हि एक शॉर्टफिल्म आहे. ज्यात एक साधारण वकील आहे जो... फॅमिली मॅटर्सवर छोटीमोठी कामे करतो. पण हाच वकील
कौटुंबिक हिंसाचार आणि इतर तत्सम प्रकरणांमध्ये महिलांसाठी उपलब्ध असलेल्या कायदेशीर मदतीबद्दल ऑनलाइन व्हिडिओ बनवीत असतो. यामुळे अनेक महिलांना कौटुंबिक हिंसाचार कायद्याबद्दल माहिती हि मिळत असते.
पण ते व्हिडीओ पाहून अनेक लॉचे विद्यार्थी आणि महिला त्या वकिलाकडे मार्गदर्शनासाठी येत असतात. एकूणच हे व्हिडीओ म्हणजेच त्या वकिलाची केसेस मिळविण्यासाठीची एक स्ट्रॅटेजी असते.
पण त्या पब्लिसीटीच्या नादाने एकदा एका कौटुंबिक हिंसाचार पीडित महिलेची गोपनीयता / प्रायव्हसीचा विचार न करता तिचा व्हिडीओ युट्युबला पब्लिश केला जातो. यामुळे त्या वकिलाला तर खूप प्रसिद्धी मिळते पण त्या पीडित महिलेला मात्र या सर्वच नाहक त्रास होतो. ती पुन्हा कधी कोर्टात येत नाही.
एक वकील म्हणून यातील अभिनेत्याचा खरा प्रवास इथूनच सुरु होतो. RIGHT TO PRIVACY - Article 21गोपनीयतेचा मूलभूत हक्क संविधानाने दिलेला आहे. पण स्वतःचा फायदा आणि प्रसिद्धी साठी अनेकदा या गोपनीयतेच्या हक्काची पायमल्ली होताना दिसते.
न्यूज चॅनेल आणि सोशलमीडिया हे इतके पॉवरफुल माध्यम आहे कि, TRP आणि views साठी याचा जितका फायदा तितकेच नुकसान लोकांच्या खाजगी आयुष्यात होत असेल हा विचार हि केला जात नाही.
पण या वकिलाच्या आयुष्यात या व्हिडीओ वाल्या घटनेनंतर एक अशी कौटुंबिक हिंसाचाराची केस येते. ज्यात त्याला स्वतःच्या चुकीची जाणीव हि होते व त्याची भरपाई करण्यास एक पाउल देखील उचलतो.
नेमके यात काय होते हे पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून पूर्ण शॉर्ट फिल्म फ्री अमॅझॉम मिनी टीव्ही वर पाहू शकता.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा