धरती,सागर आणि शिंपले - अमृता प्रीतम
स्त्रीच्या प्रेमाची व्याख्या आणि परिसिमा समजावून सांगणारं पुस्तक म्हणजे धरती, सागर आणि शिंपले. चेतना, चंपा, मीन्नी, शकुंतला आणि अम्मा या स्त्रियांच्या भावना पटलांना गुंफणारी हि कथा आहे. स्त्री ही प्रेम याच एका प्रवाहात गुरफटून आपल्या आयुष्यातला परमोच्च आनंद त्यागते, मग तिचा धरती सारखा कठोर प्रवास चालू होतो आणि जी आपल्यातल्या प्रेमाचा सागर बेधुंद चौफेरउधळून, मिळेल त्या प्रेमाच्या वाट्याला अगदी मनाच्या शिंपल्यात मोती म्हणुन आयुष्याच्या शेवटपर्यंत जपते, हेच या कथेतून अमृता प्रीतम यांनी स्पष्ट केले आहे. यातल्या प्रत्येक पात्राच्या घटना कशा एकमेकांना मिळत्या जुळत्या आहेत आणि यातून चेतनाच्या प्रेमाचा चालू असलेला प्रवास कसा एका वळणाला येऊन थांबतो, जिथे तिच्या त्यागाचे..... प्रेम सागरातील शिंपले बनतात, हे वाचून अनुभवनेच उचित राहील. एक पूर्ण चित्रपट उभा करते लेखिका आपल्या डोळ्यांसमोर. पुरुषांच्या मानसिकतेला ही योग्य पद्धतीने रंगवले गेले आहे. एकूणच अगदी हलकी फुलकी परंतु विचार करायला लावणारी ही कथा नक्कीच वाचनीय आहे...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा