्र होते . पूर्वी मात्र समाजात चार वर्ण होते . ज्यांना उपनयनाचा म्हणजेच मुंजीचा अधिकार होता , ते ब्राह्मण , क्षत्रिय व वैश्य हे तीन वर्ण द्विज म्हटले जात . उपनयन हा त्यांचा दुसरा जन्म मानला जाई . शूद्रांना उपनयनाचा अधिकार नसल्यामुळे त्यांना ' एकजन्मा ' म्हटले जाई . द्विज आईवडिलांच्या पोटी जन्माला येऊनही ज्यांचा उपनयन संस्कार होत नसे , त्यांना शूद्रत्व आल्याचे मानले जाई . काळाच्या ओघात क्षत्रिय व वैश्य यांचा उपनयन संस्कार बंद झाल्यामुळे त्यांचे क्षत्रियत्व व वैश्यत्व नष्ट झाले असून ते आता शूद्र बनले आहेत ; याचाच अर्थ असा , की सर्व ब्राह्मणेतर हे आता शूद्र झाले आहेत ; स्वाभाविकच , तुकारामही शूद्र होत , अशी धर्मशास्त्रांची व त्यांना अनुसरणाऱ्या पंडितांची भूमिका होती . खरे तर आताचे ब्राह्मणही शूद्रच ! तुकारामांच्या या शूद्रत्वाचे काय परिणाम झाले , तिकडे वळण्यापूर्वी आणखी एका मुद्द्याचे संक्षिप्त विवेचन करणे आवश्यक आहे . शूद्रत्वाच्या बाबतीतील नियमांचा वापर शास्त्रीपंडित अत्यंत पक्षपाती वृत्तीने करीत होते , हा तो मुद्दा होय ......)
हा आरोप तात्कालिक धर्म ग्रंथाप्रमाणे कदाचित योग्य असेलहि परंतु विवेकाने विचार केला तर हि निव्वळ जबरदस्तीने लादलेला निवडा आहे. जी गोष्ट विवेकाला धरून नाहि ती गोष्ट स्वीकारायला लावणे किंवा बळजबरीने लादणे हा अन्यायाच आहे. तुकोबांनी संपूर्ण वेदच अयोग्य आहे असे कुठेही म्हंटले नाही, परंतु वेद हा गळून घ्यावा. चांगले ते स्वीकाराव. तुकोबांनी वेदांवर केलेलं भाष्य हे योग्यच. पण त्यानी काय भाष्य केले किंवा काय लिहील हे विचारात न घेता त्यानी केवळ वेदांवर भाष्य केले आणि लिहिले म्हणून त्यांना दोषी ठरवण्यात आले. एककल्ली न्यायव्यवस्थेचा बुरखा हा आ ह साळुंखेनी फाडला आहे.

२. तुकाराम क्षुद्र होते. ब्राह्मणांना शिष्यकरून घेण्याचा त्याना अधिकार नव्हता. पण त्यांनी काही ब्राह्मणांना शिष्य करून घेतले होते.
इंग्रजी मध्ये एक शब्द आहे “common-sense” आणि एक म्हणाहि आहे “Common sense is not always common” धर्मपीठाची गत हि अशीच काहीशी आहे. तुकारामांची कीर्ती अफाट होती. बहुजन तसेच ब्राह्मण वर्णातील अनेक लोकांवर त्यांच्या अभंगाचा प्रभाव होता. त्यामुळे बरेच लोक त्यांना गुरु मानायचे. आजही आपल्या देशाचे पंतप्रधान शरद पवारांना गुरु मानतात याचा अर्थ पवारांनी त्यांना शिष्य करून घेतले असा होत नाही. तुकारामांनी ब्राह्मणांना शिष्य करून नाही घेतले तर ब्राह्मणांनी त्यांना गुरु केले. तुकारामांनी तर त्यांच्या अभंगात म्हटले हि आहे कि माझी कोणतीही शिष्य शाखा नाही. आरोप असिद्ध तरीही

३. तुकाराम क्षुद्र होते. त्याना ब्राह्मणांकडून पाया पडून घेण्याचा अधिकार नव्हता. ब्राह्मण त्यांच्या पाया पडत होते.
हे हि वरील आरोपा सारखेच. मुळात कोणी कोणाच्या पाया पडायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न, त्यात धर्मशास्त्र किंवा न्यायव्यवस्था मध्ये आणणे म्हणजे मूर्खपणाच लक्षण. आपस्तंभ धर्मसुत्रात लिहिल्या प्रमाणे “एखाद्या ब्राह्मणाने अब्राह्मणाला वंदन केले, तर त्याने पृशाभाग तापेपर्यंत उन्हात गवतावर बसण्याचे प्रायश्चित घ्यावे”  या सुत्राला विवेकनिष्ठ विचारसरणीत काडीच महत्व नाही. जर कोणाला एखाद्याच्या पाया पडायचं असेल तर मी किती जणांना अडवणार आणि एखाद्याने पाय पडल तर त्यात ज्याच्या पाया पडले त्याचा दोष कसा? इथे हि COMMON SENSE ची कमतरता दिसते.
नानासाहेब पेशव्यांनी काढलेला वटहुकूम : नानासाहेब पेशव्याच्या कारकीर्दीत पुण्यात अभिमानी सोवळेपणाला बराच ऊत आला होता , असे दिसते . पेशव्यांच्या वाड्यात अगर पेशवे हजर असतील तेथे हरिकीर्तनप्रसंगी तुकारामी अभग कथेत म्हणू नये , असा दण्डक पडला होता . याला कारण काय ? तर तुकारामाचे अभंग म्हणजे शूद्रकवन ! त्याचा विटाळ सोवळ्या कीर्तनास नसावा । (सुबोध केकावली – पृ ३७ लेखक : बाळकृष्ण भिडे)

खटल्याचा निकाल: जेव्हा फिर्यादीच न्यायाधीश असतो तेव्हा...

तुकोबांच्या काळी सत्ता हि विजापूरच्या बादशहाची होती परंतु न्यायनिवाडा हा हिंदू ध्रार्माशास्त्रा प्रमाणे व्हायचा. साहजिकच धर्मग्रंथातील नियमांच्या विरुद्ध कार्य करणे हा गुन्हा होता. इथे एक गोष्ट विचार करण्यासारखी आहे ती म्हणजे चूक कोणाचीही असो निर्णय हा ब्राह्मणाच्या बाजूनेच द्यायचा अशी तरतूदच धर्मपीठाने केली होती. तुकोबांच्या खटल्यात फिर्यादीच न्यायाधीश होते. संदर्भ: केतकरकृत ज्ञानकोशाच्या वेदविद्याखंडात – “ब्राह्मण आणि अब्राह्मण यांच्या भांडणात न्यायाधेशाने नेहमी ब्राह्मणाच्या वतीनेच निकाल दिला पाहिजे, कारण ब्राह्मणाला कधी विरोध करता कामा नये” तसेच गौतम धर्मसूत्र म्हणते “ राजाची सर्वांवर सत्ता चालते, ब्राह्मणांना वगळून” . आरोप सिद्ध होण किंवा न होण हे गौणच होत. अपेक्षेप्रमाने तुकारामांना शिक्षा झाली.

पहिली शिक्षा : अभंगगाथा नदीत बुडवल्या
शिक्षा म्हणून तुकोबांच्या अभंगगाथा जबरदस्तीने बुडविण्यास त्यांना सांगण्यात आले. ज्या अभंगांनी बहुजनांचे प्रबोधन केले, आणि वैदिक सत्तेविरुद्ध विद्रोह केला ते सर्व अभंग इंद्रयनित बुडवले. अभंग म्हणजे तुकोबांच सर्वस्व होत. पण तुकारामांची ख्याती इतकी प्रचंड होती कि त्यांचे अभंग लोकांच्या जिभेवर असत त्यामुळे ३५० वर्षानंतर हि तुकारामाचे अभंग या विकृत शिक्षेनंतर तरले.

दुसरी शिक्षा : मृत्युनंतर तुकोबांच्या घरावर जप्ती आली आणि कुटुंबाला गाव सोडाव लागल
तुकारामच्या मृत्युनंतर त्यांच्या परिवाराचा हि छळ झाला. त्यांचा मृत्यूच मुळात संशयास्पद होता. तुकारामांचे राहते घर मंबाजी बुवा ने ताब्यात घेतले आणि त्यांच्या पत्नीला पोरा-बाळासोबत गाव सोडाव लागल. जवळ जवळ २५ वर्षानी जेव्हा छ. शिवाजी महाराजांची सत्ता आली तेव्हा तुकोबांची मुल मुळगावी परतली. तुकोबांचा मृत्यूझाला तेव्हा विजापूरच राज्य होत. राजकीय स्थिती पालटली हे पाहूनच तुकोबांची मुल गावी परतली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

कांदे पोहे कि सौदेबाजी....की विवाह संस्थेच फाऊंडेशन

 कांदे पोहे कि सौदेबाजी....की विवाह संस्थेच फाऊंडेशन   काही चांगल्या / कमावत्या मुलांची लग्न ठरत नाही मग ती मुलं किंवा त्याच्या घरचे मुलींना...