हलाला
स्त्री मनाचा घेतलेला मागोवा, एका पतीचं पत्नी साठी चा विरह आणि त्या दोघांना एकत्र येण्यासाठी पुढाकार घेणार मौलवी यांच्यातील त्रिकोणी प्रेमकथा म्हणजे हलाला.
रागाच्या भरात खुदुस (प्रियदर्शन जाधव) ने पत्नी हालीम (प्रीतम कंगे)ला तलाक दिला. तरीही त्याचे बायको वरचे प्रेम जीवापाड होते. बायको ही पतीवर तितकेच प्रेम करायची. खुदुस निर्णय घेतो की हालीम ला पुन्हा नांदवायचे, तसं तो हालीम च्या बापाला सांगतो. पण तिथे मध्ये येतो हलाला.
एकदा तलाक दिल्यानंतर जर पतीला पुन्हा त्याच पत्नीशी लग्न करायचं असेल तर त्या तलाकशुदा पत्नी ला दुसऱ्या पुरुषा सोबत निकाह करून तीन महिने नंदायाच असते.
खुदुस ला हालीम सोबत पुन्हा संसार थाटायचा असतो पण त्यासाठी हलालाची जाचक बंधन पाळावी लागणार होती. हलाला पाळण्या साठीं नाईलाजाने खुदुस तयार झाला, पण हालीमच मत कोणीच विचारात घेतले नाही. अखेर हालीमशी तीन महिण्याकरता आणि हालीम-खुदुस या दोघांना एकत्र आणण्यासाठी गावातील मौलवी (चिन्मय मांडलेकर) निकहास तयार होतो. पहिलें दोन महिने दोन तलाक होतात. या दोन महिन्यात खुदुस ही आपल्या नव्याने सुरू होणाऱ्या संसाराच्या स्वप्नात रममाण होतो. संसाराला लागणारे सार सामना, भांडी-कुंडी, कपडेलता वैगरे ची खरेदी अगदी जोमाने चालू असते. खुदुस च्या मनात हालीम च्या प्रेमाच्या कारंज्या फुटत असतात, एखाद्या चातकासारखी तो हालीमला देणाऱ्या तिसऱ्या तलाकची वाट पाहात असतो.
तिकडे त्या सज्जन मौलवीच्या मनात दबून बसलेलं प्रेम हळूहळू उमलत होत.
पण हालीम च्या मनातली सल, तिच्या स्वतःच्या आयुष्या बद्दल च्या भावना आणि तीच मत याचा विचारच कोणाला येत नव्हता.प्रत्येक जण जनरीती (?) प्रमाणे वागत होता, आपापल्या जागी प्रत्येक जण खरा होता.
आईला मुलीचं समाजमान्य सुख हवं होतं, बापाला उरलेल्या मुलींचं लग्न लावून द्यायचं होत, खुदुस ला हालीम सोबत पुन्हा संसार थाटायचा होता, मौलावीला हालीम ला तलाक देऊन स्वतःचा शब्द पाळायचा होता आणि लोकांना धर्म पाळायचा होता.
पण हालीमच काय?
स्त्री मनाचा ठाव घेण्यात हा धर्म सपशेल अपयशी ठरला होता.
प्रवीण अंजली
खूप सुंदर
उत्तर द्याहटवाKharch sriyanchya mnacha vichar krnar khup kami lok astat
उत्तर द्याहटवाstriyana hi man ast hech konachya lakshat nast. baki lekh tya chitrpata pramane chan ahe
उत्तर द्याहटवा