कोरोनाशी सार जग
लढत आहे. देशातही प्रत्येक राज्य आपापल्या परीने कोरोनाशी दोन हात करत आहेत. याच
पार्श्वभूमीवर भारतीय रिजर्व्ह बँकेचे पूर्व गव्हर्नर श्री. रघुराम राजन यांनी
कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांना दिलेल्या मुलाखतीत अनेक महत्वाचे मुद्दे मांडले
आहेत. राहुल गांधी यांनी मुलाखत घेतली म्हणून ती राजकीयच असेल असे पाहण्यापेक्षा रघुराम राजन यांनी उपस्थित केलेलं प्रश्न खूप
महत्वाचे आहेत या दृष्टीने पाहणे गरजेचे आहे. त्यानी मांडलेले मुद्दे खालील
प्रमाणे.
लॉकडाऊन
लॉकडाऊन च्या ३ ऱ्या टप्प्यात आपण आहोत, सतत लॉकडाऊन वाढवत
राहिल्याने यंत्रणेची विश्वासाहर्ताता कमी होईल. लॉकडाऊन केवळ गतिरोधक आहेत्याने
कोरोना शून्य होणे शक्य नाही. तो शून्य होईपर्यंत टाळेबंदी ठेवणे देशाला परवडणारे
नाही. देशाचे अर्थाचाक्र
काळजीपूर्वक आणि योग्यरीतीने चालू करणे गरजेचे आहे.
कोरोनच्या चाचण्या
देशात ज्या गतीने चाचण्या होत आहेत त्या पुरेशा नाहीत. त्यामुळे
चाचण्यांचा वेग वाढवणे गरजेचे आहे. राजन यांनी मास टेस्टिंग चा पर्याय सुचविला
आहे. १००० चे sample घेऊन चाचण्या घेण आवश्यक आहे. देशात दिवसाला २० ते ३० हजार
चाचण्या होता आहेत त्या पुरेशा नाहीत. अमेरिकेत आपल्यापेक्षा ४ पट कमी लोकसंख्या
आहेत पण ते दिवसाला २ लाख टेस्ट करत आहेत.
देशाची अर्थव्यवस्था
देशाची अर्थव्यवस्था पुन्हा चालू करणे गरजेचे आहे, आतासारख्या
घटना क्वचितच कोणाच्या फायद्याच्या ठरतात. परंतु आपले उद्योगधंदे जगापर्यंत
पोहोचवण्याची भारताकडे उत्तम संधी आहे आणि जागतिक स्तरावर भारत एक मोठी भूमिका
साकारू शकतो. आपल्याला लवकरच अर्थव्यवस्थेचं चक्र पुन्हा सुरू करावं लाहेल.
आपल्याकडे इतर देशांप्रमाणे भक्कम अर्थव्यवस्था नाही. सध्या जी माहिती समोर येत
आहे ती चिंताजनक आहे. १० कोटी लोकांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण होईल असं
सीएनआयईनं सांगितलं आहे. त्यासाठी आपल्याला उपाययोजनाही कराव्या लागणार असल्याचं
राजन यांनी सांगितलं.
गरीब आणि मजूर वर्गा
देशात सध्या स्थलांतरित मजुरांची आणि गरीब वर्गाची
परिस्थिती खूप खालावलेली आहे. त्यासाठी रू ६५००० करोड इतका निधी गरजेचा आहे. देशाचा
GDP हा रू. २ लाख कोरोड आहे. त्यामुळे रू. ६५००० करोड खर्च करायला काही हरकत नाही.
मध्यमवर्ग
आपल्याकडे लोकांचं जीवनमान उंचावण्यासाठी एकउत्तम मार्ग आहे.
आरोग्य, जीवनावश्यक वस्तू आणि शिक्षण यासारख्या गोष्टींवर अनेक राज्यांनी उत्तम काम केलं आहे.
परंतु मध्यम वर्ग आणि निम्न मध्यमवर्गातील ज्या लोकांकडे चांगल्या नोकऱ्या नसतील
त्यांच्यासमोर मात्र मोठं आव्हान असेल. सर्वांसाठी नव्या संधी उपलब्ध झाल्या
पाहिजेत. केवळ सरकारी नोकरीवर आता अवलंबून राहणं चालणार नाही," असंही राजन यांनी
स्पष्ट केलं.
सामाजिक आरोग्य
देशात सध्या चालू असलेले सांप्रदायिक वाद यावर भाष्य करताना
राजन म्हणाले कि देशाला बिकट परिस्थितीत एकत्र राहणे गरजेचे आहे. सध्याच्या
परिस्थितीत तर विधाजन न परवडणार आहे.
या सर्वांचा सरकार गांभीर्याने विचार करेल कि नाही हि शंका
आहे. पण यावरून राहुल गांधीवर ट्रोलधाड पडेल हे नक्की. अशीच ट्रोलधाड त्यानी
व्यक्त कोरोन बाबत व्यक्त केलेल्या चिंतेवर हि झाली होती आणि त्यानंतरची परिस्थिती
सर्वश्रुत आहे. असो सरकार राजन यांचे मुद्दे गांभीर्याने घेईल अशे भाबडी अशा
ठेवायला काही हरकत नाही.
प्रविण अंजली
appropriate article
उत्तर द्याहटवा