शुक्रवार, २६ जुलै, २०२४

हा समाज अतृप्त शापित आत्म्यासारखा आहे.

 हा समाज अतृप्त शापित आत्म्यासारखा आहे. 


लग्न झाले नव्हते तेव्हा संपूर्ण जगाला पडलेले प्रश्न "काळजीपोटी / गॉसिपिंग पोटी " : 

"लग्न कधी करणार ?आता २५  वय झालं .. आता ३० वय झालं "


लग्न झाले कि पुढचा प्रश्न "काळजीपोटी / गॉसिपिंग पोटी ": 

मुलं होणार कि नाही ? 

मुलाचं प्लॅनिंग कधी ? 

नेमका दोष कोणात ? 

मग वय झालं तर कराच ? 

अमुक डॉक्टरची अमुक ट्रीटमेंट ? IUI ?IVF? Ayurvedic?

नवस करा .. शांती करा 


संपूर्ण समाज असा react करतो आणि टोकाचे सल्ले देतात जसे कि, 

डिलिव्हरी करायलाच ते  येणार आहेत किंवा मुलांचे आजीवन सर्व खर्च 

 ते करणार आहेत. 


ऑफिस ला गेले तर कोणी तरी तिथे सल्ला देणार...  

नातेवाईकांसाठी तर चर्चेचा मुद्दा असल्यासारखा उत्साह असतो ... 

मित्र -मैत्रिणी तर जसे काय पहिला लग्न / पहिला  मुलं होण्याच्या स्पर्धेला जुंपलेली असतात.. 


जळीस्थळी काष्ठी  पाषाणी सतत सतत तेच तेच  विचारून समोरच्या व्यक्तीला ट्रिगर होऊ शकते. व्यक्ती प्रेशरने चुकीचा निर्णय घेऊ शकते. इतकाच जर समोरच्या व्यक्तीच्या  मनाचा इतकाच विचार करत असाल तर शांत राहून त्यांचे मन समजून घेण्याचा प्रयत्न करावा. 


"लग्न करणे न करणे" हा व्यक्तीचा पर्सनल निर्णय असतो. तसेच "मुलं होणं न होणं हि 

दोघांचा पर्सनल निर्णय आहे:  याच एक्सप्लेनेशन कोणालाच द्यायची गरज नसते.


बरं, ज्यांनी केलंय २२-३० मध्ये लग्न आणि मुलं पण जन्माला घातली.  नेमकं काय झालं त्यामुळे ? कोणता आमूलाग्र बदल झालाय ? 


समाजाच्या प्रेशरमुळे होणारी "लग्न" आणि "मुलं" यालाच भारतीय विवाह व्यवस्था आणि कुटुंब संस्था  असे म्हणतात. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

कांदे पोहे कि सौदेबाजी....की विवाह संस्थेच फाऊंडेशन

 कांदे पोहे कि सौदेबाजी....की विवाह संस्थेच फाऊंडेशन   काही चांगल्या / कमावत्या मुलांची लग्न ठरत नाही मग ती मुलं किंवा त्याच्या घरचे मुलींना...