आ ह साळुंखे लिखित हा विद्रोहि तुकाराम या
पुस्तकाने तुकारामंकडे पाहायचा दृष्टीकोनच बदलला. पुस्तक विस्तार मोठा असल्या
कारणाने पुस्तक सारांश हा ५ भागात लिहिला. हा पाचवा आणि शेवटचा भाग.
तुकारामांचा मृत्यू कि हत्या ?
एखाद्या व्यक्तीच्या मोठेपणाचे मूल्यमापन
करायचे असेल , तर
ती व्यक्ती जगली कशी हे पाहणे जसे महत्त्वाचे असते , तसेच ती
व्यक्ती मृत्यूला सामोरी कशी गेली , हे पाहणेही आवश्यक असते
. सॉक्रेटीस , येशू ख्रिस्त , अब्राहम
लिंकन , भगतसिंग इ . महापुरुषांनी ज्या मूल्यासाठी व
ध्येयासाठी मृत्यू पत्करला , ती ध्येये व मूल्ये त्यांना एका
उच्च व उदात्त पातळीवर घेऊन जातात , यात शंका नाही . त्यानी
ज्या धैर्याने व ज्या पद्धतीने मरणाचे स्वागत केले , ते
धैर्य व ती पद्धत त्यांच्या माहात्म्याला अधिकच तेजोवलयांकित करते , हे स्पष्ट आहे . स्वाभाविकच , तुकारामांच्या
चरित्राचा कस तपासायचा असेल , तर त्यांच्याही मृत्यूचा अर्थ
नीट समजून घेणे आवश्यक आहे .
तुकारामांचा मृत्यू समजून घेऊ
तुकारामांचा मृत्यू कसा झाला यावर
वेगवेगळ्या विद्वानांनी वेगवेगळी कारणे दिली आहेत. वास्तविक तुकारामंचे पार्थिव
शारिराचे काय झाले याबद्दल कोणालाही काही माहित नाही, तरीसुद्धा विद्वानांनी
त्यावर अनेक तर्क-वितर्क लावले आहेत. “विद्रोही तुकाराम” मध्ये साळुंखेनी या सर्व
कारणांची चिकित्सक पद्धतीने मांडणी केली आहे. त्यातील काही कारणी पाहू.
१. इंद्रयानी काठी समाधी घेतली
१५०-२०० वर्षापूर्वी सापडलेल्या एका
पत्रावरून वि. ल. भावी यांनी हे कारण सांगितले. हे कारण जितके तर्कविसंगत आहे
तितकेच हास्यास्पद आहे. जर त्यानी समाधी घेतली असाती तर ती समाधी गायब कशी झाली.
जर समाधी बांधलीच असती तर त्यांच्या अभंगांनी प्रभावित झालेल्या असंख्य लोकांनी
जपली असती. मृत्यू नंतर तुकारामांनी टाळ आणि गोधडी पाठवली असेहि म्हटले जाते. असे
म्हणणे हे निसर्गानियामाच्या विरूद्धच आहे. जे पत्र सापडले तेही तुकारामच्या
मृत्यूनंतर लिहिले होते. म्हणजे इथे पत्रआणि समाधी दोन्ही तर्काला धरून नाही.
२. वैकुंठ गमन
संत तुकाराम नावाने एक जुना मराठी चित्रपट
आहे त्या तुकाराम ‘आम्ही जातो आमुच्या गावा, अमुचा राम राम घ्यावा” अस म्हणत
विष्णूने पाठवलेल्या विमानात बसतात आणि वैकुंठाला जातात. हेच सत्य आहे असे अनेक
लोकाना वाटत आले, मुळात त्याकाळी विमानाचा शोध लागला नव्हता आणि आता शोध जरी लागला
असला तरी वैकुंठाचा शोध अजूनही लागला नाहि. या करणाला कोणताही आधार नाही आणि
तुकारामचे दैवीकरण करून त्यांची मूळ शिकवण विसरवण्याच हे षडयंत्र होत. मुळात ज्या
माणसाचा चमत्कार वर विश्वास नाही त्या माणसाचा अंत चमत्कारिक असणे शक्यच नाही.
३. तीर्थयात्रेस निघून गेले?
देहू मध्ये देवपूजेत एका अभंगाची वही
सापडली त्याच्या आधारे तुकाराम कायमचे तीर्थयात्रेस निघून गेले. तसेच वाराणसी वरून
एक पत्र आली त्या पत्राचा पण याला आधार आहे अस सांगून तुकाराम तीर्थयात्रेला गेले
आणि तेथेच त्याचा मृत्य्यू झाला असे कारण सांगितले गेले. हे कथित पत्र तुकारामांनी
“मी वाराणसीस सुखरूप पोहचलो” हे सांगण्यासाठी लिहिले होते. हे कारण धादांत खोट
आहे. या दाव्यावर अनेक प्रश्न उपस्थित होऊ शकतात जेणेकरून हा दावा खोटा आहे हे
सिद्ध होत.
- पाहिला प्रश्न, जर तुकाराम ते सुखरूZप पोहचले असे पत्र पाठवतात तर ते न सांगता तीर्थयात्रेला का जातील?
- दुसरा प्रश्न, तुकारामच्या नावे खोटे अभंग रचून त्यांच्या मृत्यू सामान्य होता असे दहावले पण तुकाराम स्वतः चार वेगवेगळ्या अभंगात चार वेगवेगळी मृत्यूची कारणे का देतील?
- तिसरा प्रश्न, तीर्थक्षेत्रामध्ये नुसते “धोंडापाणी” असते असे विचार मांडणारे स्वतःच तीर्थ यात्रेला का जातील?
- चौथा प्रश्न, “काशीला देहाची विटंबना होते” असे परखड विचार मांडणारे स्वतःच शेवट काशीला करतील का?
तुकारामांची हत्या झाली होती का?
या व्यतिरिक्त हि अनेक कारणे दिली गेली
ज्याला ना कसला आधार होता ना त्यात कोणत तथ्य होत. मग तुकारामाचा मृत्यु कसा झाला.
तुकारामांच्या
मृत्यूच्या बाबतीत त्यांच्या समकालिकांपासून वर्तमानकाळातील लेखकांपर्यंत असंख्य
व्यक्तींनी आपली मते मांडली आहेत . या व्यक्तीपैकी विशेषत : वैदिक परंपरेतील
बहुतांश व्यक्ती या विषयाची खुलेपणाने चर्चा करीत नाहीत , असे आढळते . आपल्याला काही तरी लपवायचे आहे . या
कल्पनेचे एक भारी ओझे त्यांच्या मनावर आणि लेखणीवर आहे , हे सहजपणाने ध्यानात येते . त्यामुळे तुकारामांचा
काही घातपात तर झाला नाही ना या शंकेला खालील बाबींमुळे बळ येते
१. पत्रांचा बनाव कशासाठी – तुकारामांनी पत्र
पाठविले किंवा कोणत्यातरी एका जुन्या पत्राचा अधार घेणे या सर्व गोष्टी खोट्या
वाटतात किंवा रचलेल्या वाटतात. तुकारांमाचा मृत्यू कोणत्याही कारणाने झाला असू दे
पण मृत्युनंतर ते पत्र पाठवतीलच कसे. पाठवले
२. टाळ-गोधडी चा बनाव – जी गत पत्रांची तीच गत
टाळ गोधडी ची. मृत्युनंतर तुकारामांनी टाळ – गोधडी परत केली अस देहूतील लोकाना सांगण्यात
आल.हे नेमक कशासाठी केल गेल ?
३. खोटे अभंग – तुकारामांच्या नावने चार अभंग
आढळतात ज्यात त्यांनी स्वतःच्याच मृत्यूची चार वेगवेगळी कारणे सांगितले आहेत. एकाच
व्यक्ती चार वेळा कशी मारेल. कि खर कारण लपविण्यासाठी हे अभंग तुकारामच्या नावाने
खपवले गेले होते ?
४. हत्येच्या
शक्यतेचा उल्लेख का टाळतात? – तुकारामच्या नावे खोटे अभंग रचून त्याद्वारे त्यांचा
मृत्यू हा नैसर्गिक असल्याच दाखवलं गेल परंतु तुकाराम हयात असताना त्यांनी लिहिलेले
काही अभंग असे होते कि त्यावरून त्यांना त्यांच्यासोबत घातपात होण्याची शक्यताही
होती असे दिसते. मग त्या अभंगाकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले गेले असे म्हणायचे का?
५. मृत्युनंतरच्या घटना काय दर्शवितात - तुकारामांच्या
मृत्युनंतर त्यांच्या पत्नीला घर सोडावे लागले आणि मंबाजी भटाने त्यांच्या घरावर जप्ती आणली . या
दोन घटना काय दर्शवितात.
तुकारामांचे
विचार संपण्यासाठी त्यांच्या अभंगाच्या पोत्या नदित बुडवून त्यांच्या विचारांची
हत्या झाली. त्यांच्या अभंगात खोट्या अभंगांणा घुसवून तुकारामांमधील सहित्यिकाची
हत्या झाली. तुकारामांनी कर्जखाते बुडविले या घटनेला पळपुटेपणाचा रंग लावून
नैतिकतेची हत्या झाली. अन्याय विरुद्ध आवजा उठवण्याऱ्या आणि माणुसकी हाच धर्म
मानणाऱ्या सर्वांसाठी तुकाराम हे आदर्श आहेत. म्हणून त्यांच्याकडे केवळ अभंग रचणारा
संतया दृष्टीने न पाहता तात्कालिक शोषिणाधारित व्यवस्थेवर प्रहर करणाऱ्या एका
क्रांतिकारकाच्या दृष्टीने पाहायला हवे. बौद्धिक आणि मानसिक वांझपण झुगारून खऱ्या
तुकारामांना स्वीकारल पाहिजे, विद्रोही तुकारामाना स्वीकारल पाहिजे.
ReadingWall.com – Connecting Readers & Writers
उत्तर द्याहटवासोशल मिडिया वर तुम्ही प्रसिद्ध लेखकांपेकी एक आहातच, त्याचबरोबर तुम्हाला तुमचं लेखन जास्तीत जास्त वाचकांपर्यंत पोहोचवायला आवडेल का?
मग Reading Wall हे खास तुमच्यासाठीच तयार केलेले व्यासपीठ आहे.
www.ReadingWall.com काय आहे आणि त्यावर तुम्ही काय करू शकता?
• Reading Wall हे लेखक आणि वाचकांना जोडणारे व्यासपीठ आहे
• Reading Wall वरील Writers Club मध्ये तुम्ही सहभागी होऊन तुमचे सर्व लेखन तुमच्या वॉल वर पोस्ट करू शकता
• तुमचे लेखन जगभरातील वाचकांपर्यंत तुमच्या नावाखाली एकत्रित उपलब्ध असेल
• वाचकांना त्यांचे आवडते विषय किंवा त्यांचे आवडते लेखक follow करता येतात
• तुम्ही तुमच्या लेखनाची लिंक शेयर करू शकता
• तुमचे चाहते वाचक तसेच इतर लेखकांचे वाचक तुमच्या लेखनाला फॉलो करू शकतात
Reading Wall सुरू करण्यामागची संकल्पना -
• बऱ्याचवेळा लेखक ब्लॉग, वेबसाईट, सोशल मिडिया, वृत्तपत्र, नियतकालिकं, प्रिंट किंवा डिजिटल माध्यमातून लिहित असतात; पण अश्या सर्व लेखकांसाठी एक सामुदायिक व्यासपीठ उपलब्ध नाहीये.
• तुमचे लेखन कदाचित दुसऱ्या नावाने कॉपी केले जात असेल, नावात किंवा लिखाणात फेरफार करून पुन्हा वाचकांपर्यंत पाठवले जात असेल आणि तुम्हाला तुमच्या लेखनाचे श्रेय मिळत नसेल.
• सध्या तुमचे लिखाण हे मर्यादित वाचकांपर्यंत पोहोचत असेल. Reading Wall वर तुम्हाला इतर लेखकांचा वाचकवर्गपण उपलब्ध होऊ शकतो. अशा चोखंदळ वाचकांना विविध विषयांवर लेखन करणाऱ्या लेखकांचे वाचन एकत्रित उपलब्ध आहे.
• आपण जर आपले लिखाण laptop किंवा अन्य माध्यमांमध्ये जसे कि जुन्या काळातील फ्लॉपी डिस्क, सी.डी, डी.व्ही.डी, हार्ड ड्राईव्ह, पेन ड्राईव्ह मध्ये जतन करत असाल, तर तुमचे अमुल्य लिखाण काही काळानंतर सहजी उपलब्ध होऊ शकणार नाही कारण लेखन साठवण्याची हि technology खूप वेगाने बदलत आहे. शक्यता अशी असू शकते, कि आत्तापर्यंत आपण केलेले सर्व लिखाण हे एकाच ठिकाणी उपलब्ध नसेल किंवा वेगवेगळ्या माध्यमांमधून प्रकाशित झालेले असेल.
• सद्य परीस्थितीत उपलब्ध असेलेल्या वेळेचा फायदा घेऊन आपले सर्व लिखाण एकत्रितपणे Reading Wall वर वाचकांना उपलब्ध करून देऊ शकता. तुमचे आयुष्यभराचे सर्व एकत्रित लिखाण आपले नाव शोधून वाचकांना एकत्रित एका क्लिक वर उपलब्ध होऊ शकते किंवा आपल्या नावाच्या वॉलची लिंक तुम्ही वाचकांना पाठवू शकता.
• तुमच्या वॉल वर प्रत्येक लिखाणानंतर एक जाहिरात दाखवली जाईल. त्यातून येणाऱ्या उत्पनाचा वाटा तुमच्याबरोबर कसा शेयर केला जाईल याची सविस्तर माहिती नजीकच्या काळात आपणाला कळविली जाईल.
चला तर मग, तुमच्या वॉल वर तुमचे लिखाण पोस्ट करा आणि जास्तीत जास्त वाचकांना तुमच्या लेखनाचा आनंद द्या!
www.ReadingWall.com - Connecting Readers & Writers
ReadingWall.com – Connecting Readers & Writers
उत्तर द्याहटवानमस्कार,
सोशल मिडिया वर तुम्ही प्रसिद्ध लेखकांपेकी एक आहातच, त्याचबरोबर तुम्हाला तुमचं लेखन जास्तीत जास्त वाचकांपर्यंत पोहोचवायला नक्कीच आवडेल.
तुमच्या फेसबुक वॉलवरील तुमचे सर्व लोकांसाठी उपलब्ध असलेले लिखाण ReadingWall.com वर तुमच्या नावाने उपलब्ध करून द्यायला आवडेल.
कृपया तशी सहमती देऊन तुमच्या लिखाणाचा जास्तीत जास्त वाचकांना आनंद द्यावा हि नम्र विनंती.
धन्यवाद !!
रीडिंगवॉल टीम
www. ReadingWall.com - Connecting Readers & Writers