शुक्रवार, २६ मार्च, २०२१

स्वप्न ( 2 minutes read )

 प्रत्येकाचे काही ना काही स्वप्न हे असतेच. कोण आयपीएस व्हायच स्वप्न पाहत असतो तर कोण मोठ्या कंपनी चा सीईओ व्हायच स्वप्न पाहत असतो. प्रत्येकाने अशी मोठी स्वप्ने पाहिलच पाहिजे. आयुष्यात जर मिळण्यासाठी एखाद लक्ष्य असेल एखाद स्वप्न असेल तर जगण्यात काही औरच नशा असते. पण ही स्वप्ने माणूस कसे ठरवतो. म्हणजे एखाद्याच  फेरारी गाडी घेण्याच स्वप्न असते. अस स्वप्न तो कस ठरवत असेल. या गोष्टी माणसे विचार करून अंतःप्रेरणेने ठरवत असतात का ?

संदर्भ : www.analyticsindiamag.com

स्वप्न प्रत्येकाने पहावे आणि ते पूर्ण करण्यासाठी झपाटून कामाला लागावे, अगदी भुकेणे कासावीस झालेला चित्ता जसा हरणांचा पाठलाग करतो अगदी तसंच पाठलाग माणसाने त्याच्या स्वप्नंचा करावा. पण ज्या ध्येयाचा(स्वप्न) पाठलाग आपण करत आहोत ते जर समाजप्रेरित असेल तर एकदा थांबून विचार करावा. त्याच कारणं म्हणजे परवा माझ्या सोबत घडलेली एक घटना. माझा एक मित्र आहे , त्याच स्वप्न आहे की त्याला एक महागडी गाडी घ्यायाची आहे. यांचा उल्लेख तो दिवसातून अनेक वेळा करत असतो (कदाचित सेल्फ हेल्प पुस्तकांचा अर्थ ना समजतात पुस्तकात जे म्हटले आहे तसे करण्याच्या सवयीमुळे असेल) . त्याला मी प्रश्न विचारला “ मित्रा असल्या महागड्या गाड्याच स्वप्न तू का पाहत आहेस?” त्यावर त्याने उत्तर दिल “ चांगला आयुष्य जगण्यासाठी गाडी, बंगला , नोकर-चाकर .. असायलाच हवेत”  “मग सुखाच काय ..? “ मी त्याला आणखीन एक प्रश्न केला. पण यावेळी त्याला नीटस उत्तर देता आले नाही. कारण त्याची स्वप्ने ही समाजिक दबावतून तयार झाली होती. इंग्रजी मध्ये त्याला “peer pressure” म्हणतात. बऱ्याच वेळा माणसाची स्वप्ने किंवा ध्येय ही आपण ज्यांच्या सोबत जास्त वेळ घालवत असतो आशा समूहाच्या कलेक्टिव विचारप्रवाहातून बनत असतात. त्या स्वप्नाची आणि स्वप्नातून मिळणाऱ्या सुखाची आनंदाची व्याख्याही कलेक्टिव असते. स्वप्न पाहणार ही कधीच ठरवत नसतो.

ज्या स्वप्नांच्या परिभाषेत सुखाची व्याख्या च बसत नसेल तर अशी स्वप्ने पाठलाग करण्यात काय अर्थ आहे. यांचा अर्थ असा नाही की लोकांनी गाडी बंगले घेऊन नयेत किंवा भौतिक सुखाची स्वप्ने पाहून नयेत. फक्त स्वप्नाचा पाठलाग करताना Standard of Life ची अपेक्षा करावी पण  Quality of Life ची उपेक्षा होऊ नये इतकच.  

४ टिप्पण्या:

  1. Khup Sundar manaane sukhi asave samdhan aapoaap milatech gadi bangla ghen vait nhi pn vrutti samadhani nakki asavi😊

    उत्तर द्याहटवा
  2. एकदम बरोबर लिहल आहेस . सध्या स्वप्नाचा पाठलाग करताना लोक जीवनाचा आनंद घ्यायला विसरतात👌 👍👍

    उत्तर द्याहटवा
  3. खर आहे खरी स्वप्ने ही आपले आयुष्य अधिक आनंदाने सुखाने जगण्यासाठी केलेले विचार आणि ते सस्त्यात उतरविण्यासाठी झटपट करतो तेच खरे स्वप्न असते.

    उत्तर द्याहटवा

कांदे पोहे कि सौदेबाजी....की विवाह संस्थेच फाऊंडेशन

 कांदे पोहे कि सौदेबाजी....की विवाह संस्थेच फाऊंडेशन   काही चांगल्या / कमावत्या मुलांची लग्न ठरत नाही मग ती मुलं किंवा त्याच्या घरचे मुलींना...