रविवार, १२ जून, २०२२

वासुनाके शहराच्या प्रत्येक टोकावर असतात आपण फक्त त्याकडे दुर्लक्ष करत असतो कारण नाका म्हणजे आपल्याला गलिच्छ, अस्पृश्यच...

नाक्यावरच्या टवाळ, छपरी मंडळींचं पण एक जीवन असतं. ते ही समाजाचे घटक असतात. बऱ्याचदा चित्रपटातून दाखवलं जाणारं त्यांचं भावविश्व फार मर्यादित दाखवलं जातं. त्यांची शिवराळ भाषा, त्यांची शेरेबाजी, जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन, विचार करण्याची पद्धत, एकोपा आणि या सगळ्यात वेगळी म्हणजे माणूस म्हणून त्यांच्यात असलेला सच्चेपणा या सगळ्याचं वास्तववादी दर्शन घडवणारं पुस्तक म्हणजे "वासूनाका". पोक्या या पात्राला केंद्र बिंदू करून लिहिलेल्या या पुस्तकात मामु, मन्या, चम्या, अच्या, बाबल, केशरवडी, अशा अनेक पात्रांना तेवढाच न्याय देत कथा अगदी वाचकांपर्यंत पोहचते. भाऊ पाध्ये यांचं लिखाण अगदी विषयाला आणि आशयाला एकदम जुळणार आहे. अनेक ठिकाणी विनोदाचे फवारे आहेत. आपण यातले अनेक किस्से बऱ्याचदा आपल्या अवतीभवती कधीतरी घडल्याचे भासते. 
1960 च्य काळात चाललेली भाईगिरी, गँग पद्धत, नाक्या नाक्यावर असलेली मक्तेगिरी त्यातून होणाऱ्या मारामाऱ्या, गमती जमती आणि याच टवाळ नाक्यावरच्या पोरांमुळे लोकांना होणारी मदत अशा वेगवेगळ्या छटांचं वास्तव दर्शन घडवणारं पुस्तक म्हणजे "वासूनाका"..एक वेगळा विषय.. एक वेगळी कलाकृती...
पोक्या आणि त्याची टोळी चम्या,नम्या, मामू यांच्या टवाळक्या, मारामाऱ्या आणि बाकी लफडी करायचा नाका म्हणजे वासूनाका. मग त्यात दोन टोळीत हाणामारी, एखादी टवका दिसली की तिची छेड काढणे आणि अगदीच काहीच नाही तर वाळपाखाडी मधल्या घराघरातल्या लफड्यांची भंकसगिरी करणं हा ठरलेला वासुनाक्यावरचा कार्यक्रम. यातून अनेक गंभीर आणि गमती जमतीचे प्रकार यांच्या आयुष्यात घडतात. वाळपाखाडीत असलेल्या अनेकांची ही लोकं प्रकरण कशी उघडकीस आणतात? त्यासाठी काय काय करतात हे नक्कीच वाचण्यासारखं आहे. *सु" नावाच्या मुलीची एकूणच जगण्याची पद्धत आणि तिची प्रेमप्रकरण, केशरवड च नाक कसं कापल गेलं? यासाठी हे पुस्तक नक्की वाचावं. फिरकी या प्रकरणात बायजी नावाच्या Educate वाटणाऱ्या महिलेने या टवाळ पोरांची घेतलेली फिरकी पोट धरून नक्की हसवायला लावते. मामू म्हणजे नावाजलेला भाई पण अच्चा ने त्याला लगावलेली फाईट आणि दाखवलेली भाईगिरी मामू ला कशी भारी पडते? हे वाचण्यासारखं आहे. पोलिसांची पोलिसगिरी कशी असते हे पण यात वर्णन केलेलं आहे. एकूणच समाजाच्या मुख्य प्रवाहात न बसणारी यांची जीवनशैली हा ही समाजाचा एक भाग आहे आणि माणूस परिस्थितीमुळे कसा वाहत जाऊन नको त्या मार्गावर पोहचतो याचं वास्तववादी दर्शन घडवणारं लिखाण म्हणजे "वासूनाका"... कदाचित हे वासुनाके शहराच्या प्रत्येक टोकावर असतात आपण फक्त त्याकडे दुर्लक्ष करत असतो कारण नाका म्हणजे आपल्याला गलिच्छ, अस्पृश्यच...


लेखकाची ओळख :

दीपेश मोहिते, कल्याण, लेखकाला लिहायला, वाचायला आवडतं. निसर्ग भ्रमण, पक्षी निरीक्षण  करायची आवडं आहे


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

कांदे पोहे कि सौदेबाजी....की विवाह संस्थेच फाऊंडेशन

 कांदे पोहे कि सौदेबाजी....की विवाह संस्थेच फाऊंडेशन   काही चांगल्या / कमावत्या मुलांची लग्न ठरत नाही मग ती मुलं किंवा त्याच्या घरचे मुलींना...