सिद्धार्थ हे हेरमन हेस्से लिखित पुस्तक आहे. आतापर्यंत जेवढी अध्यात्मावर आधारित कांदबरी प्रकाशित झाल्या असतील त्यापैकी सिद्धार्थ हि लोकप्रिय अशी कादंबरी आहे. हे पुस्तक मुळ जर्मन भाषेत १९५१ साली प्रकाशित करण्यात आल. नंतर त्याचे इंग्रजी, हिंदी अशा अनेक भाषेत भाषांतरे झाली. एक गैरसमज असा आहे कि सिद्धार्थ हे गौतम बुद्धांवर आधारित पुस्तक आहे. पण तसे काही नाही. बुद्धांचा उल्लेख या पुस्तकात अनेक ठिकाणी झालाय पण हे पुस्तक बुद्धांवर नाही.
सिद्धार्थ हि कादंबरी सिद्धार्थ नावाच्या एका ब्राह्मण मुलाच्या अध्यात्मिक प्रवासाचे वर्णन आहे. पुस्तकात एकूण ८ पात्र आहेत. सिद्धार्थ , त्याचा मित्र गोविंदा, गौतम (बुद्ध), सिद्धार्थची प्रेयसी कमला, व्यापारी कामास्वमी, नावाडी वासुदेव, सिद्धार्थचा मुलगा आणि नदी. सिद्धार्थ आणि गोविंदा हे लहानपणापासून मित्र असतात. दोघही ब्राह्मण घरातले त्यामुळे दोघांच बालपण हे वेद, उपनिषदे, मंत्रपठन, पूजा-अर्चा इ मध्ये गेलेल असत. सिद्धार्थ या सर्वात हुशार होता, गोविंदाला नेहमी वाटे सिद्धार्थ काय सामान्य ब्राह्मण नाही त्यामध्ये काहीतरी निश्चित वेगळ आहे. सिद्धार्थला ला सत्य शोधायचं असत? त्याला मोक्ष , निर्वाणा, आत्मज्ञान म्हणजे काय हे जाणून घ्यायचं असत ? त्याला ते अनुभवायचं होत. तशी त्याने वडिलांकडे इच्छा प्रकट केली आणि घर सोडायची परवानगी मागितली. मुलगा हट्टाला पेटलाय म्हटल्यावर बापाने जड अंतकरणाने परवानगी दिली. गोविंद हि त्याच्यासोबत घर सोडून सत्य शोधायला बाहेर पडला.
वाटेत त्यांना श्रमण (संन्यासी) समूह दिसला. त्यांच्याकडे दोघांनी तीन वर्षे काढली. दिवसभर स्वतःसाठी आणि आपल्या गुरु साठी भिक्षा मागून पोट भरायचं आणि ध्यान करायचं. तीन वर्षे अर्ध्यापोटी, अनेक हाल सहन करत त्यांचा सत्याकडे जाण्याचा प्रवास चालूच असतो. सिद्धार्थ भूख राहतो, अर्धनग्न अवस्थेत दिवस काढतो, ध्यान-धारणा करतो, दाढी-जटा वाढवतो, पण त्याला आतून समाधान मिळत नसत. तो इतर सर्व श्रमणामध्ये सर्वात हुशार असतो आणि ध्यानधरणाच्या कलेत निपुण असतो. पण त्याच्या मनात एक विचार येतो कि सर्वात वरिष्ठ श्रमनाचे वय हे साधारणतः ६०-७० वर्षे असेल पण त्यालाही अजून पर्यंत अध्यात्मिक आत्मज्ञान (spiritual enlightenment.) मिळाले नाही. शेवटी सिद्धार्थला कळते कि असे कष्ट सहन करून काही होणार नाही आपल्या श्रमणसोबत राहून अध्यात्मिक आत्मज्ञान मिळणार नाही. आपल्याला दुसरा मार्ग शोधावा लागेल.
त्याचवेळी भारतात गौतम बुधाविषयी चर्चा चालू असायची. कोण म्हणत होत कि तो चमत्कार करतो, कोण म्हणत होत कि तो धर्माचा उपदेश देतो तर कोण म्हणत होत कि तो आत्मज्ञान देतो. कोण त्याची प्रशंसा करत होत तर कोण त्याची निंदा करत होत. अशीच चर्चा सिद्धार्थ आणि गोविंदाच्या कानावर पडली. दोघही बुद्धाकडे जायच ठरवतात आणि तसाच निर्णय श्रमणाना सांगतात. त्यावर वरिष्ठ श्रमण असंतोष प्रकट करतात पण सिद्धार्तच कमालीच मौन त्यांना निरुत्तर करत किंवा संमोहित करत. ते दोघेही श्रमणाना सोडून बुद्धाकडे निघतात
गौतम बुद्ध जिथे एका शिबीरात प्रवचण देत असतात तिथे दोघेही पोहचतात. अष्टांगमार्ग, शील वैगरे सारख्या गोष्टी खुद्द गौतमच्या तोंडून ते ऐकतात. दोघानाही त्या गोष्टी पटतात. पण सिद्धार्तच समाधान होत नाही. गोविंदा बुद्धाच्या मार्गावर जायला तयार होतो. सिद्धार्थाला बुद्धांच्या शिकवणीत विसंगती आढळते. भौतिक जगापासून लांब राहून सत्य कसे शोधणार असा विचार त्याच्या मनात येतो. त्याला हव असलेल आत्मज्ञान, सत्य बुद्धांकडून मिळणार नाही हे त्याला जाणवत. खरतर आता गुरु शोधण्यात काही अर्थ नाही असे सिद्धार्थला वाटत असते. त्याला स्वतःचा मार्ग शोधायचा असतो. त्याला आता कोणी गुरु नको असतो. बुद्धांची कोणतेही शिकवण न नाकारता स्वतःच विचार बुद्धांसमोर मांडून, बुद्धांचा आणि गोविंदाचा निरोप घेउन एकटा प्रवास चालू ठेवतो.
सिद्धार्थ आता ध्यान आणि अध्यात्मिक शोध यांपासून मुक्त होतो. आता त्याला शारीरिक आनंद आणि भौतिक जगापासून सत्य आत्मज्ञान शिकायाच असत. सिद्धार्थला प्रवासात एक वासुदेव नावाचा नावाडी होडीने नदी पार करून देतो आणि बदल्यात त्याच्याकडून काहीच घेत नाही. मुळात सिद्धार्थ कडे काहीच नसत देण्यासाठी. वासुदेव त्याला म्हणतो तू जेव्हा पुन्हा येशील तेंव्हा दे. सिद्धार्थ त्याला विचारतो कि तू कसे खात्रीने सांगू शकतोस कि मी इथे पुन्हा येईन. तेव्हा वासुदेव म्हणतो या नदीकडून मी एक गोष्ट शिकलो आहे. जी गोष्ट जाते ती पुन्हा येते. वासुदेवाचे आभार मानून सिद्धार्थ निघतो.
पुढे तो एका शहरात जातो जिथे त्याची भेट कमला नावाच्या एका सुंदर वेश्येशी होते. सिद्धार्थला तिच्याकडूण “प्रेम” शिकायचं असत. तो तिला म्हणतो कि “जस एखादा दगड पाण्यात टाकल्यावर वेगाने तळ गाठतो तसेच जेव्हा सिद्धार्थ कडे त्याचे ध्येय असते. सिद्धार्थ काही नाही करत. तो फक्त विचार करत, प्रतीक्षा करतो आणि उपवास करतो.” पण कमला त्याच्या या संभाषण कौशल्यावर जरी भाळली तरी ती त्याला लगेच प्रेम देत नाही. ती त्याला भौतिकगोष्टीची मागणी करते जे त्याच्याकडे नसते. कमलाला माहित असते कि सिद्धार्थ भौतिकजगासाठी योग्य नाही. ती त्याला कामास्वमी नावाच्या व्यापाराकडे काम करण्यासाठी मानवते . तो पुढे कामास्वमी ला भेटतो त्याच्याकडे काम करत करत त्याचा व्यापार शिकतो आणि खूप श्रीमंत होतो. त्याला व्यापारातले ज्ञान मिळते.
त्याच्याआजूबाजूला सर्व भौतिक सुख असतात , तो श्रीमंतीत लोळत असतो. वासना, द्वेष, मदिरा, मत्सर इ. सार्यांनी त्याला वेढून टाकलेले असत. तो दिवसेंदिवस या चक्रात अडकत असतो. प्रणय आणि मदिरात पूर्णपणे बुडालेला असतो. त्याचे मन असत असमाधानी असते, चिडचिड वाढलेली असते आणि घमेंडतर वरच्यास्तराला असते.
सत्याच्या, आत्मज्ञानाच्या शोधात निघालेला तरुण असा सोन्याच्या पिंजऱ्यात अडकलेला असतो. अशाच एका रात्री त्याला स्वत्वाची जाणीव होते आणि तो पुन्हा भौतिक आयुष्य सोडूण तीच नदी येई पर्यंत चालत असतो. डोक्यात आत्महत्येचा विचार घोंघावत असतो. नदी किनारी आल्यावर तो एका झाडाखाली शांत, निपचित पडून राहतो. कदाचित बऱ्याच दिवसानंतर त्याला अशी झोप मिळालेली असते. तो गाढ झोपेत असताना तिथे त्याचा मित्र गोविंद येतो. कोणाला तरी झोपलेलं पाहून तो सिद्धार्थजवळ येतो. सिद्धार्थाच्या अंगावर शाही कपडे असतात. त्यामुळे तो सिद्धार्ताला ओळखत नाही. एवढ्या भयाण जंगलात त्या झोपणाऱ्याला साप, विंचू डसू शकतो म्हणून त्याची झोप ण मोड करता त्याच्या संरक्षणासाठी त्याच्या बाजूलाच बसून राहतो. सिद्धार्थला जाग आल्यावर गोविंद त्याला ओळखतो . सिद्धार्थ त्याला म्हणतो मी आता ना श्रमण आहे ना श्रीमंत आहे. मी सध्या तोच सिद्धार्थ आहे जो आत्मज्ञान पासून सत्यापासून दूर आहे. गोविंद लगेच त्याचा निरोप घेतो आणि स्वतःच्या पुढच्या प्रवासाला लागतो. सिद्धार्थ त्या नदीकिनारी तसाच बसून राहतो.
Source: Pinterest |
त्या नदीकिनारी वासुदेव आपली बोट घेऊन येतो. सिद्धार्थ त्याच बोटीने ती नदी पार करतो. हि तीच नदी आहे जी पार करून सिद्धार्थ भौतिक जगात प्रवेश करतो आणि त्याच नदीतूण भौतिक जगापासून दूर जातो. वासुदेव त्याला म्हणतो तू जी शांती, सत्य शोधात आहेस ते तर मला या नदीने दिले आहे. हि नदी गेली अनेक वर्ष मला गुरुसारखी शिकवत असते. मी तिला ऐकत असतो. सिद्धार्थलाही हि हि ऐकण्याची कला शिकायची असते. वासुदेव सिद्धार्थला स्वतः सोबत ठेवतो. सिद्धार्थ आता नावाडी होतो आणि दररोज सायंकाळी नदीला ऐकत असतो. नदीकडून त्याल अध्यात्मिक आत्मज्ञान मिळत असत. नदीकिनारी बसता बसता तो आयुष्याच विचार करत असतो, त्याल नदीच्या अवाजात ओम ऐकू येत असते.
काही दिवसांनी बातमी येते कि गौतम बुद्ध आपले शरीर सोडत आहेत त्यांचा मृत्यू जवळ आला आहे. अनेक लोक त्यांच्या दर्शनासाठी दुरून येत होते. कमला सुद्धा आपल्या मुलासोबत दर्शनाला जात होती. ती नदी पार करण्यासाठी मुलासोबत चालली असताना एक विषारी साप तिला चावतो आणि तिचा त्यातच मृत्यू होतो. तो मुलगा आता सिद्धार्थ जवळ राहत असतो. पण त्या मुलाला सिद्धार्थचा भरपूर राग येत असतो. मुलाला ऐशोराम च आयुष्य जगायची सवय असते. पण सिद्धार्थ ते त्याला देऊ शकत नव्हता. तो मुलगा सतत सिद्धार्थचा अपमान करायचा. पण सिद्धार्थ काय त्या मुलाला सोडायला तयार नव्हता. एके रात्री तो मुलगा सिद्धार्थ आणि वासुदेव जवळचे सर्व पासिये घेऊन पसार झाला. सिद्धार्थ त्याचा शोध घेत त्याच जुन्या शहरापर्यंत आला. त्याच्या मागून वासुदेव हि आला. पण सिद्धार्थला जाणवत होत कि त्याचं वडिलांना काय वाटल असेल जेव्हा सिद्धार्थ असाच घर सोडून गेला होता. सिद्धार्थला आता कळून चुकल कि मुलाचा पाठलाग व्यर्थ आहे. वासुदेव सिद्धार्थ घेऊन पुन्हा नदीजवळ आला.
नदीने सिद्धार्थला खूप शिकवलं होत. हे सर्व प्रसंग अनुभवून सिद्धार्थ ला एक धडा मिळतो “ज्याप्रमाणे नदीचे पाणी समुद्राला मिळते आणि पावसाने ते पुन्हा नदीलाच मिळते त्याच प्रकारे जीवनचक्र हे एकमेकांशी परस्परजोडलेले असते कि ज्याचा ना अंत असतो ना सुरवात. जन्म आणि मृत्यू हे सर्व चिरंतन ऐक्याचे भाग आहेत. जीवन आणि मृत्यू, आनंद आणि दु: ख, चांगले आणि वाईट हे सर्व एक भाग आहेत आणि जीवनाचा अर्थ समजणे आवश्यक आहे.” सिद्धार्थला नदीकडून असे धडे मिळत असतात. वासुदेव सुद्धा सिद्धार्थला आपली नाव देऊन वनात जातो.
कादंबरी संपते गोविंदाच्या भेटीने. गोविंदा नदीकडे परतत असतो. त्याचा शोध हा चालूच होता. नदीकिनारी त्याला विद्वान भेटतो. प्रथम त्याला ओळखता येत नाही पण थोड्यावेळाने कळत कि हा तर सिद्धार्थ आहे. गोविंदा अजूनही बुद्धाच्या मार्गावर चालत होता. गोविंदाल सिद्धार्थप्रमाणे आत्मज्ञान मिळाल नव्हत. त्याने सिद्धार्थला त्याला जे काही मिळाल आहे ते शिकवण्याची विनंती केली. तेव्हा सिद्धार्थाने त्याला कळलेले सत्य सांगितले. आत्मज्ञान हे तो किंवा इतर कोणीही शिकवू शकत नाही. कोणताही शाब्दिक स्पष्टीकरण हे त्यासाठी मर्यादित आहे आणि ते कोणालाही समजावता येत नाही. ते फक्त अनुभवातून शिकता येत. शेवटी दोघानाही आध्यत्मिक आत्मज्ञान चे सत्य अनुभवायला मिळते, कि ज्याचा शोध ते त्यांच्या युवा अवस्थेत करत होते.
प्रविण अंजली
यावर शशी कपूर सिम्मीचा चित्रपट आहे
उत्तर द्याहटवाधन्यवाद,
हटवाकृपया ब्लोग ला फोलो करा
https://youtu.be/gQubCVHF_s4
उत्तर द्याहटवा👌👌👌👍👍
उत्तर द्याहटवा👌👌👍
उत्तर द्याहटवा��������
उत्तर द्याहटवा