गुरुवार, २१ मे, २०२०

मंथन- ग्रामीण विकासाच्या खडतर प्रवासाचे वर्णन करणारा चित्रपट

मंथन- ग्रामीण विकासाच्या खडतर प्रवासाचे वर्णन करणारा चित्रपट 

काल सहज स्मिता पाटीलचे मुव्ही शोधत असताना, मंथन चित्रपट समोर आला आणि तो डाउनलोड केला.  चित्रपट पाहून पूर्ण झाल्यावर पहिली प्रतिक्रिया  आली कि, विकास क्षेत्रात (Devlopment Sector) काम करत असलेल्या प्रत्येकाने पाहण्यासारखा आणि शिकण्यासारखा हा चित्रपट आहे. 

गाव पातळीवर काम केलेल्या प्रत्येक डेवेलपमेंट प्रोफेशनल ला चित्रपटातील प्रत्येक प्रसंगशी जवळीक साधता येईल.  ग्रामीण भागात एखादा प्रकल्प सुरवात होण्यासाठी त्यानंतर तो प्रकल्प सुरु राहण्यासाठी कोणत्या प्रकारचे खडतर प्रयत्न करावे लागतात. याचे सत्य आणि वास्तविक वर्णन सुरेख पद्धतीने या चित्रपटात दिसून येईल. गुजरातमधील खेडा जिल्ह्यातील एका गावात नवीनच प्रकल्प सुरु करताना स्थानिक लोकांचा अविश्वास दूर करणे,  विश्वास निर्माण करण्याची  धडपड, डेअरीचे  महत्व सांगणे, गट स्थापन करणे,  स्थानिक राजकारण , जातीयवाद, जातीय विषमता, महिलांचे मागासलेपण,  महिला सक्षमीकरण, सावकाराचा विरोध, गटबाजी काम, अफवा इ. असे अनेक चढ-उतार या चित्रपटाच्या माध्यमातून उत्तम रीतीने मांडले आहे. गिरीश कर्नाड, स्मिता पाटील, नसरुद्दिन शहा, मोहन आगाशे , अमरीश पुरी आणि इतर कलाकारांनी   उत्कंठा वाढवणारा अभिनय केला आहे.  तसेच स्मिता पाटील आणि नसरुद्दीन शहा यांनी ज्याप्रकारे भाषेचा लहेजा अंगीकाराला आहे त्यावरून त्यांचा अभिनय अधिक जिवंत वाटतो.
 बेनगल यांनी हा चित्रपट दिग्दर्शन केला आहे. .     या चित्रपटाची पटकथा विजय तेंडूलकर यांनी लिहिली. सवांद कैफी आजमी यांनी लिहिले.  या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाले आहेत.  विजय तेंडूलकर यानाही या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. 
 श्वेत क्रांतीचे जनक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डॉ. वर्गीज कुरियन यांच्या सहकार चळवळीवर आधारित हा चित्रपट आहे. या चित्रपटात डॉ. वर्गीज कुरियन याचं नाव डॉ. राव  (गिरीश कर्नाड)म्हणून भूमिका साकारली आहे. स्मिता पाटील यांनी बिंदू नामक हरिजन समाजातील स्त्री ची भूमिका साकारली आहे. नसरुद्दिन शहा ‘भोला ‘ नामक हरिजन समाजातील एक नेतृत्व करणारा दाखविला आहे. अमरीश पुरी ‘मिश्रा’ नामक एका सावकाराच्या  भूमिकेत सत्ताधारी पक्षाच्या भूमिकेत दिसून येईल. इतर हि कलाकार यांनी अप्रतिम कथानक स्वीकारलेले दिसतात. 
हा भारतातील पहिला Community Funded चित्रपट आहे. या चित्रपट निर्मितीला आर्थिक सहाय्याची अडचण येत होती. तेव्हा डॉ. कुरियन यांनी  अमूल ’आणंद’ येथील ५ लाख शेतकर्यांची  बैठक घेतली.   ज्यात प्रत्येक शेतकर्याने   २ रुपये  आर्थिक सहाय्यामुळे हा चित्रपट बनविणे शक्य झाले.   
या चित्रपटात एक अतिशय मोहक अर्थपूर्ण गाणे आहे जे सारखे सारखे ऐकू वाटेल. चित्रपटाची सुरवात आणि शेवट याच गाण्याने केला आहे.  सुरवातीला या गाण्यातून गावाचे कौतुक दिसून येईल. 
मेरो गाम काठा पारे ... जहां दूध की नदियां बाहे
जहां कोयल टहूको गाये... म्हारे घर अंगना न भूलो ना

खालील लिंक वर हा चित्रपट पाहता येईल.
YOU TUBE LINK : https://youtu.be/91qliAxU1pA

अंजली प्रविण

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

कांदे पोहे कि सौदेबाजी....की विवाह संस्थेच फाऊंडेशन

 कांदे पोहे कि सौदेबाजी....की विवाह संस्थेच फाऊंडेशन   काही चांगल्या / कमावत्या मुलांची लग्न ठरत नाही मग ती मुलं किंवा त्याच्या घरचे मुलींना...