माणस जपत यशाकडे वाटचाल करणारा “मुसाफिर”
आज पर्यंत अनेक महान व्यक्तींचे आत्मचरित्र वाचले. गांधी, मार्क्स, सावरकर, विवेकानंद, हेलन केलर, आल्बेट एलीस, बिल गेट्स ..... अशा अनेकांची आत्मचरित्र वाचली. प्रत्येक व्यक्तिमत्व वेगळ आणि स्वताच्या क्षेत्रात यशस्वी होत. पण या सर्व आत्मचरित्रात भावलं ते अच्युत गोडबोले याचं मुसाफिर. मुसाफिर वाचताना पुस्तक वाचतोय अस वाटलच नाही. प्रत्येक वेळी लेखक संवाद सादतोय असेच वाटत राहील. इतक सरळ, साध आणि सोप लिखाण आहे. कुठेही उगाच अलंकृत भाषेचा भडीमार नाही. कोणत्याही वयोगटातील व्यक्तीला कळेल आणि भावेल अस अच्युत गोडबोले यांचे आत्मचरित्र “मुसाफिर”. गरज वाटेल तिथे नेहमीच्या वापरातले इंग्रजी शब्द वापरून आत्मचरित्र रीडरफ्रेंडली झाले असेच म्हणावे लागेल.
मुसाफिरला मी निव्वळ आत्मचरित्र नाही म्हणणार. मुसाफिर वाचताना गेल्या ६०-७० वर्षातील सामाजिक, भौगोलिक आणि राजकीय बदलांची झलक हि पाहायला मिळते. लहान गावासारख सोलापूरच वर्णन, मुंबईतल्या ट्राम्स, त्यावेळेच्या लोकल्स, इराण्यांची हॉटेल्स, नंदुरबार येथी भिल्ल आदिवासी इतिहास आणि संकृती, गिरणी कामगारांचा संप, देश-विदेशात घडत असणारे बदल ..... एक एक पान उलटत जात तस त्यावेळेच्या सामाजिक-राजकीय परिस्थीतीच एक पटल खुलत जात.
मुसाफिर मध्ये असे अनेक प्रसंग आले कि ते वाचून अंगावर शहारे आल्याशिवाय राहत नाहीत. शाहद्यातील आदिवासी चळवळीत काम करताना अच्युत गोडबोलेंना आणि त्यांच्या सहकार्यांनी पाहिलेलं ते भयाण दारिद्र्य, तुरुंगातल्या कैद्यांचे अनुभव कथन, सालादारांच्या माफक मागण्यासाठी झालेला रक्तसंघर्ष आणि त्याला चढत असलेला नक्षलवादाचा रंग आणि या सर्वातून तरुण अच्युत च्या मनात चाललेल विचार द्वंद्व. हे सार वाचाताना अंगावर एक रोमांच उभा राहतो आणि त्यावेळेच एक हिरोइसम सुद्धा अनुभवता येतो.
अच्युत गोडबोलेंच व्यक्तिमत्व हे अनेक पैलूंनी बहरलं आहे. लहानपणीचा अभ्यासू अच्युत; आआयटी मधला इंग्रजीला घाबरणारा आणि इंग्रजीच आव्हान स्वीकारून सफाईदारपणे इंग्रजी बोलणारा अच्युत; तासनतास ग्रंथालयात बसून वेड्यासारख वाचन करणारा पुस्तक वेडा अच्युत; आदिवासी चळवळीत भाग घेऊन १० दिवस तुरुंगात घालवणारा आणि डाव्या विचारांचा पुरस्कार करणारा चळवळीतला कार्यकर्ता आणि चळवळीत पूर्णवेळ देता येत नाही म्हणून सतत अपराधी भावनेत राहणारा हळव्या मनाचा अच्युत; माहीममधील फिशरमेन कोलोनितल ते दारिद्र्य अनुभवणारा , दारू, बिडी, सिगारेट इ च लागलेलं व्यसन आणि पुढे त्यातूनच पूर्णपणे सावरलेला अच्युत ; वर्षभर निव्वळ दुनियादारी करत नोकरी साठी भटकणारा भटका अच्युत; संगीत, साहित्य, कला यांमध्ये गुंग होणारा रसिक अच्युत; शोभा च्या प्रेमात हळुवार पणे पडलेला रोमांटिक प्रियकर आणि लग्नानंतरचा आदर्श पती अच्युत , लेकाच्या आजाराने त्रस्त झालेला हळवा बाप आणि त्यासाठी सर्व करायची तयारी असलेला जिद्दी बाप अच्युत; अनेक आव्हानांचा सामना करत प्रोजेक्ट मनेजर ते अनेक कंपन्यांचा CEO असणारा व्यावसायिक अच्युत; वेगवेगळ्या विषयांवर लेखन करणारा अभ्यासू लेखक अच्युत........................... असे एक नाही तर अनेक पैलू अच्युत गोडबोलेंच्या व्यक्तीमत्वात आहेत. ‘स्वताला काहि येत नाही म्हणून त्याचा न्यूनगंड न मानता त्याचे आव्हान स्वीकारून त्यावर मात करणे’ हीच शिकवण मुसाफिर आपल्याला देऊन जातो. अच्युत गोडबोलेन्चा संघर्ष, त्यांच्या कॅरिअर मधले चढ-उतार, विचारधारेच मनातल द्वंद्व आणि त्यातून घडत असलेल व्यक्तिमत्व कधीही हार न मानण्याची शिकवण देऊन जात.
अच्युत गोडबोले या मुसाफिराची मुसाफिरगिरी वाचून अस वाटत कि आयुष्य नावाच्या मद्याची नशा सर्वांचा चढाली पाहिजे जशी या “मुसाफिराला” चढली.
प्रविण
Ek number lihale aahes pustak n vachata khup kahi kalale vel bhetla tr nakki vachen
उत्तर द्याहटवाthanks for reading blog
हटवाछान, अशीच प्रगती करत रहा. मी नक्की वाचेन.
उत्तर द्याहटवाthanks
हटवा