सोमवार, १७ ऑगस्ट, २०२०

“Just Mercy” जस्ट मर्सी- सत्य घटनेवर आधारित एक संघर्ष गाथा”

“Just Mercy” जस्ट मर्सी- सत्य घटनेवर आधारित एक संघर्ष गाथा”

 

जेव्हा आपल्यावर अन्याय होतो तेव्हा आपण न्यायालयात न्याय मागतो ... पण जर न्यायालयातील न्याय हि अन्यायकारक रीतीने देत असतील तर.... या सिस्टीमला बदलणे म्हणजे सिस्टीम विरुद्ध जाणे अर्थात समाजाच्या विरुद्ध जाणे.... अश्या संघर्षालातूनच घडतो नवा समाज... नवीन बदल...

अश्याच एका सत्य घटनेवरील  संघर्षावर आधारित एक वास्तववादि चित्रपट म्हणजे “जस्ट मर्सी” 

हा चित्रपट डेस्टिन डेनील क्रेटोनने दिग्दर्शित  केला असून यातील मुख्य कलाकार मायकेल बि जॉर्डन, जेमी फॉक्स, लार्सन, रॉब मॉर्गन हे आहेत. या चित्रपटात  जेमी फॉक्सने वाल्टर मेकमिल्लानची भूमिका साकारली आहे ज्याला एका खुनाच्या आरोपामुळे फाशीची शिक्षा सुनावली आहे. मायकेल बि जॉर्डनने  ‘ब्रायन स्टीवेसनची ‘भूमिका साकारली आहे.  जो  हॉवर्ड युनिवर्सिटीमधून  नुकतेच वकिलीचे शिक्षण घेतलेला  वकील दाखवला आहे.  या दोघांमधील साम्य असे कि, ते दोघे हि Black Community चे (African American) असतात. अलीकडेच अमेरिकेतील #BlackLivesMatter वर्णभेद संदर्भातील  Movement खूपच वादग्रस्त आणि चर्चेत होती. या आंदोलनाचे बीज हे किती खोलवर रुजलेले असेल याचे उत्तर हा चित्रपट बघताना सापडू शकते. हा चित्रपट त्यातील कथा आणि पात्रे हे सर्व सत्यघटनेवर आधारित आहे.

चित्रपटाची सुरवात १९८७ मध्ये कृष्णवर्णीय अमेरिकनला (Black American) वाल्टर मेकमिल्लान (जेमी फॉक्स) जंगलात झाडे तोडण्याचे काम करून घरी येत असताना रस्त्यावर मध्येच  पोलीस गाडी अडवून त्याला त्याचा गुन्हा न सांगता त्याला  अटक करतात.  त्याला १८ वर्षीय मुलीच्या (White American) खुना प्रकरणी  फाशीची शिक्षा सुनावली जाते.  त्याची रवानगी अमेरिकेतील अलबामा नामक मोठ्या कारागृहात होते जिथे फाशीची शिक्षा  सुनावलेले कैदी असतात. यामध्ये Black American ची संख्या सर्वाधिक असते ज्यांना फाशीची शिक्षा सुनावलेली दिसते.

त्यानंतर ब्रायन (मायकेल बि) ज्याने नुकतेच वकिली क्षेत्रात पदार्पण केलेले असते. तो ज्यांच्यावर सर्वाधिक जास्त अन्याय होतो अश्या black American ला न्यायाच्या मध्यमातून मदत करण्याचे ठरवतो. यासाठी तो ‘Equal Justice Initiative’ची स्थापना करतो. इवा एन्सले एक White American त्याला सहाय्य करत असते. ब्रायन सुरवातीला कारागृहात जाऊन फाशीच्या शिक्षा सुनावलेल्या सर्व कैद्यांची मुलाखत घेतो. या मुलाखती घेतानाचे प्रत्येकाचे अनुभव वेगवेगळे दाखवले आहेत. काहीजण त्याला सहाय्य करतात पाहिजे ती माहिती देतात,  तर काहीजण मोजकेच बोलतात, तर कोणी त्याच्यावर चिडचिड करतात... कारण वकील – कोर्ट- न्याय  या सर्व गोष्टीवरून त्यांचा विश्वास उडालेला असतो.  असे कैद्यांच्या मुलाखती घेतानाच्या नकारात्मक अनुभवासोबतच ब्रायनला कारागृहात प्रवेश मिळण्यासाठी देखील खूप अपमान सहन करावा लागतो. एक कृष्णवर्णीय वकील कसा असू शकतो? त्याच्यावर संशय घेऊन तो  वकील असतानाही त्याची एका आरोपीसारखी पूर्ण कपडे काढून झडती घेतली जाते.   इतका अपमान आणि नकारात्मक अनुभव येत असतानाहि तो आपले प्रयत्न सोडत नाही. तो त्या कैद्यांना भेटत राहतो. सर्व कैद्यांची केस स्टडी करत असताना वाल्टर मेकमिल्लानच्या केस बद्दल माहिती कळते. या केसमध्ये त्याची नीट ट्रायल न होता, कोणताही साक्षीदार आणि कोणताही पुरावा नसतानाहि त्याला फाशीची शिक्षा सुनावल्याचे दिसून येते. याबाबत तो वाल्टर मेकमिल्लानशी बोलण्याचा प्रयत्न करतो पण तो काहीच बोलण्यात उत्सुकता दाखवत नाही. आधीच्या वकिलांनी खूप पैसे घेऊन लुबाडलेले असल्यामुळे त्याचे वकीलाबाबतचे मत हे नकारात्मक होते. पण  ब्रायन वाल्टर मेकमिल्लानच्या कुटुंबियांना त्यांच्या घरी जाऊन भेटतो.  इकडेहि वाल्टर मेकमिल्लानचा मुलगा मागील कटू अनुभवामुळे नकारात्मक वागणूक देतो. पण  वाल्टर मेकमिल्लानची पत्नी आणि इतर नातेवाईक पहिल्यांदा कोणी वकील आपल्याला मदत करण्यासाठी घर पर्यंत आले म्हणून तो ब्रायनवर पूर्ण विश्वास ठेवून पाहिजे ती मदत करायला तयार होतात.  ब्रायन जी संघर्षाची लढाई सुरु तर  करतो पण त्यामुळे त्याला अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. त्याला धमकीचे फोन येणे, पोलीस त्याला अडवून आरोपी सारखे तपासणी करणे, त्याला मदत करणाऱ्यांना धमकी देणे, जो वाल्टरसाठी साक्ष द्यायला कोणी तयार न होणे, जर कोणी साक्ष द्यायची ठरवलीच तर त्याला हि पोलीस अटक करून खोट्या केस मध्ये अटक करत.  कोर्ट मध्ये त्याने केस ची पुन्हा ट्रायल व्हावी म्हणून  याचिका केल्यावर हि सर्व वाल्टर मेकमिल्लान निर्दोष असल्याचे सिद्ध करूनही त्याला अन्याय आणि अपयशच मिळते.

हा सर्व संघर्ष सुरु असताना अनेक दृश्ये मनाला चटका लावणारे आणि स्तब्ध करणारे या चित्रपटात दिसतील.

 जसे कि,

सीन क्र १.

वाल्टर मेकमिल्लानच्या बाजूच्या बेरेक मधील एक कैदी ज्याला फाशीची शिक्षा होते. त्याला जेव्हा त्याला त्याची शेवटची इच्छा विचारतात तेव्हा तो त्याचे नेहमीचे गाणे लावण्याची इच्छा व्यक्त करतो. ते गाणे ऐकत तो फाशी यार्ड पर्यंत तर जातो पण तिथे आत जाताना त्याचा हि धीर खचतो. एका खुर्चीला बांधून इलेक्ट्रिक शॉक देऊन  त्याला फाशी दिली जाते. त्याच्या साठी बाकीचे कैदी  वाटी वाजवून शोक व्यक्त करताना दिसतात.  

सीन क्र २.

जेव्हा कोर्ट रूम मध्ये वाल्टर मेकमिल्लानची अपील सुरु असते तेव्हा त्याच्या कुटुंबियांना कोर्ट रूम मध्ये प्रवेश देत नाही. त्या कोर्टरूम मध्ये प्रथम गोरे अमेरिकनला प्रवेश मिळतो मग आफ्रिकन अमेरिकनला प्रवेश दिला जातो. यावेळेस ब्रायन त्याचा वकील असतानाहि त्याला प्रवेश नाकारले जाते. कोर्ट रूम मध्ये त्याचे कुटुंबीय आणि इतर नातेवाईकाना आरोपी प्रमाणे शेवटी उभे राहावे लागते.      

सीन क्र ३.

ब्रायनची कारागृहात त्याला नग्न करून झडती घेतानाचा क्षण.... एक आफ्रिकन अमेरिकन वकील कसा असू शकतो म्हणून त्याला अनेकदा संशयास्पद आणि अपमानास्पद वागणूक दिली जाते... ते क्षण असे अनेक सीन खूप उत्कृष्ट रित्या या चित्रपटात दाखवले आहेत.

सीन क्र ४.

ब्रायन लोअर कोर्टमध्ये वाल्टर मेकमिल्लानच्या बाजुचे साक्षी- पुरावे देऊन सुद्धा जेव्हा वाल्टर मेकमिल्लानच्या विरुद्ध कोर्ट फाशीची शिक्षा सुनावते. तेव्हा वाल्टर मेकमिल्लानच्या मुलाचा आपल्या वडिलांसाठीचा आक्रोश खूप भावनात्मक दाखवला आहे.

 

एकूणच कृष्णवर्णीयांवर या पूर्वी हि अनेक अन्यायांना सामोरे जावे लागले होते. त्यांना गुलाम म्हणून वागविले जात होते. या चित्रपटात त्या बहुतेक गोष्टी मांडल्या आहेत. त्यांच्या वरील होत असेलेले अन्याय दूर करण्यसाठी अनेक संघर्ष  आणि आंदोलने करावी लागली. ‘जस्ट मर्सी’ हि त्यातील एक  संघर्षाची लढाई आहे. 

चित्रपटाच्या अखेरीस ब्रायन १९९२ च्या CBS न्यूज चेनेलच्या माध्यमातून वाल्टर मेकमिल्लानची केस मिडियाच्या माध्यमातून सर्वांसमोर आणतो. ज्यात त्याच्या बाजूने कोणताही साक्ष – पुरावा नसतानाहि त्याला कशी फाशीची शिक्षा सुनावली जाते त्याचे व्हिडीओ रेकोर्डिंग टीव्हीवर दाखवतो.  यानंतर  १९९३ मध्ये अलबामा सुप्रीम कोर्टमध्ये दाखल केलेल्या याचिके नंतर त्याला निर्दोष मुक्तता मिळते. पण त्यानंतर हि वाल्टर मेकमिल्लान ब्रायन सोबत आपली लढाई आणि संघर्ष सुरु ठेवतो. या चित्रपटाला टोरेनटो इंटरनेशनल फिल्म फेस्टिवल २०१९ मध्ये पुरस्कार मिळाला आहे. नेशनल बोर्ड ऑफ रिव्ह्यू २०२० मध्ये फ्रीडम ऑफ एक्प्रेशन चा पुरस्कार मिळाला आहे. असे अनेक पुरस्कार या चित्रपटाला मिळाले आहेत. या चित्रपटातील वकील ब्रायन याने ‘Just Mercy: A Story of Justice and Redemption’ हे पुस्तक देखील २०१४ मध्ये  लिहिले आहे. ‘Equal Justice Initiative’ हि ब्रायनने सुरु केलेली फर्म  आजही कार्यरत आहे. जी क्रिमिनल जस्टीस सिस्टीम मध्ये समान न्याय आणि हक्क मिळावा यासाठी संघर्ष करत असते.

हा चित्रपट “Amazon Prime” वर उपलब्ध आहे. यावरील पुस्तक देखील एमेझोन वर उपलब्ध आहे.  Black Racism, #blacklivesmatter वर्णभेद हे किती क्रूरपणे केले जाते. या विरुद्ध होणारे आंदोलने आणि संघर्ष करणे किती अवघड असते या चित्रपटातून कळून येईल.

ज्यांना समान न्याय- हक्क आणि कोर्ट रूम ड्रामा सारखे चित्रपट आवडत असतील त्यांनी हा चित्रपट एकदा नक्कीच बघायला पाहिजे.

“…because I now know that hopelessness is the enemy of justice. Hope allows us to push forward, even when the truth is distorted by the people in power. It allows us to stand up when they tell us sit down, and to speak when they say “Be quiet”

-          Brayan Stevenson


लेखिका : अंजली प्रविण, ८+ वर्षांपासून समुपदेशक आणि डेटा विश्लेषक  म्हणून सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. 

amkar.anju@gmail.com 

पुढील लेखासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

1 टिप्पणी:

कांदे पोहे कि सौदेबाजी....की विवाह संस्थेच फाऊंडेशन

 कांदे पोहे कि सौदेबाजी....की विवाह संस्थेच फाऊंडेशन   काही चांगल्या / कमावत्या मुलांची लग्न ठरत नाही मग ती मुलं किंवा त्याच्या घरचे मुलींना...